Author: bittambatami.com

कपिल पाटील यांचे कुटुंबियांसह दिवेअंजुर येथे मतदान

भिवंडी : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिवेअंजुर गावातील प्राथमिक शाळेतील बूथ क्र. ३१८ मध्ये कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन माझ्यावर दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ ठरवावा, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दिवेअंजुर येथील गावात कपिल पाटील यांनी कुटुंबियांसह सकाळी सव्वासातच्या सुमारास रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांचे पत्नी सौ. मीनल यांनी औक्षण केले. त्यानंतर त्यांनी श्री शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले. वडील स्व. मोरेश्वर पाटील, भाऊ स्व. पुरुषोत्तम पाटील यांच्या प्रतिमांना वंदन करून आशीर्वाद घेतले. देशहित व राष्ट्रहितासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता मतदारांनी मतदानाचा हक्क बजाावावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले होते.

पत्रकार संघर्ष  समितीची मागणी

बेकायदेशीर होर्डिंग्ज / मोबाईल टॉवरवर करवाई करण्याची पनवेल : मुंबईतील घाटकोपर होर्डिंग्ज  दुर्घटनेची घटना पनवेल महापालिका हद्दीत होऊ नये याकरिता , पनवेल महानगर पालिका हद्दीतील बेकायदेशीर होर्डींज ,मोबाईल टॉवर तातडीने काढण्याचे  आदेश द्यावेत  अशा आशयाचे निवेदन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी  पनवेल महापालिका आयुक्तांना ई-मेल द्वारे दिले आहे. , होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना ,अपघात होण्याच्या घटनेत वाढ होत आहे याला मुख्य कारण म्हणजे स्थैर्यता प्रमाण पत्र नसणे , तज्ज्ञांकडून होर्डिंग्ज चे डिझाईन न करणे ,वेळोवेळी त्या होर्डिंग्ज ची  न तपासणी करणे ,स्ट्रॅकचर  ऑडिट न  करणे  तसेच बाह्य जाहिराती करताना उभारलेले होर्डिंग्ज यांचे आकार मर्यादित नसणे त्या भागातील वाहणारे  पावसाळी वादळ वारे यांचा आढावा घेऊन आकार ठरवून न देणे  अशी विविध करणे अपघातास कारणीभूत असून यामुळे  निरपराध नागरिकांचे नाहक बळी जात आहेत . या निवेदनाद्वारे अशी विनंती करणेत येत आहे कि १)  पनवेल महापालिका हद्दीतील बेकायदेशीर होर्डिंग्ज तातडीने काढण्याचे आदेश आपल्या स्तरावर द्यावेत , २) महापालिका हद्दीतील बेकायदेशीर मोबाइलला टॉवर तातडीने काढावेत ,३) ब्युरो ऑफ  इंडियन स्टॅंडर्ड या राष्ट्रीयकृत  जे निकष ठरवून दिले आहेत त्या निकषाच्या आधारे परवाना धारक होर्डिंग्ज ची तपासणी करावी त्यात  तफावत   असल्यास ते होर्डिंग्ज हि तातडीने काढण्यात यावेत ,४)स्टॅबिलिटी  सर्टिफिकेट महापालिका अभयंत्याकडून तपासून घेण्यात यावेत अथवा महापालिका अभियंत्यांकडून  फेर तपासणी करावी तसा अहवाल सादर करून ठेवावा दुर्घटना घडल्यास महापालिका अभियंत्यांवर हि कारवाई करावी  ५)ज्या होर्डिंग्ज ला महापालिकेने परवानगी  दिली आहे त्या होर्डिंग्ज ची दरवर्षी / वेळोवेळी डागडुजी करणे परवानाधारकाला बंधनकारक करावे ,कुठे वेल्डिंग निखळली  असेल , कुठे बेसमेंट जवळ अनेक वेळा खोदकाम होते ,सिमेंट निघते ती दुरुस्त करण्याच्या सूचना द्यावेत ,५ ) पनवेल महापालिका हद्दीत डिजिटल  जाहिरात  फलक लावण्यात आले आहेत  असे डिजिटल फलक वाहनधारकांचे आणि नागरिकांचे विशेष करून संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस लक्ष विचलित होण्यास कारणीभूत ठरत आहेत अशा फलकाचे जाहिरात धोरण ठरवुन त्यांना हि यामुळे अपघात होणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देष द्यावेत   ६ ) ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग्ज उभारल्या आहेत त्या इसमांवर फोजदारी कारवाई करावी तसेच उभारलेली होर्डिंग काढण्याचा खर्च वसूल  करण्यात यावा . अशा आशयाचे निवेदन पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानग पालिकेला दिले आहे.

जबाबदार नागरिकाचे कर्तव्य बजावल्याचा अभिमान

मुंबई : लोकशाहीच्या उत्सवात मतदान केंद्रावर जात नवमतदारांनीही आपले कर्तव्य बजावले. प्रथमच मतदानाचा अधिकार मिळालेल्या नवमतदारांनी मोठ्या उत्साहात सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर जात लोकशाहीच्या प्रति असलेले आपले कर्तव्य बजावले. मुंबई…

मतदानात खेळाडू, कलाकारांचा मोठा सहभाग

विरार : पालघर मतदारसंघात आज खेळाडू, कलाकार आणि साहित्यिकांनी मतदान करून वेगळी जागृती केली. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू, मोठे साहित्यिक आणि कलाकारांचा समावेश होता. त्यांच्या मतदानाने मतदान जागृतीला चालना मिळाल्याचे बोलले…

दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

मतदारांत तीव्र संताप दिवा : दिव्यातील मतदारांचे नेहमीचे मतदान केंद्र बदलल्याने नाराजीचा सूर आहे. दिव्यातील गेल्या 30 ते 40 वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांचे मतदान ते स्वतः रहात असलेल्या ठिकाणापासून नेहमी…

मर्यादित वाहतूक सेवेमुळे मतदारांचे हाल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तसेच प्रचारयात्रेमुळे काही काळ मेट्रो सेवा, अनेक ठिकाणचे रस्ते बंद केल्याने मुंबईकरांचा खोळंबा…

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक- पुनिता गुरव

अशोक गायकवाड रायगड :आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन मतशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड पुनिता गुरव यांनी केले आहे. सन-२०२४-२५ या वर्षाकरिता…

शहापूरमध्ये मतदार महिलांसाठी पाळणाघराची व्यवस्था

खर्डी : शहापूर विधानसभा मतदारसंघातील खर्डी मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या महिलांच्या लहान मुलांसाठी अंगणवाडी सेविकेच्या साहाय्याने पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. मुलांसाठी खेळणी व खाऊची सोय करण्यात आली होती. आजनुप…

मतदान केंद्रावर संस्कृती, परंपरांचा जागर

कासा : पालघर लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून जागृती करण्यात येत आहे. डहाणूमधील विविध मतदान केंद्रांवर आदिवासी, ग्रामीण परंपरांचे…

राज्यपाल रमेश बैस – रामबाई बैस यांचे द. मुंबईत मतदान

अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाअंतर्गत मलबार हिल येथील राजभवन भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राज्यपालांच्या पत्नी…