Author: bittambatami.com

राज्यात उष्णतेचा पारा चाळीशीपार

मुंबई : राज्याच्या विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसच्या आकडा गाठला आहे. तर आज विदर्भात सर्वाधिक तापमान 41.5 अंश सेल्सिअस हे अकोल जिल्ह्याचे नोंदविण्यात आले आहे. हे तापमान विदर्भासह राज्यातील सर्वाधिक असल्याचे नोंदविण्यात…

सहा नक्षलवावाद्यांचा खात्मा

गडचिरोली : छत्तीसगडच्या बिजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर चिप्पूरभट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या या नक्षलवावाद्यांचा डाव पोलिसांनी…

ठाकरेंचे अबतक सतरा; मविआला खतरा

स्वाती घोसाळकर मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाहीविरोधात महाविकास आघाडीच्या नावाखाली एकवटलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या आघाडीलाच आता हादरे बसू लागेल आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने…

नवनीतजींना भाजपाचे तिकीट

हनुमान चाळीसा फळली शैलेश तिवटे अमरावती : अमरावतीतील स्व‍कीयांचा विरोध डावलून भाजपा श्रेष्टींनी विद्यमान अखेर खासदार नवनीत राणांना तिकीट दिले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात हनुमान चाळीसा पठण करण्यासाठी मातोश्रीवर धडक देण्याच्या…

महाराष्ट्र शासनाच्या समाज भुषण पुरस्काराने अरुण शिरसाट सन्मानित

मुंबई : सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात जनजागृती तसेच  कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ॲडव्होकेट अरुण नथुजी शिरसाट यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदाचा आता राजीनामा द्यावा

सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री या पदावर विराजमान असलेले आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे कथित मद्य घोटाळ्यात मनी लॉन्ड्रींच्या आरोपावरून इकॉनोमिक एनफोर्समेंट डायरेक्टोरेटच्या कस्टडीत बंद आहेत. एनफोर्समेंट डायरेक्टोरेट ही देखील…

जरांगेशी युती केली तरी आंबडेकरांना पाठींबा- शेंडगे

रमेश औताडे मुंबई  : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर व मनोज जरांगे पाटील यांची लोकसभेसाठी युती झाली तरीही मी त्यांना यक्तीगत अकोल्यात मदत करणार , कारण ते मला सांगलीत व्यक्तिगत…

आव्हाडांसारख्या कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा-आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे: ठाणे खारलॅण्ड चे मैदान वैयक्तिक जहागीर आहे, अशा प्रकारचा वापर डॉ जितेंद्र आव्हाड करीत आहेत. अजितदादा यांचा या प्रकरणाशी सुतराम संबंध नसताना ते जोडणे ही कला जितेंद्र आव्हाड यांच्याकडून…

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मुंबई : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे…

विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात संगीतमय धूलिवंदन

रंगाच्या उधळणीबरोबरच संगीतात रमली तरुणाई ठाणे : विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील भगवती मैदानावर अपूर्व उत्साहात संगीतमय धूलिवंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीने सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पारपंरिक व नैसर्गिक पद्धतीने धूलीवंदनाबरोबरच बहारदार गाण्यांवर तरुणाईने ठेका धरला. या उत्सवाला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदू संस्कृतीतील प्रमुख सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरे करण्यावर विश्वास सामाजिक संस्थेकडून प्राधान्य दिले जाते. त्यानुसार यंदा नौपाड्यातील भगवती मैदानावर धूलीवंदनाच्या दिवशी सकाळी ११ पासून रंगोत्सव २०२४ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने धूलीवंदनाबरोबरच बहारदार संगीताची मैफल सादर करण्यात आली. धूलीवंदनानिमित्ताने प्रसिद्ध गायक-गायिका सारिका सिंग, अनुजा वर्तक, विद्या शिवलिंग, सई जोशी, प्रशांत मापेरी, निलेश निरगुडकर, सतीश भानुशाली यांच्या वतीने सादर केल्या जाणाऱ्या प्रसिद्ध गीतांवर तरुणाईने ठेका धरला. रंगाची मुक्त उधळण करीत नागरिकांनी धूलीवंदन साजरे केले. विश्वास सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष संजय वाघुले यांच्याबरोबरच भाजपाचे नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर, नौपाडा प्रभाग अध्यक्ष रोहित गोसावी, भाजपा जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य गौरव अंकोला, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले, विश्वास सामाजिक संस्थेचे सदस्य अमित वाघचौरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी मेहनत घेतली.