Author: bittambatami.com

धर्मआधारीत आरक्षण दिल्यास मोदींना विरोध करू  – शरद पवार 

कोल्हापूर : सामाजिक तणाव वाढवण्यासाठीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मावर आधारित आरक्षण देण्याची भाषा करीत आहेत.  देशात धर्मावर आधारीत आरक्षण ही संकल्पनाच आम्हांला मान्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी असे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यास विरोध…

विजया राम शेवाळकर  यांचे दुःखद निधन 

नागपूर : वक्ता दशसहतस्रेषु  प्राचार्य राम शेवाळकर यांच्या सहधर्मचारिणी व चि.आशुतोष ची आई श्रीमती विजयाताई यांचे आज गुरूवारी २ मे २०२४ रोजी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी,नागपूर येथील डॉक्टर माहूरकर…

श्रीकांत पाच लाखांच्या लीडने जिंकणार –शिंदे

अनिल ठाणेकर ठाणे : मागील १० वर्षात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कामांच्या माध्यमातून स्वत:ची छाप सोडली आहे. आजची रॅली ही विजयाची रॅली आहे. कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांच्या आशिर्वादाने कल्याण डोंबिवली मतदार…

नरेश म्हस्केंना टेन्शन !

भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु ठाणे : प्रचंड खटपट करून शिंदेसेनेने ठाण्याची लोकसभा जागा भाजपाचा दबाव मोडून मिळवली असली तरी अडचणी अजून संपल्यानसून उलट त्या दुपटीने वाढल्या आहेत. यामुळेच शिंदेसेनेची उमेदवारी मिळविणारे…

घणसोलीत मृतदेहांना ‘मरणयातना’ !

रमेश औताडे मुंबई- जगण्याने छळले होते, मरणाने सुटका केली ही सुरेश भटांची गाजलेली गजल… पण भटांच्या गझलेत मरणानंतर सुटका होत होती, येथे घणसोलीत मेल्यानंतरही मृतदेहाच्या वाट्याला मरणयातना येत असल्याबद्दल नागरिकांत संताप…

सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये द्यावी – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे : सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्यानुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवानगी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येईल. हा कक्ष कार्यालयीन वेळेत कार्यरत राहील, असे जिल्हा  कळविले आहे.तरी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या आवश्यक कार्यपध्दतीचा अवलंब करुन सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहे. संबंधित एक खिडकी कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या परवानग्या पुढीलप्रमाणे- कार्यक्षेत्र- ठाणे जिल्हा, वाहन परवाना- १.नोंदणीकृत राजकीय पक्ष, २.नोंदणीकृत पक्षाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी. परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (लोकसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, वाहन परवाना : उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५. व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६. चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८. वाहनाच्या चारही बाजूचा फोटो.कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, वाहन परवाना- उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो.कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, तात्पुरते पक्ष कार्यालय उभारणे, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष), ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १.संबंधित जागा मालक यांची संमती, २.स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३.पोलीस विभाग.कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग.कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ- कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ- रॅली / मिरवणूक / रोड शो / पदयात्रा/ पथनाटय / लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – 1. पोलीस विभाग, २.वाहतूक नियंत्रण विभाग. कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ- रॅली / मिरवणूक / रोड शो / पदयात्रा/ पथनाटय / लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – 1. पोलीस विभाग, २.वाहतूक नियंत्रण विभाग. एकापेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघातील मिरवणूक/रॅलीच्या परवानगीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र अर्ज करण्यात यावा, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.कार्यक्षेत्र-लोकसभा मतदारसंघ- स्टेज/बॅरोगेट/रोस्ट्रम, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ – स्टेज/बॅरोगेट/रोस्ट्रम, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी कक्षातील सक्षम पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र.कार्यक्षेत्र-ठाणे जिल्हा- हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवाना, परवानगी देणारे अधिकारी – अतिरिक्त  जिल्हादंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आदी सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

एप्रिल महिन्यातील १० सेवानिवृत्तांचा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते सन्मान

नवी मुंबई : बदलत्या काळात आता निवृत्ती शब्दाचा अर्थही बदललेला असून आज निवृत्ती म्हणजे केवळ एका टप्प्यातून आपले दुस-या टप्प्यात स्थलांतर आहे. त्यामुळे जीवनाच्या या पुढच्या टप्प्यातही आपण कृतीशील राहून…

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाजरत्न पुरस्काराने सन्मान

ठाणे : जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष निलेश सांबरे यांना न्यू हिंदुस्थान कामगार सेनेने समाज रत्न पुरस्कार २०२३-२४ ने सन्मानित केले. कल्याण पश्चिम येथील मराठा मंदिर सभागृहात न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्यावतीने…

 रेल्वेची सेवा ही प्रवाशांची की कंत्राटदार व रेल्वे अधिकाऱ्यांची !

 प्रवासी समितीचा प्रशासनाला सवाल रमेश औताडे मुंबई : भारतीय सैन्य दलानंतर भारतीय रेल्वेला अर्थसंकल्पात सर्वात जास्त आर्थिक तरतूद केली जाते. मात्र रेल्वेची सेवा ही प्रवाशांची आहे की कंत्राटदार व रेल्वे अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी आहे. ज्या ठिकाणी त्या कामाची दुरुस्ती करण्याची गरज नसताना ती कामे करोडो रुपयांची टेंडर काढून केली जात आहेत. पिण्याचे पाणी नसणे, अस्वच्छ प्रसाधनगृह, बंद पंखे, बसण्यास अपुरी बाकडी, अशी अनेक प्रकारची गैरसोय असल्याने  प्रवासी सेवा सुविधा पासून वंचित राहत आहेत. प्रवाशांची चूक काय ? ते मोफत प्रवास करतात का ? असे अनेक सवाल करत प्रवासी समिती चे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते  अमोल मोरे यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत पत्रव्यवहार करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. रेल्वे डब्यातील स्वच्छता, बंद असलेले पंखे, दरवाजाच्या तुटलेल्या कड्या, जॅम झालेल्या खिडक्या, भिकारी, तृतीय पंथी यांनी डब्यात सुरू केलेला मनमानी व्यवसाय, मोबाईल चोर, अस्वच्छ मुतारी, रेल्वे स्थानकातील बंद असलेले पंखे, अर्धी अक्षरे गायब झालेली इंडिकेटर्स, बसायला अपुरी बाकडी, जी आहेत त्यावर भिकारी व गर्दुल्ले यांनी केलेले अतिक्रमण, पिण्याच्या पाण्याची पाणपोई बंद असल्यामुळे विकतचे पाणी घ्यावे लागते. अशा अनेक प्रकारे गैरसोईचा सामना करत मजबुरीने घामाच्या धारांनी ओलेचिंब झालेले प्रवासी संतप्त होत नाराजी व्यक्त करत आहेत. ज्या ठिकाणी गरज नसताना दुरुस्तीची कामे काढली जातात. जसे की , नवीन लाद्या मोठ्या ड्रिल मशीन ने काढणे, या लाद्या नवीन असताना कांत्रादराला या लाद्या चेंज करायला सांगण्यापेक्षा ज्या कंत्राटदाराने पंखे, पाणी, स्वच्छता याची टेंडर भरून सेवा देण्याचे मान्य केले असताना ते बडे कंत्राटदार रेल्वे अधिकाऱ्यांचे का ऐकत नाहीत ? प्रवाशी फुकट प्रवास करतात का ? असे अनेक सवाल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी पत्रव्यवहार करून रेल्वे प्रशासनाला विचारले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे ऐतिहासिक वास्तू म्हणून नोंद झालेले आहे. त्या ठिकाणी वारांगना, फेरीवाले, भिकारी, पान तंबाखू गुटखा विक्री होत आहे, अनधिकृत पणे बोगस फेरीवाल्यांनी मूळ रस्ता, फुटपाथ अडवले आहेत. स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस, होमगार्ड, सुरक्षा महामंडळ रक्षक, आरपीएफ जवान, पालिका विजिलांस डिपार्टमेंट, रेल्वे दक्षता पथक, इतर सर्व यंत्रणा यांना  वेतन भत्ते, वेतन आयोग, बोनस, पेन्शन इतर सेवा सुविधा कर्तव्य पार पाडत नसतानाही का दिल्या जातात? असे अनेक सवाल प्रवासी व प्रवासी संघटना करत आहेत.

सर्वजण महायुतीचा धर्म पाळतील

नरेश म्हस्के यांचा विश्वास ठाणे : कार्यकर्ते हे साहजिकच संजीव नाईक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांना वाईट वाटणारच. परंतु ही महायुती असल्याने ही परिस्थिती निवळेल आणि सर्वजण एकत्र कामाला लागतील आणि महायुतीचा धर्म पाळला जाईल असा विश्वास ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी नवी मुंबईत नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असतांना त्याचे पडसाद उमटत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. परंतु सर्वच जण महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. म्हस्के हे गुरुवारी सकाळी गणेश नाईक यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले आदी नेते मंडळी उपस्थित होते. आपण नाईक यांचा आर्शिवाद घेण्यासाठी गेलो होतो, त्यांच्यासह संदीप नाईक, सागर यांनाही भेटलो असल्याचे म्हस्के म्हणाले. मात्र कार्यकर्त्यांशी कुठल्याही भेटागाठी झालेल्या नाहीत. कार्यकर्त्यांची कुठे बैठक झाली याची माहिती नसल्याचेही ते म्हणाले. मी लहाणपणापासून नाईक यांना भेटत होतो. त्यावेळी देखील ते कौतुक करीत होते. आजही गणेश नाईक यांनी मला आर्शिवाद दिला आहे. काही चिंता करायची गरज नाही, नवी मुंबईतून लीड मिळेल, सर्व काही मी पाहीन काही अडचण असेल तर मला सांग अशा पध्दतीने त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असल्याचेही त्यांनी सांगितले. मी साधारण, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. लोकांमधला कार्यकर्ता आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिलेली आहे. त्या संधीचे मी सोने करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांना शक्ती प्रदर्शनाच्या मुद्यावर छेडले असता, आम्हाला शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, जी आमची शक्ती आहे, ती या ठिकाणी दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.