दिवस-रात्र कबड्डी स्पर्धेचे सोयगाव येथे उद्घाटन
छञपती शिवाजी क्रीडा मंडळाच्या सोयगाव : येथील छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ व क्रीडा भारती छ्त्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवस रात्र ५५ वजनी गटाच्या ५ तसेच ५७ वजनी गटाच्या २…
छञपती शिवाजी क्रीडा मंडळाच्या सोयगाव : येथील छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ व क्रीडा भारती छ्त्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवस रात्र ५५ वजनी गटाच्या ५ तसेच ५७ वजनी गटाच्या २…
राजेंद्र साळसकर नागपूर : मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि अधिग्रहित उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्वसन प्रकल्पांमध्ये विकासकांकडून दिशाभूल करण्याचे काम केले आहे.त्यामुळे लाखो सर्वसामान्य नागरिक फसवणूकीला बळी पडले आहेत.मुंबईत सध्या पाच हजार पुनर्विकास प्रकल्प प्रलंबित असल्याचा मुद्दा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )आमदार सुनिल शिंदे यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेख सुचनेद्वारे उपस्थित केला. त्यामुळे या प्रकल्पांमुळे बाधित सुमारे तीन लाख कुटुंबे बेघर झाली आहेत.यातील काही प्रकल्प अपूर्ण आहेती, तर काही अजून सुरूही झालेले नाहीत.हे रहिवासी मोठ्या आर्थिक संकटात आहेत.या रहिवाशांना विकासकांविरोधात महारेरा प्राधिकरणाकडे याचिका करता यावी, यासाठी कायद्यात तरतूद करावी.अशी मागणी आमदार सुनिल शिंदे यांनी विधान परिषदेत केली. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडा अधिका-यांच्या संगनमताने अनेक विकासकांनी पात्र रहिवाशांना अपात्र घोषित केलेले आहे.या पुनर्वसन प्रकल्पातून अपात्र ठरलेले,आपल्या हक्कापासून वंचित राहिलेले रहिवाशी त्यांते हक्क मिळविण्यासाठी धडपडत आहेत.अशा स्थितीत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि उपकरप्राप्त इमारतींच्या गृहनिर्माण प्रकल्पातील रहिवाशांना फसवणूक केलेल्या विकासकाविरोधात महारेराकडे तक्रार करता यावी यासाठी तरतूद करावी अशी मागणी केली. आमदार शिंदे म्हणाले की, मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पुनर्विकास प्रक्रियेत विकासक भाडे देत नाहीत. एवढेच नाहीतर इमारतीचा पुनर्विकासही होत नाही,अशा समस्या वारंवार येत आहेत.अनेक पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांचे छत हरवले आहे.अनेक पिढ्या संपत आहेत.असे असूनही लोकांना घरे मिळालेली नाहीत.
राजेंद्र साळसकर अकोला – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी अकोला येथे संपन्न होत असून त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध कीर्तनकार आणि संवेदनशील कवी शामसुंदर महाराज सोन्नर यांची निवड झाली आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून श्री गुरुदेव सेवा मंडळ युवा कार्यकर्ते मंगेशदादा कराळे यांची निवड झाली आहे, अशी माहिती रामेश्वर बरगत यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे गेल्या ११ वर्षांपासून आयोजन केले जात असून यात राष्ट्रसंताच्या साहित्यातील अध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय, साहित्यिक भूमिकांचे चिंतन होते. या विचार साहित्य संमेलनात साहित्य क्षेत्रातील विचारवंत सहभागी होत असतात. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिकाची निवड केली जाते. या वर्षी या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची निवड करण्यात आलेली आहे. शामसुंदर महाराज हे ज्येष्ठ पत्रकार असून संवेदनशील कवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्या अनेक कवितांचे संदर्भ अनेक वक्त्यांच्या भाषणात कोट केले जातात. त्यांच्या तीन कवितांचे वाचन विधानसभेत वेगवेगळ्या आमदारांनी केले असून कवितेच्या रूपाने त्यांच्या विचारांची नोंद विधिमंडळाच्या रेकॉर्डमध्ये झालेली आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबरोबरच पत्रकार म्हणूनही त्यांनी सामना, लोकमत, प्रहार या दैनिकात विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. कीर्तन परंपरेला सामाजिक भान देण्यात त्यांचे मोलाचे योगदान असून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल विविध माध्यमांनी घेतलेली आहे. संत साहित्य आणि संविधान यांच्यातील परस्पर पुरकता अधोरेखित करणारे संविधान कीर्तन त्यांनी प्रचलित केले आहे. शिवाय पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये संविधान समता दिंडीच्या माध्यमांतून ते प्रबोधन करतात. त्यांच्या सामाजिक, साहित्यिक, अध्यात्मिक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आल्याचे रामेश्वर बरगत यांनी सांगितले.
ठाणे : पारंपारिक वेशभूषा, पायांना आपसूक ठेका धरायला लावणारे लोकसंगीत आणि कोळी पद्धतीने बनवलेल्या जेवणाची साथ यामुळे चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित कोळी महोत्सव मोठया उत्साहात पार पडला. त्यात ख्यातनाम…
– सहा लाखांचे नुकसान; रात्री दोन वाजेची घटना सोयगाव-सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव चौफुली वर असलेल्या स्वामी समर्थ ऑटो गॅरेजला शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून गॅरेजच्या दुकानाचा अक्षरशः कोळसा झाला…
जरंडीच्या फुले विद्यालयात पालकाच्या संमतीसाठी बैठक सोयगाव : डिसेंबर महिना शालेय शैक्षणिक सहलीचा महिना आहे त्यासाठी मात्र गटशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, यांच्या परवानगी शिवाय पालकांची संमती आवश्यक केल्या मुळे शनिवारी जरंडीच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात पालकांच्या संमती साठी बैठक आयोजित करण्यात आली होती जरंडी च्या फुले विद्यालयाची २६ ते २९ या चार दिवसांच्या कालावधीत कोल्हापूरसह विविध ठिकाणी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी एसटीला पालकांची संमती आवश्यक असल्याने ही बैठक घेऊन मुख्याध्यापक एस एन महाजन यांनी सहलीची माहिती दिली यावेळी त्यांनी पालकांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांजवळ घरचे मोबाईल क्र देण्याचे सांगून पालकांची संमती घेतली दरम्यान एस टी ला विद्यार्थ्यांचा विमा आवश्यक असल्याने सोयगाव आगारने जरंडीच्या ८२ विद्यार्थ्यांचा विमा उतरविला आहे दरम्यान बैठकीत राजेंद्र वाघ,आर आर हनुमंते,श्रीमती सुजाता शिंदे आदींची उपस्थिती होती यावेळी उपसरपंच संजय पाटील, साईदास पवार दिलीप महाजन, आदींनी समस्या मांडल्या दरम्यान यावेळी बनेखा तडवी, अनिल महाजन, नंदू महाजन, अनिल जाधव,सांडू जाधव, विकास राठोड, ज्ञानेश्वर महाजन समाधान चव्हाण सोपान पाटील,अनिल पाटील,आदींसह पालकांची उपस्थिती होती. 000
माणिकराव कोकाटेंचा टोला हरिभाऊ लाखे नाशिक -सरकार स्थापन होऊन ४ दिवस झालेत, दम तर काढला पाहिजे. छगन भुजबळांना जे वाटतं ते त्यांनी मागावे. मला वाटतं भुजबळांनी देशाचा पंतप्रधान व्हावे. मला काय…
अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २२ डिसेंबर १ वाजल्यापासून ते ५ जानेवारी पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात २५ डिसेंबरला नाताळ सण तसेच ३१ डिसेंबर रोजी नववर्ष स्वागत समारंभ साजरे होणार आहेत. त्यानिमित्त जिल्ह्यात समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सद्या राज्यात राजकीय व जातीय तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचे पडसाद सणादरम्यान पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितिनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम,, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.
ठाणे – सुधागड तालुका रहिवाशांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी कार्यरत असलेल्या ठाणे शहरातील सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे या संस्थेच्या 2025 दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे खजिनदार विजय पवार, उपखजिनदार विजय जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, उपाध्यक्ष शंकर काळभोर, सांस्कृतिक कार्यप्रमुख जनार्दन घोंगे, उद्योजक चिमाजी कोकाटे, सल्लागार विठ्ठल खेरटकर, रमेश सागळे, गणपत डिगे, अनिल सागळे, सुरेश शिंदे, क्रीडा समिती प्रमुख राकेश थोरवे, अंतर्गत हिशेब तपासणीस दत्ता सागळे, कार्यकारी सदस्य अनिल चव्हाण, राम भोईर, श्याम बगडे, सखाराम चव्हाण, सखाराम घुले, भगवान तेलंगे, राजेश बामणे, प्रवीण बामणे, प्रसिद्धीप्रमुख अजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई : मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत एस सणस, SS टाईप,रूम नं 941, सेक्टर-3, कोपरखैरणे, नवी मुंबई, यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर तोडक कार्यवाही करण्यात आली. सदर बांधकाम धारकांकडून रु.10,000/- दंड वसूल करण्यात आला. तसेच, कोपरखैरणे विभागातील फेरीवाला व दुकानांवर मार्जिनल स्पेस कारवाई करण्यात आली व एकूण 12500/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. कोपरखैरणे विभागातील सेक्टर 9 येथील एकूण 9 झोपड्या हटविण्यात आल्या. सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त सुनिल काठोळे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी नमुंमपा पोलीस बंदोबस्त होता. तसेच 8 मजूर, 02 इलेक्ट्रॉनिक हॅमर, गॅस कटर 01,पिकअप व्हॅन 01 कारवाई करीता वापर करण्यात आले. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.