Author: bittambatami.com

 भाजपा बँक ठेवी मोडून महानगरपालिका दिवाळखोरीत काढणार :-सुरेशचंद्र राजहंस

भाजपा बँक ठेवी मोडून महानगरपालिका दिवाळखोरीत काढणार :-सुरेशचंद्र राजहंस मुंबई : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून मागील १२ वर्षांत काहीही विधायक कार्य केले नसून काँग्रेस सरकारने ७० वर्षात उभी केलेली देशाची संपत्ती विकण्याचा सपाटा लावला आहे. देश विकणाऱ्या भाजपाची वक्रदृष्टी आता मुंबई महानगरपालिकेच्या बँकेतील मुदत ठेवींवर पडली असून ३६ हजार ६२३ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी मोडण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. हा पैसा मुंबईकरांचा असून त्यावर भाजपा दरोडा टाकत आहे असा आरोप मुंबई काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे. भाजपा सरकारने देशातील विमानतळ, बँका, विमा कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग एक-एक करून विकण्याचा सपाटाच लावला आहे. देश विकून देश चालवला जात आहे, आता त्यांची नजर मुंबई महानगरपालिकेत असलेल्या ८१ हजार ४४९ कोटी रुपयांच्या मुदत ठेवीवर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील काही वर्षापूर्वी मुंबई दौऱ्यावरील भाषणात त्यांनी ‘पैसा बँकेत पडून’ असल्यावर भाष्य केले होते तेंव्हाच ह्या मुदत ठेवी भाजपा सरकार मोडीत काढणार अशा शंका उपस्थित झाली होती व तसेच झाले असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाची सांगता

सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाची सांगता कल्याण: संकल्प संस्था आयोजित सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा सांगता व प्रमाणपत्र वितरण सोहळा पंतवालावलकर स्कूल, नेहरू नगर येथे मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच समाजकार्याची आवड असलेल्यांसाठी संकल्प संस्थेच्या वतीने १९ आठवड्यांचा सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग राबविण्यात आला होता. या प्रशिक्षणामध्ये समाजकार्य म्हणजे काय, समाजकार्याचे महत्त्व, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, गटकार्य, प्रचार- प्रसिद्धी माध्यमे, समाजकार्यकर्त्यांची भूमिका तसेच विविध सामाजिक समस्या अशा एकूण ५२ विषयांवर ३५ तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून चार शनिवारी विविध सामाजिक संस्था, संघटना व शासकीय कार्यालयांमध्ये शैक्षणिक भेटी आयोजित करण्यात आल्या होत्या. यासोबतच दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, स्वयं- परिचय व गट उपक्रम यांवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या गायत्री सज्जन वरिष्ठ वैद्यकीय समाज विकास अधिकारी, के. जे. सोमय्या हॉस्पिटल उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून युगंधरा कोळी अभिनेत्री, मॉडेल व रील स्टार तसेच गौरी राव अखिल चित्रपट महामंडळ सदस्या आणि अभिनेत्री व शास्त्रीय कथ्थक नृत्यांगना तसेच सूरज भोईर अध्यक्ष मैत्री संस्था यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश पाटील व रेश्मा जगताप यांनी उत्कृष्ट प्रकारे केले.

बल्लाळेश्वर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ २०२५  पुरस्कार प्रदान

बल्लाळेश्वर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ २०२५  पुरस्कार प्रदान पुणे: सहकार क्षेत्रात उल्लेखनीय आणि दिशादर्शक कार्य करणाऱ्या बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई या संस्थेला  सन २०२५ चा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी प्रदान करण्यात आला, अशी माहीती समाजसेवक मारुती विश्वासराव यांनी दिली. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी आर्यन रिव्हरवुड रिसॉर्ट, जांभळी,  वेल्हे रोड, भोर, पुणे येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार सोहळा २०२५ (उर्वरित) तसेच एकदिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे प्रमुख मान्यवर म्हणून  सतिश मराठे (संचालक – भारतीय रिझर्व्ह बँक) तसेच उदय जोशी (राष्ट्रीय अध्यक्ष – सहकार भारती) उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते संस्थेचे अध्यक्ष आनंद गावडे, संचालक दामाजी डोंगरे व सरव्यवस्थापक संजय घोगरे यांनी  हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून महासचिव  शशिकांत राजोबा व खजिनदार  दादाराव तुपकर यांनी जबाबदारी पार पाडली. फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी व कार्याध्यक्ष ॲड. दिपक पटवर्धन यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. सहकार क्षेत्रात पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सभासदाभिमुख कार्यपद्धती यामुळे बल्लाळेश्वर पतसंस्थेने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशस्वी वाटचालीत सर्व सभासद, ठेवीदार व हितचिंतकांचे मोलाचे योगदान असल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. हा पुरस्कार आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान आहे. हा गौरव संपूर्ण बल्लाळेश्वर परिवाराचा आहे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

 जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आढावा बैठक दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करावे, अन्यथा चौकशी

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आढावा बैठक दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करावे, अन्यथा चौकशी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा इशारा अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून करण्यात येणारी कामे ही दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत. दिलेली डेडलाईन पाळली गेली पाहिजे अन्यथा, संबंधित विभाग प्रमुखाची चौकशी केली जाईल. कामाच्या दर्जाबाबतही चौकशी केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिला. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ बाबत आज जिल्हाधिकारी जिंदल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी सादरीकरण करुन विभागनिहाय माहिती दिली. जिल्हाधिकारी जिंदल यांनी विभागनिहाय आढावा घेतला. झालेली कामे, आलेली मागणी, दायित्व याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. ते म्हणाले, दायित्वाची मागणी करावी. ५ मार्चपर्यंत मागणी न आल्यास चौकशी केली जाईल. प्रशासकीय मान्यता घेताना घातलेल्या अटी, शर्ती प्रमाणे पाहिले जाईल. करदात्यांचा हा पैसा आहे, तो व्यवस्थित दर्जात्मक कामांसाठी वापरला गेला पाहिजे, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. बाह्य संस्थेमार्फत दर्जाबाबतदेखील तपासणी केली जाईल. १५ मार्चपर्यंत खर्च करावा, ज्याच्यासाठी निधी दिला जातो, ते काम देखील वेळेवर पूर्ण झाले पाहिजे, तुम्ही सर्वजण १०० टक्के निधी खर्च करणार अशी मला खात्री आहे. असे सांगतानाच त्यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

  पोक्सो प्रकरणात आरोपीस अटींसह जामीन

पोक्सो प्रकरणात आरोपीस अटींसह जामीन कल्याण सत्र न्यायालयाचा निर्णय मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो प्रकरणातील आरोपी प्रमोद मौळे यास कल्याण सत्र न्यायालय येथील फास्ट ट्रॅक न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला.…

 मध्य रेल्वेचा नियोजन शून्य कारभार

मध्य रेल्वेचा नियोजन शून्य कारभार आसनगाव उड्डाणपुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक ठाणे: शहापूर तालुका येथील गर्दीचे एकमेव स्थानक म्हणून आसनगाव रेल्वे स्थानक ओळखले जाते.दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात.मात्र,रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका स्थानिक नागरिक व प्रवाशांना बसत आहे. स्थानक परिसरातील एकमेव जुने फाटक रेल्वेने संरक्षक भिंत उभारून बंद केल्यामुळे हजारो नागरिक आणि प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत.त्यामुळे तातडीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा,अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. आसनगाव परिसराचा झपाट्याने विकास होत असून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.मात्र, पूर्व व पश्चिम भागांना जोडणारा रेल्वेवरील उड्डाणपूल नसल्यामुळे अनेकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.सुरक्षित व सोयीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली असली तरी रेल्वे प्रशासनाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. उड्डाणपूल नसल्यामुळे स्थानिक वाहनचालक आणि चाकरमानी प्रवाशांना तब्बल तीन ते चार किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.हनुमान मंदिराजवळील रस्ताही रेल्वेने बंद केल्याने शिवाजी चौकातील बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झाली असून अनेकांचा रोजगार धोक्यात आला आहे. जुने फाटक बंद केल्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या नागरिकांना एक ते दीड  किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.शिवाय उंच स्थानकावरील जिने चढताना महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी यासंदर्भात अनेकदा निवेदने दिली असून माजी खासदार कपिल पाटील यांनीही रेल्वे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र,अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे स्थानिकांमध्ये रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त होत असून लवकरच जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रतिक्रिया : “आसनगाव फाटकातून गेली अनेक वर्षे आम्ही पश्चिमेकडून पूर्वेला जात होतो. विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी आणि वृद्धांसाठी हा मार्ग सोयीचा होता.पण आता संरक्षक भिंत उभारून सर्व रस्ते बंद केल्यामुळे आम्हाला मोठा फेरा मारावा लागतो.या समस्येमुळे आम्ही खूप त्रस्त आहोत. – संजय उमवणे, स्थानिक नागरिक

  वाहने सावकाश चालवा येथे निलगायी आहेत

वाहने सावकाश चालवा येथे निलगायी आहेत शहापूरात शेत, माळरानावर नीलगायींचे कळप, अविनाश उबाळे ठाणे : नीलगायींचे कळप स्थलांतरित होताना भटकंतीत रस्त्यावर देखील येत आहेत.यावेळी रस्ता ओलांडून जाताना निलगायीला भरधाव वाहनांची धडक लागून यात नीलगायींचा अपघात झाल्याच्या घटना देखील येथे घडलेल्या आहेत.नीलगायींचे हे वाढते अपघात रोखण्यासाठी व नीलगायी संरक्षणासाठी वनविभागाकडून आता जनजागृती केली जात आहे.रस्त्यावर वाहनं सावकाश चालवावीत असे आवाहन करण्यासाठी नीलगाय अधिवास असलेल्या संरक्षित क्षेत्रात फलक लावण्यात आलेले आहेत. किन्हवली परिसरात रस्त्याकडे लावण्यात आलेले हे फलक लक्ष वेधून घेत आहेत. शहापूर तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील बहुतांश जंगल हे समृद्धी महामार्ग व विविध धरण प्रकल्प व रस्ते प्रकल्पांसाठी भुईसपाट झाले आहे.काही वर्षांपासून प्रकल्पांसाठी प्रचंड जंगल तोड झाल्याने येथील दाट,हिरवीगर्द जंगल ही नामशेष झाली आहेत.परिणामी वन्यजीवांचे अधिवास आता धोक्यात सापडले आहेत.दुसरीकडे अन्न व पाण्याच्या शोधात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव जंगल सोडून आता जंगला शेजारील गाव वस्त्यांकडे कुच करीत आहेत.अशाच प्रकारे जंगलातील नीलगायींचे कळप हे गाव वस्ती लगत माळरानावर स्थलांतरित झालेले दिसत आहेत.हे नीलगायींचे तांडे शेतकऱ्यांच्या रोज नजरेस पडत आहेत.शिकार आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या निलगायींचे कळप हे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करताना दिसत आहेत. निलगायी या भाजीपाला आणि कडधान्य फस्त करीत आहेत. निलगायींच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे चिंतेत सापडले आहेत. शहापूर तालुक्यातील प्रादेशिक विभागाच्या जंगलातील शेणवा मळेगाव, कुडशेत, मुसई बेडीसगाव, परटोली, उंब्रई, कानवे, चेरवली, आष्टा, आदिवासी, लवले, ठुणे आणि किन्हवली परिसरातील शेत माळरानावर सध्या मोठ्या प्रमाणावर निलगायी आढळून येत आहेत. या निलगायी शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या रब्बी हंगामातील हरभरा, वाल, मटकी इत्यादी कडधान्ये तसेच भेंडी, घोसाळी, शिरवळे, भोपळा, गवार, काकडी व पालेभाज्या यांची प्रचंड नासधूस करुन नुकसान करीत आहेत. यामुळे मोठे अर्थीक नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.निलगायींची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव पाहता रब्बी हंगामातील पिके घेण्याचे संकट शेतकऱ्यांनसमोर आता उभे राहिले आहे.यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.रब्बी हंगामात निलगायींच्या शेत मळ्यातील वाढत्या उपद्रवामुळे अर्थीक नुकसानाला देखील तोंड द्यावे लागते आहे अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे.या निलगायींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशःमेटाकुटीला आले आहेत.या नीलगायींच्या समस्येबाबत वन विभागाकडे स्थानिक शेतकरी रोज तक्रारी करीत आहेत.या निलगायींचा उपद्रव थांबविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना वनविभागाकडून होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु नीलगाय या वन्यजीव प्राणी असल्याने वनविभागाला याबाबत काहीएक करता येणार नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.एकिकडे जंगल भुईसपाट होत असल्याने वन्यप्राण्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे.तर दुसरीकडे अन्न आणि पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या वन्यजीवांची वाताहत होताना दिसत आहे.असे हे विदारक चित्र येथे दिसत आहे.नीलगायींच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होताच तातडीने घटनास्थळी पाहणी करुन रीतसर पंचनामा करून त्या शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जात आहे असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

बुद्ध विहार समन्वय समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उल्हासनगरमध्ये

बुद्ध विहार समन्वय समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उल्हासनगरमध्ये ठाणे -बुध्द विहार समन्वय समितीच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील बुध्द विहाराचा समन्वय करण्याच्या उद्देशाने गेले अनेक वर्षे काम करीत आहेत. या समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन २८ फेब्रुवारी आणि १ मार्चला…

  पावसाळ्यापूर्वी नालेसफाई वेळेत करा

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई वेळेत करा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरसेवक सरसावले मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी भांडुप मधील नालेसफाई युध्दपातळीवर करावी. दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा साचल्यामुळे पाणी तुंबणे, रस्ते जलमय होणे, त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी यंदा वेळेत आणि शास्त्रीय पध्दतीने नालेसाफाई करण्यात यावी, अशा सुचना भांडुप प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी पालिका अधिका-यांना दिल्या आहेत. सकाळी त्यांनी एस विभागाच्या अधिका-यांना सोबत घेऊन भांडुप मधील नाल्याची पाहणी केली. नगरसेविका राजोल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार नाल्यांमधील गाळ, बांधकामातील कचरा आणि सांडपाण्यामुळे येणारा इतर कचरा काढण्यासाठी यांत्रिक साधनांचा वापर करावा. मुख्य नाल्यांसोबतच गल्लीबोळात असलेल्या अंतर्गत लहान नाल्यांवरही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काम पुर्ण झाल्यानंतर काढलेला गाळ योग्य ठिकाणी टाकण्यात यावा, रस्त्यांवर कचरा साठू नये यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी घरगुती कचरा नाल्यात न टाकता तो कचराकुंडीत टाकावा, तसेच पावसाळ्यापूर्वी या परिसरातील नाल्याची योग्य प्रकारे नागरिकांच्या देखरेखीखाली साफसफाई करण्यात यावी. अशा सुचना राजोल पाटील यांनी पालिका अधिका-यांना दिल्या आहेत. यासाठी भांडुप मधील नाल्यांची पाहणी करण्यासाठी राजोल पाटील यांनी पालिका अधिका-यांना बरोबर घेऊन पाहणी दौरा केला. स्थानिक नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या मते नाल्यांची सफाई कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात झाली पाहिजे. त्यामुळे पाणी तुंबण्याची समस्या कमी होईल. गेले अनेक वर्षे नगरसेवक नसल्याने पालिकेचे अधिकारी मनमानी कारभार करीत होते. तक्रारी करुनही त्यावर कार्यवाही होत नव्हती. मात्र आता पालिकेत नगरसेवक निवडून दिल्याने त्यांनी आता लक्ष दिल्यास हा प्रश्न उद्भवणार नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. दरवर्षी नाले सफाईचे कामे पूर्ण होत नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात नाले भरतात व त्याचे पाणी जवळपासच्या घरात तसेच रस्त्यांवर जाते. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होते. त्यांना राहते घर सोडून इतर ठिकाणी आश्रय घ्यावा लागतो. नाल्यातील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने हे पाणी रस्त्यांवर जमा होते. परिणामी वाहतुक कोंडी झाल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना, पादचा-यांना होतो. भरलेल्या पाण्यामुळे भांडुप येथे एका पादचा-याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना देखील घडलेली आहे. असा प्रकार होऊ नये म्हणून भांडुप पश्चिम प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील यांनी पालिकेच्या एस विभागातील अधिका-यांना सोबत घेऊन सर्व नाल्यांची पाहणी केली. अरुंद नाले, कचरा, मातीचा गाळ असल्याने अनेक नाले तुंबलेले आहेत. या सर्व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात यावी, त्यातील गाळ, कचरा काढून टाकण्यात यावा, जेणे करुन स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. याबाबत योग्य त्या सुचना पालिका अधिका-यांना नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी केल्या.

८६ लाख लाडक्या बहिणी झाल्या दोडक्या!

‌‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‌’ योजनेच्या लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ‌‘ई केवायसी‌’ प्रक्रियेनंतर या योजनेचा डिसेंबरचा लाभ मिळालेल्या महिलांची संख्या 86 लाखांनी घटली आहे. महाराष्ट्रात सुरुवातीला ‌‘मुख्यमंत्री माझी…