Author: bittambatami.com

कोकणातील आंबा  उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडू दिलासा मिळणार !

नवी दिल्ली : कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्राचे…

– बोरिवली –बांदा स्लीपर कोच सेवा तातडीने सुरू करा

 मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) व कोकण जनविकास समितीची मागणी मुंबई, दि. (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बोरिवली ते बांदा ही स्लीपर कोच बस सेवा मागील दोन वर्षांपासून कोणतेही ठोस कारण न देता अचानक बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबई महानगर परिसर व कोकणातील हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई परिसरात हजारो कोकणवासी रोजगार, शिक्षण व व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. सण-उत्सव, सुट्ट्या तसेच आपत्कालीन परिस्थितीत कोकणात जाण्यासाठी बोरिवली–बांदा स्लीपर कोच सेवा ही त्यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था होती. प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असलेली ही सेवा अचानक बंद झाल्याने प्रवाशांना खाजगी बससेवांचा आधार घ्यावा लागत असून त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. विशेषतः वरिष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. खाजगी वाहतूक सेवांमध्ये वाढलेले दर आणि अपुरी सुविधा यामुळे सर्वसामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) कडे सदर बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली होती. जनतेच्या या तीव्र भावना व अडचणी लक्षात घेऊन मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) व कोकण जनविकास समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नॅन्सी डेपो, बोरिवली येथे भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी बोरिवली–बांदा स्लीपर कोच बस सेवा तसेच बोरिवली–मालवण बस सेवा तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले. एसटी महामंडळाचे अधिकारी जाधव यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करत सदर बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. “सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, सुलभ व परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे ही शासनाची सामाजिक जबाबदारी आहे. कोकणवासीयांच्या भावना व गरजा लक्षात घेऊन ही सेवा तातडीने सुरू करण्यात यावी,” अशी भूमिका कोकण जनविकास समितीचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, प्रकाश जाधव तसेच मासचे  कार्याध्यक्ष दिनेश राणे, उपाध्यक्ष डॉ. उत्तम महाडकर,उपाध्यक्षा चित्रा राणे,  कार्यकारिणी सदस्य रमेश बोरीचा तसेच नितांत पेडणेकर, दीपेश परब यांनी मांडली. 0000000

गाववाला पॅटर्नने पनवेल हादरले

– रिक्षाचालकाने मारला एसटी चालकाच्या डोक्यात हातोडा राज भंडारी पनवेल : शहरातील शिवशंभो नाका येथील सिग्नलजवळ एस टी बस आपल्या अंगावर येईल असा गैरसमज मानत बाळगून एसटी चालकाजवळ उद्धटपणे शिवीगाळ करीत एसटी बसमधून चालकाला खाली उतरण्यास भाग पाडून नंतर आपल्या रिक्षातील हातोड्याने एसटी बस चालकाच्या डोक्यात जबर प्रहार केल्याची घटना गुरुवारी भरदुपारी २ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास घडली. यावेळी इतर जागरूक नागरिकांनी रिक्षाचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत प्रथमदर्शी मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिवशंभो नाका (तक्का) येथील सिग्नल जवळ विलास म्हात्रे याने आपली रिक्षा (MH ४६ बीपी ४४८४) थांबविली. मात्र मागून येणाऱ्या विटा – मुंबई या बसने रिक्षाजवळ बस थांबाविल्यामुळे रिक्षा चालक विलास म्हात्रे याचा इगो दुखावला गेला. यावेळी माझ्या गाडीला ठोकला असतास म्हणून एसटी बस चालकाला अश्लील शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. यावेळी बसचालक बासमधून खाली उतरताच विलास म्हात्रे या रिक्षाचालकाने आपल्या रिक्षामध्ये ठेवलेला हातोडा काढून बस चालकाच्या डोक्यात मारला. यावेळी बस चालक हा त्यांचक्षणी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. यावेळी जमलेल्या सुज्ञ नागरिकांनी दुसऱ्या एका रिक्षातून त्या चालकाला बसमधील वाहकासोबत प्राथमिक उपचारासाठी पनवेलमधील गांधी रुग्णालयात पाठवले. तसेच पोलिसांना पाचारण केल्यानंतर नागरिकांनी विलास म्हात्रे या रिक्षा चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. अद्यापही एसटी बस चालकाच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाली नसली, तरी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

‘सुपर डुपर’ या खुसखुशीत मराठी विनोदी चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर

ठाणे : दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या ‘सुपर डुपर’ या खुसखुशीत कॉमेडी- ड्रामा शैलीतील चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा मराठी ZEE5 ने केली आहे. चित्रपटगृहांमध्ये यशस्वी प्रदर्शन आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद…

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंती दिनी केडीएमसीतर्फे अभिवादन

कल्याण : थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंती दिनी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापौर हर्षाली चौधरी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर…

मुरबाडमध्ये ‘घोटाळेबाज बनकरी’ पुन्हा चर्चेत!

कोट्यावधींचा पाटबंधारे घोटाळा उघड, तात्काळ निलंबनाची मागणी! राजीव चंदने मुरबाड : मुरबाड पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागात ‘महाभ्रष्टाचार’ उघड झालाय  आणि या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहेत पुन्हा तेच वादग्रस्त नाव उपअभियंता जगदिश बनकरी. तालुक्यासाठी आलेल्या कोट्यावधींच्या निधीवर बनकरी आणि त्यांच्या शाखा अभियंत्यांनी थेट दरोडाच टाकलाय. कागदावर सिमेंट-काँक्रीटची उच्च दर्जाची कामं, पण प्रत्यक्षात? फक्त दगड-गोट्यांचा भरणा! आणि बिलं मात्र लाखोंची उचलली… ही शासनाची फसवणूक नाही तर जनतेच्या घामाच्या पैशाची खुलेआम लूट आहे! हा पहिलाच प्रकार नसून बोगस कामं, निधीचा अपहार, मोर्चे, उपोषणं… बनकरी यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं. पण प्रत्येक वेळी ‘वरिष्ठांच्या आशीर्वादाने’ ते सहीसलामत सुटतात. मुरबाडकर विचारतायत – बनकरींना वाचवणारं ते ‘अदृश्य हात’ कुणाचे? यावर्षीही बनकरींच्या कृपेने बोगस कामांचा सपाटा सुरूच आहे. कार्यालयात शेकडो तक्रारींचा ढीग लागलाय. मात्र आता नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. बनकरीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लवकरच बेमुदत उपोषण छेडण्यात येणार असून त्याचं पत्र पंचायत समितीत धडकलं. वरिष्ठांचा आशीर्वाद’ म्हणजे नेमकं कोण?  यावेळी बनकरी वाचले तर रस्त्यावर उतरून मंत्रालय हलवू असा कडक इशाराच आता जबाबदार नागरिकांनी दिलाय.

मच्छीमारांनो सावधान! १ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी

नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील मच्छीमारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन करण्यासाठी आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी शासनाने यंदा १ जून ते ३१ जुलै  या कालावधीत पावसाळी मासेमारीवर अधिकृत बंदी जाहीर केली आहे. ठाणे-पालघर जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) दिनेश पाटील यांनी या संदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत समुद्रातील माशांचा प्रजोत्पादन काळ असतो, त्यामुळे या बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेला मोठा वाव मिळून समुद्रातील मासळीचा साठा वाढण्यास मदत होते. मत्स्यव्यवसाय विभागाने दिलेल्या आदेशानुसार, ही पावसाळी मासेमारी बंदी सर्व प्रकारच्या यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांना पूर्णपणे लागू राहील. मात्र, पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना या बंदीतून सवलत देण्यात आली आहे. सध्या समुद्रात गेलेल्या सर्व यांत्रिक नौकांनी ३१ मे पूर्वीच आपापल्या बंदरांमध्ये परतणे बंधनकारक करण्यात आले असून, १ जून किंवा त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरांवर मासे उतरवण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच, राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या क्षेत्राबाहेर खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाचे धोरण व मार्गदर्शक सूचना लागू राहतील. या शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना करण्यात आले आहे. जर बंदीच्या काळात कोणतीही यांत्रिक नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करताना आढळली, तर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम अंतर्गत ती नौका, त्यावरील उपसाधने आणि पकडलेली मासळी जप्त करून संबंधित मालकावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. इतकेच नव्हे तर, बंदीच्या काळात समुद्रात जाऊन अपघात झाल्यास अशा नौकेला शासनाकडून कोणतीही आर्थिक नुकसान भरपाई मिळणार नाही, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व नौकामालकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आले आहे.

 ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, ६ जणांना अटक ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ मे रोजी एक मोठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अनेक अन्न व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी विविध अन्न आस्थापनांची तपासणी करून तब्बल ७ लाख ३० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा संशयास्पद साठा जप्त केला आहे. यामध्ये १,४९,७२४ रुपयांचे खाद्यतेल, ९३,८३० रुपयांचे फरसाण, २,०६,८०० रुपयांचे तूप, ८,१९० रुपयांचे हक्का नुडल्स, १७,१०० रुपयांची ताडी, ५४,०९६ रुपयांचे शरबत आणि १,९७,६४० रुपये किंमतीच्या डिंकाचा (गम अरेबिक) समावेश आहे. याशिवाय, याच दिवशी प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४,५३,३४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे कडक आवाहन केले आहे. नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा किंवा वागळे इस्टेट, ठाणे येथील सह आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अशी कडक कारवाई यापुढेही नियमितपणे सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त दीपक झिंजाड, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी…

केडीएमसीने बदलले जुने धोकादायक २६८ पथदिवे पोल

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवाबत्ती सेवे करीता एकूण ३३ हजार ८७० पथदिवे पोल व ४१ हजार ९०७ लाईट बसविण्यात आलेले आहेत.  तसेच प्रभागनिहाय कार्यलयीन इमारती, दवाखाने, हॉस्पीटल, आराग्येकेंद्रे इ. आस्थापना…