Author: bittambatami.com

बाल गोपाळ-आयडियल कॅरम सेंटरला काळाचौकीत उत्तम प्रतिसाद

मुंबई : बाल गोपाळ मित्र मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप यांच्या संयुक्त विध्यमाने काळेवाडी-काळाचौकी परिसरात कॅरमप्रेमी स्व. दशरथ चव्हाण स्मृती बाल गोपाळ-आयडियल कॅरम सेंटरचा शुभारंभ शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण,…

चॉकबॉल स्पर्धेचे अंतर्गत राज्यस्तरीय सराव शिबिर संपन्न

कल्याण : महाराष्ट्र राज्य चॉकबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ दिनांक २८ मे ते ३१ मे २0२६ रोजी मडगाव गोवा येथे होणाऱ्या १६व्या वरिष्ठ गट…

डिजिटल युगातही जिवंत आहे ब्रश आणि रंगांची कला

– रंगमंचावर आजही हाताने तयार होतात पेंटिंग बोर्ड कल्याण : आजच्या डिजिटल युगात जिथे प्रत्येक काम संगणक आणि ग्राफिक डिझाइनद्वारे काही क्षणांत पूर्ण होते, तिथेच रंगमंचावर ब्रश आणि रंगांच्या माध्यमातून हाताने पेंटिंग करण्याची जुनी परंपरा आजही टिकून आहे. ही परंपरा चार दशकांहून अधिक काळ जपून ठेवली आहे पेंटर हेमंत यादगिरे यांनी. हेमंत यादगिरे यांच्या मते, ही कला हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर असली तरी रंगमंच, गणेशोत्सव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मंडप सजावट व बोर्ड पेंटिंगचे काम आजही हातानेच केले जाते. एकेकाळी त्यांच्या हाताखाली १५ ते २० जण काम करत होते. ते सांगतात की, पूर्वी राजकीय पक्षही पूर्णपणे हाताने केलेल्या पेंटिंगवर अवलंबून होते. नेत्यांची मोठमोठी चित्रे देखील ब्रश (तूलिका) आणि रंगांच्या माध्यमातून तयार केली जात होती. सण-उत्सवांच्या काळात कामाची प्रचंड मागणी असायची. मात्र संगणक युग सुरू झाल्यानंतर आणि फ्लेक्स प्रिंटिंगचा प्रसार झाल्यामुळे या पारंपरिक कलेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे हाताने पेंटिंगचे काम मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तरीही कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात होणाऱ्या नाट्यप्रयोगांचे बोर्ड आजही ब्रश आणि रंगांच्या साहाय्याने हातानेच तयार केले जातात. त्यामुळे ही लुप्त होत चाललेली कला काही प्रमाणात तरी जिवंत राहिली आहे. हेमंत यादगिरे यांचे म्हणणे आहे की, ही कला आपली सांस्कृतिक ओळख आहे आणि ती जपणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच ते आजही या रंगमंचावर तूलिका आणि रंगांच्या कलेला जिवंत ठेवण्याचे कार्य करत आहेत.

माता रमाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त स्मारकास वरळी मुंबई येथील अभिवादन

मुंबई : मुंबई-मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त माता रमाई स्मारक वरळी मुंबई येथे बुध्द वंदनासह अभिवादन सभेमधून मानवंदना त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांना  हजारोंच्या संख्येत उपस्थितीत आंबेडकरी…

सावरकरांच्या विचारांवरच देशाची प्रगती

 पनवेलचे महापौर नितीन पाटील यांचे प्रतिपादन पनवेल :“ज्यांनी आपल्याला प्रखर राष्ट्रभक्ती आणि देशाभिमान शिकवला, तसेच जगण्याची शाश्वत अशी जीवनमूल्ये दिली, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवरच आज संपूर्ण देश प्रगती करत आहे.…

– कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसेनेचे घंटानाद आंदोलन

 भाजपाला उशिरा का होईना पण जाग आली – शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे कल्याण : हिंदुनी अशा घंटानाद आंदोलनात सहभागी होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून उशिरा का होईना पण भाजपाला जाग आली असून हिंदूंच्या मतांची निवडणुकीवेळी भिक मागतो हे त्यांना लाजिरवाणे वाटत असेल म्हणून हिंदुत्वासाठी काही तरी केलं पाहिजे यासाठी भाजपासह सर्व घंटानाद आंदोलनात सहभागी होत असल्याची टीका शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपावर केली. बकरी ईदच्या निमित्ताने प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही शिवसेनेच्या वतीने कल्याणच्या दुर्गाडी किल्याजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, महापौर हर्षाली चौधरी, शहर प्रमुख रवी पाटील, उपनेत्या विजया पोटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे आंदोलन त्यांच्यानंतर अद्यापही सुरु आहे. बकरी ईदच्या दिवशी कल्याण येथील मुस्लिम बांधव एकत्रितपणे येऊन दुर्गाडी किल्ल्याच्या  परिसरात नमाज पडतात.  कायदा सुव्यवस्था बिघडु नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून नमाज कार्यक्रम संपेपर्यंत कोणालाही दुर्गाडी देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोडत नाहीत. शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी  या घंटानाद आंदोलनाला सुरवात केली. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे.  यावेळी कल्याणच्या लोकमान्य टिळक चौक येथून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने कूच केले. मात्र पोलीस प्रशासनाने या दोन्ही गटांना लालचौकी परिसरातच बॅरिकेट्स लावून रोखून धरले. ज्याठिकाणी काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ धक्काबुक्कीही झाली. तर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजीही केली जात होती.  आजही सकाळी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या वतीने घटानांद आंदोलन केले, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले, व नंतर सोडून दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी बोलतांना सांगितले कि, ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरील देवीचे दर्शन घेण्यासाठी जो अटकाव केला जातो, मज्जाव केला जातो तो चुकीचा आहे. आमच्यावर होणारा अन्याय सहन केला जाणार नसून हि बंदी सहन केला जाणार नाही. याबाबत उच्चन्यायालयात खटला सुरु असून त्याचा पाठपुरावा करत असून यामध्ये यश मिळेल. आमचा हक्क साबित राहण्यासाठी हे आंदोलन सातत्याने सुरु ठेवलं असल्याचे लांडगे यांनी सांगितले.

शिरोली बुद्रुकच्या ‘डोळ्यांच्या डॉक्टरबाई’ अनुसयाबाई डबडे यांचे निधन

 शतक महोत्सव चार दिवसांवर असतानाच काळाचा घाला; गावावर शोककळा नारायणगाव : आपल्या अंगभूत कौशल्याने अनेकांच्या डोळ्यात गेलेला कचरा कापसाच्या बोळ्याने सहजतेने व विनामोबदला काढून देणाऱ्या आणि त्यामुळे पंचक्रोशीत ‘डोळ्यांच्या डॉक्टरबाई’…

‘जातिभेद हा गुन्हा, जनगणनेत जात नोंदवणे राष्ट्रीय कर्तव्य! ‘

 राज्यात बौद्ध – अनुसूचित जाती एकता परिषदेची स्थापना मुंबई :  देशात फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेत बौद्धांसहित अनुसूचित जातींनी धर्म आणि जातींची योग्य ती नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्रात ‘ बौद्ध – अनुसूचित जाती एकता परिषद’ स्थापन झाली आहे. त्याची घोषणा राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव ( गृह) श्याम तागडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत कुलाबा येथे गुरुवारी झालेल्या एका बैठकीत करण्यात आली. त्यासाठी गेले तीन महिने राज्य पातळीवर पूर्वतयारी सुरू होती, असे संयोजक नेत्यांनी सांगितले. या संघटनेच्या स्थापनेत शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, रिपाइं (सेक्युलर) चे अध्यक्ष श्यामदादा गायकवाड, माजी आमदार बाबुराव माने, ज्येष्ठ पत्रकार सुनील खोबरागडे, माजी न्यायाधीश अनिल वैद्य ( नाशिक), ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, समान संधी अभियानचे अध्यक्ष सुनील कदम, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष राहुल डंबाळे ( पुणे), गोवा – भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष एस. के. जाधव, आंबेडकरवादी लोक मंचाचे अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड ( नांदेड ), डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स ( बानाई) चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. कुलदीप रामटेके, द बुद्धिस्ट – शेड्यूल्ड कास्ट्स मिशनचे संयोजक अच्युत भोईटे, आंबेडकरवादी भारत मिशनचे सरचिटणीस सतीश डोंगरे, युनिव्हर्सल बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र बनसोडे, राज्य सरकारचे माजी उपसचिव सी. के. जाधव , बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर, पंचशील सेवा संघाचे संजय शिंदे आदींचा पुढाकार आहे. जातिभेद करणे हा गुन्हा आहे. पण सर्वांगीण विकासाच्या धोरणांच्या आखणीसाठी जातीनिहाय जनगणनेत जात आणि धर्माची नोंद करणे ही घटनात्मक प्रशासकीय गरज आहे. त्यात कुठलाही कमीपणा नसून उलट ते प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी श्याम तागडे यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना केले. अनुसूचित जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, नोकऱ्या, सत्ता, संसदीय राजकारण, विकास निधी यात प्रतिनिधित्व मिळण्याचा मौलिक अधिकार संविधानाने दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले ते जणू वरदान आहे. त्यामुळे त्यांचा  हक्काचा पुरेपुर वाटा आणि योग्य टक्का मिळण्यासाठी जनगणनेला विशेष महत्त्व प्राप्त आले आहे,  असे त्यांनी सांगितले. ओबीसींच्या मागणीनुसार, जातीनिहाय जनगणना पहिल्यांदाच होत आहे. अशावेळी जाती आधारित जनगणनेचे पूर्वीपासून हकदार असलेल्या बौद्धांसह सर्वच अनुसूचित जातींनी धर्म आणि जातींची नोंद करून घेण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन बौद्ध – अनुसूचित जाती एकता परिषदेने एका पत्रकाद्वारे केले आहे. बौद्ध समाजासाठी ‘ बौद्ध ‘ ही  धार्मिक ओळख असून ‘ अनुसूचित जाती ‘ प्रवर्ग ही त्याची संविधानिक ओळख आहे, असे सांगून माजी सनदी अधिकारी श्याम तागडे म्हणाले की, बौद्धांना जनगणनेत धर्म नोंदवून लोकसंख्येच्या रुपात धार्मिक ताकदीची प्रचिती द्यावी लागेल. त्या बरोबरच संविधानिक अधिकार अबाधित राखण्यासाठी घटनात्मक गरज म्हणून त्यांना पूर्वीच्या जातीचीही नोंद करणे अपरिहार्य ठरले आहे. जनगणनेत जात नोंदवण्याची प्रशासकीय अपरिहार्यता लक्षात घेवूनच रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासहित भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनीही पहिल्यांदाच एकमुखी सूर  काढला आहे. बौद्ध समाजाला धर्म आणि जात या दोन्ही गोष्टींची नोंद आवर्जून करावी, असे आवाहन त्या तिघा नेत्यांनी केले आहे, असेही बौद्ध – अनुसूचित जाती एकता परिषदेने आपल्या पत्रकात नमूद केले आहे.

डोंबिवली सॅटीस प्रकल्पाच्या हालचालींना वेग

 डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात होणार मोठा कायापालट कल्याण : डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित सॅटीस  प्रकल्पाच्या कामाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर मोठी गती मिळाली असून, एमएमआरडीए प्रशासन आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात संयुक्त सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी, अपुरी पार्किंग आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता हा प्रकल्प जलदगतीने  मार्गी लावण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. डोंबिवली शहराची वाढती लोकसंख्या आणि रेल्वे स्थानक परिसरातील दिवसेंदिवस वाढणारी गर्दी पाहता पूर्व-पश्चिम जोडणी अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासन, महापालिका अधिकारी आणि संबंधित विभागांसोबत वेळोवेळी बैठका घेत सॅटीस प्रकल्पाबाबत सातत्याने पाठपुरावा केला. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनाही प्रत्यक्ष सर्वेक्षण करून प्रकल्पाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार आता प्रत्यक्ष संयुक्त सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची इमारत, रामनगर पोलीस ठाणे, विष्णूनगर पोलीस ठाणे आणि परिसरातील उपलब्ध जागांचा एकत्रित वापर करून आधुनिक सॅटीस संकुल उभारण्यात येणार आहे. नियोजनबद्ध पद्धतीने जागांचा वापर करत रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा ताण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. सॅटीस प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. प्रवाशांसाठी मोठ्या प्रमाणात आधुनिक पार्किंग सुविधा, पादचारी मार्ग, वाहतुकीचे शास्त्रोक्त नियोजन तसेच विविध नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरातील दररोजची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. डोंबिवलीच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे नागरिकांना आधुनिक आणि सुसज्ज पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिम सॅटीस प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून एमएमआरडीए आयुक्तालयात सातत्याने बैठका घेत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली होती. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रवाशांना होणारा त्रास आणि भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा प्रकल्प तातडीने मार्गी लावणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी वारंवार मांडली होती. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा करत प्रत्यक्ष संयुक्त सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आता एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून संयुक्त सर्वेक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. डोंबिवलीच्या वाहतूक व्यवस्थेला, आणि पार्किंग व्यवस्थेला भविष्यात मोठा दिलासा देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत.

येऊरमधील अनधिकृत बंगले पुन्हा चर्चेत

अनधिकृत नळजोडणी, बंगल्याची वन विभाग आणि महापालिकेकडे कागदोपत्री नोंदच नाही ठाणे : येऊर आणि अनधिकृत बंगले यांची सांगड जुनीच आहे.  अनधिकृत नळ जोडणी, स्विमिंग पूल आणि महिन्याला हजारो रुपयांची कमाई करून देणाऱ्या बंगल्याची महापालिका सोडाच पण आदिवासींच्या वन जमिनीवर बांधलेल्या बंगल्याची वन विभागाकडेही कुठलीही कागदोपत्री नोंदच नसल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. सर्वश्री गणेश टाक, गौतम मोरे, संजय पडवळ आणि हितेश राठोड या चौघा मित्रांनी २०१०-११ दरम्यान वन विभाग शेणाचा पाडा येथील जागा भूमापन क्र न स ७ उपविभाग १५(७/१७) ही १० गुंठे  जागा विकत घेतली होती. त्यानंतर काही वर्षांनी गणेश टाकने हितेश राठोडला त्याचे पैसे परत दिले. यादरम्यान घेतलेल्या जमिनीत भराव टाकून त्याठिकाणी बोअर वेल, वृक्षारोपण केले होते. नंतर गणेश टाकने इतर दोघांना डावलून त्याठिकाणी जलतरण तलाव असलेल्या हेरंब फार्म नावाचे पक्के अनधिकृत बांधकाम केले. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या पाणी विभागाचा कंत्राटदार असलेल्या गणेश टाकने या फॉर्ममध्ये १इंची पाण्याची पाईप लाईनही जोडून घेतली. बेकायदेशीर असलेला हा फॉर्म शनिवार – रविवार भाड्याने देऊन महिन्याला हजारो रुपयांची कमाई करत आहे. या बंगल्यासंदर्भात प्रशासनाकडे विचारणा केली असता, या बंगल्याची आमच्याकडे कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याचे ठाणे महापालिका आणि वन विभागाने लिहून दिले आहे. महापालिकेचा हजारो रुपयांचा महसूल बुडवणारा गणेश टाक हा महापालिकेचा कंत्राटदार असल्याने त्या बंगल्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. 00000000000