Author: bittambatami.com

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

कबड्डीत महाराष्ट्राला कांस्यपदक हरिव्दार ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कबड्डीमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला हरियाणाकडून 24-39 गुणांनी पराभव पत्करावा लागला. हरिव्दारमधील योगस्थळी क्रीडा परिसरात संपलेल्या कबड्डी स्पर्धेतील उपांत्य फेरीत हरियाणाने महाराष्ट्रावर मात केली. उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगाल हरवून महाराष्ट्राने उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची बलाढ्य  हरियाणा संघाशी झुंज रंगली. पूर्वार्धात 21-13 गुणांनी आघाडी घेत उत्तरार्धातही हरियाणाने आपली हुकुमत कायम राखून महाराष्ट्राला पराभूत केले. बचावात्मक खेळ केल्याने महाराष्ट्राला पराभूत व्हावे लागले. उपांत्य लढतीमधील पराभूत संघांना कांस्यपदक बहाल करण्यात येते. महाराष्ट्रासह राजस्थान संघ कांस्य पदकाचा मानकरी ठरला.

विहंग, सरस्वती, महात्मा गांधी व ग्रिफिन जिमखाना उपांत्य फेरीत

श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रथम विभागीय पुरुष व महिला गटाच्या खो-खो स्पर्धेत पुरुषांच्या उपांत्य गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे), शिर्सेकर्ल महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी  (मुंबई उपनगर), सरस्वती…

आता प्रेक्षकांनीच आपल्या हातातला रिमोट वापरायला हवा…

काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्या निवासस्थानी एक चोर शिरला. चोरी करण्याच्या हेतूने आलेल्या या चोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. नंतर लगेचच हा हल्लेखोर पळून गेला.…

अर्थमंत्र्यांपुढील आव्हाने

  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना एक नवा विक्रम नोंदवणार आहेत. त्यांच्या नावाने हा विक्रम होताना त्या सामान्य जनतेच्या पदरात काय टाकणार आहे, याची उत्सुकता लागणे…

बिरसा मुंडा यांच्या वारसदारांच्या भूमितले दाहक वास्तव….

केवळ बिरसा मुंडा यांची जयंती पुण्यतिथी साजरी करु नका, आदिवासी बांधव आपलेच आहेत, आपल्याच देशात वास्तव्य करतात. त्यांच्या भागातही विकासाची गंगा पोहोचविण्याचे भगीरथ कार्य करण्याची मनीषा बाळगून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी…

सेहचाळीस किलोच्या गांजासह सहा आरोपी अटकेत

मिरा – भाईंदर  येथील नवघर पोलिसांच्या धडक  कारवाईत सहा आरोपीना अटक करण्यात आली आहे. नवघर पोलीसांची गस्त सुरु असताना हे सहा आरोपी संशयास्पद स्थितीत फिरताना आढळले. यांच्या कडच्या तीन मोठ्या बॅगेत तपासणी केली असता त्यात सेहचाळीस किलो गांजा सापडला. या गांजाची बाजारातील किंमत सहा लाख नव्वद हजार रुपये आहे. या आरोपीमध्ये दोन जण गुजरातचे असून चोघे ओडिसाचे असल्याचे कळले. या सगळ्यांना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी घेतल्याचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. हे अट्टल गुन्हेगार आहेत का? हा गांजा ते कोणाला देणार होते ? हा गांजा त्यांनी कुठून आणला? याबद्दलची चौकशी सुरु असल्याचे ते म्हणाले. पोलिसांची टीम त्यांच्या राज्यात जाऊन अधिक चौकशी करेल असं ते पुढे म्हणाले. आजच्या तरुणांना तसेच या पिढीला अशा व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी अशीच मोहीम राबवावी अशी अपेक्षा इथले नागरिक व्यक्त करत आहेत.

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

महाराष्ट्राच्या नेमबाजांचा अचूक निशाणा!  पार्थ मानेला पदार्पणातच सुवर्ण, रुद्रांक्ष पाटीलला रौप्य तर किरण जाधवला कांस्य डेहराडून ः मराठमोळ्या नेमबाजांनी सुवर्णासह रौप्य व कांस्य पदकाच्या कमाई करीत 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील त्रिशूल शूटिंग रेजवर महाराष्ट्राची पताका अभिमानाने फडकवली. शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या १० मीटर एअर रायफल्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ माने या युवा खेळाडूने सोनेरी वेध घेतला, तर जागतिक सुवर्णपदक विजेता रुद्रांक्ष पाटील याने रुपेरी यश संपादन केले. सेनादलाचे प्रतिनिधित्व करणारा सातारा जिल्ह्यातील खेळाडू किरण जाधव याला कांस्यपदक मिळाले. एअर रायफल्स स्पर्धेत अखेरच्या क्षणापर्यंत चुरस पहावयास मिळाली. 17 वर्षीय खेळाडू पाथने 252.6 गुण, रुद्रांक्ष याने 252.1 गुण, तर किरणने 230.7 गुणांची नोंद करीत महाराष्ट्राला तिन्ही पदके जिंकून देण्याचा भीमपराक्रम केला. एका फेरीचा अपवाद वगळता पार्थने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आघाडी टिकवत सुवर्ण यश संपादन केले. रुद्राक्ष हा मधल्या टप्प्यात सहाव्या स्थानावर होता. मात्र शेवटच्या चार टप्प्यांमध्ये त्याने एकाग्रता दाखवीत अतिशय अचूक नेम साधले आणि जोरदार मुसंडी मारत दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली. अर्थात त्याला पार्थ याची आघाडी तोडता आली नाही. पार्थ हा मूळचा सोलापूरचा खेळाडू असून गेले चार वर्षे तो सुमा शिरूर यांच्या पनवेल येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्याने कनिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेत सोनेरी वेध घेतला होता तसेच 2023 मध्ये त्याने सांघिक विभागात भारतात सुवर्णपदक मिळवून दिले होते. तो पनवेल येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेत बारावी शास्त्र शाखेत शिकत आहे. सोनेरी यशाची खात्री होती : पार्थ अंतिम फेरीत स्थान मिळवल्यानंतर मी फक्त सुवर्णपदक जिंकण्याचाच विचार केला होता त्या दृष्टीनेच सुरुवातीपासूनच मी अचूक नेम कसा साधला जाईल याचे नियोजन केले होते सुदैवाने माझ्या नियोजनानुसारच घडत गेले. या स्पर्धेत प्रथमच भाग घेताना सुवर्णपदक मिळवता आले याचा आनंद मला खूप झाला आहे असे पार्थ याने सांगितले. जागतिक स्पर्धांसाठी होणार्‍या राष्ट्रीय चाचणी स्पर्धांमध्ये भाग घेत भारतीय संघात स्थान मिळवण्याचे माझे ध्येय आहे आणि अर्थातच ऑलिंपिक मध्ये प्रतिनिधित्व करणे हे माझे स्वप्न आहे ते मी साकार करू शकेन अशी मला आशा आहे असेही पार्थ याने सांगितले ेमुंबई येथे स्नेहल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणार्‍या रुद्राक्ष याने जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवीत गतवेळी ऑलिंपिक कोटा मिळविला होता. त्याने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर भरघोस पदके जिंकली आहेत. राज्य शासनातर्फे गतवर्षी त्याला शिवछत्रपती पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले आहे. मधल्या टप्प्यात सहाव्या क्रमांकावर माझ्यावर थोडेसे दडपण होते तरीही मला पदकाची खात्री होती त्यामुळेच मी शेवटपर्यंत संयम व चिकाटी ठेवीत नेम साधले त्यामुळेच मला रुपेरी कामगिरी करता आली, महाराष्ट्राच्याच पार्थ याला सुवर्णपदक मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे असे रुद्रांक्ष याने सांगितले. किरण जाधव हा सातारा जिल्ह्यातील भाटणवाडी या गावचा खेळाडू असून त्याने सन 2015 मध्ये सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचा सराव सुरू केला. या खेळातील त्याची कामगिरी बघून सेनादलात त्याची निवड झाली. त्याने आतापर्यंत जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली आहेत तर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याला दोन सुवर्णपदके मिळाली होती.

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

पूजा दानोळेच्या रूपेरी यशाने महाराष्ट्राला महिलांना विजेतेपद! साठ किलोमीटरच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई रुद्रपूर ः  38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कोल्हापूरच्या पूजा दानोळेने  आणखी एक पदकांची कमाई करीत रोड सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला महिला गटाचे विजेतेपद जिंकून दिले. पूजाने शुक्रवारी साठ किलोमीटरच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले. आपली पदकांची मालिका कायम राखत सायकलिंग मधील वैयक्तिक टाईम ट्रायलमध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या पूजा हिने आज 60 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. तिची या कामगिरीने महाराष्ट्राने रोड सायकलिंगचे विजेतेपदावर नाव कोरले. डोंगरदर्‍यातील रुद्रपूरमधील शेवटपर्यंत चुरशीने झालेल्या शर्यतीत पूजा हिने हे अंतर एक तास 45 मिनिटे 10.590 सेकंदात पार केले. सुवर्णपदक जिंकणार्‍या गुजरातच्या मुस्कान गुप्ता हिला हे अंतर पार करण्यास एक तास 45 मिनिटे 10.512 सेकंद वेळ लागला. स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 रौप्य पदके जिंकून महाराष्ट्राने रोड सायकलिंगमधील महिला गटाचे विजेतेपदावर नाव कोरले. ही दोन्ही पदके पूजा दानोळेने जिंकून महाराष्ट्राची शान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उंचविली आहे. पूजा हिचे वडील बबन व भाऊ हर्षद हे दोघेही नामवंत कुस्तीगीर आहेत. पूजा हिला सुरुवातीला दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून सध्या ती नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सायकलींग अकादमीत अनिल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

वुशूच्या ताईचीक्वॉन प्रकारात श्रावणी कटके हिला कांस्यपदक डेहराडून :  पुण्याच्या श्रावणी कटके हिने येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील वुशूच्या ताईचीक्वॉन प्रकारात कांस्यपदक जिंकले. ताईचीक्वॉन हा वुशूचा एक महत्त्वपूर्ण प्रकार असून, त्यात शारीरिक संतुलन, लवचिकता आणि मानसिक एकाग्रतेची आवश्यकता असते. श्रावणीने यापूर्वीही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि वुशू खेळात अधिक सहभाग वाढेल, अशी आशा श्रावणीने व्यक्त केली आहे. श्रावणी कटके हिच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. तिच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि सातत्यपूर्ण सरावामुळे तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर व पथक प्रमुख  संजय शेटे, खजिनदार धनंजय भोसले, ऑल महाराष्ट्र वुशू संघटनेचे अध्यक्ष एस एस झेंडे, सचिव सोपान कटके आणि प्रशिक्षक स्वयम् कटके, प्रतीक्षा शिंदे, गणेश यादव, दीपक माळी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.