परळ येथे युवा क्रीडा महोत्सव २०२४ ला सुरुवात
ठाणे : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एन आर एम यु) ने भविष्यवादी व्हिजन अंतर्गत २०२४ मध्ये सुरू झालेला “युवा क्रीडा महोत्सव” आयोजित करण्याचा १० वर्षांचा जुना वारसा सुरू ठेवला आहे.…
ठाणे : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एन आर एम यु) ने भविष्यवादी व्हिजन अंतर्गत २०२४ मध्ये सुरू झालेला “युवा क्रीडा महोत्सव” आयोजित करण्याचा १० वर्षांचा जुना वारसा सुरू ठेवला आहे.…
ठाणे : दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक…
अशोक गायकवाड रायगड : दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातील अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण ११ हजार ६१७ प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे. त्याद्वारे पक्षकारांना एकूण १९ कोटी २० लाख ३३ हजार ११७ रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील ५२ हजार ९०१ वादपूर्व प्रकरणे व ९ हजार ८१४ प्रलंबित अशी एकूण ६२ हजार ७१५ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी ९ हजार २९० वादपूर्व प्रकरणे व २ हजार ३२७ प्रलंबित प्रकरणे अशी एकूण ११ हजार ६१७ प्रकरणे सामंजस्याने मिटवून निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण १९ कोटी २० लाख ३३ हजार ११७ रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील लोकन्यायालयात १० जोडप्यांचा (पाली-१, पेण-१, रोहा-१, महाड-३, पनवेल-१, खालापूर-२, अलिबाग-१) सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ४८ मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना ५ कोटी ६६ लाख २८ हजार इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. अलिबाग येथील पक्षकारांचा जिल्हा न्यायाधीश क. २,एन. के. मणेर व पॅनलवरील न्यायाधिशांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जिल्ह्यातील विविध न्यायालयांत २८ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करुनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली. या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधिक्षक, रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर व न्यायाधीश तथा सचिव अमोल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.
मुंबई: विनय क्षीरसागर यांची १ डिसेंबर २०२४ पासून आयआरक्लास सिस्टम्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक – (मॅनेजिंग डायरेक्टर) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सागरी उद्योग आणि चाचणी, तपासणी आणि प्रमाणता…
किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मुंबई : महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षांखालील किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२४-२५ ला आज माटुंग्यात सुरुवात झाली. स्पर्धेचे आयोजन ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, माटुंगा (प.), मुंबई – ४०००१६ येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराचे विश्वस्त उमेश नरवणे (सी.ए.), अॅड. अरुण देशमुख, उपाध्यक्ष बाळ तोरसकर, प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत तरळ, कार्याध्यक्ष सुधाकर राऊळ, कार्योपाध्यक्ष विकास पाटील, प्र. कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, खजिनदार डलेश देसाई आणि ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरचे प्रशिक्षक नितीन पाष्टे हे मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील प्रमुख सामने आणि निकाल आज सर्व सामने किशोरीचे झाले. किशोरींच्या ओम साईश्वर सेवा मंडळ ने सरस्वती कन्या संघाचा ९-२ (९-१-१) असा १ डाव ७ गुणांनी पराभव केला. या सामन्यात ओम साईश्वरच्या वीरा मयेकर (४ मि. संरक्षण व ३ गुण), यशस्वी कदम (४ मि. संरक्षण व २ गुण), आर्या जाधव (नाबाद ३ मि. संरक्षण व २ गुण) यांनी केलेल्या खेळापुढे सरस्वती कन्या संघाचा निभाव लागला नाही. किशोरींच्या दुसऱ्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने आर्य सेनेचा ९-४ (९-२-२) असा १ डाव ५ गुणांनी पराभव केला. शिवनेरी तर्फे गार्गी कडगेने ४:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. गौरांगी पेडणकरने आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. इमला बोऱ्हाडेने ३:२० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. आर्यसेनेतर्फे आरुषी परवडीने नाबाद १:५० संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. दिक्षिता घोलपने १ मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. किशोरींच्या तिसऱ्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने वैभव स्पोर्ट्स क्लबचा (१७-२-३) १७-५ असा १ डाव १२ गुणांनी पराभव केला. श्री समर्थतर्फे सोनम शेलारने नाबाद २ मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. युक्ता पटेलने २:३० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. स्नेहा कांबळेने १:४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. वैभवतर्फे मेघदा देवळेकरने १:१०, १:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. किशोरींच्या चौथ्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने ॐ समर्थ व्यायाम मंदिराचा (९-१-१) ९-२ असा १ डाव ७ गुणांनी पराभव केला. ओम साईश्वरतर्फे कादंबरी तेरवणकरने ४:४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. वीरा मयेकरने ४:५० मिनिटे संरक्षण केले. आर्या गोरिवलेने नाबाद २:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. ॐ समर्थतर्फे खेळाडूने चांगला प्रतिकार केला. 0000
६६वी बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धा ठाणे : यजमान कुर्ला स्पोर्ट्स क्लबने चेंबूर जिमखान्याचा ६ धावांनी पराभव करत ६६ व्या बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धेत विजयी सुरुवात केली. टी २- प्रारूपात खेळल्या…
ठाणे : दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक…
मुंबई: विनय क्षीरसागर यांची १ डिसेंबर २०२४ पासून आयआरक्लास सिस्टम्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक – (मॅनेजिंग डायरेक्टर) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सागरी उद्योग आणि चाचणी, तपासणी आणि प्रमाणता…
2027 ला फिनलँडमधील 11 व्या आलिम्पिक चित्रकला स्पर्धेतही निवड ठाणे ः ठाण्यातील आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता दिव्यांग चित्रकार चेतन पाशिलकरने दिल्लीमधील राष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. चेतन पाशिलकर यांची फिनलँड येथे 2027 साली होणार्या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेसाठी पुन्हा निवड झाली आहे. (चेतन पाशिलकर यांनी मार्च 2023 साली फ्रान्स, मध्ये झालेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत पेंटिंग मध्ये सुवर्णपदक मिळविले होते.) दिव्यांग चेतन पाशिलकर हे शालेय जीवनापासूनच चित्रकला या विषयात पारंगत असून 2018 सालीही त्यांनी राष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते.. वेगवेगळ्या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या विविध प्रादेशिक चित्रकला स्पर्धेतही सुवर्णपदके मिळविली होते.चेतन पाशिलकर हे आपल्या पत्नी आणि लहान मुलगा सह ठाणे शहरातील हायल्यांड रेसिडेन्सी मध्ये वास्तव्यास असून ते दिव्यांग तसेच सामान्य विद्यार्थ्यांसाठी चित्रकला प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरेही घेतात. नुकतेच त्यांनी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल Abilimpic स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे त्यांच्या यशामुळेच 2027 या वर्षात फिनलॅण्ंडमध्ये होणार्या अकराव्या आंतरराष्ट्रीय Abylimpic स्पर्धेत त्यांची पुन्हा निवड झाली आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या स्पर्धेमध्ये दिव्यांगाच्या पुनर्वसनावर आधारित 33 वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आहेत यात क्राफ्ट, आयसीटी व सर्विसेस अशा तीन विभागात प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा क्रमाने स्पर्धा होत असतात. 2024 यावर्षी जानेवारी महिन्यात गोवा येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत निवड झाल्यानंतर चेतन पाशीलकर यांनी नुकत्याच ( डिसेंबर महिन्यात) दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय abylimpic स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले आहे. चेतन पाशीलकर हे मुख आणि कर्णबधिर असून देखील ते स्वतः लहान मुलांना पेंटिंगचे ज्ञान देत आहेत. 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्णपदक प्राप्त करूनही शासनाकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली न गेल्याची खंत ते व्यक्त करतात. क्रीडा क्षेत्रात प्रविण्या मिळणाऱ्या स्पर्धकाला अनेक बक्षिसे आणि मानधन मिळतात, मात्र चेतन पाशिलकर सारख्या दिव्यांग सुवर्ण पदक विजेत्या चित्रकाराचा सामाजिक संस्था व राजकीय मानकऱ्यांना त्याचा विसर पडतो. भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिव्यांग सुवर्ण पदक विजेता चित्रकार म्हणून सन्मानित करण्यात येत नाही हे त्या गरीब चित्रकारांचे दुर्दैवच म्हणावं लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी त्यांचे पालक आणि आपत्येष्ठ चेतन पाशिलकर यांच्या कलेसाठी मेहनत घेत आहेत. चेतन पाशीलकरांसारखे असंख्य दिव्यांग कलाकार आर्थिक कणा मोडल्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांना मुकतात अशावेळी त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक असते. दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उद्योजक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. सुधागड तालुक्यातील पाली जवळील तळई या डोंगर वस्तीत वसलेल्या गावातील चेतन पाशिलकर या मूकबधिर आंतरराष्ट्रीय सुवर्णं पदक विजेत्या चित्रकाराला मदतीचा हात दिल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील abylimpic दर्जाच्या चित्रकला स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी करून देशाचे नाव इतिहासात कोरण्याची किमया त्यांच्याकडून होऊ शकते. कारण दिव्यांगांच्या या स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी चेतन पाशिलकर यांच्याच नावावर आहे. ००००
६६वी बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धा ठाणे : यजमान कुर्ला स्पोर्ट्स क्लबने चेंबूर जिमखान्याचा ६ धावांनी पराभव करत ६६ व्या बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धेत विजयी सुरुवात केली. टी २- प्रारूपात खेळल्या जात असलेल्या स्पर्धेच्या शुभारंभी लढतीत १४७ धावांचा पाठलाग करणाऱ्या चेंबूर जिमखान्याला १४१ धावांवर रोखत कुर्ला स्पोर्ट्स क्लबने दुसऱ्या फेरीतले स्थान निश्चित केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कुर्ला स्पोर्ट्स क्लबला आर्यन मिश्राने ३७, मैत्रीक ठाकूरने ३१ धावांमुळे २० षटकात ८ बाद १४७ धावा करता आल्या. हितेश प्रजापतीने चार बळी मिळवत गोलंदाजीत छाप पाडली. उत्तरादाखल गौरव कुरकुरेने ५८ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाची आस दाखवली. पण इतर फलंदाजाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने चेंबूर जिमखान्याला विजयाने हुलकावणी दिली.यश पांडेने तीन फलंदाज बाद केले. आर्यन मिश्राला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. प्रारंभी मुंबई क्रिकेट संघटनेचे कार्यकारिणी सदस्य मंगेश साटम यांनी स्पर्धेचे रीतसर उदघाटन केले. संक्षिप्त धावफलक : कुर्ला स्पोर्ट्स क्लब : २० षटकात ८ बाद १४७,( आर्यन मिश्रा ३७, मैत्रीक ठक्कर ३१, हितेश प्रजापती २१ धावात ४ बळी) विजयी विरुद्ध चेंबूर जिमखाना : २० षटकात ८बाद १४१ (गौरव कुरकुरे ५८, यश पांडे २७ धावांत ३ बळी). युनियन क्रिकेट क्लब : २० षटकात ६ बाद १४५ ( विश्वास गनिया ४२,उद्धव मोरे ६४) विजयी विरुद्ध खंडाळा क्रिकेट क्लब : २० षटकात ९ बाद १४४ (जे. मंदिया ५६). 00000