मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांनी याबाबतचा अध्यादेश निर्गमित केला आहे. ही सार्वजनिक सुट्टी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी ‘दक्षता पथक’ स्थापन केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तसेच महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशात नमूद आहे. याबरोबरच उद्योग आणि कामगार विभागानेदेखील सार्वजनिक सुट्टीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खाजगी कंपन्यांतील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स , रिटेलर्स यांना सार्वजनिक सुट्टी लागू असेल. Reply Forward Add reaction