https://www.youtube.com/live/oHouNWAQb1A?si=cyxj_Q0G4EHgOA2i
https://www.youtube.com/live/oHouNWAQb1A?si=cyxj_Q0G4EHgOA2i
जॉर्ज सोरोसशी संबंधांवरून काँग्रेसची गोची
उद्योजक गौतम अदानी यांनी अमेरिकेतील काम मिळवण्यासाठी लाच दिल्याच्या कथित आरोपावरून काँग्रेसने गेल्या 15 दिवसांपासून संसदेच्या कामकाजात अडथळे आणले आहेत. या शहाला काटशह म्हणून भारतीय जनता पक्षाने जॉर्ज सोरोस आणि…
धर्माच्या नावावर रोज नवीन मुद्दे उचलने योग्य नाही; डॉ.भागवतांचे विधान स्वागतार्ह!
आतापर्यंत धर्माच्या नावावर झाले-गेले मुद्दे विसरून जावे.परंतु आता धर्माच्या नावावर नवीननवीन मुद्दे उपस्थित करून हिंदू -मुस्लिमांमध्ये कटुता निर्माण करणे योग्य नाही.यामुळे कट्टरतावाद निर्माण होवून संघर्षाची चिंगारी केव्हाही भडकु शकते व…
साने गुरुजी
आज भारत मातेचे थोर सुपुत्र, स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक साने गुरुजी यांची जयंती. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९…
धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान या आदिवासी योजनेची अंमलबजावणी करा –डॉ.नवलजीत कपूर
अशोक गायकवाड रायगड : धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना देण्यासाठी जिल्ह्य प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त सचिव,आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार डॉ.नवलजीत कपूर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आत्माराम धाबे, उपजिल्हाकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त सचिव, डॉ.नवल जीत कपूर म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी प्रधानमंत्री जनमन योजना या नावाने १५ नोव्हेंबर २०२३ सुरु झालेल्या योजनेचे २ ऑक्टोबरच्या धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान योजना नावाने नामांतर करण्यात आले आहे.आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी ही एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा आदिवासी बांधवांना लाभ द्यावा. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा विकास व्हावा, त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक आदिवासी बांधवांना मिळावा याकरिता संबधित विभागातील अधिकाऱ्यांनी महिन्यातील एक दिवस या योजनेसाठी द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या योजनेसाठी सकारात्मक भूमिका ठेवून काम केल्यास योजना अधिकाधिक गतिमान होईल व त्याचा लाभ आदिवासी बांधवांना मिळेल. ज्या आदिवासी बांधवांचे बँक खात्याशी आधार संलग्न नसेल तर त्यांचा सर्व्हे करुन ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.आदिवासीच्या विविध योजनांसाठी असलेले अनुदान वाढवून देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. या योजनेविषयी काही अडचणी असतील तर अधिकारी वर्गाने माझ्याकडे संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपिस्थित अधिकाऱ्यांना केले. यावेळी उपस्थितांना दूरदृष्य प्रणालीद्वारे धर्ती आभा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान योजनेची माहिती देण्यात आली. 00000
मुंबई शहराची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन
मुंबई शहराची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन मुंबई:-मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ वर्षाखालील मुले – मुली, द्वितीय श्रेणी (ब) आणि तृतीय श्रेणी (क) गट स्थानिक पुरुष, विशेष व्यावसायिक, व्यावसायिक-अ, व्यावसायिक-ब, व्यावसायिक महिला गट कबड्डी स्पर्धा दिनांक २५ डिसेंबर २०२४ ते ०३ जानेवारी २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा, मुंबई येथे या स्पर्धा खेळविण्यात येथील. ज्या संलग्न संघाना उपरोक्त स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी आपले प्रवेश अर्ज व खेळाडूंची नोंदणी ऑलाईन पूर्ण करून आपला सहभाग नोंदवावा. त्याच बरोबर आपल्या विभागातील सहकारी संघांनही याची कल्पना द्यावी. हि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून असो. ला सहकार्य करावे असे आवाहन या परिपत्रकाद्वारे सचिव विश्वास मोरे यांनी सर्व प्रसार माध्यमाद्वारे केले आहे.
