Author: bittambatami.com

 ‘सदगुरुंनी निर्माण केलेली विश्वप्रार्थना म्हणजे गीतेचे सार आहे’

 कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली जीवनविद्या मिशन ची प्रशंसा   कर्जत : सदगुरु वामनराव पै यांनी निर्माण केलेली  विश्वप्रार्थना म्हणजे  गीतेचे सार आहे, अशा शब्दांत राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  जीवनविद्या मिशन ची प्रशंसा केली. थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कर्जत येथील ज्ञानपीठात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आनंद मेळाव्यातील आजच्या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी जीवनविद्या मिशन च्या कार्याचा गौरव केला. सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना मंगलप्रभात लोढा यांनी विनम्र अभिवादन केले. धर्मरक्षणासाठी, मानवी जीवन सुखी करण्यासाठी चांगले संस्कार समाजाला मिळायला हवेत. हे चांगले संस्कार समाजाला जीवनविद्या मिशनसारख्या संस्था निस्वार्थपणे देत आहेत. याबद्दल त्यांनी सदगुरु आणि प्रल्हाद पै यांची विशेष कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद पै म्हणाले की, प्रत्येक मुल हे वेगवेगळं असतं. त्याच्यातील कौशल्य शोधून त्याला योग्य वाव देणं म्हणजे आनंदी पालकत्त्व. मुलांना संस्कार देणे म्हणजे त्यांना योग्य शिक्षण, शिकवण आणि अनुभव देणे होय. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी पालकांनी आधी स्वतःमध्ये योग्य बदल करायला हवेत. दुपारच्या सत्रात सदगुरुंचे पालकत्त्वावर विशेष मार्गदर्शन झाले. त्याचप्रमाणे एका नाविण्यपूर्ण चर्चासत्रात आदरणीय श्री प्रल्हाद पै यांच्यासोबत पत्रकार दक्षता ठसाळे घोसाळकर आणि प्रोफेसर पूजा पवार जांभळे यांनी मुक्त संवाद साधला. पालकत्त्व या विषयावर त्यांनी प्रल्हाद पैंना विविध प्रश्न विचारले. ज्यामध्ये आजच्या आधुनिक काळात पालकांना जाणवणाऱ्या विविध समस्या आणि प्रश्न होते. त्यांना उत्तर देताना प्रल्हाद पै यांनी आनंदी पालकत्त्वाच्या विविध टीप्स सर्वांसोबत शेअर केल्या. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी एक सहज सोपी पालकत्त्वाची व्याख्याच सर्वांना सांगितली. “प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या स्वभावाचे असते. त्यामुळे प्रत्येक मुलात एक वेगळे कौशल्य दडलेलं असतं. आपल्या मुलामधील ही कौशल्ये शोधून त्यांना योग्य संधी देणे म्हणजे आनंदी पालकत्त्व होय.” मुलांमधील ही कौशल्ये शोधण्यासाठी पालकांनी मुलांना योग्य वेळ द्यायला हवा. मुलांच्या आवडी निवडी जपायला हव्या. विशेष म्हणजे आपल्या मुलांना चांगले नागरिक बनविण्याचा प्रयत्न करा. त्यांचे मालक नाही तर पालक बना असे त्यांनी यावेळी सांगितले. मुलं ही पालकांचे निरिक्षण करून मोठी होत असतात. संस्कार कऱण्यासाठी त्यांना योग्य शिक्षण, शिकवण आणि अनुभव देणे गरजेचे आहे. मुलांवर चांगले संस्कार कऱण्यासाठी पालकांनी स्वतःमध्ये योग्य बदल करणेही तितकेच गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. मुलांना संस्कार देताना मुलांसोबत पालकांचा चांगला बॉन्ड तयार झाला पाहिजे. कारण त्यामुळे तुमची मुलं तुम्हाला न घाबरता त्यांच्या समस्या सांगतील आणि त्यांच्या जीवनातील आव्हाने तुम्हाला कमी करणं शक्य होईल. मुलांना चांगले नागरिक बनविण्यासाठी, उत्तम माणूस करण्यासाठी त्यांना जीवनविद्येचे संस्कार त्यांना द्या. तुम्हाला जर दोन जुळं मुलं असली तरी ती मुलं वेगवेगळी आहेत हे स्विकारा. त्यांच्यात एकमेकांशी तुलना करू नका. त्यापेक्षा प्रत्येकातील विशेष कौशल्य ओळखा आणि त्याच्या कौशल्यांना वाव द्या. कारण प्रत्येकाला या जगार परमेश्वराने एक विशेष उद्देशासाठी पाठवलं आहे. यासाठीच प्रत्येकामध्ये असलेलं हे वेगळं कौशल्य आईवडिलांनी ओळखणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात सकाळी ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ, श्रीसदगुरु पूजन, मानसपूजा आणि विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थनेची साधना अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आय़ुष्यभर निस्वार्थपणे जीवनविद्या मिशनचे कार्य करणाऱ्या काही शिष्यमंडळींना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यंदा हा पुरस्कार जेष्ठ प्रसारक कल्याणी पोतनीस, ज्येष्ठ नामधारक काशिनाथ पवार आणि प्रदीप सुभेदार यांना प्रदान करण्यात आला.

पडद्याआडून काम करणाऱ्या समन्वयक पटवर्धन यांच्यावर श्रेष्ठी खूश

 कोकणात महायुतीला यश मिळण्यात महत्त्वाची भूमिका पटवर्धन यांनी फडणवीस यांना दिल्या मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा   योगेश चांदेकर पालघरः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणात महायुतीचे समन्वयक म्हणून अनिकेत पटवर्धन यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आणि महायुतीला कोकणात विजयी करण्याच्या त्यांच्या या कामगिरीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दखल घेऊन त्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली. दरम्यान, पटवर्धन यांनी फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेऊन महायुतीच्या यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मुख्यमंत्री होण्यासाठीही सदिच्छा दिल्या. महायुतीचे समन्वयक म्हणून अनिकेत यांच्यावर चव्हाण यांनी मोठी जबाबदारी सोपवली होती. पटवर्धन हे चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक आहेत. राज्यातील महायुतीच्या यशाचे शिल्पकार जसे फडणवीस आहेत तसेच कोकणातील महायुतीच्या यशामागे पटवर्धन यांचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत. महायुती एकसंघ ठेवण्याची जबाबदारी कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात महायुतीमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी पटवर्धन यांच्याकडे होती. रत्नागिरी, दापोली, राजापूर आणि चिपळूण या चार विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी करण्यामागे समन्वयक म्हणून पटवर्धन यांचा महत्त्वाचा वाटा होता, हे विसरून चालणार नाही. महायुतीत कोणत्याही प्रकारचा बेबनाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन पटवर्धन यांनी काम केले. युती अभेद्य ठेवणे, पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवणे आणि चव्हाण यांच्याशी त्यांचा वारंवार समन्वय घडवून आणणे, त्याचबरोबर कोकणातील सर्व जिल्ह्यात महायुतीला मतदान होण्याच्या दृष्टीने संपूर्ण व्यूहरचना पटवर्धन यांनी केली. त्यासाठी वारंवार त्यांनी फडणवीस आणि चव्हाण यांचे मार्गदर्शन घेतले. संयम आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम अतिशय संयमी पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली. कुठेही वाद निर्माण होणार नाही किंवा गैरसमज निर्माण होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. त्याचबरोबर महायुतीतील नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या काही अडीअडचणी असतील, तर त्यावर चव्हाण यांच्याशी संपर्क ठेवून तोडगा काढण्याचे काम त्यांनी जागच्या जागी केले. त्याचबरोबर महायुतीला मदत करू शकणाऱ्या आणि पडद्याआड राहू इच्छिणाऱ्यांशी त्यांनी संपर्क ठेवला. पालकमंत्री चव्हाण यांच्यांशी चर्चा घडवून आणली. त्यातून महायुतीला अनेक दृश्य अदृश्य हातांची मदत झाली. त्याचा परिणाम कोकणामध्ये महायुतीला प्रचंड यश मि‍ळण्यात झाला. श्रेयवाद टा‍ळून समन्वय चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप कोकणात काम करीत असून त्यात पटवर्धन हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांची ही भूमिका अशीच राहणार आहे. अनेक नेते केलेल्या व न केलेल्या कामाचे श्रेय घेत असतात. फोटो काढून मिरवत असतात; परंतु याला अनिकेत पटवर्धन हे अपवाद आहेत. त्यांनी राज्याच्या तसेच केंद्राच्या नेतृत्वाशी आपले संबंध कायम ठेवले आहेत; किंबहुना ते वृद्धिंगत केले आहेत. नेत्यांशी चांगल्या समन्वयातून नेत्यांचा त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे. पक्षहितापुढे सारे गौण राज्यातील अनेक नेत्यांची तसेच अनेक कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध ठेवून त्यातून भाजपचे अधिकाधिक भले कसे होईल यासाठी अनिकेत प्रयत्न करत असतात फडणवीस आणि चव्हाण यांनी अनिकेत यांच्यासारखा एक चांगला पडद्याआड राहून काम करणारा संयमी कार्यकर्ता पक्षाला दिला. शांतपणे आणि संयमीपणे काम कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून अनिकेत यांच्याकडे पाहिले जात असून त्यांचा पक्षाला यापुढे चांगला उपयोग होईल, असा विश्वास महायुतीच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना आहे. फडणवीस आणि चव्हाण यांच्यावर अनिकेत यांची अढळ निष्ठा असून कोणत्याही लाभासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग न करता पक्षहीत एक हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून काम करण्याच्या पटवर्धन यांचे फडणवीस आणि चव्हाण यांनाही कौतुक आहे. पटवर्धन पडद्यामागून जरी काम करीत असले, तरी आपण पक्ष नेत्यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या व्यूहनीतीनुसार काम करतो, याची त्यांना जाणीव आहे. आपण काय काय काम केले आणि त्याचा काय काय परिणाम झाला याचा अहवाल ते सातत्याने आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या नेत्यांना देत असतात. त्यातून त्यांची कामावरची निष्ठा दिसते. 0000

ईव्हीएमविरोधात ‘इंडियाचा’ एल्गार

व्हीव्हीपॅट मोजणीसाठी अर्ज करा ० पवार, ठाकरेंचे पराभूत उमेदवारांना आदेश   मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अभुतपुर्व पराभवानंतर आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने देशातील इंडिया आघाडीसह ईव्हिएमविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला…

मुंबईवर २६ नोव्हंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या पोलीस आणि सैन्यातील वीरांना पोलीस आयुक्तालय येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या शौर्याला अभिवादन करताना भाजपा नेते…

एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री !

 मुदत संपल्यामुळे राज्यपालांना सोपवला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ० मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम ० दिल्लीत वाटाघाटींना वेग स्वाती घोसाळकर मुंबई: विधानसभेची मुदत संपत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…

अंबरनाथच्या शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण

ठाणे : अंबरनाथ जिल्ह्यातून वडोदरा राष्र्टीय महामार्ग जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेत जमिनी संपादीत केलेल्या आहे. त्यानुसार अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचीही शेतजमीन संपादीत झाली आहे. पण त्या बदल्यात त्यांना मोबदला मिळाला नसून तो परस्पर काढून…

कन्नडिगांचा कौल

  महाराष्ट्रासह देशातील विधानसभेच्या पोटनिवडणुकात काँग्रेसचा धुव्वा उडाला. त्याला अपवाद ठरले झारखंड आणि कर्नाटक. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस लढली. त्यामुळे या विजयात झारखंड मुक्ती मोर्चाचाही सहभाग आहे. कर्नाटकमधील…

संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संविधान कीर्तन मालिका

विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म l भेदा भेद भ्रम अमंगळ ll1ll आईकाजी तुम्ही भक्त भागवत l कराल ते हित सत्य करा ll2ll कोणाही जीवाचा न घडो मत्सर l वर्म सर्वेश्वर पूजनाचे…

वाचता आव्हानांचा पाढा…

अलिकडेच पंतप्रधानांच्या सल्लागार समितीने दाखवल्याप्रमाणे दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दहाच्या खाली घसरला आहे. दुसरीकडे, सकल उत्पन्नातील आपला वाटा 15 टक्क्यांवरुन घसरुन 13 टक्के झाला आहे. म्हणजेच उत्पादनाचा वाटा घसरला आहेच,…