Author: bittambatami.com

वाढते प्रदुषण व बदलते हवामान रोखण्यासाठी पर्यावरण संरक्षणाची गरज

पर्यावरणाची सुरक्षा व संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रानी पर्यावरणाच्या प्रती वैश्विकस्तर यावर आणि राजनीतीक व सामाजिक जागृती आणण्याकरिता संयुक्त राष्ट्राने २६ नोव्हेंबर १९७२ ला “विश्र्व पर्यावरण संरक्षण दिवस” साजरा करण्याची घोषणा…

संविधान; भारताचा राष्ट्रीय ग्रंथ

आज २६ नोव्हेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान…

प्रांतनिहाय वर्चस्व कसे उभे राहिले?

अवघ्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दणकून मार खाल्ल्यानंतर नव्या जोमाने कामाला लागलेल्या महायुतीवर लोकांनी भरभरुन टाकलेला विश्वास, फेक नरेटिव्ह कुचकामी ठरणे, जातीपातीच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण करत सामाजिक वातावरणात…

ठाणे जिल्ह्यात ‘नोटा’ला ४७ हजार मतदान, शहापूर आणि ओवळा माजिवडा मतदारसंघात नोटाला अधिक पसंती

ठाणे : ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीमध्ये ‘नोटा’वर अर्थात ‘वरील पैकी कोणताही उमेदवार नको’ या पर्यायासाठी तब्बल ४७ हजार २४२ जणांनी मतदान केले. सर्वाधिक मतदान शहापूरमध्ये झाले असून या ठिकाणी ४…

पसंतीचा वाहन क्रमांक घरबसल्या मिळण्याची सुविधा

मुंबई : लाखो-करोडो रुपये खर्च करून नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आता ऑनलाइन पद्धतीने आकर्षक वाहन क्रमांक मिळवण्याची सुविधा आरटीओद्वारे राज्यभरात सुरू केली जाणार आहे. त्यामुळे घरबसल्या पसंतीचा वाहन क्रमांकाची नोंद…

 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार

 लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा   ठाणे : एकनाथ शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढलेला उमेदवार आता निकालानंतर शिंदेंच्याच पक्षात प्रवेश करणार आहे. रविवारी रात्री उशिरा त्यांनी ही  घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांची पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. मनोज शिंदे हे काँगेसमधून बंडखोरी करीत कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उभे राहिले होते. यामुळे शिंदे यांची काँग्रेसने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा चांगलाच सुफडासाफ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र उबाठा पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच एकतर्फी निवडणूक होणार अशी चर्चा झाली. तर काँगेसमधून बंडखोरी करीत मनोज शिंदे यांनी देखील या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला होता. उबाठा पक्षाचे उमेदवार असताना काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी निवडणुकीत उडी मारल्याने शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागताच मनोज शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाची घोषणा केली. लवकरच महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे मनोज शिंदे यांनी सांगितले. ०००००

डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती आणि डोंबिवलीतील फ, ग आणि ह प्रभागातील वितरण वाहिन्यांवरील गळती थांबविणे आणि व्हाॅल्व्ह दुरुस्तीच्या कामासाठी डोंबिवली…

ठाणे जिल्ह्यात पशुगणनेस प्रारंभ

ठाणे : पशुगणनेला सोमवारपासून ठाणे जिल्ह्यात प्रारंभ होणार आहे. २८ फेब्रवारीपर्यंत ही मोहीम चालणार आहे. तीन हजार कुटुंबामागे एका प्रगणकाची नियुक्ती केली आहे. पशुगणनेमुळे पशुसंवर्धन विभागाला योजनांची अंमलबजावणी करणे, निधीची…

ठाणे महापालिकेच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाळकुम येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क…

 २७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न

प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या अध्यक्षतेखाली अनिल ठाणेकर ठाणे : कर्नाटकमधील निपाणीतील कारदगा येथे २७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ नाटककार-साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या ‘योद्धा कर्मयोगी’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सीमाभागातील मराठीप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या संमेलनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाचा हा योग रविवारी जुळून आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, उद्योजक राजेंद्र पवार, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळचे संचालक इंद्रजीत पाटील, ब्रम्हाकुमारी साक्षी कमलापुरे, कारदगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अभिनंदन मुराबट्टे, चिंतामणी मगदूम, स्वागताध्यक्ष पद्मावतीताई अलंकार, डॉ. अच्युत माने, माजी आमदार सुभाष जोशी, श्री जंगली महाराज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद खराडे, प्रा. चंद्रकुमार नलगे फाऊंडेशनच्या अध्यक्ष अनिता नलगे, कन्नड बळग संघाचे गौरवाध्यक्ष राजू खिचडे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. निपाणी येथील साहित्य विकास मंडळाकडून आयोजित करण्यात आलेले २७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन कारदगा येथे रविवारी संपन्न झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची निवड करण्यात आली होती. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सीमाभागाचा उज्ज्वल इतिहास आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ, तसेच ग्रामीण साहित्य आणि ग्रामसंस्कृती यांच्या अनुबंधाचा पट उलगडून दाखवला. सीमाभागातील मराठी भाषक बंधू-भगिनी मराठी भाषा, संस्कृती आणि विचार प्राणपणाने जपण्याचे काम करत आहेत, असे सांगत प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी सीमाभागातील मराठीजनांचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्राने सीमाभागातील मराठीजनांना नेहमी आपलेच मानले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील निपाणी-बेळगावसह ८६१ गावांतील मराठीजनांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहिले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत सीमाभागातील मराठीजनांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. महाराष्ट्र राज्याच्या कल्याणकारी योजना, तसेच आरोग्यसेवांचा लाभ सीमाभागातील मराठीजनांना मिळावा, यादृष्टीने महायुती सरकारने सकारात्मक पावले उचलली आणि यापुढेही महायुती सरकार सीमाभागातील मराठीजनांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा विश्वासही प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. याविषयी बोलताना प्रा. डॉ. प्रदीप ढवळ म्हणाले की, सीमाभागातील मराठीजनांच्या लढ्याशी शिवसेना नेहमीच एकनिष्ठ राहिली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे सीमावासीयांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या विचारांवर काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनीदेखील त्यांच्या तरुणपणी सीमालढ्यातील आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. त्यासाठी कर्नाटकमध्ये त्यांना महिनाभराचा तुरुंगवासही भोगावा लागला होता. सीमावासीयांच्या वेदना आणि दु:ख माहीत असलेला एकनाथ शिंदे यांच्यासारखा शिवसैनिक सव्वादोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाला. तेव्हापासून त्यांनी सीमावासीयांच्या हितासाठी जे जे करणे शक्य आहे ते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी जनांमध्ये त्यांच्याविषयी, राज्य सरकारविषयी आणि महाराष्ट्राविषयी सकारात्मक भावना आहेत. या ग्रामीण साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन होणे, ही त्यामुळेच ऐतिहासिक गोष्ट ठरली आहे. सीमाभागातील मराठीजन या चरित्रग्रंथाचे नक्कीच स्वागत करतील, असा विश्वास असल्याची भावना प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी याप्रसंगी व्यक्त केली. ००००