Author: bittambatami.com

 तेजज्ञान फाउंडेशनच्या वतीने रजत जयंती ध्यान महोत्सवाचे आयोजन

 ८ डिसेंबर रोजी पनवेलमध्ये तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत आयोजन   राज भंडारी पनवेल : हॅपी थॉट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेच्या स्थापना दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी १ डिसेंबर रोजी वाशी येथे तर ८ डिसेंबर रोजी पनवेल येथे तसेच १५ डिसेंबर रोजी अलिबाग येथे रजत जयंती ध्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी विजेंद्र जैन, प्रज्ञा कोळवणकर, प्रभात कोळवणकर, आशा सरकटे, विलास साठे, शागुप्ता गदने आदी उपस्थितांनी कार्यक्रमाच्या रुपरेशेबद्दल माहिती दिली. ज्ञान ध्यान केंद्रात १ डिसेंबर रोजी वाशी सेक्टर १५ येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० ते १२ या वेळेत होणाऱ्या या महोत्सवाचे उद्‍घाटन व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक तथा लेखक डॉ.अजित मगदूम, के.जे.सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्रिन्सिपॉल डॉ.विवेक सुन्नपवर आणि म.टा.सन्मान पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध अभिनेते अमोल देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दिनांक ८ डिसेंबर रोजी पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात सकाळी १० ते १२ यावेळेत आयोजन करण्यात आले असून यावेळी पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ.योगेश्वर दयाळ कौशिक आणि जिमनॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाचे टेक्निकल कमिटी चेअरमन पवन भोईर यांच्या उपस्थितीत याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अलिबाग येथे पार पडणारा कार्यक्रम हा जे.एस.एम.कॉलेजच्या सभागृहात दिनांक १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:३० ते ६:३० यावेळेत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी रायगड भूषण डॉ.के. डी. पाटिल, स्त्री शक्ती पुरस्कार प्राप्त डॉ.निहा राऊत आणि महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या ध्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरु सरश्री यांनी जीवनात ध्यान व आध्यात्मिक साधनेचे महत्त्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण केली आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फाउंडेशनचे सर्व साधक, ध्यानप्रेमी आणि नागरिकांना उत्साहपूर्वक निमंत्रण करण्यात आले आहे. आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद व शांततेच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी या महोत्सवाचा एक भाग व्हा!, असे आवाहन फाउंडेशनमार्फत करण्यात आले आहे. 00000

पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे २८ नोव्हेंबरला प्रकाशन

मुंबई :भारतातील पोर्ट उद्योगात सर्वात जुनी असलेली १०४  वर्षाची  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन आहे. स्वातंत्र्यसेनानी, मुंबईचे माजी महापौर, माजी खासदार व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांच्या…

 एकनाथ शिंदेकडून आमदार महेंद्र थोरवे यांचा सत्कार

दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल माथेरान:‘महेंद्र हा आमचा वाघ आहे. निवडणूक काळात अनेक संकटे आली पण  तो मुळीच घाबरला नाही. मी कर्जतकराना धन्यवाद देतो की तुम्ही शिवसेना पक्षाला साथ दिली आणि तुमचा महेंद्र आत्ता दुपटीने विकास करेल हा विश्वास आहे’, असे गौरवोद्गार एकनाथ शिंदे यांनी महेंद्र थोरवे यांच्याबद्दल काढले. नुकताच विधानसभा निवडणूका पार पडल्या असून महायुतीच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदार संघातील उमेदवार महेंद्र थोरवे यांनी अटीतटीच्या लढतीत विजय संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन आशीर्वाद घेतले.खऱ्या अर्थाने कर्जत खालापूर मतदार संघातील जवळपास २९०० कोटी रुपयांची विकास कामे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे तडीस नेली आहेत. त्यामुळे आगामी काळात सुध्दा या मतदार संघातील जी काही प्रलंबित कामे आहेत ती पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने मार्गी लागणार आहेत. ह्या मतदार संघात अत्यंत चुरस पहावयास मिळाली आहे परंतु केवळ अडीच वर्षाच्या कार्यकाळात आमदार महेंद्र थोरवे यांनी झपाटून कामे केल्यामुळेच ह्या मतदार संघाचा कायापालट होत आहे. महेंद्र थोरवे यांचा मुख्यमंत्र्यांकडुन छोटेखानी सत्कार होताना हा समस्त मतदार संघातील कार्यकर्त्यांचा सन्मान आहे असे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले.यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले,शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.

मिहीर शहा आणि त्याच्या चालकाची अटक कायदेशीरच

 वरळी येथील हिट अँण्ड रन प्रकरण : मुंबई : वरळी येथील अपघाताप्रकरणी शिवसेना (एकनाथ शिंद) नेत्याचा मुलगा मिहीर शहा आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत यांना झालेली अटक ही कायदेशीरच होती. त्यात काहीच बेकायदा नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने सोमवारी दोघांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. अटक करताना ती करण्याची कारणे आपल्याला सांगण्यात आली नव्हती, असा दावा करून मिहीर आणि बिडावत यांनी अटकेला आव्हान दिले होते. तसेच, अटक बेकायदा ठरवून आपली तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने दोघांची अटक कायदेशीर ठरवून त्यांच्या याचिका फेटाळला. दरम्यान, याचिकांवरील युक्तिवादाच्या वेळी एखाद्या व्यक्तिला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले किंवा पकडले गेल्यास त्याला अटकेच्या कारणांची माहिती देणे ही निव्वळ एक औपचारिकता असते. मद्यपान करून बेदरकारपणे गाडी चालवणे आणि सदोष मनुष्यवधासाठी कारणीभूत ठरण्याच्या प्रकरणात तर या नियमाचे पालन न केल्याने फारसा फरक पडत नाही, असे खंडपीठाने प्रामुख्याने स्पष्ट केले होते. तसेच. गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगितले नसल्याचा दावा करून अटकेला आव्हान देणाऱ्या मिहीर आणि बिडावत यांच्या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. याचिकाकर्त्याला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले गेले आहे. त्यानंतरही त्याला अटकेचे कारण माहिती नाही ? अटकेचे कारण सांगितले नाही म्हणून त्यांची अटक ही बेकायदा कशी ठरते ? प्रत्येक प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार, कार्यवाही करणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. याचिकाकर्त्यावरील आरोप लक्षात घेता त्याने मद्याच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून आधी दुचाकीला धडक दिली. त्यानंतर, धडकेमुळे, दुचाकीवरून पडलेल्या महिलेला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. एवढेच नाही, तर याचिककर्ता इतका घाईत होता की तो फास्टॅग कार्ड मागे विसरला, त्याचाही त्याला विसर पडला. त्यामुळे, या प्रकरणाकडे उदाहरण म्हणून पाहण्याची गरज आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली मिहीर याच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करताना केली होती. आरोपीला त्याने केलेल्या कृत्याची माहिती असतानाही निव्वळ औपचारिकता म्हणून त्याला ताब्यात घेत असल्याची माहिती द्यावी लागते. परंतु, सर्वकाही माहिती असूनही आपल्याला अटकेचे कारण सांगितले नाही हा मिहीर याचा दावा आश्चर्यकारक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. प्रकरण काय ? मिहीर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. त्याच्यावर मद्याच्या नशेत भरधाव बीएमडब्ल्यू चालवून कावेरी नाखवा (४५) या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. मिहीरने ९ जुलै रोजी मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवताना नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे जमिनीवर पडलेल्या कावेरी यांना रुग्णालयात नेण्याऐवजी त्याने गाडीनेच दीड किमीपर्यंत फरफटत नेले होते. यात कावेरी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून पळून गेला. राजेश शहा यांनाही पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, त्यांना जामीन मिळाला आहे.

डोंबिवली जवळील अप्पर कोपर रेल्वेस्थानकातील प्रवाशांचा रेल्वे मार्गातून प्रवास

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे बहुतांशी प्रवासी जिन्यावरून चढण्याचा त्रास वाचविण्यासाठी आणि मधला मार्ग म्हणून रेल्वे मार्गातून प्रवास करत आहेत. दररोज…

नाशिक जिल्ह्यात केवळ १६ उमेदवारांना अनामत वाचविणे झाले शक्य

हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीत बहुतांश मतदारसंघात मोठ्या फरकाने महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवल्याने अनेक ठिकाणी प्रमुख प्रतिस्पर्ध्यासह पराभूत इतर सर्व उमेदवारांना अनामत रक्कम गमावण्याची वेळ आली. १५ मतदारसंघात १९६ पैकी १६५ म्हणजे ८४ टक्के उमेदवारांनी ही रक्कम गमावली. केवळ १६ उमेदवार आपली अनामत वाचवू शकले. विधानसभेच्या जिल्ह्यातील १५ पैकी १४ जागांवर एकहाती विजय मिळवत महायुतीने महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडवला. राष्ट्रवादीने (अजित पवार) सर्वाधिक सात, भाजपने पाच तर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दोन आणि एमआयएमने एक जागा मिळवली. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षांसह काँग्रेसचा दारूण पराभव झाला. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये भरावे लागतात. अनामत रक्कम परत मिळण्यासाठी उमेदवाराला एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मते (१६.३३ टक्के) मिळणे आवश्यक असते. निवडणुकीत मोठ्या फरकाने उमेदवार विजयी झाल्यास प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवाराला अनामत वाचविणे शक्य होत नाही. ज्यांना तेवढी मते मिळतात, केवळ त्याच उमेदवारांना अनामत रक्कम परत मिळते. उर्वरितांना ती गमवावी लागते. जिल्ह्यात १६५ उमेदवार तेवढी मते मिळवू शकले नाहीत. संबंधितांना अनामत रक्कम गमवावी लागली. नाशिक जिल्ह्यात मालेगाव बाह्य, बागलाण आणि इगतपुरी मतदारसंघात प्रत्येकी १६ उमेदवार होते. मतदानासाठी या ठिकाणी दोन मतदार यंत्रांचा वापर करावा लागला. नाशिक पश्चिममध्ये १५ तर नाशिक मध्य चांदवड आणि नांदगावमध्ये प्रत्येकी १४ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात बागलाणमध्ये भाजपचे दिलीप बोरसे १ लाख २९ हजार या सर्वाधिक फरकाने विजयी झाले. या मतदारसंघात दोन लाख तीन हजार मतदान झाले होते. अनामत रक्कम वाचविण्यासाठी या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवारास ३३ हजार मते मिळणे अपेक्षित होते. परंतु, शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण यांना ३० हजार ३८४ मते मिळाली. तशीच स्थिती इगतपुरी मतदारसंघातही झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हिरामण खोसकर यांनी ८६ हजार ५८१ च्या मताधिक्याने विजय मिळवला. या मतदारसंघात एकूण मतदान दोन लाख १४ हजार इतके झाले होते. प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसचे लकी जाधव यांना अनामत रकमेसाठी ३५ हजार मते मिळणे आवश्यक होते. तथापि, त्यांना ३० हजार ९९४ मते मिळाली. बागलाणमध्ये दीपिका चव्हाण आणि इगतपुरीत लकी जाधव या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांनाही अनामत रक्कम गमवावी लागली. उर्वरित १३ मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावरील नाशिक पश्चिम मतदारसंघ वगळता १२ मतदारसंघात उमेदवारांनाही ही रक्कम गमवावी लागली. त्यास केवळ नाशिक पश्चिम मतदारसंघ अपवाद ठरला. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार १५ मतदारसंघात केवळ १६ उमेदवार एकूण मतदानाच्या एक षष्ठांशहून अधिक मते मिळवत अनामत रक्कम वाचवू शकले. यामध्ये येवल्यात माणिकराव शिंदे, नांदगावमध्ये समीर भुजबळ, चांदवडमधील गणेश निंबाळकर व केदा आहेर, देवळालीत राजश्री अहिरराव व योगेश घोलप, नाशिक मध्य मध्ये वसंत गिते, नाशिक पश्चिम मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावरील सुधाकर बडगुजर व तिसऱ्या क्रमांकावरील दिनकर पाटील, नाशिक पूर्वमध्ये गणेश गिते, निफाडमध्ये अनिल कदम, कळवणमध्ये जे. पी. गावित, सिन्नरमध्ये उदय सांगळे, मालेगाव बाह्यमधील बंडुकाका बच्छाव, मालेगाव मध्यमधील असिफ शेख रशिद व दिंडोरीतील सुनिता चारोस्कर यांचा समावेश आहे. ०००००

 मानसिक आरोग्य सुदृढ होण्यासाठी अध्यात्माची जोड महत्त्वाची

 प्रल्हाद पै यांचे प्रतिपादन कर्जतच्या जीवनविद्या ज्ञानपीठात आनंद सोहोळा उत्साहात   मुंबई, : ‘माणूस आनंदी असला की शरीरात हॅपी हॉर्मोन्स तयार होतात आणि या हॅपी हॉर्मोन्समुळे माणूस आनंदी होतो. मानसिक…

१८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येत विजयी चौकार मारणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्यावतीने पुस्तक भेट देऊन मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे…

व्यवसाय परवाना नुतनीकरणाबाबत जाहीर आवाहन

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 376, अनुसूची ड, प्रकरण 18, भाग 4 मध्ये समाविष्ट असलेले सर्व व्यवसाय (उदा. खानावळी, हॉटेल, उपहारगृहे, लॉजिंग बोर्डींग, स्वीट मार्ट, केक…

भिवंडीतील अवैध भंगार गोदामे असुरक्षित

भिवंडी  : भिवंडीतील बेकायदा भंगार गोदामे आता सुस्थितीत नाहीत, अवैध भंगार गोदामांमुळे नेहमी आगी लागण्याच्या घटना घडतात. त्याचा फटका लोकवस्तीलादेखील बसतो. ही जाळपोळ थांबविण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला…