Author: bittambatami.com

आचारसंहिता संपताच मुंबई महापालिका उगारणार कारवाईचा बडगा

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडले असून शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीअंती निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मुंबईत बानरवाजीला उत येण्याची शक्यता आहे.…

 प्रकाश फातर्पेकर यांची हेट्रिक हुकली

 चेंबूरमध्ये तुकाराम कातेंचा विजयी   मुंबई: मतमोजणीत अखेरपर्यंत चुरस असलेल्या चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) तुकाराम काते विजयी झाले आणि त्यांना आव्हान देणारे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) प्रकाश फातर्पेकर यांची हेट्रिक हुकली. तुकाराम काते यांच्या विजयानंतर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) कार्येकर्त्यांनी चेंबूर परिसरात मोठा जल्लोष केला. विधानसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये चेंबूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) प्रकाश फातर्पेकर विजयी झाले होते. यावेळी पक्षाने त्यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिले. त्यांच्यासमोर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) माजी आमदार तुकाराम काते यांना उमेदवारी दिली. यापूर्वी तुकाराम काते अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. चेंबूर विधानसभा मतदारसंघात त्यांचा फारसा प्रभाव नव्हता. मात्र भाजपचे बळ मिळाल्यामुळे तुकाराम काते यांना मोठी मदत झाली. मतमोजणी दरम्यान काते आणि फातर्पेकर यांच्यात मोठी चुरस सुरू होती. पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये तुकाराम काते पिछाडीवर होते. मात्र सातव्या फेरीनंतर काते यांनी आघाडी घेत फातर्पेकर यांना मागे टाकले. अखेर २१ व्या फेरीअंती काते यांचा १० हजार ८२२ मतांनी विजय झाला. काते यांना एकूण ६२ हजार ९९१ मते मिळाली, तर प्रकाश फातर्पेकर यांना ५२ हजार १६९ मते मिळाली. ०००००

मातोश्रीच्या अंगणात ठाकरेंची सरशी, वरुण सरदेसाई ११३६५ मतांनी विजयी

मुंबई : मातोश्रीच्या अंगणात अर्थात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील तिरंगी आणि अतितटीच्या लढाईत अखेर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवाराने वरुण सरदेसाई यांनी अखेर बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) झिशान सिद्दिकी…

दादा भुसे यांचा मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातून पाचव्यांदा दणदणीत विजय

मालेगाव : मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा पालकमंत्री दादा भुसे यांचा पाचव्यांदा दणदणीत विजय झाला आहे. अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचा भुसे यांनी १ लाख ६…

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना

 मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणार   मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग उमेदवार हे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी त्यांना लेखनिक उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना’ प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह संदर्भीय शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार विनंती अर्ज सादर करुन पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे. आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा गट-क  च्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज, संबंधित सर्व कागदपत्रे तसेच प्रमाणपत्रे हे पडताळणी, अनुवाद चाचणीच्या वेळी सोबत मूळ प्रतींसह सादर करणे अनिवार्य राहील. लेखनिकाची मागणी करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांने या संदर्भात शासन परिपत्रकातील परिच्छेद क्र. ६ मधील “लेखनिक/ वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक पात्रता या परीक्षेकरिता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असावी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा एका टप्प्याने कमी असावी” या तरतुदीकडे विशेषत्वाने लक्ष वेधण्यात येत आहे. या परीक्षांकरिता किमान शैक्षणिक अर्हता, विविध विषयातील पदवी असल्याने लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्हता पदवीच्या एक टप्पा कमी म्हणजे १२ वी असणे आवश्यक आहे. या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार दिव्यांग उमेदवाराने लेखनिकाची मागणी करणे आवश्यक आहे. लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळ आवश्यक असलेल्या उमेदवारांनी प्रमाणपत्रे पडताळणी/अनुवाद चाचणीच्या वेळी प्रपत्र १/प्रपत्र २, लक्षणीय दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व नमुना क्रमांक ११ अशी कागदपत्रे सादर करावीत. शारीरिक दिव्यांगत्व (दोन्ही हात बाधित/नसलेले) / मेंदुचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांनी नमुना क्रमांक ११ सादर करणे आवश्यक नाही. लेखनिकाची मागणी करणा-या दिव्यांग उमेदवारांनी प्रपत्र १/ प्रपत्र २ मध्ये स्वतःची शैक्षणिक अर्हतादेखील नमूद करणे आवश्यक आहे. विहित प्रपत्र १/ प्रपत्र २ व नमुना क्रमांक ११ आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

लोकसहभागातुन विकसित ठाण्याचे स्वप्नपूर्ण करू-संजय केळकर

ठाणे : विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा ठाणेकरांनी माझ्यावर विश्वास ठेवत, मला विजयी केले. त्यामुळे ठाणेकरांना मी वचन देतो की, लोकसहभागातुन विकसित ठाण्याचे स्वप्नपूर्ण करेन असे आश्वासन भाजप नेते संजय केळकर यांनी…

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड विजयी

ठाणे : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा कळवा मुंब्रा मतदार संघातून विजयी झाले आहेत. सुमारे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. आव्हाड यांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर…

कल्याण ग्रामीणमध्ये आमदार बदलाची परंपरा कायम

कल्याण : मागील वीस वर्षाच्या कालावधीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार बदलाची परंपरा यावेळी कायम राखली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील प्रस्थापित आमदार मनसेचे राजू पाटील यांना शिवसेनेचे डोंबिवली शहर…

मुरबाडमध्ये कथोरेंनी चक्रव्युव्ह भेदले

बदलापूरः माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या रूपाने स्वपक्षिय छुपे आव्हान आणि महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांची नाराजीतून प्रचारातून माघार यामुळे कधी नव्हे ते आव्हानात्मक झालेल्या मुरबाड…

 उल्हासनगरात कलानींना नाकारले, आयलानींवरच विश्वास;

 कुमार आयलानी विक्रमी मतांनी विजयी   उल्हासनगरः अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या उल्हासनगर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या कुमार आयलानी यांनी सहज विजय मिळवला आहे. आयलानी ३० हजार ७५४ मतांनी विजयी झाले आहेत. आयलानी यांना ८२ हजार २३१ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे ओमी कलानी यांना ५१ हजार ४७७ मते मिळाली आहेत. यंदा कलानी पिता पुत्रांच्या आक्रमक प्रचारालाही उल्हासनगरच्या मतदारांनी नाकारले. ओमी कलानी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रचारात केंद्रस्थानी ठेवल्याने कुमार आयलानी यांना फायदा झाल्याचे बोलले जाते. गेल्या दोन दशकात उल्हासनगर विधानसभेत आलटून पालटून आमदार निवडून येत होते. मात्र यंदा आयलानी यांनी या परंपरेलाही छेद दिला आहे. उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत यंदा आमदार कुमार आयलानी यांच्यासमोर कलानी कुटुंबियांचे कडवे आव्हान होते. कुमार आयलानी यांना पहिल्या यादीत स्थान मिळाल्याने त्यांची गच्छंतीच्या चर्चा रंगल्या होत्या. उल्हासनगर शहरात विशेष कामगिरी दाखवू न शकल्याने आयलानी यांच्यावर टीकाही होत होती. यंदा पहिल्यांदा पप्पू कलानी आणि त्यांचा पुत्र ओमी कलानी प्रचारात सक्रीय होते. त्यांनी आक्रमकपणे प्रचारही केला होता. मात्र कलानी पिता पुत्रांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शेवटच्या टप्प्यात कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी यांनी एका कार्यक्रमात केलेले भावनीक भाषण यामुळे कलानी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी पुन्हा चर्चेत आली. उल्हासनगर विधानसभेचा भाग असलेल्या वरप, म्हारळ, कांबा या मराठी पट्ट्यात कलानी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीपेक्षा आयलानी बरे अशी प्रतिक्रिया मतदारांमधून उमटत होती. या भागात अखेरच्या टप्प्यात मतदानही चांगले झाले. त्यामुळे कुमार आयलानी यांचा मार्ग मोकळ्या झाल्याचे बोलले जाते. पहिल्या फेऱीपासून कुमार आयलानी आघाडीवर होते. अखेर ३० हजार ७५४ मतांनी कुमार आयलानी यांनी कलानी यांना पराभवाची धुळ चारली. विक्रमी विजय गेल्या काही निवडणुकांमध्ये अवघ्या काही मतांनी उमेदवार विजयी होत होते. २००४ च्या निवडणुकीत कुमार आयलानी यांचा २२ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर २००९ निवडणुकीत ७ हजार मतांनी आयलानी विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ निवडणुकीत १ हजार ८६३ मतांनी ज्योती कलानी जिंकल्या होत्या. तर २०१९ निवडणुकीत २००४ मतांनी आयलानी जिंकले होते. त्यानंतर आता तब्बल ३० हजार ७५४ मतांनी आयलानी जिंकले आहेत. त्यामुळे हा मोठा विजय असल्याचे मानले जाते.