Author: bittambatami.com

माऊंट मेरी जत्रेनिमित्त बेस्टच्या १२१ जादा बस

मुंबई : वांद्रे (प) येथील माऊंट मेरी जत्रा सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडयापासून सुरू होत असून त्या निमित्त १५ सप्टेंबरपर्यंत जादा बस चालवण्यात येणार आहेत. बेस्टकडून संपूर्ण आठवडाभर १२१ अतिरिक्त बस वांद्रे रेल्वे स्थानक (प.) ते हिल रोड उद्यान या दरम्यान चालवण्यात येतील. तसेच बेस्ट बसमार्ग क्रमांक सी-७१, ए-२०२, ३२१ मर्या., ए-३७५, ४२२, ४७३ व सी-५०५ या बसमार्गावर अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येतील. माऊंट मेरी चर्च, फादर अॅग्नल आश्रम या परिसरात जत्रेसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर वांद्रे स्थानक (प) येथे लोकलने येऊन तेथून बेस्टच्या बसने प्रवास करतात. परंतु बस माऊंट मेरी चर्चपर्यंत चालवणे शक्य नसते. त्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानक (प) ते हिल रोड उद्यान दरम्यान जादा बस सोडण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त वांद्रे परिसरातून धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या नियमित बसमार्गावरही अतिरिक्त बसगाडया चालवण्यात येतील. जत्रेनिमित्त वांद्रे स्थानक (प) आणि माऊंट मेरी चर्च परिसरात होणारी प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन प्रवाशांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती संपूर्ण कालावधीसाठी केली आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 २. ५ लाख मुंबईकरांना ‘एसटी’नं पोचवलं कोकणात

 गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई : गणेशोत्सव म्हटलं की कोकणात एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. गणेशोत्सव आणि कोकण हे एक वेगळं समीकरण पाहायला मिळतं. आता गणेशोत्सवाच्या काळात अनेक चाकरमानी कोकणात जात-येत असतात. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी लालपरीला म्हणजे एसटीला प्राधान्य दिलं आहे. गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघरसह आदी शहरातून जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त चाकरमानी एसटीने आप-आपल्या गावी म्हणजे कोकणात गेल्या ५ दिवसांत पोहोचले आहेत. तब्बल ५००० पेक्षा जास्त बसेसद्वारे एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करून एक नवा विक्रम केला आहे. ३ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब या अडचणीवर मात करत एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल ५००० बसेसद्वारे अडीच लाख पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात किरकोळ अपघात वगळता एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली. या बद्दल महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, आता १२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या परतीच्या वाहतुकीसाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागातील आगारातून गट आरक्षण व व्यक्तिगत आरक्षणाला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ३ ते ८ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेस ना पर्याय म्हणून चिपळूण, महाड व माणगाव आगारात १०० बसेस तैनात ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे.

वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई

Photo-6   कल्याण : कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या, तसेच, या वाहनांमुळे सकाळच्या वेळेत पालिका सफाई कामगारांना वाहने उभी असलेल्या भागाची सफाई करता येत नाही. त्यामुळे अशी वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कल्याण डोंबिवली पालिकेचा घनकचरा विभाग आणि कल्याण वाहतूक विभागातर्फे संयुक्तपणे दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पहिल्या पाहणी दौऱ्यात १५ वाहन मालकांवर कारवाई करण्यात आली. दुर्गाडी किल्ला येथील दुर्गा चौक, लालचौकी, सहजानंद चौक ते शिवाजी चौक हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. सर्व प्रकारची जड अवजड, हलकी वाहने या रस्त्यांवरून धावतात. लालचौकी ते आधारवाडी, गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्यांवरून सर्व प्रकारची वाहने धावतात. या वर्दळीच्या रस्त्यावर दुतर्फा मोटार, ट्रक सारखी वाहने उभी करून ठेवली जातात. अनेक वेळा या वाहनांमुळे या रस्त्यांवर वाहन कोंडी होते. कोंडी झाल्यानंतर या वाहनांचे मालक परिसरात नसतात. त्यामुळे ही वाहने आहे त्या जागेवरून हटविणे वाहतूक पोलिसांना अवघड होते. या भागातील वाहन कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते. या वर्दळीच्या रस्त्यांवर अनेक वाहने अनेक महिने एकाच जागी उभी आहेत. ही वाहने एकाच जागी अनेक महिने उभी राहत असल्याने सकाळच्या वेळेत पालिका सफाई कामगारांना वाहने उभी असलेल्या भागाची सफाई करता येत नाही. अशा वाहनांखाली कचरा साचून रहातो. त्यामुळे पालिकेच्या घनकचरा विभागाची अशा वाहनांमुळे डोकेदुखी वाढली आहे. ही वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून हटविण्याची मोहीम गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवली पालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी सुरू केली आहे. रस्त्यांवरील वाहनांचे क्रमांक पाहून त्यांच्या वाहन मालकांचा शोध घेऊन वाहतूक विभाग, पालिकेने अशा वाहन मालकांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्यास सुरूवात केली आहे. ही वाहने तातडीने वर्दळीच्या रस्त्यावरून हटविण्याच्या सूचना केल्या आहेत. वाहनतळ सोडून सार्वजनिक वर्दळीच्या रस्त्यावर वाहन उभे केल्याने आणि स्वच्छतेमध्ये बाधा आणल्याने पालिकेने एकूण १५ वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. अनेक वाहन मालकांनी वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या नोटिशीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यांच्यावर आरटीओच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे, असे पालिका, वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. अशाप्रकारची मोहीम डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यावर राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या

गणेश भक्तांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांचा कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला जात आहे. गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांनी नदी, खाडी, ओहोळ असे नैसर्गिक जलस्त्रोत प्रदुषित करू नयेत. अधिकाधिक भाविकांनी पालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करावे, हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विविध भागात एकूण ६३ कृत्रिम तलाव पालिकेने निर्माण केले आहेत. भाविकांना आपल्या घर परिसरात गणपती विसर्जन करण्याची संधी मिळावी. प्रत्येक भाविकाला दोन ते तीन किलोमीटर अंतर वाहन, पायी चालत जाऊन गणपती विसर्जन करण्यास लागू नये. वाहन कोंडीचा कोणालाही त्रास होऊ नये. तसेच जलप्रदुषण होऊ नये, नैसर्गिक जलस्त्रोत स्वच्छ रहावेत हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे, असे पालिका आयुक्तांनी सांगितले. विसर्जन आपल्या दारी या शीर्षकाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. कृत्रिम तलावांमध्ये एक निर्माल्य कलश ठेवण्यात आला आहे. तेथे भाविकांना निर्माल्य टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निर्माल्यापासून खत तयार करून ते पालिकेचे बगिचे, उद्यानांमधील झाडांंसाठी वापरण्यात येते. गेल्या काही वर्षापासून गणेश भक्त घराजवळील कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जनाला प्राधान्य देत आहेत. भाविक शाडूच्या मूर्तींचा अधिक प्रमाणात वापर करत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक पुढाकार घ्यावा, हाही या उपक्रमा मागील उद्देश आहे, असे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. गणपती विसर्जन काळात कोळी बांधवांकडून पालिकेला मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आयुक्त डॉ. जाखड यांनी कोळी बांधवांचे कौतुक केले. यावेळी आयुक्तांचा कोळी बांधवांची टोपी आणि शाल देऊन कोळी बांधवांतर्फे सन्मान करण्यात आला.

पत्रकार मित्र असोसिएशनच्या आरती संग्रहाचे भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्याहस्ते प्रकाशन

अशोक गायकवाड पनवेल : भाजपचे निष्ठावंत अशी ओळख असलेले विक्रांत पाटील यांनी आतापर्यंत पनवेलकरांशीही बांधिलकी जपली आहे. प्रत्येक नागरिकाशी त्यांनी दायित्व वृध्दींगत केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे भावी आमदार म्हणून तरुणपीढी त्यांना साद घालत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्याहस्ते असोसिएशनचा आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव लक्षात घेता पत्रकार मित्र असोसिएशनने विविध देवी देवतांच्या ३२ आरत्या एकत्र असलेला आरती संग्रह संपादित केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना एकाच पुस्तकात सर्व आरत्या सापडतील या उद्देशाने तयार केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेश महासिचव तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले. सामाजिक, सांस्कृतीक कार्यात पत्रकार मित्र असोसिएशन नेहमीच अग्रेसर असते असे म्हणत त्यांनी असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले. भाजपचे निष्ठावंत अशी ओळख असलेले विक्रांत पाटील यांनी आतापर्यंत पनवेलकरांशीही बांधिलकी जपली आहे. प्रत्येक नागरिकाशी त्यांनी दायित्व वृध्दींगत केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे भावी आमदार म्हणून तरुणपीढी त्यांना साद घालत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्याहस्ते असोसिएशनचा आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे आधारस्तंभ दिपक महाडीक, संस्थापक केवल महाडीक, उपाध्यक्ष सुनील भोइर, कार्याध्यक्ष नितीन जोशी, दैनिक युवक आधारचे संतोष आमले उपस्थित होते. पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील, खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चंद्रकांत लांडगे यांनीही या आरतीसंग्रहाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

मुरबाडच्या पत्रकार विश्वावर शोककळा

पत्रकार लक्ष्मण पवार यांचे निधन राजीव चंदने      मुरबाड रू मुरबाड होमगार्ड ड्युटी सांभाळून पत्रकारिता करणारे मुरबाडचे नामवंत पत्रकार लक्ष्मण पवार यांचे रविवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.रविवारी होमगार्ड म्हणून बंदोबस्तासाठी मुरबाड पोलीस ठाण्यात हजर होताना ही दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्रातील विविध दैनिकांमध्ये पत्रकार म्हणुन लक्ष्मण पवार हे मुरबाडची जबाबदारी सांभाळत होते.सामाजिक बांधिलकी जपताना ते होमगार्ड म्हणुन देखील पोलीस खात्याला सहकार्याची भूमिका बजावत होते.पत्रकारिता सांभाळून ते पोलीस खात्यासोबत विविध ठिकाणी बंदोबस्तावर असायचे.निवडणुका,विविध सण,मोर्चे, व आपत्कालीन परस्थितीत त्यांची होमगार्ड म्हणुन चोख कामगिरी होती.रविवारी ते ड्युटीवर मुरबाडकडे  येताना गोवेली नजीक त्यांच्या छातीत दुखू लागले.यातच त्यांची प्राणज्योत मालवली.ते 42 वर्षांचे होते.त्यांच्या पत्रकारितेसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.एका गुणी पत्रकाराला व चोख कर्तव्य बजावणाऱ्या कर्तव्यदक्ष होमगार्डला तालुका मुकला आहे,अशा प्रतिक्रिया त्यांच्या जाण्याने समाजात व्यक्त होत आहेत. पवार हे रात्री,बेरात्री, आपत्कालीन परस्थितीत होमगार्ड म्हणुन चोख व नियमित कर्तव्य बजावत होते.दिवसा पत्रकारिता करणे व रात्री बंदोबस्ताची ड्युटी बजावणे यात कदाचित त्यांचा कामाच्या तणावामुळे हा प्रकार घडला असावा अशी मतं यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली आहेत.होमगार्ड पोलीस बळाला सोबत म्हणुन मोलाची भूमिका बजावत असतात,हीच भूमिका बजावत असताना पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,त्यामुळे शासनाने त्यांच्या कुटुंबीयाना आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी होत आहे. पवार हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय पत्रकार होते,त्यांच्या जाण्याने चळवळीचीही हानी झाल्याच्या दुःखद प्रतिक्रिया आंबेडकरी चळवळीत व्यक्त होत आहेत.यावेळी होमगार्डच्या मुरबाड युनिट तर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली.त्यांच्या अंत्यसंस्कार समयी तालुक्यातील मान्यवर,पत्रकार, सामाजिक,राजकीय पुढारी मोठ्या संख्येने सामील झाले होते. पवार हे कर्तव्य चोख बजावणारे होमगार्ड होते.ते स्वतः ड्युटी मागून घ्यायचे,व ती प्रामाणिक पार पाडायचे.त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे.त्यांच्या कुटुंबाला मदत मिळण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत,—-महेंद्र चंदने :- समादेशक अधिकारी,होमगार्ड मुरबाड युनिट

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या तबला वादन स्पर्धेचे निकाल जाहीर

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तबला वादन स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून विजेत्यांचे केंद्राच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. पंडित बाळकृष्ण अय्यर, गिरीश गोगटे, हरेकृष्ण रथ यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. छोट्या गटातील विजेते अनुक्रमे – मास्टर कृशांग हरीहरन, स्वरांग दाबके, विहंग मुळ्ये, केशव खटावकर. मोठ्या गटातील विजेते अनुक्रमे – निरज कुमार वैष्णव, विवेक संकपाळ, प्रसाद सोनटक्के, प्रथमेश दाते.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या तबला वादन स्पर्धेचे निकाल जाहीर

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तबला वादन स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून विजेत्यांचे केंद्राच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. पंडित बाळकृष्ण अय्यर, गिरीश गोगटे, हरेकृष्ण रथ यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. छोट्या गटातील विजेते अनुक्रमे –

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी  केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे औक्षण करीत स्वागत केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली यांच्याशी संवाद साधला.

व-हाळदेवी विसर्जन घाटावर स्त्री सुरक्षेचा गजर

ठाणे : दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला जात असतानाच आशियाँ फाऊंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि स्री सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांवर मात करण्यासाठी “भावाला संस्कार द्या… बहिणी सुरक्षित राहतील” ही संकल्पना राबविणारे अभियान आशियाँ फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहसीन शेख आणि सरचिटणीस दिपा सावंत – खोत यांनी राबविण्यास सुरूवात केली आहे. त्याच अनुषंगाने भिवंडीतील व-हाळदेवी तलाव येथे गणेश विसर्जनाचे औचित्य साधून पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याद्वारे रित्विश्व ग्रुपने शाळा , कार्यालये, बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण, पालकांची भूमिका, कायदे या विषयी   गौतम सोनवणे , साक्षी मंचेकर, अस्मिता मोरे, प्रमोद गायकवाड , मृण्मय जाधव यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले.  हे पथनाट्य सादर करण्यात रितेश जाधव  आणि मिरेश उजगरे यांनी मोलाची भूमिका बजावली. या पथनाट्याला गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.