Author: bittambatami.com

पनवेलचा टीडीआर ठाण्यात; तर कल्याणचा मुंबईत वापरण्यास मुभा,

 २०३० पर्यंत एमएमआर झोपडपट्टीमुक्त करण्याचे लक्ष्य   ठाणे : मुंबई महानगर प्रदेश २०३० पर्यंत झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एमएमआर क्षेत्रातील सर्व शासकीय जागेवरील झोपडपट्टी क्षेत्राचे क्लस्टर तयार करून हे क्षेत्र एकाचवेळी झोपडपट्टी…

४० वर्षीय नराधमाने ८ वर्षीय बालिकेवर केले अत्याचार

 पनवेल शहर पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल राज भंडारी पनवेल : शहरातील गजबजलेल्या ठिकाणी राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने याच परिसरात राहणाऱ्या ८ वर्षीय बालिकेला घरातील बाथरूममध्ये नेवून तिच्यावर…

अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांवर धडक कारवाई

ठाणे : उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल criminal writ petition नं.२९११/२०२२ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे आणि प्रांताधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख निवासी नायब…

 ठाकरे गट, ‘अभाविप’विरोधात अपक्षांची एकजूट

 मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : मुंबई : मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक जिंकण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी मतांची जुळवाजुळव आणि मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून युवासेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाद्वारे सर्व १० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे युवा सेना (ठाकरे गट) आणि अभाविप यांना टक्कर देण्यासाठी छात्रभारती, बहुजन विकास आघाडी (वसई) आणि इतर अपक्षांनी वेगळे एक ‘पॅनल’ करण्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक ही एकूण १० जागांसाठी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. २५ सप्टेंबर रोजी फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. एकूण २८ उमेदवारांपैकी प्रत्येकी १० उमेदवार हे युवा सेना (ठाकरे गट) आणि अभाविप या संघटनांचे आहेत. बहुजन विकास आघाडीचे (वसई) ४, छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे १, मनसेचे १ राज्य सचिव आणि २ जणांनी वैयक्तिकरित्या अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही संघटनांना टक्कर देण्यासाठी छात्र भारती, बहुजन विकास आघाडी आणि उर्वरित अपक्षांनी कंबर कसलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि युवा सेनेच्या शिंदे गटाकडून एकाही जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन संघटना नेमका कोणाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘अधिसभा निवडणुकीत पसंतीक्रमाला महत्त्व असते. त्यामुळे सर्व अपक्षांना एकत्र करून एक नवीन ‘पॅनल’ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी सनील मोसेकर म्हणाले, ‘छात्र भारती आणि बहुजन विकास आघाडी यांची युती जवळपास निश्चित असून अपक्षांना सोबत घेऊन एक पॅनल तयार करू.’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव सुधाकर तांबोळी म्हणाले की, ‘अधिसभा निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी केली आहे आणि सर्व पर्याय खुले आहेत’. ठाकरे गटाच्या युवा सेनेचा प्रचार प्रारंभ; वचननामा प्रसिद्ध ठाकरे गटाच्या युवा सेनेने अधिसभा निवडणुकीत २०१० साली १० पैकी ८ आणि २०१८ साली सर्व १० जागा जिंकल्या होत्या. यंदाही युवा सेनेने सर्व १० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. युवा सेनेने अधिसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कार्य अहवाल आणि वचननामाचे प्रकाशन करून प्रचाराला सुरुवात केली.

घोडबंदर भागात अवजड वाहने उलटल्याने कोंडी, वाहनांच्या रांगा

ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ दोन अवजड वाहने उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. या वाहतुक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवित आहेत. त्यामुळे कोंडीत भर…

घोडबंदर भागात अवजड वाहने उलटल्याने कोंडी, वाहनांच्या रांगा

ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ दोन अवजड वाहने उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. या वाहतुक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवित आहेत. त्यामुळे कोंडीत भर…

आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

ठाणे : मुस्लिम धर्मियांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी येथील एका २०…

कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळांच्या मनमानीने प्रवासी हैराण

डोंबिवली : कल्याण, डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे संध्याकाळी नोकरदार वर्ग घरी परतण्याच्या वेळी गणपती आगमन मिरवणुका ढोल ताशांच्या गजरात काढत असल्याने या संथगती मिरवणुकांमुळे काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवली शहरे सकाळ,…

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नवी मुंबई : अवजारे व साधने यांचा वापर करुन तसेच हातांनी काम करणाऱ्या पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेतील लोकांना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी…

गणेशोत्सवात काळात अवजड वाहने बंद करण्याची एआयएमआयएमची मागणी

नवी मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला खोळंबा नको म्हणून गेली अनेक वर्षे गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहतूक बंद करण्यात येत होती. मात्र यावर्षी गणेशोत्सव दोन दिवसांवर येवून ठेपला असतानाही अवजड वाहतूक…