Author: bittambatami.com

जि. प. कानडी शाळेत ‘आला आला श्रावण दारी, पुस्तक वाचू घरोघरी’ अनोखा उपक्रम

ठाणे- विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ‘आला आला श्रावण दारी, पुस्तक वाचू घरोघरी’ अनोखा उपक्रम शहापूर तालुक्यातील जि. प.कानडी शाळेत राबवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी श्रावण…

‘शालेय बस, रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र आरक्षित मार्गिका ठेवा’

मनसे  उपाध्यक्ष-ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्राचे उपशहराध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली मागणी   ठाणे : घोडबंदर रोडवरील होणारी रोजची वाहतूक कोंडी ठाणेकरांसाठी विशेषतः या मार्गावर ये जा करणाऱ्या नागरिकांकरता डोकेदुखी ठरली आहे. गुरुवारी या वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील बहुतेक शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली. या पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय समिती नेमून शालेय बस आणि रुग्णवाहिकांकरता स्वतंत्र मार्गिका तयार करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना  उपाध्यक्ष-ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्राचे उपशहराध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी केली. यासंदर्भात पुष्कराज विचारे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. गुरुवारी घोडबंदर रोडवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांचे अतोनात हाल झाले. कित्येकांनी वाहतुकीत अडकल्यामुळे पुन्हा घरी जाणे पसंत केली. या वाहतूक कोंडीमुळे  घोडबंदर परिसरातील  शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून रुग्णाच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे काही दुदैवी घटना घडल्यावरच प्रशासन लक्ष देणार का?असा सवाल पुष्कराज विचारे यांनी केला आहे. या परिसरात होणाऱ्या नेहमीच्याच वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिका आणि इतर शासकीय यंत्रणांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी असे पुष्कराज विचारे यांनी सांगितले. 0000

श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंचे यश

मुंबई : श्री गणेश आखाड्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व मिरा भाईंदर महानगर पालिका आयोजित २०२४-२५ च्या जिल्हा स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत…

 इंद्रलोक सर्वधर्मिय स्मृती उद्यान व स्मशानभूमीचे आरक्षण रद्द

१५ कोटींच्या निधीतून थीम गार्डनसह इतर विकास कामे होणार! २- आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीवर मनपा आयुक्त संजय काटकर यांनी केले शिक्कामोर्तब! अनिल ठाणेकर / अरविंद जोशी भाईंदर : जनतेच्या…

दोन आपटे, दोघेही फरार

हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे ‘बेटा पढाओ, बेटी बचाओ‘ शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अहवालासाठी राज्यस्तीरीय समिती स्वाती घोसाळकर मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटना लपवल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आलेले शाळेचे सचिव तुषार आपटे आणि मालवणमधिल राजकोट किल्यावरील शिवछत्रपतींचा कोसळलेल्या पुतळ्याचे शिल्पकार…

लाडक्या बहीणींना लुटण्यासाठी भामट्यांनी लढवली शक्कल !

एकाच बाईचे २७ वेगवेगळे फोटो वापरून बोगस अर्जाव्दारे पैसे लाटले पनवेल : पनवेलमध्ये एका भामट्याने एकाच महिलेचा वेगवेगळ्या पोशाखातील फोटो वापरत तब्बल तिला २७ वेगवेगळ्या व्यक्ती म्हणून चित्रित करीत लाडकी बहीण योजनेचे पैसे…

‘शिवसंग्राम’मध्ये उभी फूट; ‘स्वराज्य संग्राम’ची घोषणा

कराड : शिवसंग्राम संघटनेचे सर्वेसर्वा माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर गेली दोन वर्षे शिवसंग्राम संघटना मी टिकवून ठेवली. मात्र, मेटे कुटुंबीयांनी संघटना वाटून घेतल्याचा आरोप करीत ‘शिवसंग्राम’चे प्रदेशाध्यक्ष तथा वस्त्रोद्योग…

महाराष्ट्राची विकासयात्रा वेगाने पुढे जात राहील – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुंबई : महिलांच्या सहभागा शिवाय कोणतेही राष्ट्र, राज्य गतीमान प्रगती करु शकत नाही, या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्र महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी)  महाराष्ट्राचं देशात  पहिलं…

गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या- पटोले

मुंबई : महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फेल झाले आहेत तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला  बदलापूर घटनेतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलापूर…