Author: bittambatami.com

 साडेचार वर्षीय मुकबधिर बालकाच्या चेहऱ्यावर फुलले हसू

 भरत बास्टेवाड यांनी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शस्त्रक्रियेसाठी केली ६ लाखांची मदत अशोक गायकवाड   अलिबाग : अलिबाग तालुक्यातील मेढेखार गावातील सारांश‌ प्रशांत ठाकूर या साडेचार वर्षिय मूकबधिर बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. या बालकावर श्रवणशक्ती सुधारण्यास मदत करणारी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया नुकतीच मुंबईतील रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेसाठी ६ लाख ८ हजार रुपयांची मदत रायगड जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात आली आहे‌‌. सोमवारी (दि.२) सारांशच्या आई, वडिलांनी सारांशसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सारांश याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मेढेखार येथील सारांश‌ प्रशांत ठाकूर हा बालक जन्मतः मुकबधीर आहे‌. घरची परिस्थिती बेताची असल्याने सारांशच्या पालकांनी त्याच्यावर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज केला. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, समाजकल्याण अधिकारी डॉ. शामराव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी तत्काळ हालचाल करीत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी मंजूर करीत, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ६ लाख ८ हजार रुपयांचा निधी रुग्णालय‌ प्रशासनाकडे वर्ग केला‌. अतिशय नाजूक समजल्या जाणाऱ्या कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे कानाच्या मागील हाडामध्ये एक यंत्र बसविले जाते. त्याद्वारे बाहेरील ध्वनिलहरीचे इलेक्ट्रिक ध्वनिलहरीत रूपांतर होऊन जन्मजात कर्णबधिर बालकाला ऐकू येण्यास चालना मिळते, सारांश यांच्यावर ही शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या करण्यात आली आहे. कॉक्लियर इम्प्लांटमध्ये दोन मुख्य घटक असतात: एक बाह्य प्रोसेसर आणि अंतर्गत इम्प्लांट. बाह्य प्रोसेसर वातावरणातील ध्वनी कॅप्चर करतो आणि त्यांचे डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतर करतो. हे सिग्नल मॅग्नेट आणि स्कॅल्पवर ठेवलेल्या कॉइलद्वारे अंतर्गत इम्प्लांटमध्ये प्रसारित केले जातात. इम्प्लांटचे इलेक्ट्रोड अॅरे शस्त्रक्रियेने कोक्लियामध्ये घातले जाते, श्रवण तंत्रिका उत्तेजित करते, मेंदूला सिग्नल पाठवते. मेंदू या सिग्नल्सचा ध्वनी म्हणून अर्थ लावतो, ज्यामुळे व्यक्तींना भाषण आणि पर्यावरणीय आवाज समजू शकतात. सारांश ठाकूर या मूकबधिर बालकावर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. ५ वर्ष आतील बालकांवर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया अधिक प्रभावी ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ वर्षांच्या आतील मूकबधिर बालकांच्या पालकांनी जिल्हा परिषदेकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने संपर्क साधावा. पात्र बालकावर कॉक्लियर इम्प्लांट शात्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ते आर्थिक सहकार्य जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती डॉ. भरत बास्टेवाड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांनी दिली. 000000

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी केले चैत्यभूमीवर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन

अशोक गायकवाड   मुंबई :राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांचे मंगळवारी मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भीमराव आंबेडकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे आदी उपस्थित होते. 000

उरणच्या आदित्य घरत ने मिळवले गोल्ड मेडल

 पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी हरियाणा येथे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व   पनवेल : आज महाराष्ट्रातील तरुण पिढी विविध क्षेत्रात आपले प्राविण्य मिळवत आहे. यामध्ये रायगड मधील तरुण सुद्धा पाठी नाहीत. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा चेंबूर येथे ऑगस्टमध्ये झाली होती यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पॉवरलिफ्टर सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये आदित्य अनंत घरत याने  गोल्ड मेडल पटकावले. 13 सप्टेंबर 2024  रोजी हरियाणा येथे नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आदित्यला मिळाली आहे. आदित्यने केलेल्या या  उत्कृष्ट कामगिरीबद्दल शेतकरी कामगार पक्षातर्फे पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आमदार बाळाराम पाटील, नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, कृ.उ.बा.स. सभापती नारायण घरत, पनवेल पं.स.सभापती  काशिनाथ पाटील,शेकाप महाराष्ट्र राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, शेकाप रा.जि. खजिनदार प्रितम ज.म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू आणि शेकाप महिला आघाडी  यांनी सन्मान करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. =00000000

शिवसेना शिंदे गटाचे मेघनाथ घरत भाजपात दाखल

अनिल ठाणेकर   ठाणे घोडबंदर- बाळकूम भागातील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक देवराम भोईर आणि संजय भोईर यांचे कट्टर समर्थक मेघनाथ घरत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले, मनोहर डुंबरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे सूरज दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. मेघना घरत यांचा भाजप प्रवेश शिवेसना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. मेघनाथ घरत यांनी बाळकूम, कोलशेत परिसरात शिवसेनेचे संघटन तयार केले होते. ठाणे महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मेघनाथ घरत म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गणेश नाईक, संजीव नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन मी आज भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहे स्थानिक राजकारणाला कंटाळून आणि स्वार्थी लोकप्रतिनिधींच्या विचारधारीला सोडून सर्व व्यापक विचारधारा असलेल्या कार्यपद्धतीवर काम करण्याची माझी इच्छा असल्यामुळे मी भाजपात प्रवेश केला आहे ठाणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही ओबीसी चळवळीच्या माध्यमातून सतत काम करत असतो करतही राहू परंतु चळवळीला धार देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती ची गरज असते तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी भाजप माझे हात बळकट करेल असा मला ठाम विश्वास वाटतो’. 000000000

ठाणे शिवसेनेच्यावतीने श्री गणेश दर्शन स्पर्धा २०२४ चे आयोजन-  नरेश म्हस्के

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांची परंपरा कायम राखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही शिवसेना ठाणे जिल्ह्याच्यावतीने श्री गणेश दर्शन स्पर्धा २०२४ आयोजित केली असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा…

वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रातील रस्त्यांवरून १२ बेवारस वाहने हटवली

ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाच्या आगमनात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ठाणे महापालिकेच्या नौपाडा परिमंडळात रस्त्यावरील बेवारस वाहने हटविण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी या कारवाईच्या पहिल्या दिवशी वागळे…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधान परिषदेतील २०१८-१९ मधील उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे सन्मानित करण्यात आले. या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते आमदार प्रताप सरनाईक सन्मानित

अनिल ठाणेकर   ठाणे : विधान परिषद व विधानसभा सदस्यांच्या उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार वितरण सोहळ्यात, आमदार प्रताप सरनाईक यांना विधिमंडळातील सन २०२०-२०२१  या वर्षासाठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त भारताच्या  राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे शुभहस्ते विधान परिषद व विधानसभा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यात मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांना विधिमंडळातील सन २०२०-२०२१  या वर्षासाठी उत्कृष्ट भाषण पुरस्कार देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर , विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे तसेच विधिमंडळातील सदस्य उपस्थित होते. ००००००००

‘संविधान जागर यात्रा’ ६ सप्टेंबरला मुंबईत दाखल

रमेश औताडे   मुंबई :संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित ” संविधान जागर यात्रा ” ९ ऑगस्ट २०२४ रोजी सत्याग्रह भूमी चवदार तळे महाड येथे भारतरत्न संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तसेच रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून क्रांती दिनाच्या दिवशी सुरुवात करण्यात आली होती. ती संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर ला मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती संविधान जागर समितीचे  संयोजक नितिनभाऊ मोरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. संविधान जागर यात्रा आजपर्यंत महाड, रायगड, खेड. रत्नागिरी, पतीत पावन मंदिर, सिंधुदुर्ग, कणकवली, कोल्हापूर शाहू समाधी दर्शन, हातकणंगले, सांगली पेठ नाका. सातारा, पिंपरी चिंचवड, पुणे कॅन्टोन्मेंट, महात्मा फुले वाडा, वस्ताद लहुजी साळवे समाधी, अहमदनगर, माळशिरस, सोलापूर, तुळजापूर, उमरगा, लातूर, उदगीर, देगलूर, नांदेड, हिंगोली, परभणी, केज, बीड, संभाजीनगर, बदनापूर, जालना, चिखली, मेहकर, वाशिम, उमरखेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, भंडारा, उमरेड, दीक्षाभूमी, नागपूर, वर्धा, अमरावती, दर्यापूर, मुर्तीजापुर, अकोला, भुसावळ या जिल्ह्यामध्ये प्रवास करत सभा बैठका घेत जळगाव मध्ये दखल झाली. जळगाव वरून धुळे नाशिक कल्याण अंबरनाथ उल्हासनगर ठाणे करत संविधान जागर यात्रा ६ सप्टेंबर रोजी सहा हजार किलोमीटर चा प्रवास करून मुंबईत दाखल होणार आहे. संविधानाबद्दल निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून यात्रा जवळ जवळ यशस्वी झाली आहे असे मोरे यांनी सांगितले. समारोप साठी केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 0000

मीरा भायंदरचे आयुक्त राजकीय व्यासपीठावर

भायंदर मधील इंद्रलोक परिसरात होणारं स्मृती उद्यानाला स्थानिकांचा विरोध झाल्यावर आमदार प्रताप सरनाईकांनी निर्णय फ़िरवला. त्या संदर्भात त्यांच्या कार्यालयात स्थानिकाची सभा घेण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीवर डोळा ठेवून स्थानिकांचं म्हणणं त्यांनी…