Author: bittambatami.com

कामावरुन काढून टाकलेल्या १४८ कंत्राटी कामगारांना पुन्हा नोकरी

भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांचा पुढाकार ठाणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून तडकाफडकी कामावरुन काढून टाकलेल्या १४८ कंत्राटी कामगारांना पुन्हा नोकरी मिळाली आहे. भाजपाचे…

जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता

मुंबई : कलम ३७० हटवल्यानंत पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सनं बाजी मारली आहे. २०१४ मध्ये अवघ्या १५ जागा जिंकणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सनं यावेळी तब्बल ४२ जागांपर्यंत मजल मारली आहे. तर त्यांची सहकारी असणाऱ्या…

महाराष्ट्रातील ४ बँकांना रिझर्व्ह बँकेकडूंन दंड

मुंबई : सहकार क्षेत्रातील महाराष्ट्राच्या चार मोठ्या बँकांना रिझर्व्ह बँकेने दणका दिला आहे. या चार सहकारी बँकांना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आर्थिक दंडात्मक कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह…

हरियाणामध्ये भाजपची हॅट्रिक;

एक्झिट पोलची ‘एक्झिट’ चंढीगड : एक दोन नव्हे तर विविध संस्थानी केलेल्या तब्बल १२ एक्झिट पोलमध्ये भाजापाचा पराभव दाखविला जात असताना आज मोदीं है तो मुमकीन हैची जादू हरिणायात पुन्हा पहायला मिळाली. भाजपाने…

 दिवा विकास प्रतिष्ठान आयोजित नवरात्री उत्सवाचा उत्साह शिगेला

श्रीकांत शिंदे मिञ मंडळ नेतृत्वाखाली दिव्यात सहा ठिकाणी रास गरबा   ठाणे : शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्त दिवा शहरात नऊ रंगात न्हाऊन निघण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. दिव्यात देखील अनेक सार्वजनिक मंडळाचे व कार्यकर्त्यांनी मंडप सजावट, साउंड सिस्टिम, विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि डीजेच्या आवाजात गरबा नृत्य आयोजित करून तरुणाई मंत्रमुग्ध होत आहे. तसेच दिवा शिवसेनेचे गरबा किंग म्हणून ओळखले जाणारे उपशहर प्रमुख तथा मा. नगरसेवक शैलेश पाटील यांनी दिवा शहरात एकूण पाच ते सहा  ठिकाणी रास दांडियाचे भव्य आयोजन केले आहे. साबेगाव येथील डिजे कंपाऊंड, तर दिवा पश्चिमेस क्रिश कॉलनी, दिवा-आगासन रोड येथील सदगुरू नगर, दत्तनगर व एन आर नगर,  या ठिकाणी आयोजन केले आहे. तसेच यावर्षी महिला व तरुणींना उत्कृष्ट बक्षिसे व भेट वस्तू व तसेच दररोज पैठणी जिकंण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यंदा महिला वर्गामध्ये बक्षिसांची लयलूट करण्यासाठी व नृत्य करताना सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळून राहाव्यात यासाठी ड्रेस, हेअर स्टाईल, दागिने, टॅट्यू काढण्याला विशेष पसंती दिली जात आहे. नवरात्री उत्सवात मोठ्या प्रमाणात गरबा-दांडियाचे ठिकठिकाणी आयोजन केले आहे. यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली आहे. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत व या नियमांचे तंतोतंत पालन करून दिव्यातील यंदाचा शारदीय नवरात्रौत्सव मोठया उत्साहात सुरू आहे असे मा.नगरसेवक शैलेश पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.

दिव्यातील म्हात्रे गेट येथील रस्त्याचे कोंक्रीटीकरण पूर्ण

ठाणे : दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट मधील भगवान म्हात्रे चाळ क्र तीन ते सहा  येथे पावसाळ्यात रहिवासी यांना येण्याजण्यासाठी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते याचीच दखल घेत दिवा शिवसेनेचे…

भीषण आगीत दूध डेअरीतील साहित्य खाक

मुंब्राः दूध डेअरी मध्ये लागलेल्या आगीत डेअरी मधील विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दिव्यात घडली. दिवा शहरातील साबे रोड जवळ  असलेल्या १० बाय १५ फूट आकाराच्या गाळ्यामध्ये कैलास चंद्रकुमार यांची दूध डेअरी आहे. या डेअरी मध्ये मंगळवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. याबाबतची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्यातील कर्मचारी, वीज वितरण करणाऱ्या कंपनीचे  कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी १ फायर ,१  रेस्क्यू वाहन आणि १ वॉटर टँकरच्या मदतीने दोन तासांच्या अथक प्रयत्नानी मध्यरात्री पावणेचार वाजण्याच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेत कुणालाही  दुखापत झाली नाही. परंतु डेअरी मधील दुध ठेवण्याचे दोन मोठे आणि एक लहान फ्रिज तसेच इतर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.

शिधापत्रिकाधारकांनी ईकेवायसी करण्याचे आवाहन

कल्याण  : शिधापत्रिकाधारकांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी, अन्यथा भविष्यात धान्य बंद होईल, असे आवाहन ३८ फ कल्याण प्रभारी शिधावाटप अधिकारी धरमसिंग बहुरे यांनी केले आहे. तसेच,…

हजारो कोटींची खैरात करूनही ठाणे पालिकेची झोळी फाटकी

ठाणे : राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेला रस्ते, विविध प्रकल्पांसह इतर विकासकामांसाठी तब्बल ४२०० कोंटीचा निधी आतापर्यंत मंजूर झाला असून, त्यापैकी तीन हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम प्राप्त होऊनही महापालिकेची आर्थिक…