Author: bittambatami.com

  एसएसटी महाविद्यालयात ‘पेरेंटाईन डे’चा भावनिक सोहळा

एसएसटी महाविद्यालयात ‘पेरेंटाईन डे’चा भावनिक सोहळा भारतीय संस्कृतीचा सन्मान आणि पालकांप्रती कृतज्ञतेची अभिव्यक्ती कल्याण : भारतीय संस्कृतीतील मातृ-पितृ पूजेची परंपरा जपत एस.एस.टी. कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘पेरेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनावर भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजवण्यासाठी विविध अभिनव उपक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयाने गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा यंदाही कायम ठेवत पालकांविषयी आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची अनोखी अभिव्यक्ती घडवून आणली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांची मनोभावे पूजा-अर्चा करून आरती केली, साष्टांग दंडवत घालत आशीर्वाद घेतला. आपल्या मनातील प्रेम आणि कृतज्ञतेच्या भावना विद्यार्थ्यांनी सर्वांसमक्ष व्यक्त केल्या. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य आणि पथनाट्याद्वारे पालकांप्रती असलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यासोबतच विद्यार्थ्यांना पालकांची काळजी घेण्याचे आवाहनही केले. भावनांनी ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात अनेक पालक साश्रूनयनांनी भारावून गेले. “असा अनोखा सोहळा प्रथमच पाहिला; आपल्या पाल्याने सर्वांसमक्ष व्यक्त केलेले प्रेम आणि आदर मनाला स्पर्शून गेले,” अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेची कौशल्ये विकसित व्हावीत या उद्देशाने महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थीनीने स्वतः बनवलेल्या पौष्टिक लाडूंचा स्टॉल लावण्यात आला. योग्य आहाराचे महत्त्व पटवून देत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आड प्रमोद ढोकळे, विशेष अतिथी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचे वाणिज्य विभाग प्रमुख व एनएसएसचे मुंबई उपनगर जिल्हा समन्वयक डॉ. निखिल कारखानिस, लोकल बंधन मीडिया हाऊसच्या शार्मिन मिरजकर आणि मृणाली ओरसकर,महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानी, आयक्यूएसी समन्वयक डॉ.खुशबू पुरस्वानी, ट्रस्टी डॉ.हिना मुलपानी, तसेच अनेक पालक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, डीएलएलई, सांस्कृतिक समिती, स्टुडंट्स कौंसिल, सीबीक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक, विद्यार्थी व स्वयंसेवकांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव’ या मूल्यांचा जागर करत एस.एस.टी. महाविद्यालयाने ‘पेरेंटाईन डे’च्या माध्यमातून प्रेम, आदर आणि संस्कारांची सुंदर परंपरा अधिक दृढ केली.

 विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लोकल ट्रेनमध्ये तातडीने अतिरिक्त डबे सुरू करा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लोकल ट्रेनमध्ये तातडीने अतिरिक्त डबे सुरू करा वल्ली राजन यांची मागणी कल्याण: १२वीच्या परीक्षेसाठी जात असताना गर्दीच्या लोकल ट्रेनमधून पडून १८ वर्षीय विद्यार्थी सचिन कठरे याचा झालेला दुर्दैवी मृत्यू ही केवळ अपघाती घटना नसून, उपनगरीय रेल्वे व्यवस्थेतील गंभीर दुर्लक्ष आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेप्रती असलेल्या बेफिकिरीचे द्योतक आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया वल्ली राजन, राज्य सचिव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी कल्याण रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना निवेदन देऊन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त लोकल डबे व स्वतंत्र सुरक्षित व्यवस्था तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – विमुक्त भटक्या जमाती सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दिनेश परदेशी तसेच समाजसेवक तोषेश शुक्ला उपस्थित होते. दरवर्षी परीक्षा काळात हजारो विद्यार्थी प्रचंड गर्दीत, जीव मुठीत धरून लोकलने प्रवास करतात. ही परिस्थिती प्रशासनाला ज्ञात असतानाही ठोस उपाययोजना न होणे अत्यंत दुर्दैवी आहे. वरिष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी जशा विशेष सुविधा आहेत, त्याच धर्तीवर किमान १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वतंत्र डब्बा सुरू करणे अत्यावश्यक आहे. परीक्षा कालावधीत अतिरिक्त लोकल गाड्या किंवा डबे तातडीने सुरू करावेत. १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र, सुरक्षित डबे लागू करावेत. पीक अवर्समध्ये गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करावी या मागण्या रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या असून “मानवी जीवन हे कोणत्याही व्यवस्थेपेक्षा मौल्यवान आहे. आणखी कोणत्याही विद्यार्थ्याचा बळी जाण्याआधी प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावेत, असा इशारा वल्ली राजन यांनी रेल्वेला दिला आहे.

 संत सेवालाल महाराजांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

संत सेवालाल महाराजांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन ठाणे :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन चौधर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहायक महसूल अधिकारी सुमेध राऊत व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

 गेटवे ऑफ इंडिया येथे नृत्येश्वर संस्थेच्या वतीने सादरीकरण

गेटवे ऑफ इंडिया येथे नृत्येश्वर संस्थेच्या वतीने सादरीकरण कल्याण : सीआयएसएफ संरक्षण आणि सुरक्षा मंत्रालय आयोजित व महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात श्रीराम पांडे यांच्या सहकार्याने नृत्येश्वर संस्थेच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात ६० कलाकारां सोबत महाराष्ट्राच्या लोकनृत्यांच्या कार्यक्रम सादर करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शशिन मेस्त्री व सिद्देश मेस्त्री यांनी दिग्दर्शित केला होता. सहाय्यक म्हणून आशिष सोराप, अरविंद, सुधांशु, देवांग यांनी काम पाहिले. तसेच एसवीपी व लीलावती लालजी दयाल कॉलेज यांनी हि सहभाग घेतला.

 कल्याण रेल्वे स्टेशन परिसरास “रेड लाईट एरिया” घोषित करण्याची मनसेची मागणी

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरास “रेड लाईट एरिया” घोषित करण्याची मनसेची मागणी कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वारांगनांचा वाढता वावर लक्षात घेता कल्याण स्टेशन परिसर रेड लाईट एरिया घोषित करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यत आली आहे. याबाबत मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि शाखा अध्यक्षा सोनल पवार यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेत निवेदन दिले आहे. निवडणूकी दरम्यान पॅनल क्रं ९ मध्ये प्रचारासाठी फिरताना महिलांचे विषेश प्रश्न म्हणजे रेल्वे स्टेशन परिसरात महिलाचा दिवसांदिवस बिकट होणारे प्रश्न त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महापौर हर्षाली थवील चौधरी यांची मनसेच्या वतीने भेट घेण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिक क्षेत्रातील महिला रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या राहण्यास सुरक्षित नाही. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात दिवसाढवळ्या व रात्री महिला वारांगना व्यवसाय करणाऱ्या महिलांनी व्यापलेला असतो. सर्वसाधारण नागरिक महिला येथे उभे राहणे सुद्धा शक्य नसल्याने हा स्टेशन परिसर “रेड लाईट एरिया” घोषित करण्याची मनसेची मागणी आहे जेणे करून सर्वसामान्य महिला येथे उभे राहणार नाहीत. येत्या महिन्याभरात हे दृश्य असेच राहिले तर तेथे रेड लाईट एरियाचे फलक लावावे लागतील असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. महापौरांनी देखील या विषयाचे गांभीर्य समजून घेत लवकरात लवकर रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी करून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

 २० वर्षांच्या सेवेनंतर महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ;

२० वर्षांच्या सेवेनंतर महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ; पालघरमध्ये भूमिपुत्र एल्गार संघटनेचा आंदोलनाचा इशारा योगेश चांदेकर जव्हार:दिनांक 11 फेब्रुवारी आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये गेल्या २० वर्षांपासून धुलाई कर्मचारी म्हणून राबणाऱ्या महिलांना अचानक कामावरून कमी केल्याने पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. शासनाने ‘आऊटसोर्सिंग’ (बाह्य स्त्रोत) धोरण राबवत ६० महिलांना बेरोजगार केल्याच्या विरोधात भूमिपुत्र एल्गार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. अल्प मानधनावर केली २० वर्षे सेवा बाधित महिला कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, त्यांनी सुरुवातीला केवळ ३० ते ४० रुपये प्रतिदिन इतक्या अत्यल्प मजुरीवर काम सुरू केले होते. आज २० वर्षांनंतर त्यांना ६०० रुपये वेतन मिळत असताना, प्रशासनाने अचानक एकत्रित ठेक्याचे धोरण अवलंबले. यामुळे या स्थानिक भूमिपुत्र महिलांच्या हाताचे काम हिरावले गेले असून त्यांच्यावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांची घेतली भेट या गंभीर अन्यायाविरोधात सर्व महिलांनी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांची भेट घेऊन या महिलांची कैफियत मांडली. यावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार, सरचिटणीस नवनाथ भोये, आदिम शक्ती प्रमुख व जिल्हा सरचिटणीस स्वप्नील वाघ, विजय राऊत, स्वप्नील जाधव आणि सर्व कामगार महिला होत्या. भूमिपुत्र एल्गार संघटनेची भूमिका संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी शासनाच्या या धोरणाचा तीव्र निषेध केला आहे. “स्थानिक महिलांनी आपले आयुष्य या आश्रमशाळांच्या सेवेसाठी वेचले, त्यांना न्याय देण्याऐवजी शासन बाह्य संस्थांना ठेका देऊन स्थानिकांचा रोजगार हिरावत आहे. हा भूमिपुत्रांवर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

 “सुनेत्रा पवार यांना काम समजून घेऊ द्या, मग काय करायचे ते…”

“सुनेत्रा पवार यांना काम समजून घेऊ द्या, मग काय करायचे ते…” छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया चर्चेत… हरिभाऊ लाखे नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची दररोज चर्चा सुरु आहे. अखेर शनिवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यापुढे विलिनीकरणाचा विषय आमच्याकडून बंद, असे सांगण्याची वेळ आली. परंतु, त्याच दिवशी नाशिकमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनीही दोन्ही राष्ट्रवदींच्या विलिनीकरणाविषयीच भाष्य केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयीही त्यांनी मत व्यक्त केले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण आणि सुनेत्रा पवार हे दोन विषय यापुढेही चर्चेत राहणार आहेत. महायुतीत सत्तेत असलेले राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्युनंतर अजित पवार गटाची धुरा आता कोणाकडे, असा प्रश्न प्रथम उपस्थित करण्यात येऊ लागला होता. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाशिवाय आता पर्याय नसल्याचा एक विचार पुढे आला. त्याविषयी दोन्ही बाजूकडील एकेका नेत्याच्या दररोज प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजितदादा विलिनीकरणाविषयी आग्रही होते, असे सांगण्यात येऊ लागले. तर, अजित पवार गटाच्या नेत्यांकडून विलिनीकरणाविषयी अजितदादांनी कोणतीच चर्चा केली नव्हती, असा दावा करण्यात येऊ लागला. त्यामुळे या प्रकरणात नेमकी कोणाची बाजू खरी, हे सामान्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना समजेनासे झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात एक लेख लिहिला. त्यात दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडेच जाणार होते, असा दावा केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी, अजित पवार हे स्वत: विलिनीकरणाची अधिकृत घोषणा १२ फेब्रुवारीला करणार होते, असा दावा याआधीच केला होता. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दररोज पुढे येत असल्याचे दिसते. विलिनीकरणाच्या चर्चेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनीही उडी घेतली आहे. नाशिक येथे शनिवारी माध्यमांशी छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली. रोज विलिनीकरणाची चर्चा का होत आहे, हे आपणास कळत नसल्याचे त्यांनी सांगितले. विलिनीकरण आजही करता येईल. एक महिन्याने, दोन महिन्यांनी करता येईल. त्यासाठी घाई करण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विलिनीकरणाच्या विषयावर कोण काय म्हणाले, याविषयी मोघमपणे बोलण्यात काही अर्थ नाही. आता नवीन कॅप्टन त्यासंदर्भात काय ते बघतील. आमदारांची बैठक घेतील. हा म्हणतो, तो म्हणतो म्हणून घाई का करत आहात ? पक्ष संघटना सगळे मिळून तयार होते, पक्ष बनतो. पक्ष म्हणजे बोर्ड आहे का, ऑफिस आहे का, असे प्रश्न उपस्थित करीत भुजबळ यांनी काम करणारे कार्यकर्ते मिळून संघटना, पक्ष तयार होतो. ते सगळे बसून विचार करतील, असे सांगितले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर आता लवकरच आम्ही त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करणार आहोत. यानंतर पक्षातील प्रमुख लोक विलीनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी ज्या नेत्यांना बोलावतील त्यांच्याशी चर्चा होईल. आता नवीन कॅप्टन आल्या आहेत. त्यांना बसू द्या, काम समजून घेऊ द्या. मग काय करायचे ते बघू, असे मंत्री भुजबळ यांनी नमूद केले.

या देशात आता हिंदूंनी पक्षभेद विसरून संघटित व्हायलाच हवे

या देशात हिंदू जोवर संघटित होणार नाहीत तोवर हिंदूंच्या बाबत असेच होणार आहे, असे विधान केले आहे प्रसिद्ध अभिनेते आणि सावरकर साहित्याचे अभ्यासक शरद पोंक्षे यांनी. त्यांच्या या विधानाला संदर्भ…

डिजिटल प्रतिकृती हे उद्याचे आभासी वास्तव

डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एखादी भौतिक वस्तू किंवा प्रक्रियेचे तपशीलवार आभासी प्रतिनिधित्व तयार करते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे डिजिटल क्षेत्र आणि वास्तविक जगाचे एकत्रिकरण होऊन डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एक अपरिहार्य साधन म्हणून उदयाला…

राहुल यांना बोलू द्या!

राहुल यांना बोलू द्या! ज्या दिवशी बारामतीत भीषण विमान अपघात घडला त्याच दिवसी लोकसभा आणि राज्यसभांच्या संयुक्त बैठकीमध्ये राष्ट्रपतींनी अभिभाषण केले आणि नव्या वर्षातील पहिल्या संसद अधिवेशनाला सुरुवात झाली. राष्ट्रपतींचे…