Author: bittambatami.com

 दरडींच्या ठिकाणी पालिका बांधणार संरक्षक भिंती

 ११५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय मुंबई : भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका, जोगेश्वरी, मालाड येथील २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. याठिकाणी २२ हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्य करत आहेत. रहिवाशांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर रहिवाशांचे पुनर्वसन व स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी ११५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मुंबईत २९१ ठिकाणी दरडींचा धोका असून, त्यातील २०० हून अधिक ठिकाणे ही कुर्ला ते मुलुंड पश्चिम पर्यंतच्या भागात आहेत. विक्रोळी, भांडुपपर्यंत १३२, घाटकोपरमध्ये ३२ ठिकाणे धोकादायक आहेत. कुर्ला येथे १८ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. मुलुंड येथील पाच ठिकाणे, देवनार परिसरात ११, मालाडमध्ये १८ आणि मलबार हिल, ताडदेव परिसरात १६ अशी धोकादायक ठिकाणे आहेत. ९,६०० झोपड्यांचे होणार स्थलांतर मुंबईतील २९१ ठिकाणे ही डोंगराळ भागातील धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी अजूनही २२ हजार ४८३ झोपड्यांपैकी नऊ हजार ६५७ झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे केली आहे.

श्री गणपतीची साडेतीन शक्तिपीठे मोरगाव-प्रथम पूर्ण शक्तिपीठ

विशेष राजेंद्र साळसकर अनेकांना देवीची साडेतीन शक्तिपीठे माहित आहेत. सर्वसाधारणपणे लोकांन अष्टविनायक माहित आहेत.महाराष्ट्रातील ही अष्टविनायकाची क्षेत्रे म्हणजे सर्व गणेशभक्तांची श्रद्धास्थानं. अष्टविनायक म्हणजे मोरगावचा श्रीमोरेश्वर, सिद्धटेकचा श्रीसिद्धिविनायक, पालीचा श्रीबल्लाळेश्वर, महडचा…

 दीड दिवसांच्या 10672 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन

     इकोफ्रेंडली गणेशोत्सवाला प्रतिसाद देत 2175 शाडूच्या गणेशमूर्तींचे विसर्जन  पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत 2766 गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन नवी मुंबई : श्रीगणेशोत्सव 2024 ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त’ साजरा करावा अशाप्रकारे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. 7 सप्टेंबर रोजीच्या श्रीगणेश चतुर्थीपासून प्रारंभ झालेल्या श्रीगणेशोत्सवात दीड दिवस कालावधीतील 10672 श्रीगणेशमूर्तीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन संपन्न झाले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच 136 कृत्रिम विसर्जन स्थळे अशा 158 विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या 10672 श्रीगणेशमूतींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जन स्थळांवर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, चोख व्यवस्था केली होती. आठही विभाग कार्यालयांमार्फत संबधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली त्या त्या विभागातील विसर्जन स्थळांवर श्रीमूर्ती विसर्जनासाठी संबधित अधिकारी, कर्मचारी व  स्वयंसेवक तत्पर होते. ठिकठिकाणच्या नागरिकांनी उत्तम विसर्जन व्यवस्था ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त करीत महानगरपालिकेची प्रशंसा केली. त्यास अनुसरुन 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 7895 घरगुती तसेच 11 सार्वजनिक मंडळांच्या 7906 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 136 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 2761 घरगुती तसेच 5 सार्वजनिक मंडळांच्या 2766 श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 10656 घरगुती व 16 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 10672 श्रीमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 2174 मूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. यामध्ये बेलापूर विभागात 5 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 2035 घरगुतीव 04 सार्वजनिक तसेच 19 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 374 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. नेरुळ विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1119 घरगुती तसेच 26 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 372 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्नझाले. वाशी विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 745 घरगुती व 02 सार्वजनिक तसेच 16 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 433 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. तुर्भे विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 472 घरगुती व 01 सार्वजनिक तसेच 17 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 443 घरगुती व 3 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन झाले. कोपरखैरणे विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 901 घरगुती तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 419 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. घणसोली विभागात 4 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1343 घरगुती व 01 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 208 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ऐरोली विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1220 घरगुती व 03 सार्वजनिक तसेच 18 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 383 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. दिघा विभागात 1 नैसर्गिक विसर्जन स्थळावर 59 घरगुती तसेच 11 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 129 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.…

पुन्हा झुंडशाही

गेल्या आठवड्यात पुण्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी झुंडशाहीविरोधात वक्तव्य केले. सर्वोच्च न्यायालयानेही कायदा हातात घेण्याविरोधात टिप्पणी केली. त्यानंतर लगेच कायदा हातात घेण्याच्या आणखी काही घटना घडल्या. सरकारने केलेल्या…

मुख्यमंत्री शिंदेनीच केला ‘दादां’चा करेक्ट कार्यक्रम !

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून चक्क मुख्यमंत्र्यांनाच बगल देणाऱ्या राष्ट्रवादीच्या जाहीरातीमुळे दादा आणि भाईंचे (एकनाथ शिंदे) नेते आणि कार्यकर्ते आमने सामने ठाकले होते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्याय नेत्यांनीही याबाबत जोरदार आक्षेप नोंदवूनही…

गणेशोत्सव मंडपात शासकीय योजनांची प्रसिध्दी

विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम ठाणे : शासकीय योजनांची प्रसिध्दी व्हावी, गरजूंना त्यांचा लाभ मिळावा, यासाठी ठाणे येथील विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ यांनी उभारलेल्या गणेशोत्सव मंडपात जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या प्रसिध्दीचे बॅनर लावण्यात आले आहेत. या ठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी अनेक भक्त दर्शनासाठी येत असून या प्रसिध्दी बॅनर्सच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती होण्यास मदत होणार आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय बाऱ्हाटे, सचिव भूपेंद्र मिस्त्री, खजिनदार डॉ.विजय पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले. विहंग गार्डन सार्वजनिक  गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालय आणि महिला आणि बालविकास विभागाने यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच या उपक्रमाचे इतर सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांनीही अनुकरण करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड व जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

केडीएमसी अधिकाऱ्याच्या लाचखोरीचा व्हिडीओ व्हायरल

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दक्षता गुणनियंत्रण विभागातील अधिकारी संजय सोमवंशी एका कंत्राटदाराकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची पुष्टी अद्याप झालेली नाही. महापालिकेच्या दक्षता गुण नियंत्रण विभागात एक प्रयोगशाळा…

राज्यात पाच वर्षांत ॲट्रॉसिटीचे गुन्हे वाढले

परभणी : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ॲट्रॉसिटी अंतर्गत मागील पाच वर्षांत राज्यात विविध परिक्षेत्रामध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यांचा आलेख हा चढताच राहिल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. यंदा जुलै अखेरपर्यंत राज्यात…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व आदर्शवत – शरद पवार

अशोक गायकवाड पनवेल : पैसे मिळवता येतात, पण त्या पैशांचा आपल्या दातृत्वाने सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सगळ्यांसमोर ठेवला आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी संस्थेच्या हनुमान विद्यालयाच्या नुतनीकृत इमारतीच्या उद्घाटनावेळी काढले. या इमारतीसाठी ७५ लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जाहीर सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. या वेळी त्यांनी विद्यालयाच्या विकासासाठी आणखी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील निढळ येथे रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालयाची नुतनीकृत इमारत रायगडचे माजी खासदार आणि रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ लाख रुपयांच्या देणगीतून उभारण्यात आली आहे. या नुतनीकृत इमारतीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते तसेच वर्गखोल्या, विविध कक्ष, ऑफिस यांचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीप्रमाणे मुक्तहस्ते मदत केली. ते सातारला रयत शिक्षण संस्थेचे चार वर्षे विद्यार्थी होते. कर्मवीर अण्णांचा कमवा आणि शिका हा कार्यक्रम होता, त्यामध्ये त्यांनी एक वर्ष काम केले. चार वर्षे या ठिकाणी राहून शिक्षण पूर्ण केले आणि संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केले. वर्ष, दोन वर्षे इथे काम केल्यानंतर त्यांच्या भागामध्ये नवी मुंबईत ते गेले. तिथे काम करायला सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये व्यवसायामध्ये पडले आणि या क्षेत्रात कष्ट करून सगळ्यांना बरोबर घेऊन प्रचंड यशस्वी झाले. त्या यशाचाच परिणाम संस्थेचे कोणतेही नवीन काम असले आणि ते हजर असले तर मला खात्री असते की आता या कामाला जो काही अडथळा किंवा कमतरता आहे त्यातून मार्ग निघेल. आजपर्यंत मला आकडा लक्षात नाही. मागे एकदा मी माहिती घेतली होती की, संस्थेला त्यांच्याकडून सहाय्य किती झाले असेल? जो आकडा एक वर्षापूर्वीचा माझ्याकडे होता तो शंभर कोटींचा होता. माझ्या मते या राज्यात कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये देणगीदार असतात. तरीपण त्यांच्यात सातत्य नसते. वर्षानुवर्ष मदत करत असतात, देणगीदार असतात, मात्र स्वतःच्या शाळेपुरते हे दातृत्व ते दाखवत असतात. रामशेठ यांचे वैशिष्ट्य हे आहे की, आम्ही लोक आदिवासी भागात गेलो. संस्थेची शाखा त्या ठिकाणी आहे. सगळे काम बघितले. काही कमतरता जाणवल्यावर रामशेठ यांना सांगितले की इतके पैसे जाहीर करा. त्यानुसार त्यांनी अशा अनेक शाखांमध्ये अर्थसहाय्य केलेले आहे. पैसे मिळवता येतात, पण त्या पैशांचा सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श रामशेठ यांनी सगळ्यांसमोर ठेवला आहे. म्हणून याही शाखेला त्यांनी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. निढळ गावचे सुपुत्र तथा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या पुढाकारातून आणि संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिलेल्या ७५ लाख रुपये देणगीतून इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. राज्याला दिशादर्शक ठरणारी शाळेची अद्ययावत आणि सर्व सुविधांनी युक्त इमारत निढळमध्ये उभारण्यात आली आहे. संगणक कक्ष, ग्रंथालय, डिजिटल वर्ग, सुसज्य स्टाफरूम, बोलक्या भिंती, मुख्याध्यापक कक्ष, रंगरंगोटी, नवीन बेंचेस, अत्याधुनिक डिजिटल बोर्ड अशा अनेक सुविधा विद्यार्थी आणि शिक्षकांना देण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी या वेळी दिली. या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर, हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश निर्मळ, माजी विद्यार्थी विजय जाधव, कला शिक्षक प्रदीप कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या आणि विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. कार्यक्रमास संस्थेचे व्हॉईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सचिव विकास देशमुख, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, आमदार विश्वजीत कदम, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, अ‍ॅड. रवींद्र पवार, डॉ. सदाशिव कदम, डॉ. विठ्ठल शिवणकर, सांगली दक्षिण विभागीय चेअरमन डॉ. एम.बी. शेख, संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. राजेंद्र मोरे, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, पीआरओ बाळासाहेब कारंडे यांच्यासह पदाधिकारी, रयत सेवक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिजामाता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रजि.), काळाचौकी, मुंबई वर्ष-७२ वे सुशील मनोज साळसकर – अध्यक्ष मंगेश घेगडे – सरचिटणीस संदिप मेंगडे – खजिनदार 0000