Author: bittambatami.com

आता शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शोधावरून वादंग

स्वाती घोसाळकर मुंबई- मालवणमधिल शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून उठलेला वादंग शमतो न शमतो तोच आता शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शोधावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावेळी या वादाच्या केंद्रस्थानी आहेत सरसंघचालक…

नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

अशोक गायकवाड नाशिक : आदिवासी बांधवांसाठी नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. त्यात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांचा समावेश राहील, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले. राज्यपाल राधाकृष्णन यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार नितीन पवार, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर आदी उपस्थित होते. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. या भागातील सामाजिक विकासासाठी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. या विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील. नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.आदिवासी आणि डोंगरी भागातील विविध प्रश्नांची आपल्याला जाणीव असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले की, आदिवासी भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरतीसाठी निर्देश देण्यात येतील. विद्यापिठातील प्राध्यापक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे करण्याच्या सूचना देण्यात येतील, यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली आहे. राजभवन येथे आदिवासी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी आदिवासी लोकप्रतिनिधी यांची राजभवन येथे बैठक घेण्यात येईल, असे सांगितले. पालकमंत्री भुसे यांनी नार – पार प्रकल्प मंजूर केल्याबद्दल राज्यपाल राधाकृष्णन यांचे आभार मानले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ, खासदार भगरे, आमदार दराडे, आमदार इस्माईल, आमदार श्रीमती फरांदे, श्रीमती हिरे, आमदार खोसकर, आमदार पवार यांनी आपले जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि विकास योजनांबाबत राज्यपाल महोदयांना माहिती दिली.

कर्करोगावरील औषधं स्वस्त होणार !

नवी दिल्ली : जीएसटी काऊन्सिलची 54वी बैठक सोमवारी पार पडली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सामान्य नागरिकाच्या आयुष्यावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जीएसटी…

शीळ फाटा कोंडीमुक्त होणार?

     उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य कल्याण : कल्याण-शिळफाटा आणि मुंब्रा-पनवेल जोड रस्त्यांवरील कल्याण फाटा चौकात उड्डाण पूल उभारणीच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केल्या आहेत. तीन वर्षापूर्वी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडीचा विचार करून शासनाने या रस्त्यावर तीन उड्डाण पूल उभारणीचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कल्याण फाटा येथे उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाचा समावेश आहे. २०० कोटी खर्चाचे हे काम आहे. एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता गुरुदत्त राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची निविदा प्रक्रिया एमएमआरडीएने सुरू केली आहे. कल्याण फाटा येथे उड्डाण पूल उभारणीचा संकल्पन बांधकाम आराखडा नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने तयार करायचा आहे. ४२ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्याची अट निविदेत टाकण्यात आली आहे. या उड्डाण पूल आणि भुयारी मार्गामुळे बदलापूर, अंबरनाथ काटई मार्गे शिळफाटा चौक दिशेने येणारी, कल्याण, भिवंडी, डोंबिवली, उल्हासनगरकडून येऊन नवी मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कल्याण फाटा येथे (दत्त मंदिर) उड्डाण पुलावरून थेट एमआयडीसीच्या जलवाहिन्यांवरील पुलावरून महापे-नवी मुंबई दिशेने जातील. ठाणे-मुंब्रा भागाकडून येणारी वाहने कल्याण फाटा येथील उड्डाण पुलाखालील भुयारी मार्गिकेतून पनवेल, तळोजा भागाकडे जातील. यामुळे कल्याण फाटा चौकात होणाऱ्या वाहन कोंडीतून आणि प्रवाशांची खोळंब्यातून कायमची मुक्तता होणार आहे. ग्रेड सेपरेशन या प्रणालीद्वारे हे काम केले जाणार आहे. डोंबिवली, कल्याण, बदलापूर भागातून येणारी वाहने कल्याण फाटा (दत्त मंदिर चौक) येथून एमआयडीसीच्या जलवाहिन्या असलेल्या पोहच रस्त्यावरून खिंडीतून थेट महापे -नवी मुंबईकडे जातील, असे सुरुवातीला या पुलाचे नियोजन करण्यात आले होते. शिळफाटा खिंडीतील एमआयडीसीच्या जलवाहिन्या अन्य भागात स्थलांतरीत करण्याचे काम खूप खर्चिक आहे. त्यामुळे जलवाहिन्या आहे त्याच ठिकाणी ठेऊन उड्डाण पुलाची सीमारेषा बदलून जलवाहिन्यांवरून पुलाची मार्गिका खिंडीतून महापे रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर उतरविण्यात येणार आहे. पुलावरील मार्गिका तीन मार्गिकेची करण्यात येणार होती. खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा करून ही मार्गिका चार मार्गिकेची करावी आणि त्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ही मागणी चार वर्षापूर्वी प्राधिकरणाने मान्य केली आहे. या उड्डाण पुलांव्यतिरिक्त काटई नाका, सुयोग हाॅटेल (रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोर ) येथे उड्डाण पूल प्रस्तावित आहेत. या पुलांमुळे या दोन्ही चौकांमध्ये होणारी कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. पनवेल, नवी मुंबई, ठाणे, मुंबई भागातून शिळफाटा रस्त्यांवरून जाणारी वाहने उड्डाण पुलांवरून थेट इच्छित स्थळी निघून जातील. स्थानिक शहरांतर्गत वाहने या पुलांखालून इच्छित स्थळी जाणार आहेत, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले.यासंदर्भातच्या अधिक माहितीसाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

आरएसएस, भाजपाकडून इतिहासाचे विकृतीकरण सुरू आहे- जितेंद्र आव्हाड

 मुंबई :  शिवाजी महाराजांची झाडाझुडपात लपलेली समाधी  ही महात्मा जोतिबा फुले यांनीच शोधली आहे. तुम्ही इतिहासाचे विकृतीकरण करत आहात, अशी संतप्त प्रतिक्रीया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. शिवाजी महाराजांची समाधी…

मुंबईकर रोहीत शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी २० क्रिकेट वर्ल्डकप जिंकला. या विश्वविजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर लाखोंची गर्दी उसळली होती… सायनच्या कलाकार जानवी राहुल रोकडे  यांनी त्यांच्या…

ट्रान्स हार्बरची रेल्वे वाहतुक विस्कळीत,

 नेरुळ येथे तांत्रिक बिघाड  ठाणे, ऐरोली, रबाळे सह महत्त्वाच्या स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली ठाणे : ट्रान्स हार्बर मार्गावरील नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा परिणाम ट्रान्स हार्बर मार्गावर झाला. या बिघाडामुळे ठाणे, ऐरोली, रबाळे यासह सर्वच महत्त्वाच्या स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. ठाणे स्थानकातील पादचारी पूलावर आणि फलाटावर गर्दी वाढल्याने महिला प्रवाशांचे हाल झाले. नवी मुंबई येथील ऐरोली, रबाळे, घनसोली आणि तुर्भे भागात मोठ्याप्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या, कारखाने आहे. त्यामुळे ठाणे ते कर्जत, कसारा आणि मुलुंड, भांडूप भागातील लाखो प्रवासी दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईत जात असतात. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक नऊ, १० -१० अ येथे वाशी, पनवेल आणि नेरूळ या स्थानकांच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या रेल्वेगाड्या थांबतात. मंगळवारी पहाटे नेरूळ स्थानकाजवळ पहाटे ५ वाजेपासून ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) समस्येमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. येथील दुरुस्ती दोन तासांनी पूर्ण झाली. परंतु ट्रान्स हार्बर मार्गिकेवरील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. रेल्वेगाड्यांची वाहतुक १५ ते २० मिनीटे उशीराने सुरू होता. सकाळी ठाणे रेल्वे स्थानकातील ट्रान्स हार्बर मार्गिकेच्या फलाटांवर तुफान गर्दी उसळली होती. रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीबाबत प्रवाशांना पुरेशी माहिती मिळत नव्हती. पादचारी पुलावर काही प्रवासी थांबल्याने पुलावर देखील गर्दी झाली. गर्दीमुळे महिला प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. प्रवाशांकडून रेल्वेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात होती.

हाच नियम भारतात सुध्दा लागु व्हायला हवा

स्वीडनमध्ये दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल व टिव्ही पाहण्यास बंदी! हाच नियम भारतात सुध्दा लागु व्हायला हवा आज फक्त स्वीडनमध्येच नाही तर संपूर्ण जगात टिव्ही आणि मोबाईलच्या अती वापरामुळे दुष्परिणामाला सुरूवात…

 महाडमध्ये आज होणार हुतात्म्यांचे स्मरण

 स्वातंत्र्यसैनिक स्मृती समिती, रायगड जि. प.च्या वतीने हुतात्मादिनाचे आयोजन महाड : ब्रिटिश राजसत्तेच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचा एल्गार झालेला असतानाच महाडमध्येदेखील क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली १० सप्टेंबर १९४२ ला ब्रिटिशांना चले जाव करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या किसान मोर्चावर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला आणि त्यामध्ये पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. या दिवसाचे स्मरण करण्याकरिता आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी महाडमध्ये १० सप्टेंबरला हुतात्मादिन साजरा करण्यात येतो. यावर्षीही ८२ व्या हुतात्मादिनाचे आज आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाड शहरात स्वातंत्र्यसैनिक स्मृती समिती, महाड नगर परिषद, रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या हुतात्मादिनाचे आयोजन करण्यात येते. महात्मा गांधींनी चले जावचा नारा दिल्यानंतर त्याचे पडसाद महाडमध्येही उमटले. १० सप्टेंबर १९४२ ला महाडमध्ये महाड तहसील कचेरी ताब्यात घेण्यासाठी किसान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावर शहरातील पिंपळपार या ठिकाणी तात्कालीन इंग्रज सरकारने अंधाधुंद असा गोळीबार केला. या बेछूट गोळीबारामध्ये कमलाकर दांडेकर या विद्यार्थ्यासह वसंत दाते, अर्जुन भोई कडू, विठ्ठल बिरवाडकर, नथू टेकावले या भारत मातेच्या पाच वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या स्मृती पुढील पिढीला स्मरणात रहाव्यात या उद्देशाने स्वातंत्र्यसैनिक स्मृती समिती, महाड नगर परिषद रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने या दिनाचे आयोजन केले जाते. हुतात्म्यांना वाहणार श्रद्धांजली मंगळवार सकाळी ८.३० वाजता शाळा क्रमांक चार येथे या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात हुतात्म्यांच्या तसबिरीला पुष्पमालिका व श्रद्धांजली अर्पण करून होणार आहे. या कार्यक्रमाला महाडचे आमदार भरत गोगावले, म्हाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांसह विविध सामाजिक संस्थांचे मान्यवर स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीयांतील आप्तगण, तसेच महाडमधील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शाळा क्रमांक चार येथून मुख्य बाजारपेठेतील विविध चौकांमध्ये असलेल्या हुतात्म्यांच्या नामफलकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण केल्या जातील. या कार्यक्रमाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारक येथे होणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.