राज्य खो खो पंच शिबिर २७ व २८ जुलैला हिंगोलीत
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे मुंबई :महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे २०२४-२५ या वर्षीचे राज्य खो खो पंच शिबीर दि २७ व २८ जुलै रोजी हिंगोली जिल्हा ॲम्युचर खो खो असोसिएशन…
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे मुंबई :महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे २०२४-२५ या वर्षीचे राज्य खो खो पंच शिबीर दि २७ व २८ जुलै रोजी हिंगोली जिल्हा ॲम्युचर खो खो असोसिएशन…
पुणे : सोमेश्वर फॉउंडेशन व क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ २…
मुंबई : दादर येथील आंबेडकर भवनमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या १३वी मुंबई जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत खेलो तायकोंडो अकादमीच्या खेळाडूंनी २७ सुवर्ण पदके जिंकून शानदार कामगिरी केली. तसेच त्यांच्या…
सुविचारांची पालखी घेतली खांद्यावर ठाणे : पुस्तकांनी सजवलेली पालखी, सावळ्या विठ्ठल रखुमाईच्या वेशातील बालगोपाल, विविध विचारांचा संदेश देणारे फलक, ताळ, मृदुंग, लेझीम,लाठी काठी प्रात्यक्षिक करत सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनोखी दिंडी काढत पंढरीच्या विठ्ठलाला आळवले. सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध सण-उत्सवांचा परिचय करून देत त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असतो. शाळेत प्रत्येक सण-उत्सवांना विचार आणि कृतीची जोड देत उत्सव साजरे केले जातात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अशाच विचारांची पालखी खांद्यावर घेत मुलांनी दिंडी काढली. वृक्ष संवर्धन, सुविचारांचे जोपासन, आत्पातकालीन व्यवस्थापनेत असलेल्या नागरी सेवा कर्मचाऱ्यांना मानवंदना अशा विषयांचा संदेश देत सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल सायन्ना मंदिर अशी दिंडी काढली. दिंडीत पुस्तकांची पालखी, सुविचारांचे तुळशी वृंदावन, विविधांगी विचारांचे फलक, घेत टाळ-मृदुंग, लेझीमच्या गजरात ही दिंडी निघाली होती. विठ्ठल सायन्ना मंदिरात दिंडीचा समारोप झाला व तेथे मुलांनी भजन-किर्तन करत पांडुरंगाच्या रचणी आपली भक्ती अर्पण केली. 0000
उल्हासनगर :ठाणे जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेले शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांनी एकच गर्दी केली होती. सकाळी कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी सहपत्नी मंदिराची पूजा केल्यानंतर विठ्ठल भक्तांना…
कार्यालये, बँका, शाळा, दुकानांसह सर्वसामान्य नागरिक जेरीस बदलापूरः सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या आणि चौथी मुंबई अशी बिरुदावली मिरवणाऱ्या बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात बिघडलेल्या वीज वितरण व्यवस्थेमुळे आता नागरिक मेटाकुटीस आले आहेत. एकीकडे विजेअभावी पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त झाले असताना वीज नसल्याने ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयातही वाताहत झाल्याचे चित्र दोन दिवसांपूर्वी दिसले. बदलापुरातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांवरही वीजसंकट असून उद्योग चालवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शाळा, बॅँकाचे व्यवहार आणि दुकानदार हैराण आहेत. गेल्या काही वर्षात अंबरनाथ आणि बदलापूर या चौथ्या मुंबईतील दोन शहरांची लोकसंख्या वेगाने वाढली. अनेका नामांकीत बांधकाम व्यावसायिकांनी बदलापूरसारख्या शहरात गृहसंकुले उभी केली. निसर्ग, पाणी आणि मोकळीक यामुळे शहराला नागरिकांनी पसंती दिली खरी मात्र आता शहराच्या लोकसंख्येला पायाभूत सुविधा पुरवणे यंत्रणांना कठीण होते आहे. त्यातही विजपुरवठा यंत्रणा काळानुरूप सक्षम झाली नाही. गेल्या काही दिवसात येथील महावितरणाच्या यंत्रणेने वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम नसल्याचे दाखवून गुढघे टेकले आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण शहरातील नागरिकांच्या आयुष्यावर होतो आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेलाही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शहरात पाणीबाणी आहे. खुद्द प्राधिकरणाने याबाबत नागरिकांना सूचीत करत पाणी व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले आहे. जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी स्थानिक आमदार, महावितरणाचे वरिष्ठ आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू असल्याचे प्राधिकरणाच्या अभियंत्या माधुरी पाटील यांनी सांगितले आहे. दोनच दिवसांपूर्वी एका रोहित्राच्या दुरूस्तीमुळे येथील उपजिल्हा रूग्णालयाला पाच तास विजेविना काढावे लागले. रूग्णालयाची पर्यायी व्यवस्था सक्षम नसल्याने रूग्णांना त्याचा फटका बसला. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर महावितरणाकडून रूग्णालायातील रोहित्राची दुरूस्ती करण्याऐवजी थेट नवे रोहित्र बसवून देण्यात आले. सहा महिन्यात २७५ वेळा वीज खंडीत आधीच औद्योगिक वसाहतींभोवती वाढलेल्या रहिवासी इमारतींमुळे धोक्यात सापडलेल्या आणि स्थलांतरणाची टांगती तलवार असलेल्या बदलापूरच्या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना आता सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याचा फटका बसतो आहे. येथील उद्योजकांच्या बदलापूर इंडस्ट्रीयल वेल्फेअर असोसिएशन अर्थात बिवा संघटनेने गेल्या सहा महिन्यात २७५ वेळा वीज पुरवटा खंडीत झाल्याची नोंद केल्याची माहिती संघटेनेचे अध्यक्ष कुशल जैन यांनी दिली आहे. या औद्योगिक क्षेत्रात २९० कंपन्या असून त्यात कापड उद्योग, रसायन आणि अभियांत्रिकी कंपन्यांचा समावेश आहे. रासायनिक कंपनीत प्रक्रियेवेळीच वीज खंडीत झाल्यास काही अपघात घडण्याचीही भीती जैन यांनी व्यक्त केली आहे. शाळा, कार्यालयांनाही फटका सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे लहान शाळा, दुकानदार, कार्यालयांनाही फटका बसतो आहे. बॅंकांचे कामही विजेअभावी खोळंबते. तर शीतगृह, शीतकपाट असणाऱ्या दुकानदारांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे.
ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूचे १३१ रुग्ण ठाणे : यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियासह स्वाईन फ्ल्यूचे रुग्णही आढळून येत आहेत. जिल्ह्यात मागील दोन आठवड्यात डेंग्यूचे १०२ तर, मलेरियाचे १९ रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूचे १३१ रुग्ण आढळून आले असून हे शहर वगळता जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात २० जून ते ७ जुलै या कालावधीत डेंग्यू चे ४३ रुग्ण तर, ८ जुलै ते १४ जुलै या कालावधीत ५९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये डेंग्यू चे सर्वाधिक रुग्ण हे कल्याण शहरात आढळले आहेत. तर, मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण ठाणे शहरात आढळले आहेत. तसेच ठाणे शहरात गेल्या काही दिवसापासून स्वाईन फ्लुच्या रुग्ण संख्येतही वाढ होताना दिसत आहे. ठाणे शहरात जुन महिन्यात स्वाईन फ्ल्युचे ८ रुग्ण आढळले होते. तर, ९ जुलैपर्यंत स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या ७० वर पोहोचली होती. या आठवड्यात रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली असून सद्यस्थितीला रुग्णांची संख्या १३१ इतकी आहे. या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. कळवा रुग्णालयात स्वाईन फ्ल्यू रुग्णांसाठी विशेष कक्ष ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लुच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी एकूण १९ खाटा सज्ज असून त्यातील ४ खाटा या अतिदक्षता विभागातील असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या रुग्णालयात स्वाईप टेस्टींगची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. साथीच्या आजारांमध्येही वाढ डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्ल्यू या आजारांसह डायरियाच्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असून सध्या ही संख्या १६० वर पोहचली आहे. शहरात स्वाईन फ्ल्यूची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन महापालिकेने कळवा रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे. डॉ. चेतना नितील (मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठाणे महापालिका) पावसाळ्याच्या दिवसात सखल भागात पाणी साचून तिथे डासांचा प्रादूर्भाव वाढतो. त्यातून, डेंग्यू मलेरिया सारखे आजार उद्भवतात. पावसाळ्याच्या काळात बाहेरचे अन्न पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे. पाणी उकळून प्यावे अशी काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. डॉ. कैलास पवार, शल्यचिकित्सक (जिल्हा रुग्णालय, ठाणे) 00000
कल्याण: मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकातील गृह फलाटाचे काम (होम प्लॅटफाॅर्म) गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याने प्रवासी, रेल्वे प्रवासी…
ठाणे : ठाण्यातील लक्षभेदी सामाजिक संस्थेच्या वतीने पाचपाखाडी भागातून आषाढी एकादशी निमित्त पालखी दिंडी काढण्यात आली . लक्षभेदी सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष व भाजपा ठाणे शहर जिल्हा सचिव माधुरी मेटांगे यांच्या…
उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेत २२ जुलै ते २६ जुलै रोजी मालमत्ता कर वरील शंभर टक्के दंड माफ करण्यासाठी अभय योजना तसेच २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजन करण्यात आले असून जास्तीत…