Author: bittambatami.com

  पालघर पूर्व विभागात रेल्वे तिकीट काउंटर सुरू करा

पालघर पूर्व विभागात रेल्वे तिकीट काउंटर सुरू करा खासदार डॉ. हेमंत सवरा यांची मागणी सामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीची दखल योगेश चांदेकर पालघरः पालघर शहराचे पश्चिम रेल्वेने दोन विभाग केले असून, पालघर पश्चिम आणि पालघर पूर्व असे ते दोन विभाग आहेत. पालघर पश्चिममध्ये रेल्वेचे तिकीट घर आहे; परंतु पालघर पूर्वेला तिकीट काउंटर नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन डॉ. हेमंत सवरा यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांना पत्र लिहिले असून पालघर पूर्व भागात रेल्वेचे तिकीट काउंटर सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शाम बनपट्टे यांनी डॉ. सवरा यांना पत्र देऊन पालघर पूर्व विभागात तिकीट काउंटर नसल्याचे निदर्शनास आणले होते. डॉ. सवरा यांनी लोकसभेत रेल्वेचे विविध प्रश्न मांडून त्याचे निराकरण केले तसेच प्रवाशांच्या गैरसोयी दूर केल्या. याबद्दल बनपट्टे यांनी सवरा यांचे कौतुक करून पूर्व विभागातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन तेथे रेल्वे काउंटर सुरू करण्याची मागणी केली होती. पूर्व भागातील प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात सध्या पूर्व विभागात रेल्वेचे तिकीट काउंटर नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच दिव्यांग प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून पश्चिम विभागात जावे लागते. ही बाब गैरसोयीची आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. पालघर शहराचा पूर्व भाग वेगाने विकसित होत असून या भागातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पूर्व विभागात स्वतंत्र तिकीट काउंटर असणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी सवरा यांना दिलेल्या पत्रात नमूद केले होते. सवरा यांनी महाव्यवस्थापकांचे वेधले लक्ष शाम बनपट्टे यांच्या पत्रानुसार डॉ. सवरा यांनी तातडीने या प्रश्नाकडे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांचे लक्ष वेधले. पालघर पूर्व विभागात रेल्वेचे तिकीट काउंटर नसल्यामुळे प्रवाशांची किती गैरसोय होते, हे त्यांनी निदर्शनास आणले. पालघर हे वेगाने विकसित होणारे शहर असून पूर्व विभागात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण होत आहेत. या लोकांना रेल्वे शिवाय अन्य चांगला पर्याय नाही. दररोज रेल्वेने येजा करणाऱ्या प्रवाशांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पूर्व विभागातील प्रवाशांची गरज लक्षात घेऊन तेथे रेल्वे तिकीट काउंटर तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार सवरा यांनी केली आहे. आता याबाबत रेल्वेचे महाव्यवस्थापक काय निर्णय घेतात, याकडे पालघर पूर्व विभागातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

 महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी पदभार सांभाळला

महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी पदभार सांभाळला पत्राद्वारे अनधिकृत बांधकामाविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश अरविंद जोशी मिरा-भाईंदर आज ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी महापालिकेत येऊन आपल्या दालनाचे उदघाटन करत पदभार सांभाळाला. यावेळी स्थानिक आमदार नरेंद्र मेहता, भाजपा अध्यक्ष दिलीप जैन तसेच नवनिर्वाचित नगरसेवक व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ७८ नगरसेवक निवडून बहुमतात असलेल्या भाजपाने आपल्या कामकाजाला सुरुवात केली. महापौर डिपंल मेहता यांनी आपल्या दालनाचा ताबा घेतला असता, त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांना तसेच उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांना भेटण्यासाठी मोठी झुंबड उडाली. यावेळी महापौर मेहता यांनी त्यांचे पहिले पत्र आयुक्ताना दिले. शहरात एकही अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी झिरो टोलरन्स पॉलिसी राबवावी अशी सूचना त्यांनी त्यात केली आहे. अनधिकृत बांधकामा संदर्भात वॉर्ड ऑफिसर आणि अधिकारी यांच्यावर कारवाई सुद्धा करावी असे त्यांनी त्यात सुचवाले आहे. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की शहराच्या विकासासंदर्भात आणि जनतेच्या प्रश्नावर त्या काम करत राहणार आहेत.

 शिवसेनेच्या खासदारांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची भेट

शिवसेनेच्या खासदारांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची भेट नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन  यांची आज दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेना मुख्य प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, खासदार संदीपान भुमरे, खासदार मिलिंद देवरा, प्रवक्त्या शायना एनसी हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. भेटी दरम्यान संसदेमध्ये सुरु असलेले अधिवेशन आणि केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील स्थिती या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.  नितिन नवीन  यांनी यावेळी एनडीएचे घटक पक्ष म्हणून नेहमी शिवसेनेच्या पाठिशी खंबिर उभे राहण्याचा शब्द शिवसेनेच्या सर्व खासदारांना दिला.

विजयकुमार पाटील यांच्या शताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून ‘त्रिवेणी तुला’ कार्यक्रम संपन्न 

विजयकुमार पाटील यांच्या शताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून ‘त्रिवेणी तुला’ कार्यक्रम संपन्न कल्याण : विजयकुमार पाटील यांच्या शताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत त्रिवेणी तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ या मांगल्यपूर्ण मातृस्तुती ग्रंथाची तुला करण्यात आली. द्वितीय पूजाऱ्यांना दान देण्यासाठी पितांबर पंचा वस्त्रांची तुला करण्यात आली, तर तिसऱ्या टप्प्यात अन्नधान्याची तुला करण्यात आली. या सर्व तुला केलेल्या वस्तू आदिवासी पाड्यातील गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे विजयकुमार यांचे पुत्र नारायण पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन विजयकुमार यांचे पुत्र आणि शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख, कल्याण पूर्वचे नारायण पाटील यांनी केले होते. शतकपूर्ती सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुलभा गायकवाड, नगरसेवक निलेश शिंदे, जिल्हा प्रमुख तात्या माने, उपजिल्हा प्रमुख अशोक म्हात्रे, हर्षवर्धन पालांडे, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, नितीन निकम, विशाल पावशे, युवासेनेचे निरज कुमार, महिला शहर संघटक मीना माळवे, सुनीता ढोले, राधीका गुप्ते यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायण पाटील यांनी आपल्या पित्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतांना सांगितले की, “आज माझ्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. वडील विजयकुमार पाटील यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा, सेवाभाव, संस्कार आणि समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा आम्हाला दिली. त्यांनी कधीही केवळ स्वतःपुरते जगणे स्वीकारले नाही, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा ध्यास घेतला. आज त्यांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त त्रिवेणी तुला करून त्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील गरजू नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे, हेच त्यांच्या शिकवणीचे खरे फलित आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे, आप्तस्वकीयांचे, गुरुबांधवांचे आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानतो. वडिलांचे जीवन हेच आमच्यासाठी आदर्श असून त्यांचा वारसा पुढे नेण्याचा आम्ही संकल्प करतो असेही ते म्हणाले.

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणे राज्यात तृतीय क्रमांक

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणे राज्यात तृतीय क्रमांक अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले. या…

  ‘राज ठाकरे पंतप्रधान मोदींना जास्तच घाबरलेले दिसतात’

‘राज ठाकरे पंतप्रधान मोदींना जास्तच घाबरलेले दिसतात’ माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी डिवचलं हरिभाऊ लाखे नाशिक : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. भगतसिंह कोश्यारी आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील व्याख्यानावर राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देत असताना कोश्यारी यांनी राज ठाकरेंना डिवचत त्यांच्यावर टीका केली. मुंबईतील नेहरू सेंटर येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या व्याख्यानाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. विशेष करून अभिनेते सलमान खान यांच्या हजेरीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे सर्व लोक संघाच्या प्रेमाखातर आले नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आले आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला होता. राज ठाकरेंच्या या पोस्टबाबत भगतसिंह कोश्यारी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “व्याख्यानाला आलेले कुणीही पंतप्रधान मोदींना घाबरलेले नसावेत. मी राज ठाकरेंचा सन्मान करतो. मला वाटते, राज ठाकरे पंतप्रधान मोदींना खूपच घाबरलेले दिसतात. त्यांनी मोदींना घाबरू नये. त्यांनी मोदींच्या जवळ जायला हवे. जसे प्रभू रामजीसाठी सर्व प्रजा सारखीच होती, तसे पंतप्रधान मोदींसाठीही सर्व समान आहेत.” राज ठाकरे माझे लहान भाऊ भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले, “राज ठाकरे माझे लहान भाऊ आहेत. ते कणखर नेते आहेत. मी त्यांना सांगेन की, त्यांनी पंतप्रधान मोदींशी घाबरू नये. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र या कर्मभूमीत राहता, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. घाबरायचे असेल तर चुकीच्या कामाला घाबरा.” भाषेच्या अस्मितेवर देशभरात जे तंटे सुरू आहेत, तो एकप्रकारचा आजार आहे, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले होते. याबाबत प्रश्न विचारला असता कोश्यारी म्हणाले, मी आजघडीला भाजपाचा सदस्य नाही. मी राजकारणात सक्रिय नाही. तसेच मी संघाचा प्रवक्ताही नाही. त्यामुळे या बाबीवर मी उत्तर देऊ शकत नाही. मी अजित पवारांचा आदर करतो… अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरही कोश्यारी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मी अजित पवारांचा खूप आदर करतो. अजित पवारांनी त्यांच्या टिकाकारांना कधीही वाईट म्हटलेले नव्हते. ते नेहमी प्रेमाने वागत. रोहित पवारांनी त्यांचे मुद्दे सरकारकडे मांडावेत.

शासकीय कार्यालयात अभिप्राय पेटी यंत्रणा कार्यान्वित करा – अनिल महाडिक

शासकीय कार्यालयात अभिप्राय पेटी यंत्रणा कार्यान्वित करा – अनिल महाडिक अनिल ठाणेकर ठाणे : शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात अभ्यागतांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी एक कुलूपबंद अभिप्राय पेटी बसविण्यात यावी, अशी मागणी व्हिसल ब्लोअर कार्यकर्ता अनिल महाडिक यांनी सर्व शासकीय कार्यालयातील प्रमुखांकडे केली आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालय एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग,तहसीलदार , जिल्हा परिषद, कामगार उपायुक्त, धर्मदाय  सहाय्यक आयुक्त,  रेशनिंग कार्यालय, सर्व पोलीस स्टेशन महानगरपालिका  कार्यालय ,व सर्व प्रभाग समिती, सार्वजनिक हॉस्पिटल ,जिल्हा/ ठाणे शहर सहकारी संस्था निबंधक* आपणास सविनय अर्ज सादर करतो की, महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ४ फेब्रुवारीला विशेष शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदींनुसार, प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित अभिप्राय यंत्रणा राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अनुषंगाने आपल्या कार्यालयात खालील बाबींची तातडीने पूर्तता व्हावी, शासनाचा हा निर्णय लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी व प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरी, आपल्या स्तरावरून या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून तशी सूचना फलकावर प्रसिद्ध करावी, असे. अभिप्राय पेटीची स्थापना: कार्यालयाच्या दर्शनी भागात अभ्यागतांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी एक कुलूपबंद अभिप्राय पेटी बसविण्यात यावी. शासन निर्णयासोबत जोडलेले अभिप्राय प्रारूप पेटीच्या शेजारी उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून नागरिकांना गुणांकण देणे सुलभ होईल.कार्यवाही व अहवाल: प्राप्त झालेल्या विधायक सूचनांचे स्थानिक आणि धोरणात्मक असे वर्गीकरण करून त्यावर तात्काळ सुधारणात्मक पावले उचलण्यात यावी, अशी सूचना अनिल महाडिक यांनी केली आहे.

अजितदादांनंतरची पक्षसंघटना

राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्युमुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. धडाडीचा, कार्यक्षम आणि शिस्तबद्ध नेता म्हणून लौकिक असलेले अजित पवार आगामी काळात राज्याच्या राजकारणात…

हिमालयात बर्फाचा दुष्काळ

दिल्लीसारख्या महानगरांमधून येणारी प्रदूषित हवा केवळ लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवत नाही, तर हिमालयालाही संक्रमित करत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, शहरी भागातील वायू प्रदूषण सीमा ओलांडून हिमालयात पोहोचत आहे. हे सीमापार प्रदूषण…

दादांच्या बारामतीत संशयाची भुते

दादांच्या बारामतीत संशयाची भुते थोरल्या पवारांचे थोरले बंधु आप्पासाहेब ऊर्फ दिनकरराव पवार हे कृषी तज्ज्ञ होते. त्यांचा मुलगा कृषी उद्योजक राजेंद्र यांचा आमदार पुत्र रोहीत पवार. हे नात्याने शरद पवारांचे…