Author: bittambatami.com

‘आशाताई’ दि लास्ट एम्परर

‘आशाताई’ दि लास्ट एम्परर राज ठाकरे ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही…

घसरण खरी की वाढ?

घसरण खरी की वाढ? ‌‘रुपया घसरत नाही, तर डॉलर मजबूत होत आहे,‌’ अशी मांडणी सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे. विशेषतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही भूमिका ठामपणे मांडली आहे. जागतिक…

हिंदूंनी आता संघटित होऊनच शरद पवारांना उत्तर द्यावे…

समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी परंपरेत आज साठ टक्के प्रतिगामी धर्मांध शक्ती सक्रिय झाल्या आहेत असा खळबळजनक आरोप महाराष्ट्राच्या राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे चाणक्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष…

आशाताईंची सांगितिक श्रीमंती !

आशाताईंची सांगितिक श्रीमंती ! एक कलाकार म्हणून आशाताई प्रचंड थोरच, पण एक व्यक्ती म्हणून कसे जगायचे हेही त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. आशाताईंनी संगीतक्षेत्रावर गेली ऐशी वर्षे राज्य केले. त्याच वेळी त्यांचा…

दिवंगत शारदा चन्ने यांचे निधन

ठाणे : पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी जीवन चन्ने यांच्या पत्नी शारदा जीवन चन्ने यांचे सोमवार दिनांक ६ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले‌.मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्ष…

भूराजकीय संकटामुळे भारतासाठी पीव्हीसी ही धोरणात्मक गरज

१३वी ‘विनाइल इंडिया २०२६’ जागतिक पीव्हीसी शिखर परिषद मुंबईत सुरू मुंबई : ‘विनाइल इंडिया २०२६’ या दोन दिवसीय जागतिक पीव्हीसी शिखर परिषद व प्रदर्शनाच्या १३व्या आवृत्तीचा शानदार शुभारंभ ९ एप्रिल रोजी…

 नाशिक कॉर्पोरेट शोषण, नाशिकच्या मल्टीनॅशनल कंपनीत सॉफ्ट टार्गेटचा शोध

धर्मांतराचे धक्कादायक वास्तव नाशिक : शहरातील नामांकीत बहुराष्ट्रीय कंपनीत महिला अत्याचार, विनयभंग, धर्मांतर प्रकरणातील वेगवेगळे कंगोरे समोर येत आहे. कंपनीत संशयित आपले सावज कसे शोधायचे, त्यांचे मत परिवर्तन कसे करायचे, याची आपबिती तक्रारदारांनी तपास यंत्रणेसमोर मांडली आहे. यावरून संशयित कंपनीतील ‘सॉफ्ट टारगेट’वर लक्ष देऊन त्यांना जाळ्यात ओढायचे, असा प्राथमिक निष्कर्ष पोलीस यंत्रणेकडून काढला जात आहे. एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत मागील काही वर्षांपासून कार्यरत सहकारी कर्मचाऱ्यांकडून महिलांचा विनयभंग, शारिरीक जवळीक साधण्यासाठी लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मातराचा प्रयत्न असे गंभीर प्रकार घडत असल्याचे उघड झाले. महिला लैंगिक शोषणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला आणि कंपनीतील अनेक गैरप्रकार समोर आले. या संदर्भात आतापर्यंत आठ महिला व एका पुरूषाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एकूण नऊ गुन्हे दाखल केले आहेत. महिलांबरोबर पुरूष कर्मचारीही यामध्ये लक्ष्य ठरले. बहुराष्ट्रीय कंपनीत बैठका, अन्य कार्यक्रम, कामे या धावपळीत संशयितांकडून कामावर नव्याने रुजू झालेले, साधेभोळे, कामापुरता बोलणारे अशा काहींना लक्ष्य केले जात होते. त्यांना धर्मांतर किंवा शोषणाच्या सापळ्यात अडकवताना त्यांची वैयक्तिक माहिती मिळवली जात होती. त्यांची बलस्थाने आणि ते भावनिकदृष्टया कुठे कमकुवत ठरतात, याचा अंदाज संशयितांकडून घेतला जात होता, असे समोर आले आहे. ज्या युवकाच्या धर्मातराचा प्रयत्न झाला, त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून कंपनीत गैरप्रकार कसे सुरू होते ते समोर आले. तक्रारदार युवक हा सातारा जिल्ह्यातील एका लहान गावातून आलेला होता. धार्मिक वृत्तीचा. घरापासुन दूर आणि बोलण्याची शैली कॉर्पोरेट विश्वात शोभणारी नसल्याने त्याने स्वत:ला कामांत गुंतवून घेतले होते. भाबड्या युवकाला संशयितांनी लक्ष्य केले. सर्वांशी बोलणे टाळणाऱ्या त्या युवकाला बोलते करण्यासाठी जेवणाच्या सुट्टीत सोबत जेवण्यासाठी आग्रह धरला जात होता. युवक शाकाहारी होता. मात्र संशयित त्याला बळजबरीने सोबत जेवणासाठी बसवायचे. अनेकदा त्यांच्या जेवणात मांसाहाराचे पदार्थ असल्याने तक्रारदार त्यांच्या सोबत जेवण टाळत होता. त्यामुळे त्याचा डब्बा लपवला जायचा. आपला डब्बा शोधणाऱ्या त्या युवकाला संशयितांनी जेवणात केवळ चव बदल म्हणून मांसाहार पदार्थ खाण्यासाठी दिला. त्याने नकार दिला असता काही धार्मिक संदर्भ देऊन मांसाहार पदार्थ खाण्यासाठी भाग पाडले. हे प्रकार सातत्याने होत राहिले. जेवनानंतर मद्यपानाच्या पार्ट्यांमध्ये त्याला जबरदस्तीने नेण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्या श्रध्देला चिथावणी देणारे काही संदर्भ देत एखादा धर्म किती श्रेष्ठ हे त्याला सातत्याने समजावून देण्याचा प्रयत्न झाला. एकाक्षणी त्याच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. मात्र हा दबाव झुगारत या युवकाने पोलिसांकडे दाद मागितली.

कळवा येथे १५ एप्रिलला रंगणार ‘वन्यजीव – निसर्ग – साहस’ विशेष अनुभवयात्रा

‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’ आयोजित व्याख्यानमालेत ‘वन्यजीव प्रेमी’ व मान्यवरांची विशेष उपस्थिती ठाणे – ‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’ तर्फे आयोजित व्याख्यानमालेचे ‘तिसरे पुष्प’ येत्या बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी गुंफले जाणार आहे. ‘वन्यजीव – निसर्ग – साहस’ या अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित हा सोहळा मनीषा विद्यालय व जुनिअर कॉलेज, सभागृह , कळवा येथे दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत संपन्न होणार आहे. या तिसऱ्या पुष्पाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ एक व्याख्यान नसून ती एक संपूर्ण ‘अनुभवयात्रा’ असणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध वनसंपदेचे दर्शन घडविणारे भटकंती छायाचित्र प्रदर्शन, वन्यजीव अभ्यासकांशी थेट संवाद साधणारा लाईव्ह टॉक शो, थरारक साहसी मोहिमांचा स्लाईड शो आणि वन तज्ञांचे विशेष व्याख्यान असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शैलेंद्र पाटील (वन अभ्यासक, Rainbow Adventure Group  ) हे ‘वन्यजीव भटकंती, साहस व निसर्ग फोटोग्राफी’ या विषयावर आपले अनुभव मांडतील. प्रदीप भाऊ साळवी (संचालक, एकलव्य रायफल व आर्चरी क्लब, कासणे) हे ‘वन्यप्राणी संवर्धन, निसर्ग साहस व ग्रामीण युवाशक्ती’ या विषयावर संवाद साधतील. सौ. सुरेखा मोरे या टॉक शोच्या माध्यमातून संवादक/मुलाखतकार म्हणून तज्ञांशी संवाद साधतील. सचिन रेपाळे (उपवनसंरक्षक, ठाणे वनविभाग, महाराष्ट्र राज्य) हे वन्यजीव संरक्षण व वन कायद्यांविषयी विशेष मार्गदर्शन करतील.  दा. कृ. सोमण (प्रसिद्ध खगोलशास्त्र अभ्यासक व पंचांगकर्ते) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. श्रीमती साधना वझे (प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी   Animal Conservation/Rehabilitation    ) यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याचे आयोजन राहुल साळवी (संयोजक अध्यक्ष) आणि  प्रदीप साळवी (कार्याध्यक्ष) यांनी केले आहे. या उपक्रमाला मनीषा एज्युकेशन ट्रस्ट, कळवा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद (ठाणे), शोभा वेल्फेअर असोसिएशन आणि मैत्रिण ग्रुप हे सहआयोजक म्हणून जोडले गेले आहेत. ०००००००

पालिकेचे दुर्लक्ष की व्यवस्थेचा अभाव?

Slug –  दिवा स्टेशन परिसरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर दिवा(आरती परब): दिवा शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, पूर्वेकडील मधल्या ब्रिजजवळील प्रवेशद्वारासमोर कचऱ्याचा मोठा ढीग साचल्याचे चित्र समोर आले आहे. सकाळी कामावर जाणारे नागरिक तसेच स्थानिक रहिवासी या ठिकाणी कचरा टाकत असल्याने परिसरात कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. स्थानिक दुकानदारांच्या मते, या भागातील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. परिणामी, कचऱ्याचे ढीग वाढून अक्षरशः डोंगर तयार झाला असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. या मार्गावरून कोकणात जाणारे प्रवासी, तसेच रोज वसई, पनवेल आणि रोहा येथे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या अधिकच वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी दररोज कचरा उचलून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. ०००००००

लॉर्ड बुद्धा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ उभारणीला गती

२५० एकर जमिनीच्या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवारांची शिफारस मुंबई:‘लॉर्ड बुद्धा’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठ’ स्थापन करण्यासाठी घेरा, पुरंदर, ता. पुरंदर (जि. पुणे) येथील गट क्र.५०,१५१,१९६ वनविभागाच्या अखत्यारीतील ७३६.६३ हेक्टर जमिनीपैकी २५० एकर नापीक,…