Author: bittambatami.com

साहित्याचा सन्मान !

ज्ञानपीठ पुरस्कारानंतर सर्वाधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारांकडे पाहिले जाते. यंदा या पुरस्कारांमध्ये २१ इतर भाषिक तर दोन मराठी साहित्यिक आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे…

दोन दिवस माथेरानला पर्यटकांची तोबा गर्दी

माथेरान : चौथ्या शनिवारी सुट्ट्यांमुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती. सलग दोन दिवस घाटात नेहमीप्रमाणे प्रशासनाच्या निष्क्रिय व्यवस्थेमुळे आणि कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण…

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम

अशोक गायकवाड नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून जाणारा सायन पनवेल महामार्ग हा जरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असला तरी या मार्गावरून दररोज बाहेरच्या शहरातील हजारो नागरिक ये – जा…

महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोंडी

माजिवाडा उड्डाणपुलासह खारेगाव टोलनाका भागात खड्डे ठाणे : ठाणे, घोडबंदर आणि नाशिक भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या माजिवडा, कापुरबावडी उड्डाण पुलावरील मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापुर्वी करण्यात आलेली असतानाच, या मार्गावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच मुंबई-नाशिक मार्गावर रस्ते आणि पुल बांधणीची कामे सुरू असून त्यातच या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे खारेगाव नाका, माजिवाडा, मुंब्रा बाह्यवळण मार्गावर कोंडी झाल्याचे दिसून आले. ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग मंदावून कोंडी होते. त्याचा परिणाम, शहरातील अंतर्गत मार्गांवर दिसून येतो. यंदाही हे चित्र कायम असल्याचे शनिवारी दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाला सुरूवात झाली. परंतु अर्ध्या तासांच्यावर पाऊस पडत नव्हता आणि पावसाचा जोरही फारसा नव्हता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून त्याचबरोबर सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ठाणे, घोडबंदर आणि नाशिक भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या माजिवडा पुलावरील घोडबंदरहून नाशिक आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर खड्डे पडले आहेत. या पुलाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापुर्वी करण्यात आले होते. मास्टीक पद्धतीने या रस्त्याची बांधणी करण्यात आली होती. परंतु पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पुलावरून अवजड, हलक्या वाहनांसह दुचाकींची वाहतूक सुरु असते. या सर्व चालकांना खड्डे चुकत प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. त्याचबरोबर मुंबई-नाशिक मार्गावरील खारेगाव चौकाजवळील रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडतात आणि कोंडीची समस्या निर्माण होते. यंदाही पहिल्याच पावसात याठिकाणी खड्डे पड़ले असून ते संबंधित विभागाकडून बुजविण्याची कामे सुरु आहेत. या मार्गावर रस्ते आणि पुल बांधणीची कामे सुरू असतानाच, त्यात खारेगाव टोलनाका भागात खड्डे पडल्यामुळे शनिवारी येथे कोंडी झाली. मुंब्रा बाह्य वळण मार्गापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच माजिवाडा येथून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरही कोंडी झाली होती. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकरांना पावसाळ्यात कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

कचरा समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतींनी कायमस्वरूपी उपाययोजना करा – रोहन घुगे

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरालगत व हायवेलगतच्या ग्रामपंचायती मधील घनकचरा व्यवस्थापनाबाबत ठाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. भिवंडी, कल्याण, शहापूर, अंबरनाथ तालुक्यातील डंपिंग…

मोबाईल स्कूल उपक्रमातील ४७० मुलांचा शाळा प्रवेश-महेन्द्र गायकवाड

ठाणे : रस्त्यावरील बालकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत फिरते-पथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना राबविली होती. या उपक्रमांतर्गत ४७० मुलांना शाळा प्रवेशपत्र देण्यात आल्याची माहिती…

मर्जिया पठाण यांचा पाण्यासाठी ‘तिरडी मोर्चा’

ठामपा कार्यालयाच्या दारात फोडली मडकी ठाणे : विविध कारणे पुढे करून सातत्याने मुंब्रा- कौसावासियांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. या सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली…

निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या उपस्थितीत  १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम संपन्न

रायगड : निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या उपस्थितीत शुक्रवारी,(दि.२१) जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आणि नेहरु युवा केंद्र व प्रिझम सामाजिक संस्था यांच्या संयुक्त…

नमुंमपा वाशी रूग्णालयामधील आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाबाबत समाधानकारक-दिप्ती गौर मुखर्जी

 अशोक गायकवाड नवी मुंबई :नमुंमपा वाशी रूग्णालयामधील आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाबाबत समाधानकारक असल्याचे मत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती गौर मुखर्जी यांनी व्यक्त केले. आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाची पाहणी करण्याकरिता आज राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.दिप्ती गौर मुखर्जी आणि संचालक एलपीएल विक्रम पगारीया यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयास भेट दिली. याप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेश म्हात्रे उपस्थित होते. सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या अंतर्गत आभा ॲपव्दारे रुग्णांची आभा नोंदणी करणे, त्यांचे टोकन नंबर तयार करणे व त्याव्दारे आभा नोंदणी कक्षातून त्वरित केसपेपर मिळविणे अशा कामांबाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन आदी विविध उपक्रमांची सविस्तर माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपस्थितांना दिली तसेच नजिकच्या काळात रुग्णालयविषयक सर्व कामकाजाचे संगणकीकरण करण्यात येत असल्याचेही नमूद केले. आभा ॲपव्दारे नोंदणीकरण झालेल्या रुग्णांना लांबलचक रांगा टाळून त्वरित केसपेपर मिळत असल्यामुळे रुग्णांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच आभा नंबर हा युनिक असल्यामुळे संपूर्ण देशात आभा ॲपचा वापर होत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची सर्व माहिती जसे की यापूर्वीचा आजार, त्यावर झालेला उपचार, तपासण्या, औषधे अशी सर्व प्रकारची माहिती रुग्णाच्या सहमतीने उपलब्ध असणार आहे. त्यामुळे रुग्णांना चांगल्या व दर्जेदार रुग्णसेवा कमी कालावधीत देता येणे शक्य होणार आहे. आभा ॲपचा वापर होत असलेल्या खाजगी रुग्णालये, प्रयोगशाळा येथे देखील रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.दिप्ती गौर मुखर्जी यांनी सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन हे कामकाज प्रभावीपणे होत असल्याचे नमूद केले. या योजनेचे पुढील टप्प्यातील कामकाज करणेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले व राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत नमुंमपाला याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. या भेटी दरम्यान कोपरखैरणे येथे जूनी क्षेपणभूमी शास्त्रोक्तरित्या बंद करून त्याठिकाणी बनविण्यात आलेल्या निसर्गेद्यानाला, तेथील मियावाकी जंगल परिसराला तसेच त्या जवळील टाकाऊतून टिकाऊ संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आकांक्षी शौचालयाचीही पाहणी करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरणशील नाविन्यपूर्ण कामांची प्रशंसा केली.

निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेने ठाण्यात सुरु केल्या २१ मोफत अभ्यासिका !

ठाणे : निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने ठाण्यात २१ मोफत अभ्यासिका मोफत अभ्यासिका सुरु केला आहे याद्वारे गरिब गरुजु मुलांच्या स्वप्नांना जिजाऊने दिला आधार देऊन एक स्तुत्य…