Author: bittambatami.com

रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने रविवारी ज्येष्ठ व विधवा महिलांसाठी मोफत छत्री वाटप – भास्कर बैरीशेट्टी

ठाणे : स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने  शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी २३ जून रोजी करण्यात आल्याची माहिती सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी यांनी दिली आहे. पावसाळा सुरू होत आहे. पावसापाण्यात महिलांना संरक्षण मिळावे या हेतुने स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी यांच्यावतीने शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी, २३ जून २०२४ रोजी,सायंकाळी ७ वाजता, जनसंपर्क कार्यालय, उपवन सोसायटी, शिवाई नगर शिवसेना शाखेजवळ, ठाणे (प) येथे करण्यात आले करण्यात आले आहे. छत्री वाटप कार्यक्रमध्ये जो उपस्थित राहील आणि कूपन आणेल त्यालाच छत्री मिळेल. छत्री वाटपाची कूपन जनसंपर्क कार्यालय येथून घेऊन जाणे. कूपन शिवाय छत्री दिली जाणार नाही. एका व्यक्तीला एकच कूपन दिले जाईल आणि एका व्यक्तीला एक कूपन एक छत्री दिली जाईल. एका कूपन व्यतिरिक्त दुसरे कूपन आणले तर छत्री मिळणार नाही. कार्यक्रमानंतर कूपन आणल्यास छत्री मिळणार नाही, याची नोंद घ्यावी, तरी या छत्रीवाटप कार्यक्रमास महिलांनी मोठ्यासंखेने उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक कार्यसम्राट माजी नगरसेविका सौ. रागिणीताई भास्कर बैरीशेट्टी व सामाजिक बांधिलकी जपणारे सच्चे समाजसेवक श्री भास्कर बैरीशेट्टी  यांनी केले आहे. ०००००

महाड येथील निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात  105 युनिट रक्तदान

रघुनाथ भागवत   महाड : संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन (रजि.) दिल्ली, शाखा-महाड व रावतळी आयोजित श्री विरेश्वर मंदिर सभागृह येथील रक्तदान शिबीरामध्ये तब्बल 105 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वेच्छेने रक्तदान केले. त्यामध्ये 23 स्त्री रक्तदात्यांचाही समावेश होता. उल्लेखनीय आहे, की निरंकारी भक्तांच्या सेवा भावनेने प्रेरित होवून इतर रक्त दात्यांनीही या शिबिरात उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. तर उदघाट्न प्रसंगी जिल्हा रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक गोसावी यांनी बोलताना रायगड जिल्ह्यात रक्तदानाच्या महान कार्यात संत निरंकारी मिशनचे प्रथम स्थानी नंबर आहे. सदर शिबिराला महाड विधानसभा आमदार भरतशेठ गोगावले, युवा नेते श्रीयश माणिकराव जगताप, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, पत्रकार चंद्रहास नगरकर, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद माने यांनी सदिच्छा भेट दिली. महाड नगरपरिषद माजी बांधकाम सभापती प्रमोद महाडिक यांनी संत निरंकारी मिशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून स्वच्छता अभियानामध्ये महाड नगर परिषदेला मिळालेल्या यशामध्ये संत निरंकारी मिशनचे मोठे योगदान असल्याचे सांगून पूरपरिस्थितीच्या दरम्यान स्वच्छता अभियानामध्ये संत निरंकारी मिशनचे योगदान आहे असे यावेळी अधोरेखित केले. तर राजिप माजी सदस्य जितेंद्र सावंत यांनी देखील मनोगतात संत निरंकारी मिशनच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. महाड युनिट सेवादल संचालक नथुराम निंबरे यांनी सांगितले कि, संत निरंकारी मिशन हे निराकार ईश्वराचे ज्ञान देणारे मिशन आहे. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, फ्री मेडिकल कँप, वननेस वन सारखे सामाजिक उपक्रम राबवणे एवढीच संत निरंकारी मिशनची ओळख नाही. तर, समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्याकडून निराकार ईश्वराची प्राप्ती केल्यावर मनुष्य जीवनात ईश्वराची भक्ती सुरू होते व ती मोक्ष मुक्तीसाठी साधन बनते या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला. मानवमात्राच्या सेवेसाठी रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे. संत निरंकारी मिशन अध्यात्मिक जनजागृती बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य अविरतपणे करत आहे असे प्रास्ताविक मध्ये महाड सेवादल शिक्षक अनिल सकपाळ यांनी व्यक्त केले. रायगड 40-अ झोनचे झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे, संयोजक दयाळ पारधी, रावतळी शाखा मुखी प्रविण करबेले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या रक्तदान शिबिरमध्ये सेवादल युनिट नं. 357 महाड यांनी मोलाची कामगिरी बजावली. यावेळी रक्तसंकलन जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग यांनी केले. रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित सर्व रक्तदात्यांचे रक्तपेढी कडून प्रमाणपत्र व संत निरंकारी मिशनकडून निरंकारी साहित्य, पुष्प देऊन आभार मानण्यात आले.

जुनी पेन्शन योजनेला अधिवेशनात मंजूरी- निरंजन डावखरे

शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी अनिल ठाणेकर     ठाणे : १२ वर्षात प्रत्येक अधिवेशनात वरिष्ठ सभागृहात १०० टक्के उपस्थिती लावून महाराष्ट्रातील व कोकणातील प्रश्न सातत्याने मांडणारा, त्यासाठी आवाज उठविणारा व फाॅलोअप घेऊन प्रश्न सोडविणारा आमदार म्हणून निरंजन डावखरे ओळखले जातात, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले. निरंजन डावखरे यांना इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी करा की ठाण्याच्या नादी लागण्याची हिंमत पुन्हा कोणी करणार नाही, असे उद्गार खासदार नरेश म्हस्के यांनी काढले. तर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी जुनी पेन्शन योजनेला येत्या अधिवेशनात निश्चितच मंजूरी मिळेल, असा विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला. कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुती पुरस्कृत भाजप उमेदवार आ. निरंजन वसंतराव डावखरे यांच्या विजय संकल्प मेळाव्यात प्रमुख पाहूणे म्हणून ना. रविंद्र चव्हाण बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, आ.निरंजन डावखरे, माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, भरत चव्हाण, एकनाथ भोईर, राधाबाई जाधवर, दिगंबर ठाकूर, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे अध्यक्ष सचिन मोरे, शिवाई विद्यालयाच्या अध्यक्षा सुलेखा चव्हाण, आर जे ठाकूर काॅलेजचे विश्वस्त मंगेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याला ठाणे परिसरातील विविध शाळांचे संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होते. निरंजन डावखरे यांनी गेल्या १२ वर्षातील आमदारकीच्या कारकीर्दीत प्रत्येक अधिवेशनात हजेरी लावून वरिष्ठ सभागृहात १०० टक्के उपस्थिती नोंदविलेली आहे. तसेच प्रत्येक अधिवेशनात महाराष्ट्रातील,  कोकणातील व ठाण्यातील जनतेचे प्रश्न सातत्याने मांडलेले आहेत. आवाज उठविलेला आहे. हे प्रश्न नुसते मांडून ते थांबले नाहीत तर सतत संबंधित विभागातील अधिकारी व मंत्री यांच्याकडे सतत फाॅलोअप घेत प्रश्न सोडविण्यासाठी निरंजन डावखरे हे सातत्यपूर्ण प्रयत्नशील राहिलेले आहेत.अशा कार्यशील उमेदवाराला निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बळावर नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकी २५ मतदारांची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारायला हवी, मतदान होईपर्यंत मतदारांशो सातत्यपूर्ण संपर्क ठेवणे मतदानाच्या वेळेस त्यांना बुथपर्यंत नेण्याची व्यवस्था करणे, मतदान कसे करावे याची सततची माहिती देणे, मतदान बाद होणार नाही याची काळजी घेणे या पाच गोष्टीवर लक्ष दिल्यास निरंजन डावखरे हे विक्रमी मताधिक्याने निश्चित निवडून येतील अशी आशा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. तर निरंजन डावखरे हे संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. पदवीधर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक व विद्यार्थी यांचे प्रश्न सातत्यपूर्ण मांडून ते सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत. लोकसभा निवडणुकीत कोकणाने महायुतीला विजयाचा मार्ग दाखविलेला आहे. यामुळेच कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी करा की ठाण्याच्या नादी लागण्याची हिंमत पुन्हा कोणी करणार नाही, असे उद्गार ठाणे लोकसभेतील खासदार नरेश म्हस्के यांनी काढले. सागरी, नागरी व डोंगरी अशा कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यात कोकण पदवीधर मतदारसंघ पसरलेला आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक, विद्यारथी यांचे विविध प्रश्न गत दोन टर्म मध्ये मार्गी लावण्यात आले आहेत. व्हिजन डाॅक्युमेंटमध्ये मिशन एज्युकेशन नुसार विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हायस्पीड इंटरनेट, डेटा व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनो आणलेल्या क्रांतीचे आव्हान पेलण्यासाठी कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कोकणातील पाचही जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाला लाभ मिळावा यासाठी समन्वय साधण्यात येणार आहे. जिल्हानिहाय व तालुकानिहाय प्रत्येक शाळेत डिजिटल रुम आणि रोबोटिक्स लॅब तसेच इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससाठी अखंड विजेची सुविधा प्राप्त करुन देणार, कोकणातील पाचही जिल्ह्यातील शाळा पुढील सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने ग्रीन स्कूल करण्यात येईल. एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षांसाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय मार्गदर्शन केंद्र यात ग्रंथपाल, इंटरनेट सुविधा उपलब्ध करणार, अर्धवेळ ग्रंथपाल व प्रयोग शाळा सहाय्यकांना पूर्णवेळ सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती गती देणार. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सरकारी कर्मचारीवर्गासाठी आवश्यक जुनी पेन्शन योजनेला येत्या अधिवेशनात निश्चितच मंजूरी मिळेल, असा विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरें यांनी व्यक्त केला. ०००

डोंबिवली उपविभाग क्रमांक चार व अंतर्गत तीन शाखा कार्यालयांचे स्थलांतर 

कल्याण : महावितरणच्या डोंबिवली विभाग कार्यालयांतर्गत डोंबिवली पश्चिम उपविभाग क्रमांक चार व त्याअंतर्गत तीन शाखा कार्यालयांचे स्थलांतर कंपनीच्या स्वमालकीच्या जागेत करण्यात आले आहे. उपविभाग चारसह गांधीनगर पश्चिम, कोपर रोड, जुनी डोंबिवली या तीन शाखा कार्यालयांचा यात समावेश आहे. गणेश मंदिरच्या मागे, पंडित दिनदयाल रोड, कैलास भुवन बिल्डींग जवळ, डोंबिवली (पश्चिम) ४२१२०२ या नवीन पत्त्यावर शुक्रवारपासून (२१ जून) ही चारही कार्यालये कार्यान्वित होत आहेत. सध्या ही कार्यालये नाखे एव्हरेस्ट हाऊस, हॉटेल द्वारकाच्या वर, तीसरा मजला, रेल्वेस्टेशन जवळ, डोंबिवली पश्चिम येथे भाडयाच्या जागेत कार्यरत आहेत. संबधित ग्राहकांनी या नवीन बदलाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतील जाचक अटी दूर करा

आंबेडकरवादी अध्ययन सवर्धन समितीचा इशारा   ठाणे : अनुसूचीत जाती जमतीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येयांर्‍य परदेशी शिक्षण शिष्यवृतीत राज्य शासनाने बादल करून जाचक अटींचा समावेश केला. यामुळे अनुसूचीत जातींच्या सवलती…

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरमधून गटबाजीचं प्रदर्शन!

अंबरनाथ :अंबरनाथमध्ये शिवसेनेत असलेली गटबाजी वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या बॅनर्समधून पुन्हा एकदा समोर आली आहे. या गटबाजीकरून काही दिवसांपूर्वी स्वतः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून दोन्ही गटांचे कान टोचले होते. मात्र त्यानंतरही काहीही सुधारणा झाल्याचं दिसून येत नाही. अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये दोन्ही गटाने एकमेकांचे फोटो टाळून उघडपणे आपली नाराजी दाखवून दिली आहे. अंबरनाथ शहरात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे दोन गट असून आजवर अनेकदा या गटबाजीचे उघडपणे प्रदर्शन झाले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही याच गटबाजीमुळे सर्वाधिक विकासकामे करूनही अंबरनाथ शहरातून शिवसेनेला अवघ्या ३५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः अंबरनाथ शहरात येऊन पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. मात्र याला आठवडाही उलटला नसताना पुन्हा एकदा वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या बॅनर्समधून गटबाजी समोर आली आहे. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अगदी बाजूबाजूला दोन्ही गटांनी बॅनर्स लावले असून त्यावर एकमेकांचे फोटो मात्र टाकलेले नाहीत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा या गटबाजीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता ३ महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत या गटबाजीचा पक्षाला फटका बसू नये, यासाठी वरिष्ठांनी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. – लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे अंबरनाथमध्ये येणार असल्याची कल्पना असताना देखील बैठकीच्या ठिकाणी शहराध्यक्षांचा फोटो एका गटाने डावळला होता. त्यावरून समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. – आढावा बैठकीत फोटो वरून वाद निर्माण झालेला असताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली होती तसेच पदाधिकाऱ्यांना देखील सज्जड दम देण्यात आला होता. – वाळेकर गट आणि आमदार किनीकर गट यांच्यात आता मोठ्या प्रमाणात वाद वाढले असून आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे पडसाद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 0000

कल्याण पूर्वेतील दावडी गावातील बेकायदा इमारतीवर हातोडा

भर पावसात भुईसपाट करण्याची कारवाई   कल्याण : कल्याण पूर्वेतील दावडी गावात महापालिकेच्या विकास आराखड्यामधील रस्त्यामध्ये उभारण्यात आलेली एक चार माळ्याची बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची कारवाई आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी मंगळवारपासून सुरू केली आहे. या इमारतीवर आत्ताच कारवाई केली नाहीतर माफिया ही इमारत सात माळ्याची करून तिचा निवासी वापर सुरू करू शकतात. त्यामुळे ही इमारत पाऊस सुरू असला तरी भुईसपाट करण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली. दावडीतून पालिकेचा विकास आराखड्यातील रस्ता गेला आहे हे माहिती असूनही भूमाफिया शेजूळ यांनी दावडी येथे चार माळ्याची बेकायदा इमारत उभी केली. शेजूळ यांनी विकास आराखड्यात बेकायदा इमारत उभारली असल्याच्या तक्रारी आय प्रभागाच्या साहाय्य्क आयुक्त मुंबरकर यांच्याकडे आल्या होत्या. मुंबरकर यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे, उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली माफिया शेजूळ यांना इमारतीची बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची नोटिस बजावली. विहित मुदतीत ते कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी शेजूळ यांची इमारत अनधिकृत असल्याचे घोषित केले. या बेकायदा इमारतीमधून घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी भर पावसात ही इमारत भुईसपाट करण्याचे काम मंगळवारपासून सुरू केले आहे. या इमारतीचे स्लॅब क्रॅकरने तोडल्यानंतर या इमारतीचे सिमेंटचे खांब पोकलेनच्या साहाय्याने तोडण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले. या कारवाईने दावडी भागातील भूमाफियांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आय प्रभागात गेल्या वर्षभरात भुईसपाट करण्यात येणारी ही सहावी बेकायदा इमारत आहे. दावडी गावात विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये बेकायदा इमारत उभारल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्त, उपायुक्तांच्या आदेशाने ही इमारत जमीनदोस्त केली जात आहे. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण. 0000

पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करावे –  पी. वेलरासू

ठाणे : अशोक गायकवाड विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आज पहिले प्रशिक्षण विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी बिनचूक व पारदर्शीपणे होण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी यावेळी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. या मतदारसंघात २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलै २०२४ रोजी नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात आज मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे, पालघर जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर तावडे, नगर परिषद प्रशासनाचे संचालक मनोज रानडे, उपायुक्त तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, कोकण विभागाचे उपआयुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, रेवती गायकर, सत्यम गांधी आदी यावेळी उपस्थित होते. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मतमोजणीचे हे पहिले प्रशिक्षण होते. यावेळी गायकवाड यांनी मतमोजणीसाठी करावयाची तयारी, मतपत्रिका कशा मोजाव्यात, त्यांची वैध-अवैधता कशी तपासावी, वैध मतांचा कोटा कशा प्रकारे तपासावे, किती फेऱ्या होणार आदी माहिती दिली. तसेच रानडे यांनीही मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणकोणती काळजी घ्यावी, डेटा कसा भरावा आदींची माहिती दिली. वेलरासू यांनीही मार्गदर्शन करून म्हणाले की, यंदा कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली आहे. तसेच यंदा मतदानाची वेळ वाढविण्यात आल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. या निवडणुकीत १३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे. सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा या निवडणुकीची प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया वेगळी असणार आहे. पसंतीक्रमानुसार मतदान होणार असल्याने मोजणी प्रक्रियेची व्यवस्थित तयारी करावी व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व बिनचूक होण्यासाठी प्रयत्न करावे. कोकण पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी सांगितले. तहसीलदार आसावरी संसारे यांनी सूत्रसंचालन केले. 0000

 स्वच्छता कार्यात लोकसहभाग वाढीवर भर देण्यासोबतच शहर स्वच्छतेकडे

अधिक बारकाईने लक्ष देण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश   नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ ला सामोरे जाताना स्वच्छता विषयक विविध उपक्रमांमध्ये व दैनंदिन बाबींमध्ये अधिक व्यापक…

 डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी दिला भाजपचा राजीनामा;

कॉँग्रेस पक्षात घेतला प्रवेश ;   मुंबई : मुंबई विद्यापीठात बायोलॉजिकल विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी आझाद मैदान, मुंबई येथील राजीव गांधी काॅंग्रेस भवन येथे मुंबई विभागीय काॅंग्रेस अध्यक्षा, खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार वर्षाताई गायकवाड यांनी डॉ. उज्ज्वला जाधव यांना काॅंग्रेस पक्षात प्रवेश देतांना त्यांच्या हाती काॅंग्रेस पक्षाचा झेंडा दिला आणि पक्षाच्या मजबुतीसाठी डॉ. उज्ज्वला जाधव या उत्तम काम करतील असा विश्वास व्यक्त केला. काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी एक भला मोठा पुष्पहार मुंबई काॅंग्रेस अध्यक्षा खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड आणि डॉ. उज्ज्वला जाधव यांना घालून आनंद व्यक्त केला. डॉ उज्ज्वला जाधव या २०१४ पासून भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळी डॉ उज्ज्वला जाधव यांनी  भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष लल्लुसिंग आर्य, प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. डॉ उज्ज्वला जाधव यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला तेंव्हा माजी आमदार अशोक जाधव, विविध पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला असतांना भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले भारताचे संविधान बदलण्याची भाषा वारंवार करीत होते. यासाठी चारशे पार चा नारा दिला जात होता. मी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निष्ठावंत कार्यकर्ती असून भारतीय संविधानाशी एकनिष्ठ असल्याने मला ही भारतीय जनता पार्टीची भूमिका पटत नव्हती म्हणून मी भारतीय जनता पक्ष सोडण्याच्या निष्कर्षाप्रत आले होते. काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, मुंबई काॅंग्रेस अध्यक्षा खासदार प्रा वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री नसीम खान आदींची भेट घेऊन चर्चा केली आणि अखेर आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच त्यांच्या प्रचंड यशस्वी झालेल्या भारत जोडो व भारत न्याय यात्रेने प्रभावित होऊन प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश घेतला, असे डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले. प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी लवकरच डॉ. उज्ज्वला जाधव यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.