Author: bittambatami.com

ओबीसी आंदोलक आक्रमक; उपोषणकर्त्यांचा उपचारास नकार

 वडीगोद्री ( जालना) : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस असून दोघांनीही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान सरकार ओबीसी आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे…

काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा

मुंबई : मुंबईतील धारावी मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला . नुकत्याच…

भाजपशासित राज्ये पेपरफुटीची केंद्रे बनली-राहुल गांधी

नवी दिल्ली : शासित राज्ये पेपर लीकचे केंद्र बनले आहेत, पण पंतप्रधान मोदी या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केंद्रातील मोदी सरकारवर आणि भाजपावर केला आहे. राहुल…

‘जेईई आणि नीटच्या प्रशिक्षणासाठी 30 जूनपर्यंत अर्ज द्या’

 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बार्टीमार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जेईई -100 व नीट-100 जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थी इयत्ता 11 (विज्ञान) शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याजवळ महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास दाखला असावा. कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या घरात असावे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी. जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी नमुद केल्याप्रमाणे महिला 30 टक्के, दिव्यांग  5 टक्के, अनाथ 1 टक्के, वंचित 5 टक्के जागा आरक्षित असतील. प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता 10 वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निहाय उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 24 महिन्यांचा असणार आहे. प्रशिक्षण काळात 75 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती राहिल्यास विद्यार्थ्यांना दरमहा रु.6000/- एवढे विद्यावेतन दिले जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरीता प्रती विद्यार्थी रु.5000/- एवढी एकरकमी रक्कम अदा करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30/06/2024 आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी https://jee-neet.barti.co.in/public/ या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज

आपला दवाखाना, रुग्णवाहिका, अतिदक्षता व हिरकणी कक्ष उपलब्ध   मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त काढल्या जाणाऱ्या वारीदरम्यान वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. आरोग्य विभागाने पालखी मार्गावर सहा हजारांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी, आपला दवाखाना, फिरती रुग्णवाहिका पथके, आरोग्यदूत सज्ज ठेवली आहे. मुक्कामाच्या ठिकाणीही अतिदक्षता कक्ष, हिरकणी कक्ष उपलब्ध केले आहेत. आषाढी एकादशीनिमित्ता राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. यामध्ये साधारणपणे १२ लाखांपेक्षा अधिक वारकरी दरवर्षी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी गतवर्षीपासून राज्य सरकारने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत यंदाही वारकऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालखी मार्गावर आरोग्य विभागाने पाच किमी अंतरावर आरोग्य सेवा उपलब्ध केली आहे. यासाठी सहा हजार ३६८ आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहेत. पालखी मार्गातील खासगी वैद्यकीय दवाखान्यात वारीतील रुग्णांसाठी १० टक्के खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अत्यवस्थ रुग्णांसाठी पाच खाटांचे, तर पालखी मार्गावर ८७ अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. महिला वारकऱ्यांसाठी १५८ स्त्री रोग तज्ज्ञ विविध ठिकाणी सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच, १३६ हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. याशिवाय, १०२ आणि १०८ क्रमांकाच्या ७०७ रुग्णवाहिका २४ तास सज्ज असणार आहेत. दिंडी प्रमुखांHeading – आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज Slug -आपला दवाखाना, रुग्णवाहिका, अतिदक्षता व हिरकणी कक्ष उपलब्ध मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त काढल्या जाणाऱ्या वारीदरम्यान वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. आरोग्य विभागाने पालखी मार्गावर सहा हजारांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी, आपला दवाखाना, फिरती रुग्णवाहिका पथके, आरोग्यदूत सज्ज ठेवली आहे. मुक्कामाच्या ठिकाणीही अतिदक्षता कक्ष, हिरकणी कक्ष उपलब्ध केले आहेत. आषाढी एकादशीनिमित्ता राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. यामध्ये साधारणपणे १२ लाखांपेक्षा अधिक वारकरी दरवर्षी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी गतवर्षीपासून राज्य सरकारने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत यंदाही वारकऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालखी मार्गावर आरोग्य विभागाने पाच किमी अंतरावर आरोग्य सेवा उपलब्ध केली आहे. यासाठी सहा हजार ३६८ आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहेत. पालखी मार्गातील खासगी वैद्यकीय दवाखान्यात वारीतील रुग्णांसाठी १० टक्के खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अत्यवस्थ रुग्णांसाठी पाच खाटांचे, तर पालखी मार्गावर ८७ अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. महिला वारकऱ्यांसाठी १५८ स्त्री रोग तज्ज्ञ विविध ठिकाणी सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच, १३६ हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. याशिवाय, १०२ आणि १०८ क्रमांकाच्या ७०७ रुग्णवाहिका २४ तास सज्ज असणार आहेत. दिंडी प्रमुखांसाठी पाच हजार ८८५ औषधांचे कीट उपलब्ध केले आहेत. पालखी मार्गावरील दोन हजार ७५२ पाणी स्रोतांचे सर्वेक्षण व निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, पालखी मार्गावरील सात हजार ९९१ हॉटेल, उपहारगृहे, ढाबा येथील १९ हजार ५०२ कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. वारी मार्गावर ठिकठिकाणी कीटकजन्य आजार सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून, नागरिकांची असंसर्गजन्य आजारांची तपासणी, समुपदेशन व उपचार करण्यात आले आहेत. आपला दवाखाना वारकऱ्यांच्या सेवेत वारकऱ्यांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी वारी मार्गामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने मुक्कामाच्या ठिकाणी तसेच प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखान्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पालखी मार्गावर २५८ आपला दवाखाना उभारले आहेत. दिवेघाटामध्ये पायथ्याशी, मस्तानी तलाव आणि डोंगरमाथा अशा तीन ठिकाणी आपला दवाखाना उभारण्यात येणार आहे. महाआरोग्य शिबिरासाठी तीन हजार कर्मचारी नियुक्त वारी मार्गादरम्यान वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. ही महाआरोग्य शिबिरे वाखरी, तीन रस्ता, गोपाळपूर या ठिकाणी भरवले जाते. वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता या महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभागाने तीन हजार ३६२ आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 000000 साठी पाच हजार ८८५ औषधांचे कीट उपलब्ध केले आहेत. पालखी मार्गावरील दोन हजार ७५२ पाणी स्रोतांचे सर्वेक्षण व निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, पालखी मार्गावरील सात हजार ९९१ हॉटेल, उपहारगृहे, ढाबा येथील १९ हजार ५०२ कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. वारी मार्गावर ठिकठिकाणी कीटकजन्य आजार सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून, नागरिकांची असंसर्गजन्य आजारांची तपासणी, समुपदेशन व उपचार करण्यात आले आहेत. आपला दवाखाना वारकऱ्यांच्या सेवेत वारकऱ्यांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी वारी मार्गामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने मुक्कामाच्या ठिकाणी तसेच प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखान्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पालखी मार्गावर २५८ आपला दवाखाना उभारले आहेत. दिवेघाटामध्ये पायथ्याशी, मस्तानी तलाव आणि डोंगरमाथा अशा तीन ठिकाणी आपला दवाखाना उभारण्यात येणार आहे. महाआरोग्य शिबिरासाठी तीन हजार कर्मचारी नियुक्त वारी मार्गादरम्यान वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. ही महाआरोग्य शिबिरे वाखरी, तीन रस्ता, गोपाळपूर या ठिकाणी भरवले जाते. वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता या महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभागाने तीन हजार ३६२ आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 000000

‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या आसपास वृक्षारोपण करा

एमएमआरसीचे नागरिकांना आवाहन   मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेलगतच्या परिसरात वृक्षारोपण करावे असे आवाहन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) नागरिकांना केले आहे. नागरिकांनी लावलेल्या…

केवळ एक रुपयात शेतकऱ्यांनी भात, नाचणी पिकांचा विमा उतरावा- अंकुश माने

ठाणे : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी व उडिद या  पिकांकरीता पीक विमा काढण्यासाठी अंतिम दिनांक 15 जुलै, 2024 आहे, अशी माहिती कोकण विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली आहे. खरीप हंगाम २०२४ करीता पिक विम्यासाठी शेतकरी सहभागास सुरुवात झाली आहे. कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी व उडिद या  पिकांकरीता पीक विमा उतरविता येईल. सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल, असेही श्री. माने यांनी कळविले आहे. ठराविक पिकांकरिता अधिसूचित असणाऱ्या महसूल मंडळामधील शेतकरी त्या पिकाचा विमा उतरवू शकतील. ठाणे, रत्नागिरी व  सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर, पालघर व रायगड जिल्ह्यामध्ये चोलामंडलम एम. एस.जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. ठाणे, पालघर, रायगड व सिंधुदुर्ग जिल्हा भात पीक विमा संरक्षित रक्कम (रु. /हेक्टर) – 51760/-, रत्नागिरी जिल्हा भात पीक विमा संरक्षित रक्कम (रु. /हेक्टर) – 50000/-., ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा नाचणी पीक विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) – 20000/-., पालघर जिल्हा उडीद पीक विमा संरक्षित रक्कम (रु./हेक्टर) – 25000/- ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. विविध जोखामी अंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनातील अटी व शर्तींचा अधिन राहून निश्चित केली जाईल. खरीप हंगाम 2024 करिता सहभागाची अंतिम मुदत दिनांक 15 जुलै, 2024 अशी आहे. पीक विम्यासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी 7/12 उतारा, आधार कार्ड, पेरणी घोषणापत्र, बँकखात्याचे तपशील प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. पीक विमा पोर्टल, विमा कंपनी संकेतस्थळ, बँक, सहकारी पतसंस्था, पीक विमा अँप इत्यादी माध्यमांद्वारे शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकतात. पीक विमा योजनेचे अर्ज भरताना बँकामधील गर्दी टाळावी याकरिता जनसुविधा केंद्रामार्फत (सी.एस.सी.) ऑनलाइन पद्धतीने पीक विमा अर्ज दाखल करता येईल. शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरताना कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी कृषि विभागाकडून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरीता योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. माने यांचे मार्फत करण्यात येत आहे. 0000

कोकण पदवीधर मतदार कर्मचाऱ्यांसाठी 26 जून रोजी नैमित्तिक रजा – अशोक शिनगारे

ठाणे :  विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी शासनाकडून विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी येत्या 26 जून 2024 रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मर्यादीत स्वरुपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली आहे. ही नैमित्तिक रजा अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल. यामुळे ठाणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांनी या दिवशी मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. 000000

 स्वच्छतेसाठी अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका !

ओल्या व सुक्या कचऱ्याची योग्य पद्धतीने करण्यासाठी ५० टोगो व्हॅन – प्रताप सरनाईक   अनिल ठाणेकर   ठाणे : ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोगो व्हॅन ओवळा माजिवडा मतदारसंघाला देण्याचे नियोजन असून दोन टोगो व्हॅन यापूर्वीच शहराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच आहे. ठाणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात राबवायला घेतलाय. कचऱ्याची व्हिलेवाट जागेवरच होऊ शकेल व आपल्या मतदार संघातील कचरा हा डंम्पिग ग्राउंडवर जाणार नाही. कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा व सुका कचरा असं त्याचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य व्हिलेवाट लावण्यात येईल व कचऱ्याचे खतात रूपांतर होईल. यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात येतेय. या टोगो व्हॅन मध्ये कचरा परस्पर टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुखा कचरा वेगवेगळा केला जातो. त्या कचऱ्याचे तिथल्या तिथेच खतामध्ये रूपांतर होते. प्रायोगिक तत्वावर दोन टोगो व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आलेल्या असून, आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो व्हॅनचे प्रात्येक्षिक आज पत्रकार परिषदेत दाखवले. त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या आधी आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिलेल्या आहेत. भविष्यात ओवळा माजिवडा मतदारसंघासाठी ५० व्हॅन देणार आहेत. जेणेकरून कचऱ्याची व्हिलेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डंम्पिग ग्राउंडवर जाणार नाही. कचऱ्याचे खतात रूपांतर झाल्याने मतदारसंघातील जी उद्यानं आहेत किंवा दुतर्फा सुशोभित झाडं आहेत तसेच ज्या ज्या ठिकाणी लॅण्डस्केप केलेले आहेत, तिथे खताचा पर्यावरणसुलभ वापर करता येईल. तसंच मोठ्या मध्यवर्ती भागामध्ये झाडांसाठी तेथील गार्डन डिपार्टमेंटला हे खत दिलं जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी टोगो व्हॅन कचरा प्रकल्पासाठी निधी दिला होता. त्यामधून ह्या दोन टोगो व्हॅन घेतलेल्या आहेत. महाराष्ट्रात अशी टोगो व्हॅन चालवणारी ठाणे महापालिका पहिलीच असून, राज्यात असा प्रकल्प पहिल्यादांच होतो आहे, अशी माहीती आ. प्रताप सरनाईक यांनी दिली. ०००००

ठाणे जिल्ह्यातील बचत गटांमार्फत विद्यार्थ्यांसाठी १ लाख ४ हजार ७०३ गणवेश होणार तयार

ठाणे : समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावाणी सुरू झाली आहे. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ठाणे जिल्ह्यातील बचत गटांना मिळाले आहे. जिल्ह्यातील बालकांच्या अंगावर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी शिवलेले गणवेश दिसणार आहेत. जिल्ह्यासाठी एकूण सुमारे 1,04,703 गणवेश शिलाई करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी 15 जून रोजी ग्रामीण भागातील 1201 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. राज्य शासनाने समग्र शिक्षा कार्यक्रम अंतर्गत एक राज्य एक गणवेश योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत वाटप करावयाच्या मोफत गणवेशाच्या शिलाई करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटातील महिलांना मिळाले असून यातून बचत गटाच्या महिलांना रोजगारची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात एकूण 104703 गणवेश शिवणकाम बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. यंदाच्या वर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दि. 15 जून 2024 रोजी मोफत गणवेश योजनेअंतर्गत भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड व अंबरनाथ या 6 तालुक्यामधील एकूण 6 केंद्र शाळेतील 1201 विद्यार्थ्यांचे गणवेश पोहोच करण्यात आले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रथम दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून देऊन आनंदाची भेट देण्यात आली. यावेळी गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग तसेच माविम जिल्हा प्रतिनिधी व सीएमआरसीचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटांतील महिलांना मिळावे यासाठी शासन स्तरावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच मुख्यालय स्तरावरून या उपक्रमाची अंमलबजावणी योग्यरित्या होऊन विहित वेळेत शिवणकाम पूर्ण होण्यासाठी प्रकल्प संचालक कुसुम बाळसराफ, महाव्यवस्थापक (वित्त व प्रशासन) रविंद्र सावंत, महाव्यवस्थापक (प्रकल्प) महेंद्र गमरे मेहनत घेतली. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात या प्रकल्पाची अंलबजवणी होऊन विद्यार्थ्यांना विहित वेळेत गणवेश पुरवठा व्हावा यासाठी कार्यक्रम व्यवस्थापक रूपा मेस्त्री, गौरी दोंदे, वित्त व लेखा अधिकारी राखी मिराशी व व्हॅल्यु चेन सल्लागार महेश कोकरे यांनी जिल्ह्यांना मार्गदर्शन केले. गणवेश शिलाईचे कामकाज वेळेत पूर्ण करून शाळेत पोहच करण्यासाठी सर्व सीएमआरसीतील गारमेंट युनिट मोठ्या जोमाने काम करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील सीएमआरसी मार्फत कुशल महिलांना रोजगार मिळावा यासाठी महिलांची निवड करणे, त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी माविमचे विभागीय सल्लागार मंगेश सूर्यवंशी, माविमच्या ठाणे जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती अस्मिता मोहिते यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून हे कामकाज यशस्वीरित्या पूर्ण करत आहेत. 0000