Author: bittambatami.com

तुर्भे विभाग अंतर्गत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई

तुर्भे विभाग अंतर्गत अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई नवी मुंबई  : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभाग अंतर्गत  धनपाल गोकुळ पाटील व श्रीम. मालती धनपाल पाटील, घर क्र. ५१८, सेक्टर – ५, सानपाडागांव, सानपाडा, नवी मुंबई, यांनी वरील नमुद पत्यावर प्रतयक्ष ठिकाणी स्थळपाहणी केली असता विनापरवानगी अनधिकृतरित्या ९.४० मी. x ५.० मी. मोजमापाच्या क्षेत्रफळामध्ये चौथ्या मजल्याचे (G+४) आर.सी.सी. स्वरुपाचे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते. त्याअनुषंगाने, अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कारवाई करुन सदरचेअनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेलेआहे. सदर मोहिम आयुक्त सो. यांचे आदेशान्वये अति. आयुक्त राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड, यांचे मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त, तुर्भे  सागर मोरे, यांचे नियंत्रणाखाली तुर्भे विभागातील  विनोद आंब्रे, कनिष्ठ अभियंता व इतर अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली आहे. तसेच सदर मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार आणि अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक देखील तैनात ठेवण्यात आले होते. वरील अनधिकृत बांधकाम हटविण्याकरीता ४ इलेक्ट्रीक हॅमर, १० मजूर यांचा वापर करण्यात आला आहे. तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अनधिकृत बांधकामावर कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे राधिका जोशी यांचे गायन

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे राधिका जोशी यांचे गायन मुंंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवार १५ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राधिका जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उस्ताद खादिम हुसैन खाँ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम होईल. यावेळी तबल्यावर प्रणव गुरव तर संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर हे साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी सहभागी व्हावे, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ०२२-२४३०४१५०.  राधिका जोशी ही जयपूर अत्रौली घराण्याची भारतीय शास्त्रीय गायिका आहे. ती गानसरस्वती श्रीमती किशोरी आमोणकर यांच्या वरिष्ठ शिष्या पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्या आहेत. तिने कोलकाता येथील संगीत संशोधन अकादमीमध्ये पद्मविभूषण श्रीमती गिरिजा देवी जी यांच्याकडून अर्धशास्त्रीय संगीताचाही अभ्यास केला आहे. राधिका ही एक बहुमुखी गायिका आहे आणि ऑल इंडिया रेडिओने शास्त्रीय तसेच हलक्या शास्त्रीय (ठुमरी, दादरा, काजरी, होरी, इत्यादी) संगीतात ग्रेड मिळवलेल्या काही गायिकांपैकी ती एक आहे.

 चिन्मय मिशनच्या जागतिक स्तरावरील ७५ गौरवशाली वर्षांच्या निमित्ताने “चिन्मय अमृत यात्रेचे” आयोजन

चिन्मय मिशनच्या जागतिक स्तरावरील ७५ गौरवशाली वर्षांच्या निमित्ताने “चिन्मय अमृत यात्रेचे” आयोजन कल्याण : सेंट मेरीज हायस्कूल चक्की नाका, आर्य गुरुकुल, नांदिवली–कल्याण आणि आर्य गुरुकुल, अंबरनाथ या तीनही शाळांमध्ये भक्तिभाव, आध्यात्मिक जागृती आणि सांस्कृतिक चेतनेच्या वातावरणात यात्रा संपन्न झाली. प्रत्येक ठिकाणी पूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंदजी यांच्या पादुका, प्रतिमा व वस्त्रांचे पावन सान्निध्य लाभले. भव्य पारंपरिक स्वागत, पादुका पूजन, मंत्रोच्चार, सांस्कृतिक सादरीकरणे आणि माहितीपूर्ण प्रदर्शने यांच्या माध्यमातून गुरुदेवांचा व्यावहारिक वेदांत व मूल्याधिष्ठित जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरले स्वामिनी निष्कलानंदा अम्मा यांचे “चिन्मय कल्याण” या विषयावरील प्रेरणादायी मार्गदर्शन, ज्यातून विद्यार्थ्यांना व पालकांना मूल्ये दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याची प्रेरणा मिळाली. मान्यवर संत, विशेष पाहुणे आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण झाला. विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रे, ऑडिओव्हिज्युअल सादरीकरणे आणि अमृत वाहिनी प्रदर्शन बस यांद्वारे चिन्मय मिशनच्या प्रवासाची व शिकवणीची सखोल ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सामूहिक प्रार्थना, श्री विष्णुसहस्रनाम पठण, महाआरती, तसेच गीता पंचामृत ग्रंथ व प्रसाद वितरणाने झाली. या आध्यात्मिक अनुभवाने उपस्थित सर्वांच्या मनात शांती, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तीन्ही शाळांमध्ये पार पडलेली ही चिन्मय अमृत यात्रा केवळ उत्सव न राहता एक आध्यात्मिक जागरण ठरली. चिन्मय व्हिजन प्रोग्रामच्या अनुरूप शैक्षणिकदृष्ट्या सक्षम, आध्यात्मिकदृष्ट्या दृढ आणि मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व घडवण्याच्या शाळांच्या बांधिलकीची ही यात्रा सशक्त साक्ष ठरली.

  मालाडमध्ये शरीरसौष्ठवाचा २२ फेब्रुवारीला महासंग्राम

मालाडमध्ये शरीरसौष्ठवाचा २२ फेब्रुवारीला महासंग्राम ज्युनियर मुंबई श्रीसह दिव्यांग आणि मास्टर्स स्पर्धेचाही पिळदार थरार जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्टच्या वतीने ज्युनिअर मुंबई श्री चे मालाड येथे आयोजन मुंबई : जिद्द, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर शरीर घडवणाऱ्या तरुणाईला मोठ्या व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी देणारी ‘दिव्यांग / मास्टर्स / ज्युनियर मुंबई श्री २०२६’ तसेच ‘ज्युनियर मुंबई मेन्स फिजीक’ ही बहुप्रतिक्षित शरीरसौष्ठव स्पर्धा रविवार, २२ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता  जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्ट यांच्या विद्यमाने मालाड (पूर्व) येथील पंडित दिनदयाल उपाध्याय उद्यान, कासम बाग येथे   रंगणार आहे. स्पर्धेपूर्वी दुपारी १ ते ४ या वेळेत वजन व उंची तपासणी होणार असून, ही तपासणीच अनेक खेळाडूंसाठी अंतिम कसोटी ठरणार आहे. अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली. या स्पर्धेत ज्युनियर मुंबई श्री अंतर्गत ५५ किलोपासून ७५ किलोवरील असे एकंदर सहा वजनी गट, मास्टर्स मुंबई श्रीमध्ये ४० ते ५०, ५० ते ६० आणि ६० वर्षांवरील गट, तर दिव्यांग मुंबई श्री व ज्युनियर मुंबई मेन्स फिजीकसाठी स्वतंत्र खुले गट ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नवख्या ज्युनियर खेळाडूंना अनुभवी शरीरसौष्ठवपटूंसोबत एकाच व्यासपीठावर चमक दाखवण्याची प्रेरणादायी संधी मिळणार आहे. या स्पर्धेचे आकर्षण केवळ रंगतदार सादरीकरणापुरते मर्यादित नसून पारितोषिकांमध्येही मोठा दम आहे. ज्युनियर मुंबई श्री व ज्युनियर मुंबई मेन्स फिजीकच्या प्रत्येक वजनी गटात पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे ३,०००, २,५००, २,०००, १,५०० व १,००० रुपये रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रे, तसेच पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके दिली जाणार आहेत. सहा गटांतील किताब विजेत्यास १५ हजार रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. दिव्यांग मुंबई श्री गटातही पहिल्या पाच विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्रे, तर मास्टर्स मुंबई श्री गटात पहिल्या तीन विजेत्यांना पदके आणि पहिल्या पाच विजेत्यांना प्रशस्तीपत्रे दिली जातील.…

  अमर हिंद मंडळात रंगणार जपान विरुद्ध कबड्डीचा थरार!

अमर हिंद मंडळात रंगणार जपान विरुद्ध कबड्डीचा थरार! दादरच्या मॅटवर घुमणार आंतरराष्ट्रीय कबड्डीचा जयघोष कबड्डीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झालेल्या दादरच्या अमर हिंद मंडळाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय रंगत उतरतेय! मुंबई कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने जपान कबड्डी असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय मुलींचा संघ आणि अमर हिंद मंडळाचा मुलींचा संघ यांच्यात ११ फेब्रुवारी सायंकाळी ठीक ७ वाजता मैत्रीपूर्ण सामना रंगणार असून, कबड्डीप्रेमींना जागतिक दर्जाचा थरार अनुभवता येणार आहे. आंतरराष्ट्रीय उपस्थिती : जपानकडून मान्यवरांची हजेरी या सामन्यासाठी जपान कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी जनरल कवाई स्वतः उपस्थित राहणार असून, त्यांच्या सोबत १६ महिला खेळाडूंचा संघ तसेच महिला प्रशिक्षक अओकी यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. ही भेट भारतीय कबड्डीच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. कबड्डीला जागतिक पातळीवर नवे बळ कबड्डी या खेळाला आंतरराष्ट्रीय महत्त्व निर्माण करणे आणि जागतिक स्तरावर समृद्ध करणे हा या मैत्रीपूर्ण सामन्यामागील प्रमुख उद्देश आहे. दोन्ही संघांचा सामना मॅटवर होणार असून, तांत्रिक कौशल्य, वेग आणि डावपेच यांचा सुरेख संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रवेश विनामूल्य : कबड्डी प्रेमींसाठी खुलं आमंत्रण हा सामना सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून, कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन अमर हिंद मंडळ, दादरच्या प्रमुख कार्यवाह सीमा कोल्हटकर यांनी केले आहे. दादरच्या क्रीडा भूमीत जागतिक कबड्डीचा उत्सव जपान आणि भारतातील मैत्रीला क्रीडामाध्यमातून नवी उंची देणारा हा सामना दादरच्या क्रीडा संस्कृतीसाठी अभिमानाचा क्षण ठरणार असून, अमर हिंद मंडळ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रीडामंचावर आपली ठसा उमटवणार आहे.

शाहू शिक्षण संस्था अध्यापक महाविद्यालयात पार पडल्या विविध स्पर्धा

शाहू शिक्षण संस्था अध्यापक महाविद्यालयात पार पडल्या विविध स्पर्धा कल्याण : शाहू शिक्षण संस्था अध्यापक महाविद्यालय, बी.एड., शहाड विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, फुल सजावट, नेल आर्ट स्पर्धा, हेअर स्टाईल स्पर्धा तसेच फूड स्टॉल (खाद्य मेळावा) या उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमास शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गिरीश लटके यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ पत्रकार बाबा रामटेके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्या वैशाली पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. कल्पना सोमनाचे, प्रा. बबन पाटील, प्रा. अनघा चौधरी, प्रा. डॉ. सुस्मिता म्हाळुंकर, प्रा. योगिनी घरत, ग्रंथपाल प्रा. अनघा मोडक तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना नियोजनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तसेच शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली कला, कल्पकता व कौशल्य सादर केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा मनमुराद आनंद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 महानगरपालिकेची मैदाने व उद्याने व्यवसायासाठी देऊ नका – उपनेते विजय साळवी

महानगरपालिकेची मैदाने व उद्याने व्यवसायासाठी देऊ नका – उपनेते विजय साळवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केडीएमसी आयुक्तांना पत्र कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेची मैदाने व उद्याने व्यवसायासाठी न देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली असून याबाबत पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण शहरातील काही भूखंड खेळाच्या मैदानासाठी व उद्यानासाठी आरक्षीत करुन ठेवते. त्या आरक्षीत भुखंडावर लाखो रुपये खर्च करुन क्रिडाविषयक सर्व प्रकारच्या सुविधा असलेली क्रिडांगणे व करमणुकीसाठी बगीचे विकसीत करत असते. या क्रिडांगणांचा वापर फक्त क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी होणे आवश्यक आहे. हि  क्रिडांगणे महापालिकेने व्यवसायीक उपक्रमासाठी देणे म्हणजे खेळाडू व क्रिडाप्रमींवर अन्यायकारक आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या संघटने तर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त हिंदुहृदयसम्राट श्री २०२६ ही जिल्हास्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धा महापालिकेच्या यशवंतराव क्रिडांगणावर (मॅक्सी ग्राऊंड) येथे शुक्रवारी आयोजित केली होती. यासाठी महापालिकेचे या क्रिडांगणाचे रितसर भाडे व डिपोझीट भरण्यात आले होते व महापालिकेची परवानगी घेण्यात आली होती. परंतु त्या स्पर्धेच्या वेळी या मैदानात भाजी विक्रीचा आठवड्याचा बाजार मांडण्यासाठी अनेक भाजी विक्रेते सर्वप्रकारचे स्टॉल, भाजी व इतर वस्तू घेऊन मैदानात आले आणि त्यांनी स्पर्धेच्या आयोजकांबरोबर वाद गळात मैदानात भाजी विक्रीचा बाजार मांडण्याचा आग्रह धरला. मैदानाचे रीतसर भाडे भरलेले असताना मैदानात भाजी विक्री करुन व्यवसाय करण्यात येत असेल तर ते निषेध करण्यासारखे आहे. त्यामुळे या विषयात लक्ष घालावे, मैदाने व उद्याने फक्त क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमासाठीच वापरण्यात येणे बाबत योग्य ते निर्देश प्रशासकीय आधिकाऱ्यांना द्यावेत. महापालिकेच्या मैदानात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय होऊ नये, क्रिडांगणे व्यवसाय करण्यासाठी वापरात येऊ नयेत अशी मागणी शिवसेना उपनेते विजय साळवी यांनी केली आहे. याबाबत प्रशासना तर्फे योग्य ती कडक कारवाई न झाल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटने तर्फे मोठे आंदोलन करण्याचा इशारा साळवी यांनी दिला आहे.

बारावी परीक्षार्थींसाठी केंद्रापासून बससेवा – संजय केळकर

बारावी परीक्षार्थींसाठी केंद्रापासून बससेवा – संजय केळकर ठाणे, कासारवडवली येथील आदर्श विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज या केंद्रातील बारावीच्या परीक्षार्थींना ठाण्यात येण्यासाठी होणारी असुविधा आमदार संजय केळकर यांच्या सूचनेमुळे दूर झाली आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने या २५०हून अधिक विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा सुरू केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कासारवडवली येथे आदर्श विद्यामंदिर आणि ज्यू.कॉलेजमध्ये बारावी परीक्षेचे केंद्र असून येथे कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी पेपर सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांना बससाठी चालत घोडबंदर मार्गावर चालत यावे लागले. तर शेअर रिक्षा प्रती प्रवासी ६० ते ७० रुपये आकारत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत होती.ही बाब पालकांनी आमदार संजय केळकर यांच्या निदर्शनास आणल्यानंतर केळकर यांनी तत्काळ ठाणे महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापकांना पत्र देऊन या विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार बुधवार ११, १४ १७, २४ आणि २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १.५० वाजता परिवहनची बससेवा केंद्रापासून ठाणे स्टेशनपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बस केंद्रापासून कासारवडवली, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडे, गोकुळ नगर, कोर्ट नाका या मार्गाने स्टेशनकडे जाणार आहे. त्यामुळे कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील विद्यार्थ्यांना ऐन परीक्षाकाळात सुविधा मिळाल्याने पालकांनी  केळकर यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु टी-२० क्रिकेट स्पर्धेत आरोग्य विद्यापीठाची उत्तम कामगिरी

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु टी-२० क्रिकेट स्पर्धेत आरोग्य विद्यापीठाची उत्तम कामगिरी नाशिक :  महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरु चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांकांचे पारितोषिक पटकावले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्य फेरीत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरविरुध्द झुंज देत असताना नाशिकच्या संघाने स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण केले. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाने आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिला सामन्यात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली विरुध्द ८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात  योगेश राऊत ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. दुसऱ्या सामन्यात यजमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठावर २६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात  संदीप चौधरी ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. तिसऱ्या सामन्यात कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचा ९ गडी राखून पराभव केला. या सामन्यात  पुष्कर तऱ्हाळ ’मॅन ऑफ द मॅच’ ठरले. उपांत्य फेरीतील अटीतटीच्या लढतीत साखळी फेरीतील अजेय घोडदौड नंतर आरोग्य विद्यापीठाचा सामना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुध्द झाला. नाशिकच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले होते. कोल्हापूरच्या संघाने हे लक्ष्य १९.५ षटकांत ८ बाद १५८ धावा करत गाठले. केवळ २ गडयांनी विजय मिळवत कोल्हापूरने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. विद्यापीठाच्या संघातील  पुष्कर तऱ्हाळ यांना मालिकेतील ’सर्वोत्तम गोलंदाज’ म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेतील येशात गोलंदाजीचा मोलाचा वाटा आहे.  पुष्कर तऱ्हाळ यांनी आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना स्पर्धेतील ’बेस्ट बॉलर ऑफ टूर्नामेंट’ (सर्वोत्तम गोलंदाज) या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या क्रिकेट संघात संघव्यवस्थापक राजेश पाटील व कर्णधार योगेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली पुष्कर तऱ्हाळ, संदीप चौधरी, पवन गोलवाल, राजेंद्र दिवे, प्रविण जगताप, महेंद्रनाथ चौधरी, नंदकिशोर ठाकरे, नंदकिशोर वाघ, विजय कुरकुरे, संतोष जढाळ, बबन कांगणे, सचिन शिराळ, मुकुंद मुळे आदी खेळाडू आहेत. या क्रिकेट स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंचे विद्यापीठ परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले.

 डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवण्यासाठी धावतोय एक ध्येयवेडा तरुण

डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवण्यासाठी धावतोय एक ध्येयवेडा तरुण विशाख कृष्ण स्वामी सलग ३७० दिवस दररोज ४२ किलोमीटर धावण्याचा करणार रेकॉर्ड कल्याण : डोंबिवलीतील विशाख कृष्ण स्वामी हा धावपटू आता पर्यन्त धावण्याचे बरेच रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. यावेळेस तो दररोज तो ४२ किलोमीटर सलग ३७० दिवस धावून जागतिक रेकॉर्ड पार करणार आहे. विशाख कृष्णस्वामी हा एक सामान्य डोंबिवलीकर असून त्याला धावण्याचे वेड आहे. आता पर्यंत राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत त्याने अनेक रेकॉर्ड केलेत. मात्र आता त्याला यावेळेस एक मोठा जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे. तो दररोज ४२ किलोमीटर सलग ३७० दिवस धावणार आहे.  ६३ दिवस झाले असून वर्ल्ड रेकॉर्ड मुळे तो महाराष्ट्राचे आणि डोंबिवली चे नाव जगात मोठं करणार आहे ही त्याची जिद्द आहे. विशाख कृष्ण स्वामी हा एका सामान्य कुटुंबातला आहे. त्याला लहानपणापासून खेळाची जास्त आवड असल्यामुळे आता डोंबिवलीकर त्याला सपोर्ट करत आहेत.