Author: bittambatami.com

ममता परदेशी यांचा ऐतिहासिक सायकलिंग जागतिक विक्रम

ममता परदेशी यांचा ऐतिहासिक सायकलिंग जागतिक विक्रम कल्याण : आदी कैलास व ओम पर्वत या अतिदुर्गम आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या स्थळांपर्यंत पहिली महिला सोलो सेल्फ सपोर्ट सायकल मोहिम यशस्वीरीत्या पूर्ण करून डोंबिवलीच्या ममता परदेशी यांनी ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ही मोहिम २३ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पार पडली. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डकडून या विक्रमाची अधिकृत नोंद करण्यात आली. त्यानिमित्ताने डोंबिवली येथील सिद्धिविनायक हॉल येथे आयोजित सुसंस्कार क्लासेसच्या कार्यक्रमात ममता परदेशी यांना सन्मानित करण्यात आले. ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डचे सीईओ दिनेश गुप्ता यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सायकलिंग मोहिमेत ममता परदेशी यांनी अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती, उंच पर्वतीय मार्ग, बदलते हवामान आणि दीर्घ अंतरांचा सामना करत ही कामगिरी यशस्वी केली. त्यांच्या या विक्रमामुळे महिला सायकलिंग, साहसी क्रीडा तसेच प्रेरणादायी सामाजिक उपक्रमांना नवी प्रेरणा मिळाली असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास सुसंस्कार क्लासेसचे पदाधिकारी, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, सायकलिंगप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘साहित्यिक म्हणजे कोण रे भाऊ?’ विषयावर जळजळीत लेखन स्पर्धा

‘साहित्यिक म्हणजे कोण रे भाऊ?’ विषयावर जळजळीत लेखन स्पर्धा कल्याण : सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक विचारप्रवर्तक आणि जळजळीत लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ‘साहित्यिक म्हणजे कोण रे…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू संशयास्पद – विश्वनाथ पाटील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू संशयास्पद – विश्वनाथ पाटील अविनाश उबाळे ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा झालेला विमान अपघातातील मृत्यू हा मला संशयास्पद वाटत आहे.या अपघाताची पारदर्शकपणे सरकारने…

परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून कोपरमधील विद्यार्थ्याचा मृत्यू

परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून कोपरमधील विद्यार्थ्याचा मृत्यू आरती परब दिवा : बारावीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जात असताना धावत्या लोकलमधून पडून कोपरमधील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना…

शासकीय कार्यालयात अभिप्राय पेटी यंत्रणा कार्यान्वित करा – अनिल महाडिक

शासकीय कार्यालयात अभिप्राय पेटी यंत्रणा कार्यान्वित करा – अनिल महाडिक अनिल ठाणेकर ठाणे : शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात अभ्यागतांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी एक कुलूपबंद अभिप्राय पेटी बसविण्यात यावी, अशी मागणी व्हिसल ब्लोअर कार्यकर्ता अनिल महाडिक यांनी सर्व शासकीय कार्यालयातील प्रमुखांकडे केली आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालय एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग,तहसीलदार , जिल्हा परिषद, कामगार उपायुक्त, धर्मदाय  सहाय्यक आयुक्त,  रेशनिंग कार्यालय, सर्व पोलीस स्टेशन महानगरपालिका  कार्यालय ,व सर्व प्रभाग समिती, सार्वजनिक हॉस्पिटल ,जिल्हा/ ठाणे शहर सहकारी संस्था निबंधक* आपणास सविनय अर्ज सादर करतो की, महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ४ फेब्रुवारीला विशेष शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदींनुसार, प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित अभिप्राय यंत्रणा राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अनुषंगाने आपल्या कार्यालयात खालील बाबींची तातडीने पूर्तता व्हावी, शासनाचा हा निर्णय लोकशाही अधिक प्रगल्भ करण्यासाठी व प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरी, आपल्या स्तरावरून या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून तशी सूचना फलकावर प्रसिद्ध करावी, असे. अभिप्राय पेटीची स्थापना: कार्यालयाच्या दर्शनी भागात अभ्यागतांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी एक कुलूपबंद अभिप्राय पेटी बसविण्यात यावी. शासन निर्णयासोबत जोडलेले अभिप्राय प्रारूप पेटीच्या शेजारी उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून नागरिकांना गुणांकण देणे सुलभ होईल.कार्यवाही व अहवाल: प्राप्त झालेल्या विधायक सूचनांचे स्थानिक आणि धोरणात्मक असे वर्गीकरण करून त्यावर तात्काळ सुधारणात्मक पावले उचलण्यात यावी, अशी सूचना अनिल महाडिक यांनी केली आहे.

  साळवा बलात्कार प्रकरणातील आरोपीस कठोर शासन करा

साळवा बलात्कार प्रकरणातील आरोपीस कठोर शासन करा माकप व जनवादी महिला संघटनेची मागणी अनिल ठाणेकर ठाणे, साळवा येथिल बलात्कार प्रकरणातील आरोपीस कठोर शासन करा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनवादी महिला संघटनेने केली आहे.यावेळी माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य विजय गाभणे व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य नेत्या रेहाना शेख, उज्वला पडलवार, लता गायकवाड, संगीता गाभणे, रमेश देवरे, प्रकाश दांडेगावकर, रामा कंटाळे, रेणुका कंटाळे हे उपस्थित होते कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे भूमिहीन कुटुंब मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करून आपले पोट भरते. पिडित कुटुंब भूमिहीन असून ९ वर्षाची मतिमंद मुलगी २ ऱ्या वर्गात शिकते, २८ तारखेला शाळेच्या दुपारच्या सुट्टीत ती खेळत असताना तिला ६९ वर्षाचा आरोपी संतुकराम आवटे यांने चॉकलेट चे अमिष दाखवून पीडितेला घरी बोलावून लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी येऊन रडत असल्याने आईने काय झाले विचारले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीचे आई वडील यांनी आरोपीच्या घरी जाऊन विचारले असता त्याने पीडित कुटुंबाला ५ लाख रुपये घे आणि घडलेला हा प्रकार कोणाला सांगू नका असे धमकावले आहे.त्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीच्या आई वडिलांनी मुलीला हॉस्पिटल मध्ये दाखल केले आणि पुढील उपचार चालू असून मुलगी सुखरूप असल्याचे निदर्शनास आले.कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक होऊन त्यास परभणी येथील कारागृहात पाठवण्यात आले आहे.८ फेब्रुवारी २०२६ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने पीडित मुलीच्या घरी जाऊन आई-वडिलांना धीर दिला आणि आरोपीला कडक शासन झाले पाहिजे या साठी प्रयत्न करण्याचे आश्वासण देण्यात आले तसेच पक्ष व महिला संघटना आपल्याला सोबत आहे असे सांगून पिडीत कुटुंबाचे सांत्वन केले.पिडीत कुटुंबाच्या पुढील पुनर्वसनासाठी तसेच वैद्यकीय उपचारासाठी आणी लेकरांच्या शिक्षणासाठी शासकीय मदत मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कुटुंब भूमिहीन बेघर असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे हेही निवेदन लवकरच देण्यात येणार असून पीडित मुलीला न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याची भूमिका माकप व जमस ने घेतली आहे.

काळ्या कामगार कायद्यांविरोधात, धर्मराज्य पक्षाची गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

काळ्या कामगार कायद्यांविरोधात, धर्मराज्य पक्षाची गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने अनिल ठाणेकर ठाणे-केंद्र सरकारने लादलेल्या चार काळ्या कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी,’धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुरुवार,१२ फेब्रुवारी, लोकशाहीमार्गाने निदर्शने करण्यात येणार आहेत.पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला…

“घुसखोर पंडित” वेबसिरीज विरोधात महाराष्ट्र करणी सेनेची पोलिसांत धाव

“घुसखोर पंडित” वेबसिरीज विरोधात महाराष्ट्र करणी सेनेची पोलिसांत धाव रमेश औताडे मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेल्या ‘घुसखोर पंडित’ या वेब सिरीजमुळे ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत महाराष्ट्र करणी सेनेने खांदेश्वर पोलिस ठाणे, नवी मुंबई येथे तक्रार दाखल केली आहे. या वेब सिरीजचे शीर्षक व कथानक समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करणारे असल्याचा दावा संघटनेने केला आहे. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ घुसखोर पंडित ” हे नाव ब्राह्मण समाजाचा अपमान करणारे असून हिंदू धर्मासाठी पूज्य मानल्या जाणाऱ्या ब्राह्मण समुदायाची अवहेलना करण्याचा प्रयत्न यातून होत आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक धार्मिक विधी ब्राह्मणांद्वारे पार पाडले जातात आणि त्यामुळे ब्राह्मण जातीचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. या वेब सिरीजमुळे ब्राह्मण समाजासह विविध हिंदू संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित वेब सिरीज समाजात द्वेष, असंतोष आणि धार्मिक तेढ वाढवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला असल्याचे सेंगर यांनी सांगितले. या प्रकरणी वेब सिरीजचे दिग्दर्शक मनोज बाजपेयी तसेच संबंधित निर्मात्यांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १९६, २९९, ३५२, ३५३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र करणी सेनेने केली आहे. पोलिसांनी तक्रार स्वीकारून पुढील तपास सुरू करावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

  रस्त्यावर खायला टाकणाऱ्या प्राणीमित्रांवर बंदी

रस्त्यावर खायला टाकणाऱ्या प्राणीमित्रांवर बंदी विशिष्ट ठिकाणी भटक्या श्वानांना मिळणार मेजवानी मिरा -भाईंदर: नागरिकांकडून अनेकदा मुक्या प्राण्यांना भररस्त्यात अन्न टाकले जाते. यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने उघड्यावर खाद्यपदार्थ टाकण्यास सगळ्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे करतानाच भटक्या कुत्र्यांची उपासमार होऊ नये याकरता महापालिकेने शहरात २० ठिकाणी फिडिंग स्पॉट तयार केले असून या ठिकाणी येऊन श्वानांना यतेच्छ ताव मारावा लागणार आहे. न्यायालयाने नोव्हेंबर २०२५ मध्ये मोकळ्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्यपदार्थ देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींनी भटक्या कुत्र्यांसाठी जागा निश्चित करून त्या ठिकाणी पाणपोई व फिडिंग स्पॉट तयार करण्याचे आदेश दिले होते. परिपत्रक राज्य शासनाकडून काढण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांनंतर मिरा- भाईंदर महापालिकेकडून भाईंदर पूर्वेत १, पश्चिमेत ७ व मीरा रोडमध्ये १३ फिडिंग स्पॉट तयार करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिली आहे. प्राणीमित्र रस्त्यावर तसेच मोकळ्या ठिकाणी या भटक्या कुत्र्यांना खायला टाकतात. एकाच ठिकाणी खाद्यपदार्थ मिळत असल्याने भटके कुत्रे त्या ठिकाणी टोळी बनवतात. परिणामी रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांवर भुंकणे आणि हल्ला केल्याच्या घटना घडतात. याला आळा घालण्यासाठी, नागरिकांची सुरक्षा व प्राणी मित्रांना शिस्त लावल्यासाठी महापालिकेकडून हे फिडिंग स्पॉट तयार करण्यात आले असून त्याबाबत जनजागृती करणे सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली. फिडिंग स्पॉटसाठी केलेला खर्च वाया जाऊ नये यासाठी भटक्या प्राण्यांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांवर प्राणीमित्रांनी खाद्यपदार्थ टाकण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या फिडिंग स्पॉटला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास आवश्यकतेनुसार ठिकाणे वाढवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिली.