Author: bittambatami.com

 शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर परिसरात यापुढे वाळू उपसा नाही!

निलेश राणे यांच्या आश्वासनानंतर तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित…! मालवण :  कालावल खाडीपात्रात शेलटी  जेटी ते सर्जेकोट बंदर परिसरात वाळू उपसा होणार नाही असा शब्द शिंदे सेनेचे स्थानिक आमदार निलेश राणे यांनी दिल्यानंतर तळाशील  येथील ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले. तळाशील येथे गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आणि त्यांना आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. राणे यांचे सोबत यावेळी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, नायब तहसीलदार प्रिया हरणे,तळशील ग्राम विकास समितीचे अध्यक्ष संजय केळुसकर पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर पतन विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पट्ट्यात यापुढे वाळू उपसा करण्यास परवानगी मिळणार नाही तसेच आंदोलकांच्या अन्य मागण्यांवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन ही राणे यांनी यावेळी दिले. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकार हे तळाशील ग्रामस्थांच्या सोबतच असून ग्रामस्थांनी मनात कोणतीही शंका बाळगू नये असेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. तळाशील गावासमोरील कालावल खाडीतील बेकायदा वाळू उपशावर कारवाई होऊन तो बंद व्हावा यासह अन्य मागण्यासाठी तळाशील ग्रामस्थांनी गेले आठ दिवस कालावल खडीपात्रात  होड्यांमध्ये बसून,तसेच पाण्यात उतरून आंदोलन छेडले होते. गावातील महिला तर चक्क चार तास पाण्यात उतरल्या होत्या. या दरम्यान दोन महिलांची  प्रकृतीही  बिघडली.तेव्हा कुठे असंवेदनशील प्रशासनाला खडबडून जाग आली.अखेर आमदार निलेश राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्तक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलक  आणि आमदार निलेश राणे यांना बैठकीसाठी पाचारण केले. अखेर सिंधुदुर्गनगरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार निलेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंदोलनकर्त्यांशी  तासभर चर्चा केल्यानंतर त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. बैठकीनंतर  ठरल्याप्रमाणे आमदार राणे यांनी सायंकाळी तळाशील गावाला  भेट देत संपूर्ण परिसराची पहाणी केली. स्थानिक ग्रामस्थ आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आणि वरील आश्वासन दिल्यानंतर  आंदोलन मागे घेण्यात आले. गेले आठवडा भर हे आंदोलन सुरु आहे मात्र निद्रिस्त महसूल प्रशासन काही हलेना. मालवणच्या नायब तहसिलदार सोडल्या तर महसूल विभागाचा एकही बडा अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी फिरकला नाही.तरीही आंदोलन शांतपणे सुरु होते मात्र प्रशासन दाद फिर्याद घेत नाही असे लक्षात येताच संतप्त ग्रामस्थ आणि खास करून महिला, चक्क खाडी पात्रात उतरल्या आणि आम्ही स्वतःला संपवू असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर  जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळूसकर यांना काल घाईघाईने पत्र पाठवले आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांना व आंदोलनकर्त्यांना  चर्चेला बोलावले.स्थानिक आमदार या नात्याने निलेश राणे यांनाही आमंत्रित करण्यात आले. बैठकीला केळुसकर यांच्यासह अजित केणी, संजय जुवाटकर, सीताराम तोडणेकर, गोपाळ मालवणकर, स्नेहा तोंडवळकर आदी आंदोलनकर्त्यांचे  प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार राणी म्हणाले, या प्रश्नावर आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि आणि त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्याचे ठरले लवकरच या संदर्भात योग्य ते निर्णय घेण्यात येतील. तळाशील आणि आसपासच्या परिसरातील गावांचे अनेक प्रश्न आहेत मग ते ‘सीआरझेड ‘संबंधी असोत, अनधिकृत बांधकामे, वाळू उपसा, किनाऱ्याची धूप होणे. या सर्व प्रश्नांवर सर्व संबंधित विभागांशी  चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असेही  राणे यांनी सांगितले.

तेलानी मेरीटाईम इंस्टिट्युटवर युवासेनेची धडक

मुंबई प्रतिनिधी पुणे जिल्हा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे नुकताच घडलेल्या दुर्दैवी अपघातात २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तेलानी मेरीटाईम इंस्टिट्युट च्या आवारात बास्केटबॉल खेळताना पोस्ट कोसळून ही घटना घडली. ह्या घटनेची त्वरित दखल घेऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने माझ्या नेतृत्वाखाली युवासेनेने संबंधित इंस्टिट्युटवर धडक देऊन त्यांस धारेवर धरले.व इंस्टिट्युटच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याच्या झालेल्या जीवितहानी संदर्भात जाब विचारला.  त्यात  इंस्टिट्युटने शासनाने दिलेल्या नियम व अटीचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला. व त्या संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले त्यात प्रामुख्याने बास्केटबॉल स्टॅन्डची सुव्यवस्था तपासणी (मेंटेनन्स) का करण्यात आली नव्हती. खेळाडू संदर्भात आपत्कालीन परिस्थितीतील वैद्यकीय सेवेचा अभाव होता. तसेच कॉलेज कॅम्पसच्या मैदानात नियमानुसार सी. सी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाही. सदरच्या घटनेचे फुटेज उपलब्ध नाही . अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर कॉलेज प्रशासनास धारेवर घरले. कॉलेज प्रशासनाने देखील घडलेल्या प्रसंगावर दुःख व दिलगीर व्यत्त करत अशा घटना भविष्यात पुन्हा होऊ देणार नाही. तसेच मृत विध्यार्थीच्या परिवारास सर्वोत्परी सहकार्य करून पोलिसांमार्फत होणाऱ्या तपासात पारदर्शकपणे सहकार्य करण्याचे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासन्याच्या चुका निदर्शनास आणल्या त्यांना कॉलेज प्रशासना कढून  कोणत्याही पद्धतीने दबाव अथवा त्रास देण्यात येणार नाही आश्वासित केले. सदरची घटना कॉलेज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे  घडली असून त्यास दुघृटनेच्या दिशेने तपास न करता कालेज   प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन वरीष्ठ पोलीस आधिकारी यास युवासेनेतर्फे देण्यात आले. पोलीसांनी देखील सखोल चौकशी करून मृत विद्यार्थ्यांच्या पालकांस न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी युवासेना महाराष्ट्र वितरक नीलेश बडदे, शिवसेना जिल्हा प्रमुख – गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख – राजेंद्र मोरे, तालुका प्रमुख – आशिष ठोमरे, महिला संघटिका – शैला ताई खंडागळे,युवासेना उपशहर प्रमुख – निखिल दळवी, प्रसाद जठार, तालुका प्रमुख – उमेश गावडे, रवींद्र बावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 लाकूडचोरांना वन खात्याचा आशीर्वाद

   मुरबाड पश्चिम राखीव वनक्षेत्रात वारंवार राजरोस वृक्षतोड राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील मोहघर वनपरीमंडळ पश्चिम क्षेत्रात राखीव वनांची राजरोसपणे वारंवार तोड होत असून वनखात्याच्या संगनमताने ही तोड होत असल्याची चर्चा आहे. मुरबाडच्या पश्चिम क्षेत्रात मोहघर राउंडमध्ये पाटगाव परिसरात वनजमिनीवरील खैर जातीचे वृक्ष मोठया प्रमाणात तोडले गेले आहेत. मागील सात आठ महिन्यापुर्वी याच ठिकाणी शेकडो खैर तोडून ते चोरट्यांनी विकले. आता याच ठिकाणी पुन्हा खैर तोडले आहेत.वनखात्याच्या संगनमताने ही तोड होत असल्याची परिसरात चर्चा आहे. हे खैर चोरटे अधिकाऱ्यांना माहित आहेत, अशीही वनविभागात व परिसरात दबक्या आवाजात चर्चा आहे. हा खैर चक्क कटिंग मशीन लावून राजरोसपणे तोडलेला आहे.या कटिंग मशीन लाकूडतोड व्यवसायीकांकडे मोठया प्रमाणात आहेत. त्यामुळे हा खैरचोर लाकूडतोड व्यवसायिक असावा असा अंदाज आहे. त्यात खैर प्रकाराची वृक्षतोड प्रकरणे कुणी केली आहेत. याचा शोध घेतल्यास या खैर चोरांचा तपास लागू शकतो. मागील वेळी हा खैरचोर पकडला होता, मात्र मोठी तडजोड करुन चोरटयांना सोडण्यात आले. मुरबाड मोहघर वनपरीमंडळ पश्चिम क्षेत्रात राखीव वनांची राजरोसपणे वारंवार तोड होत असून वनखात्याच्या संगनमताने ही तोड होत असल्याची चर्चा आहे.

महात्मा ज्योतिबा फुले महान समाजसुधारक

महात्मा ज्योतिबा फुले महान समाजसुधारक महात्मा फुले हे महान समाजसुधारक होते.त्याच्याच प्रयत्नातून आपल्याला आज समाजात एकता व बंधुता दिसून येते. महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला सातारा…

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले भारताचे थोर सुपुत्र, विचारवंत, समाजसुधारक, लेखक महात्मा जोतीराव फुले यांची आज जयंती. महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव…

निमित्त जागतिक होमिओपॅथी दिनाचे…

निमित्त जागतिक होमिओपॅथी दिनाचे… १० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. १० एप्रिल १७५५ रोजी जन्माला आलेल्या डॉ. सॅम्युअल हॅनिमन या शास्त्रज्ञाने या आगळ्यावेगळ्या उपचार पद्धतीचा…

सोशियल मीडियावरील बंदीनिमित्ताने…

सोशियल मीडियावरील बंदीनिमित्ताने… ‌‘सोशल मीडिया‌’ प्लॅटफॉर्म्स केवळ संवादाचे माध्यम राहिलेली नाहीत, तर किशोरांचे व्यक्तिमत्त्व, विचारसरणी आणि वर्तनावर खोलवर परिणाम करणारी प्रभावी साधने बनली आहेत. अशा परिस्थितीत, सरकार किंवा न्यायव्यवस्थेकडून या…

चिमुकल्यांचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

चिमुकल्यांचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न हरिभाऊ लाखे नाशिक :स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय पूर्व प्राथमिक, इंदिरानगर येथे ९ एप्रिल रोजी मोठ्या गटातील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आनंदात पार पडला.…