Author: bittambatami.com

 रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  प्रवाशांचे होणार हाल ! मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १६ जून २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार…

मराठीची आवड असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

 ठाण्यातल्या जोशी, बेडेकर महाविद्यालयात करा एम. ए., ठाणे : विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी, बेडेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने मराठी भाषा विषय घेऊन एम.ए.करण्याची संधी ठाण्यातच उपलब्ध करून दिली आहे. बी. कॉम., एम.कॉम, बी. एस्सी, झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरी करणाऱ्या युवक आणि युवतींना, गृहिणींसह एम.ए. करण्याची इच्छा असलेल्यांना मराठी विषय घेऊन एम.ए. करता येईल. एम. ए. मराठी का आवश्यक? विविध सरकारी आस्थापना आणि ठाणे महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांना विभागीय बढत्यांसाठी एम.ए.आवश्यक असून ते पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. ही गरज ओळखून ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी, बेडेकर, कला वाणिज्य महाविद्यालयाने मराठी भाषा विषय घेऊन एम.ए.करण्याची संधी ठाण्यात उपलब्ध करून दिली आहे. मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही या संधीचा लाभ घेता येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय बेडेकर यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली इतर विषयांसह मराठी भाषा विभागातर्फे विविध कोर्सेस घेण्यात येणार आहेत.एम.ए.पूर्ण केल्यावर आवडीच्या क्षेत्रात संशोधन करून पी.एचडी म्हणजेच डॉक्टरेट करता येईल. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा असे आवाहन मराठी भाषा विभागप्रमुख प्रा.डॉ. संतोष राणे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी 9820176934 / 9819023904 या क्रमांकांवर संपर्क साधावा. एम. ए. मराठीचा कालावधी २ वर्षे अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये काय? रोजगारभिमुख अभ्यासक्रम प्रसारमाध्यमे आणि भाषा व्यवहार, भाषांतरकौशल्ये, साहित्य, चित्रपटांसह मुद्रितशोधन आणि अनुवादशास्त्राचा अभ्यास, ग्रंथ व्यवहार, पुस्तक प्रकाशन, वितरण असा अभ्यासक्रम असणार आहे. तसंच करिअरच्या विविध संधीही आहेत. जसे की, कवी, लेखक, ब्लॉग लेख, पटकथा लेखक, सर्जनशील लेखक, दुभाषी निवेदक, पटकथा लेखक, संहिता लेख, जाहिरात लेखक, निवेदक, मुद्रितशोधक, प्राध्यापक, संशोधक होता येईल. जून २०२४ मध्ये हा कोर्स सुरु होईल. एम.ए. चा कालावधी दोन वर्षे आहे.

अतिधोकादायक इमारतींचा पाणी, वीज पुरवठा खंडीत करा

ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश ठाणे : शहरातील अतिधोकादायक इमारतींचा वीज, पाणी पुरवठा खंडीत करण्याबरोबरच मलनि:सारण वाहिन्या तत्काळ तोडून टाकण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. इमारत अतिधोकादायक असल्याचे पालिका प्रशासनाने घोषित केल्यानंतरही अशा इमारतींमध्ये नागरिक वास्तव्य करीत असून पावसाळ्यात इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय, स्थिरता प्रमाणपत्र नसलेली तसेच जास्तीचे आकारमान असलेली जाहिरात फलक तत्काळ उतरवा आणि रस्त्यावरील खड्डे भरणे, झाडाच्या फांद्या उचलणे ही कामे २४ तासांत व्हायला पाहिजेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मान्सूनसाठी तयारीच्या दृष्टीने मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याच्या पालकसचिव सुजाता सौनिक यांनी दिलेले निर्देश, तसेच लोकप्रतिनिधी, नागरिकांनी केलेल्या तक्रारी या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व उपनगर अभियंता, सर्व सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता यांची शुक्रवारी बैठक घेतली. महापालिका क्षेत्रात एकूण ९६ अतिधोकादायक इमारती (सी -१ वर्गवारी) आहेत. त्यापैकी, ३७ इमारतीत नागरिक राहत आहेत. त्यात, नौपाडा आणि कोपरी २७, माजिवडा १, उथळसर ३, कळवा २, मुंब्रा ४ अशा इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारतींचा पाणी, वीज खंडीत करण्याबरोबरच मलनिःसारण जोडणी तोडून या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात, असे आदेश आयुक्त राव यांनी दिले. नागरिकांच्या जिविताचा प्रश्न असल्याने आता चर्चा करण्यात वेळ दवडू नये. नागरिकांची समजूत काढून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. पावसाचा जोर कधीही वाढू शकतो, याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी, असेही आयुक्त राव म्हणाले. पुढील दोन दिवसात सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील अतिधोकादायक (सी -१) आणि धोकादायक (सी २ ए) अशा सर्व इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रहिवाशांना तेथून स्थलांतरित होण्यासाठी संवाद साधावा, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना हलविण्याची वेळ आली तर आपल्या संक्रमण शिबिरामध्ये पाणी, वीज आणि स्वच्छता राखली जाईल, हे पाहावे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. पाणी साठणाऱ्या सखल भागातील १४ मोक्याच्या ठिकाणी ६३ पंप आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच, स्थानिक तरुणांना स्वयंसेवक म्हणून सोबत घ्यावे. त्यांना ओळखपत्र, जॅकेट देण्यात यावे. त्यांच्या मदतीमुळे आपत्कालीन स्थितीत नागरिकांपर्यंत जाणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. खाडीच्या मुखापाशी कचरा साठून ते पाणी नाल्यात पाठीमागे येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी खाडी मुखांपाशी नाल्यांची स्थिती कशी आहे ते पाहून तेथे स्वच्छता करण्यात यावी. गटारांची झाकणे वरचेवर पाहणी करून सुस्थिती राहतील, याची खबरदारी घ्यावी. तसेच, रस्त्यावर साचणारे पाणी पर्जन्यजलवाहिन्यांमध्ये व्यवस्थित वाहून जाईल, तेथे कचरा, माती साचणार नाही, याचीही काळजी घ्यावी, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. नाल्यातील तरंगता कचरा दररोज साफ केला जावा. त्याचप्रमाणे, किती ठिकाणी सफाई झाली याचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. पावसाळ्यात मोठी दुरुस्ती नको नागरिकांनी पावसाळ्यात घरामध्ये कोणतीही मोठ्या स्वरुपाची दुरुस्ती करू नये. सोसायट्यांनी अशा दुरुस्तीसाठी परवानगी देवू नये. त्याचबरोबर, व्ह्यायब्रेटर सारख्या उपकरणाचा वापर निरीक्षकांच्या देखरेखीत करावा. काही इमारतींच्या दुरुस्तीच्या कामात नियमांची पायमल्ली केली जात असल्याने दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

 वर्सोवा पुलाखाली झालेल्या दुर्घटनेची एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

लार्सन अँड टुब्रो कंपनीमार्फत दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत, कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी -. मुख्यमंत्री अशोक गायकवाड पालघर : सूर्याप्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी मुंबई महानगर…

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात व निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज सादर करा – सुनिल जाधव

अशोक गायकवाड रायगड :वसतिगृहात रहाणाऱ्या मुलामुलींकरिता इ.८ वी पासून पुढे मांग, भंगी, कातकरी व माडिया गोंड या जातीमधील मुला-मुलींकरिता इ.५ वी पासून निर्वाह भत्ता देण्यात येतो. निवासी शाळेतील मुलांकरिता इ.६ वी पासून इ.१० वी पर्यत शाळा आहे. विहित नमुन्यातील अर्ज वसतिगृहात वरील पत्यावर विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रायगड-अलिबाग, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिर, सेंटमेरी स्कूलसमोर, श्रीबाग रोड, अलिबाग येथे अथवा संबधित गृहपालांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड यांच्या अधिनस्त अनु.जाती करीता सध्या ७ शासकीय वसतिगृहे व एक निवासी शाळा पुढीलप्रमाणे कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतीगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, महाड गोकुळ विहार, चवदार तळे ता. महाड, रिक्त जागा- अनु, जाती २५, अनु सूचित जमाती २, भटक्या विमुक्त जमाती ४, आर्थिकदृष्टया मागास २, विशेष मागासवर्गीय ०, अपंग २, अनाथ १, एकूण रिक्त जागा ३५. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, महाड, जि. रायगड तालुका पोलिस स्टेशनजवळ, नवेनगर,, रिक्त जागा- अनु, जाती २९, अनु सूचित जमाती ३, भटक्या विमुक्त जमाती ३, आर्थिकदृष्टया मागास १, विशेष मागासवर्गीय ०, अपंग २, अनाथ २, एकूण रिक्त जागा ४०.रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुर्लीचे शासकीय वसतिगृह पाली-सुधागड, यांचे कार्यालय मधली आळी, राम मंदीर रोड, पाली-सुधागड, रिक्त जागा- अनु, जाती ५८, अनु सूचित जमाती २, भटक्या विमुक्त जमाती -१, आर्थिकदृष्टया मागास २, विशेष मागासवर्गीय २, अपंग २, अनाथ ०, एकूण रिक्त जागा ६६. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पनवेल, सेक्टर १०, प्लॉट नंबर २१ ग्रीनपार्क सोसायटी समोर, रिक्त जागा- अनु, जाती १२, अनु सूचित जमाती ०, भटक्या विमुक्त जमाती ०, आर्थिकदृष्टया मागास ०, विशेष मागासवर्गीय ०, अपंग २, अनाथ १, एकूण रिक्त जागा १५. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह, अलिबाग, गणेशमंदीर शेजारी, विजय नगर, वरसोली-अलिबाग, रिक्त जागा- अनु, जाती ५३, अनु सूचित जमाती १, भटक्या विमुक्त जमाती १, आर्थिकदृष्टया मागास २, विशेष मागासवर्गीय ०, अपंग २, अनाथ २, एकूण रिक्त जागा ६१. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलीचे शासकीय वसतिगृह अलिबाग, गोंधळपाडा- अलिबाग, रिक्त जागा- अनु, जाती ६१, अनु सूचित जमाती ०, भटक्या विमुक्त जमाती -१, आर्थिकदृष्टया मागास ४, विशेष मागासवर्गीय १, अपंग २, अनाथ २, एकूण रिक्त जागा ६९. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – मागासवर्गीय मुलांचे शासकिय वसतिगृह बोरघर-हवेली, तालुका क्रीडा संकुलाजवळ, बोरघर-हवेली, ता. तळा, रिक्त जागा- अनु, जाती ६७, अनु सूचित जमाती २, भटक्या विमुक्त जमाती ३, आर्थिकदृष्टया मागास २, विशेष मागासवर्गीय २, अपंग २, अनाथ २, एकूण रिक्त जागा ८०. रायगड जिल्ह्यांतर्गत कार्यरत वसतिगृहाचे नाव, ठिकाण व पूर्ण पत्ता – अनुसूचित जाती/नवबौध्द मुलांकरिता शासकिय निवासी शाळा, जावळी, ता. माणगांव, रिक्त जागा- अनु, जाती ११९, अनु सूचित जमाती ०, भटक्या विमुक्त जमाती ०, आर्थिकदृष्टया मागास ०, विशेष मागासवर्गीय १, अपंग ५, अनाथ ०, एकूण रिक्त जागा १२५. वसतिगृह प्रवेशाकरीता आरक्षणाचा तपशिल- अनु.जाती ८० टक्के, अनु.जमाती ३ टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग ०२ टक्के, आर्थिकदृष्टया मागास ५ टक्के, अनाथ ३ टक्के, निवासी शाळ प्रवेशाकरीता आरक्षणाचा तपशिल- अनु.जाती ८० टक्के, अनु.जमाती १० टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग २ टक्के, अपंग २ टक्के. वसतिगृह/निवासी शाळेची वैशिष्टये-मोफत निवास व भोजन व्यवस्था, शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व महाविद्यालयीन प्रवेशितांकरिता लेखन साहित्याकरिता रु. ४ हजार, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता,. दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता दरमहा रु.६००, निर्वाहभत्ता जिल्हापातळीवर रु.५००, निर्वाहभत्ता तालुका पातळीवर, शालेय/महा. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन संचाकरिता गणवेष भत्ताप्रोजेक्ट रिपोर्ट/शै. सहल भत्ता, अॅप्रन भत्ता इ. आवश्यक कागदपत्र- प्रवेशपात्र विद्यार्थ्याच्या पालकांचे सर्व मार्गानी मिळून वार्षिक उत्पन्न अनु. जाती, व जमाती विद्यार्थ्यांकरिता रु.२ लाख ५० हजारचे आत व विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागास, अनाथ व अपंग घटकातील विद्यार्थ्यांकरिता रु.१ लाख ५० हजारचे आंत असावे, अर्जासोबत तहसिलदार यांचे सहीचा सन २०२३-२४ मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक, बँक खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. 000000

शहर सव्वादोन कोटींचे पण पाणी नाही…

काहीतरी नवीन… श्याम तारे जगाच्या एखाद्या भागात वर्षानुवर्षे पावसाने दडी मारावी आणि ‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ अशी परिस्थिती यावी ही दुर्दैवाचीच बाब म्हणावी लागेल आणि ही गोष्ट जर…

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान !

विशेष श्याम ठाणेदार आज १४ जून, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियातील डॉ कार्ल लॅडस्टेनर या संशोधकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून…

विजयदादांमुळे घडला संतांचा सहवास !

शुभेच्छा ! योगेश त्रिवेदी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री. विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला ऐंशीवा वाढदिवस साजरा केला. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांना सर्वत्र विजयदादा म्हणून प्रेमाने संबोधण्यात…

कल्पक, प्रयोगशील प्रकाशक हरपला

श्रध्दांजली मकरंद मुळे आपल्यासाठी खूप धक्कादायक असत. कुटुंबावर आभाळ कोसळत. होत्याच नव्हतं होत. मात्र, नियतीला ठाऊक असत. श्वासांचा हिशोब हिशोब जो ठेवतो त्याला ज्ञात असत. आपण अनभिज्ञ असतो. आशेवर जगत…