Author: bittambatami.com

ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालय क्षेत्रांतर्गत सेक्टर 03, ऐरोली येथे घर क्र. जे-48 व जे-194 यांचे आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. तसेच घर क्र. जे-185 यांनी नमुंमपाच्या परवानगी व्यतिरिक्त वाढीव बांधकाम केलेले आहे. या अनधिकृत बांधकामांस ऐरोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदर अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक मोहीमेचे आयोजन करण्यात येऊन ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. तसेच सदर कारवाई अंतर्गत रू. 50,000/- दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी एकुण 08 मजूर, 01 गॅस कटर, 02 इलेक्ट्रिक हॅमर यांचा वापर करण्यात आला. ही मोहीम जी विभाग ऐरोली येथील अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

लोकसभेच्या ५४३ नवनिर्वाचित खासदारांपैकी २५१ खासदारांवर फौजदारी गुन्हे ही अत्यंत गंभीर बाब

विशेष रमेश कृष्णराव लांजेवार देशाचे ५४३ खासदार देशांच्या १४० कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करीत असते.यात जर ४६ टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल असेल तर सर्वसामान्यांनी काय करावे?तो कोणताही गुन्हेगार असो त्याला…

साने गुरुजी

दिन विशेष श्याम ठाणेदार आज भारत मातेचे थोर सुपुत्र, स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक साने गुरुजी यांची पुण्यतिथी. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा…

गरज जलनियोजनाची

वेध जनार्दन पाटील यंदाचा पाऊसकाळ सुरू झाला असून सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. मात्र सध्या पाऊसही लहरीपणा दाखवत असल्याचे गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे. म्हणूनच…

मोदींच्या तिसऱ्या इनिंगचे स्वागत…

अखेर नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. हा मान यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मिळाला होता. सलग…

ठाण्यात  प्रताप सरनाईक इन अॅक्शन

अनिल ठाणेकर  ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या राज्य शासनाच्या निधीतील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांचा, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक हे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मदतीने धडाका लावणार…

नरिमन पॉईंट ते हाजीअली १० मिनिटात

अशोक गायकवाड मुंबई : ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा’वरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी आजपासून खुली करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र…

ठाण्याला ऑरेंज, मुंबईला यलो अलर्ट; 

  मुंबई : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे ठाणे जिल्ह्यात ऑरेंज तर मुंबईला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीआहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशीही पावसाचाजोर पाहायला मिळत आहे. आजपासून पुढील पाच दिवसमुंबई, ठाणेसह राज्यात पावसाचा जोर असाच कायमराहणार असल्याचं आयएमडीने सांगितलं आहे. येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईत मान्सून दाखल झाला असून मुंबईकरांना पावसानंचांगलंच झोडपलं आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्येयेत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजहवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच येत्या आठवड्याभरातमान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे.हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांतसाधारणपणे  ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरातगडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुठे ऑरेंज, तर कुठे यलो अलर्ट ठाणे, रायगड, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांतजोरदार पावसाची शक्यता असून आज 10 जून रोजी ऑरेंजअलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या कोकणासहदक्षिण आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र तसेचमराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस तसेच मेघगर्जनेसहपाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येतुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 50-60 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार तेअति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरमध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्येतुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणिसोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यताआहे.

शरद पवारांप्रती पक्ष फुटीनंतर अजित पवार पहील्यांदाच कृतज्ञ

मुंबई : “सर्वांनी खांद्याला खांदा लावून हा पक्ष पुढे आणला. काही नेते आपल्यात नाहीत. ⁠शरद पवार यांचंही पक्ष स्थापनेतमोठ काम आहे. मी त्यांना ही कृतज्ञता व्यक्त करतो. पक्षस्थापनेवेळी सोनिया गांधी यांचा परदेशी मुद्दा काढला, मात्रत्यावेळी आपल्याला कमी वेळ निवडणुकीत मिळाला. ⁠सर्वांनीप्रयत्न केला त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. 33 टक्केजागा महिलांना होत्या, त्या आपण 50 टक्के करण्याचानिर्णय घेतला. ⁠डांन्सबार बंदी आणि गुटखा बंदीचा निर्णयआपण घेतला होता”, असे उपमुख्यमंत्री अजित पवारम्हणाले. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा25 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी अजितपवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, संबंध नसताना गैरसमज पसरवण्याचकाम काहीजण करत होते. दोन दिवस दिल्लीत होतो. आम्हीएकत्र जेवण केलं.  ⁠काहीही वाद नव्हता. तरीही चुकीच्याबातम्या लावल्या. देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिलं. तुमची लोकसभेची एकच जागा आली आहे. तुम्हाला एकमंत्रीपद द्यायचं आहे, असं म्हणाले होते. ⁠राज्यसभा देऊनस्वतंत्र कार्यभार दिला जाणार होता. आता दोन खासदारआहेत. जुलैपर्यंत आणखी एक खासदार वाढणार हे तुम्हालामी आताच सांगतो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पक्षाच्या कार्यालयातठराविक लोक बसली पाहिजेत. ⁠बाकी इतर लोकांनी सातदिवसात काय दौरा केला याची माहिती घ्या. ⁠मंत्र्यांनाही याचसूचना आहेत. आपण जरी महायुतीत असलो तरी आपणफुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. महायुतीच्या नेत्यांनाही हे आपण सांगितलं आहे. ⁠जोपर्यंत चंद्रसुर्य आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानकोणीच मायचा लाल बदलू शकत नाही.  ⁠नरेटीव्ह सेटकरण्याचा प्रयत्न आपले विरोधक करतील. हे अधिवेशनझाल की जातील असं ही सांगितलं की, हे 75 वे संविधान वर्षसाजरे करण्याचे एनडीएने सांगितलं आहे. यावेळी जे अपयशमिळालं याची जबाबदारी मी घेतो, असंही अजित पवार म्हणाले.