Author: bittambatami.com

स्नेहांकित हेल्पलाईनची अंध शिक्षण परिषद मुंबईत

रमेश औताडे मुंबई :विशेष अंध शाळांकरिता व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी स्नेहांकित हेल्पलाईन या सामाजिक संस्थेमार्फत मार्फत नवीन शिक्षण पद्धती या विषयावर परिषद आयोजित केली आहे.अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या अध्यक्षा परिमला भट यांनी दिली. सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शिक्षकांकरिता नवीन शिक्षण पद्धती कशी लागू करता येईल याबाबत चर्चासत्र व सूचना या परिषदेच्या माध्यमातुन शासनास सादर करण्यात येणार आहेत. नेहांकित हेल्पलाईन ही संस्था मागील २३ वर्षांपासून अंध युवकांना शैक्षणिक क्षेत्रात विविध स्तरावर मार्गदर्शन करत आहे. विलेपार्ले पूर्व मुंबई येथे महाराष्ट्रातील विविध अंध शाळांकरिता व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शिक्षकांकरिता परिषद २५ ऑगस्ट रोजी उत्कर्ष मंडळ हॉल, विलेपार्ले पूर्व, मुंबई येथे होत आहे. माधव गोरे व योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक धोरण, त्याची ओळख व ते अंधांकरिता कसे राबविता येईल याबाबत एक सत्र आहे. विविध क्षेत्रातील जाणकार व अनुभवी आपले अभ्यासपूर्वक विश्लेषण करणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण हे सर्वसमावेशी असून यात प्रत्येक टप्प्यावर विविध शाळांमध्ये कशा पद्धतीने कामकाज करावे याबाबत माहिती मिळणार आहे . नवीन धोरण अंधशाळांकरिता देखील शासनाने लागू करावे. तसेच स्नेहांकित हेल्पलाईन या संस्थेमार्फत अभ्यासपूर्वक  सर्व शाळांच्या सहमतीने प्रस्ताव या परिषदेत सादर करण्यात येणार आहे.असे डॉ माधव गोरे यांनी सांगितले.

वीज कंत्राटी कामगारांचा ‘इशारा मोर्चा’

रमेश औताडे मुंबई : भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतनवाढ व हरियाना सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा या व अन्य प्रमुख मागण्यासाठी राज्यभरातून सुमारे चार हजार वीज कंत्राटी कामगारांनी मोर्चा काढला. सरकारने जर आता गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी दिला. ऊर्जामंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मित्रा यांना निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात दिलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा. सरकारने संघटने सोबत सकारात्मक चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा व जो पर्यंत ऊर्जामंत्री भेटून ठोस तोडगा काढत नाही तो पर्यंत कामगार आंदोलनातून घरी जाणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला. कंत्राटी कामगार व कायम कामगार यांच्या कामात काही फरक नाही. मात्र वेतनात फरक का ? कंत्राटी कामगार कायम करा म्हणून न्यायालय वारंवार आदेश देत असते तरीही सरकार अंमलबजावणी करत नाही त्यामुळे यापुढचे आंदोलन बेमुदत असेल असे सचिन मेंगाळे यांनी सांगितले.

भायखळा येथील कारागृहात संत रामपाल जी महाराज यांचा सत्संग

मुंबई-  मुंबईतील भायखळा जिल्हा पुरुष कारागृह आणि महिला कारागृहात 24 ऑगस्टला संत रामपाल जी महाराज यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले. हा सत्संग प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आला होता, दोन्ही कारागृहातील बंदींसाठी…

स्वीडनमध्ये रंगली मंगळागौर!

स्वीडनमध्ये मोठ्या थाटात रंगला मंगळागौरीचा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम आयोजित केला गोथनबर्ग महाराष्ट्र मंडळ यांनी.  गेल्या वर्षीपासून या कार्यक्रमाची  सुरुवात झाली. याला भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे  यावर्षीही हा कार्यक्रम आयोजित  केला आणि यापुढेही नक्कीच करत राहतील, असं मंडळाच्या अध्यक्षा प्रणाली मानकर पतके म्हणाल्या.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आता जरांगें आंदोलन करणार

जालना : ”शेतकरी देखील आमचाच आहे. सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी लक्ष द्यायला तयार नाही. आता आम्ही या प्रश्नात लक्ष घालणार, सरकार कसं कर्जमाफी देणार नाही हे आम्ही बघतो,” असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त…

“आज महाराज असते, तर नराधमांचे चौरंग केला असता” राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

 बदलापूर येथे मुलीवर अत्याचार झाला. ही घटना मनसेच्या महिला सेनेने उघडकीस आणली. तेव्हा लोकांना समजले. तोपर्यंत ती गोष्ट दाबून ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराज आज हवे होते. ही महाशक्ती आता हवी होती. या नराधमांचे हातपाय कापून त्यांचे…

राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार ?

बुलढाणा : राज्यभरातील एस. टी. कर्मचारी पुन्हा एकदा संपावर  जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची आज बुलढाणा येथे बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतन देण्यात यावं, या मागणीसाठी येत्या…

दहीहंडीला पावसाची दांडी !

मुंबई : येत्या २५ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची हवामान खात्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी ही पावसाशिवाय होणार आहे. नेमक्या दहीहंडीच्या दिवशी पाऊस दांडी मारणार आहे. येत्या २६ ते…

जळगावच्या १४ भाविकांचा नेपाळमधिल अपघातात मृत्यू

जळगाव : जळगावच्या १४ भाविकांचा नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये ही भीषण दुर्घटना घडली आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये ३१ जण जखमी…