Author: bittambatami.com

शाळेवर पॉक्सोअंतर्गत अखेर गुन्हा दाखल

बदलापूरमधिल शाळेत दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्याच्या गुन्ह्यासाठी विशेष तपास समितीने बदलापूरच्या शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Pocso Act च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीने हे म्हटलं…

बदलापुरच्या शाळेचे संचालक मंडळ बरखास्त; प्रशासकाची नेमणूक

अत्याचाराची घटना घडलेल्या बदलापुरच्या शाळेवरील संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. तसेच या शाळेवर आता प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांनी पदभार सांभाळला आहे.  चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने…

उद्धव ठाकरेंचा सदावर्तेंवर निशाणा

खरंतर याचिकाकर्त्याने या कारणासाठी कोर्टात जायला नको होतं. जिथे आई बहि‍णींचा विषय येतो तिथे त्यांनी संवेदनशील व्हायला हवं होतं. आता उद्या जर कुणावर अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी याचिकाकर्ते आणि…

बंद मागे, आंदोलन सुरू हाताची घडी, तोंडावर काळी पट्टी

न्यायालयाचा आदर राखत महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद मागे ० आता राज्यभरात निषेध आंदोलने    मुंबई  : बदलापुरमधिल शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधात शनिवार दिनांक २४ मार्च रोजी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद न्यायालयाच्या…

 फेरीवाल्यांवर आणि वाहनांवर कारवाई

दक्षता पथक मार्फत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नेरुळ विभागाअंतर्गत नेरुळ स्टेशन व सेक्टर-20 येथील गुडविल कॉर्नर येथे पदपथावर अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या तसेच बेवारसपणे वाहन पार्किंग करणारे तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या पंधरा हातगाडी, तीन टेम्पो व एक रिक्षा इत्यादींवर सदर मोहिमेअंतर्गत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील केंद्रीय अतिक्रमण्‌ दक्षता पथक मार्फत पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर हटविण्याची व सामान जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेले सामान कोपरखैरणे क्षेपणभुमी येथे जमा करण्यात आलेले आहे. सदर कारवाईसाठी अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी, तेरा मजूर, तीन टोईंग, तीन पिकअप, एक आयशेर, अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक उपस्थित होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

 11 लाख ‘लखपती दिदींना’ प्रधानमंत्री यांच्याकडून प्रमाणपत्र

जळगावात 25 ऑगस्ट रोजी सोहळा   मुंबई  : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला महाराष्ट्राच्या दौ-यावर येत आहेत. या दौ-या दरम्यान  जळगाव येथे 11 लाख दिदींनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा सन्मान म्हणून श्री.मोदी त्यांचा सत्कार  करतील. ज्या कष्टाळू महिलांनी स्व:बळावर वर्षाकाठी  एक लाखाहून अधिक रुपये कमावले आहेत व त्यांनी त्यांच्या  कुटुबांला  हातभार लावत, कुंटुंबीयाना  गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात  मदत करुन, समाजात एक आदर्श निर्माण केला आहे, अशा लखपती दिदींचा प्रधानमंत्री .मोदी सन्मान करतील, अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमात प्रधानमंत्री 2500 कोटी रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी आणि 5000 कोटी रुपयांचे बँक कर्ज जाहीर करणार असल्याचे श्री चौहान यांनी सांगितले. यामुळे 4.3 लाख बचत गटांच्या 48 लाख सदस्यांना तसेच 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना लाभ होईल. चौहान यांनी सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच 1 कोटी लखपती दीदी तयार केल्या आहेत आणि आगामी 3 वर्षांत 3 कोटी लखपती दिदींना तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या कार्यक्रमामध्ये 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्हा मुख्यालये आणि सीएलएफ दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील. 15 लाख नवीन लखपती दिदींची यादी राज्यनिहाय उपलब्ध असून यात महाराष्ट्रातील 1,04,520 लखपती दिदींचा समावेश आहे. ००००

मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज पात्र

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये 3 हजार त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री…

झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी २४ तारखेला असलेल्या बंदला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मुझप्पर हुसेन यांनी केले आहे. मीरा भायन्दर पत्रकारांशी वार्तालाप करत असतान ते बोलत होते.कायद्याचा कोणताही…

कर्जमुक्ती आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना मुंबईत अटक

रमेश औताडे   मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, हक्काचा पिकविमा, सोयाबीन-कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शेतकऱ्यांनी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलन करताना शेतकऱ्यांना मुंबईत मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली. शेतकरी नेते रविकात तुपकर यांनी या आंदोलनाची हाक दिली होती. त्यांनाही अटक करून किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर सुटका केली. पोलिसांना चकमा देत शेतकरी मुंबईत दाखल झाले होते. सगळे एकत्र गेलो तर पकडले जाऊ त्यामुळे काही शेतकरी वेगवेगळ्या ग्रुपने मुंबईत दाखल होऊन आंदोलनाच्या स्थळी पोहोचतील असे नियोजन तुपकारांचे होते. तर दुसरीकडे मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिसांचा  बंदोबस्त लावण्यात आला होता. तरीही पोलिसांना चकमा देऊन  मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानाकडे निघाले होते. परंतु मरीन ड्राईव्ह परिसरात  पोलिसांनी रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या व सरकारच्या या भूमिकेविषयी यापुढचे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे. 0000

पशुसंवर्धनातून उद्योजकता विकासाला चालना – किशन जावळे

अशोक गायकवाड   रायगड : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा, संस्कृतीचा पशुधन हा महत्वाचा घटक आहे. पशुपालनाकडे केवळ शेतीला पूरक व्यवसाय म्हणून न पाहता एक चांगला व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. पशुसंवर्धनाला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक मूल्यांची जोड दिल्यास त्यातून उद्योजकता विकासाला चालना देता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. नियोजन भवन येथे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुपालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ.सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शामराव कदम, उपायुक्त रत्नाकर काळे, सहाय्यक आयुक्त डॉ.अजित हिरवे यासह कार्यशाळेस जिल्हाभरातील पशुपालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, स्वाभाविकपणे दुग्ध उत्पादन, अंडी, कुक्कुटपालन, शेळी पालन या व्यवसायाला आपल्या जिल्ह्यात खुप वाव आहे. पशुसंवर्धनाला चालना दिल्यास त्यातून प्रक्रिया उद्योग, विक्री व्यवस्था, वैरण विकास, पशुखाद्य निर्मिती इ. अशा अनेक क्षेत्रात व्यवसाय व उद्योगाच्या संधी निर्माण होतात. त्यामुळे पशुसंवर्धनातून आपण उद्योजकता विकास घडवून लहान लहान उद्योजक घडवू शकतो. त्यातून अनेकांना रोजगाराची संधीही आपण देऊ शकतो. महिला बचतगटानी कुक्कुट पालन व्यवसायात पुढाकार घ्यावा असे आवाहन जावळे यांनी यावेळी केले. तसेच या वर्षात किमान पाच पोल्ट्री तयार करण्याचे निदेश संबंधित यंत्रणेला दिले. दुग्ध व्यवसाय आणि पूरक जोड धंदेवाढीसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा किमान ५ वैरण प्रकल्प तयार करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय पशुधन योजनेचा शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी अंगिकार करावा. त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जावळे यांनी यावेळी केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील पशुधन वाढीसाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. बकरी, कोंबडी, शेळी पालन यासाठी जिल्ह्यात चांगल्या संधी आहे. तसेच शासनामार्फत मोठया प्रमाणावर अनुदान दिले जाते. जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनाचा लाभ घ्यावा असे सांगितले. उपायुक्त डॉ.देशपांडे यांनी लवकरच सुरु होणाऱ्या पशु गणनेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी अचूक व बिनचूक माहिती द्यावी असे सांगितले. तसेच शेळी-मेंढी पालन, कुक्‍कुट पालन, वराह पालन अशा अनेक व्यवसायाकरीता शासनाव्दारे देण्यात येणाऱ्या अनुदान आणि अनुषंगिक माहिती दिली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शामराव कदम यांनी आभार मानले. दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत वैरणविकास व गुणवत्ता पूर्वक व्यावसायिक सायलेज उत्पादन, शेळीपालन व्यवस्थापन, कुक्कुटपालन, बॅंक अर्थसहाय्य इ. विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. 00000