हिरवी सावर जातीचे बहूउपयोगी झाड तोडल्याप्रकरणी केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार
हिरवी सावर जातीचे बहूउपयोगी झाड तोडल्याप्रकरणी केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार कल्याण : डोंबिवली मिलापनगर परिसर हा विविध वृक्षराजीने बहरला आहे. यामुळे या परिसरात आल्यावर एक प्रकारचा पर्यावरणीय आनंद सर्वाना मिळतो. सद्या या परिसरात गटारे नाले, भूमिगत सांडपाणी वाहिन्या यांची कामे चालू आहेत. त्यामुळे काही झाडांना इजा होऊन ती पडतात किंवा सुकून मरून जात आहेत. काही रहिवाशांना आता ही मोठी झालेली काही झाडे नकोशी झाली आहेत. त्यापासून विविध अडचणी आल्याने त्यांना ही झाडे पूर्णपणे तोडून हवी आहेत. त्यासाठी कायदेशीर मार्गाने न जाता झाड तोडणाऱ्यांना कंत्राट देऊन झाडे तोडली जात आहेत. असेच एक मिलापनगर RL-१३० आणि RL-१३१भूखंड मधील रस्त्याचा कडेला असलेले “हिरवी सावर” जातीचे बहुउपयोगी मोठे झाड हे सोमवारी अचानक माणसे आणून तोडण्यात आले. त्यामुळे काही वृक्षप्रेमी हळहळले. मिलापनगर मधील एक वृक्षप्रेमी ज्येष्ठ नागरिक मुकुंद वैद्य यांनी हे झाड बेकायदेशीर तोडण्यास हरकत घेतली असता झाड तोडण्यास सांगणाऱ्या त्या रहिवाशाने त्यास विरोध केला. मुकुंद वैद्य यानी या झाडाच्या फांदया छाटाव्यात व जर पूर्ण झाड तोडायचे असेल तर प्रशासनाकडून रीतसर परवानगी घ्या, असा सल्ला दिला. परंतु त्या रहिवाशाचा हट्टापायी हे “हिरवी सावर” जातीचे बहुउपयोगी झाड पूर्ण तोडले गेले. यामुळे व्यथित होऊन वृक्षप्रेमी मुकुंद वैद्य यानी फोटो सहित याची तक्रार केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे इमेल द्वारे केली आहे. त्या तक्रारीची प्रत त्यानी मिलाप नगर रेसी. वेलफेअर असोसिएशनला दिली आहे. या तक्रारीची दखल घेऊन केडीएमसी कडून यावर काय कार्यवाही होते का ते पाहावे लागेल.
सत्यम फाउंडेशनकडून माथेरानच्या शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन
सत्यम फाउंडेशनकडून माथेरानच्या शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन मुकुंद रांजाणे माथेरान : गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टच्या प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर माथेरान या शाळेत सत्यम फाउंडेशन नवी मुंबई यांच्या वतीने किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान लागणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनचे वेंडिंग मशीन बसवण्यात आले. माथेरान मधील यापूर्वी बीजे रुग्णालय नगरपरिषद दवाखाना आणि नगरपरिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी या प्रकारचे वेल्डिंग मशीन लावण्याचे काम सत्यम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. माथेरान सारख्या दुर्गम भागात नवी मुंबईच्या या फाउंडेशन मार्फत सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले. सत्यम फाउंडेशनचे सर्वेसर्वा कुमार सत्यम यांच्या अथक प्रयत्नातून शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्यात आली. यावेळी गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त श्री शशी भूषण गव्हाणकर सर शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश ढोले शिक्षक श्री संघपाल वाठोरे, विदुला गोसावी यासह सत्यम फाउंडेशन या संस्थेचे प्रमुख कुमार सत्यम, संचालक प्रभाकर तांबें यांसह अन्य उपस्थित होते.
क्रांतिकारी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महापौर हर्षाली चौधरी यांना निवेदन
क्रांतिकारी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महापौर हर्षाली चौधरी यांना निवेदन आरती परब डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील पत्रकारांसाठी “पत्रकार विकास योजना” राबवण्या बाबत “क्रांतिकारी पत्रकार संघाच्या” वतीने महापौर यांना निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील पत्रकार आपल्या मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत. पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकार हे लोकशाही टिकवण्यासाठी धडपड करत असतात. आपले जीवन जनतेसाठी समर्पित करून कार्य करत असतात, वेतन नसल्यामुळे या महागाईच्या जमान्यात पत्रकारांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे व पत्रकारितेतून कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी पुरेसा मोबदला मिळत नसल्याने कौटुंबिक परिस्थिती हलाकीची झाल्याने त्यांना त्यामध्ये जीवन जगावं लागतं आहे. तेव्हा वस्तुस्थिती समजून घेता सहानूभूतीपूर्वक पत्रकार विकास योजना राबवून सहकार्य करावे. प्रामुख्याने पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा विनामूल्य मिळाव्यात, ज्या पत्रकारांचे स्वतःच घर आहेत त्यांना महानगरपालिके तर्फे घर पट्टी माफ करणे, पालिकेतील रुग्णाल्यातून निशुल्क सुविधा मिळाव्यात, मेडिक्लेम, विमा, आरोग्य सुविधा देण्यात याव्या. शासनाने पत्रकारांसाठी राबवलेले धोरण महानगर पालिकेने लागू करावे. महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात पत्रकारांसाठी घरकुलासाठी/भुखंड योजना राबवण्यात आल्या आहेत. तत्कालीन आयुक्त आर. डी. शिंदे, यांनी सन २००८ च्या पत्रकार समारंभात सर्व पत्रकारांसाठी घरासाठी मनपा हद्दीत भूखंड उपलब्ध करून दिला जाईल असे सूचक विधान केले होते. त्यामुळे पत्रकारांसाठी घरकुल योजना किंवा गृह भूखंड योजना राबविण्यात यावी. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेऊन सुविधा, सवलती मिळतील अशा आशयाचे निवेदन संघटनेच्या वतीने महापौरांना देण्यात आले. यावेळी, राष्ट्रीय अध्यक्ष – गुलाबचंद्र यादव, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष – मधुकर वाल्हेकर, राष्ट्रीय सचिव – प्रमोद तांबे, पत्रकार – राजू काऊटकर, पत्रकार – दीपक इंगळे, यांनी निवेदन सादर केले. तसेच अधिक माहिती साठी आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण, उपमहापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शहर अभियंता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका उप आयुक्त सामान्य प्रशासन यांना प्रत रवाना करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व…!
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व…! उबाठा सेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह ? महायुतीच्या विरोधात बंडखोरी करणारे ७ अपक्ष विजयी. राजन चव्हाण सिंधुदुर्ग : तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत…
जिल्हा परिषदेतही भाजपच पुन्हा नंबर १
१२ पैकी सात जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता रत्नागिरीत एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्ता सांगलीत महाविकास आघाडी सत्तेत मुंबई : बुहप्रतिक्षित १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या निकालात…
शरद पवारांची प्रकृती बिघडली, पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल
शरद पवारांची प्रकृती बिघडली, पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने बारामतीहून पुण्यातील रूबी रूग्णालयात हलवण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे…
बारावीची परीक्षा आजपासून
बारावीची परीक्षा आजपासून पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे उद्या मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी पासून राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी १० हजार ६६४ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील १५ लाख ३२ हजार ४८७…
१२०० कोटींची फसवूणक करणाऱ्या ‘बंटी-बबलीला’ गुंतवणूकदारांनी न्यायालयाच्या आवारातच घेरले
१२०० कोटींची फसवूणक करणाऱ्या ‘बंटी-बबलीला’ गुंतवणूकदारांनी न्यायालयाच्या आवारातच घेरले ठाणे : जादा परताव्याचे अमीष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल १२०० कोटींची फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे असोसिएटेड प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांना आज त्रस्त गुंतवणूकदारांनी न्यायालयाच्या आवारतच…
