Author: bittambatami.com

होर्डिंगपासून सुरक्षिततेबाबत ठाण्यात भाजपा आग्रही

 माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन ठाणे : घोडबंदर रोड परिसरात मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग तत्काळ काढून टाकावीत. त्याचबरोबर होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात महापालिकेने नियमावली तयार करावी, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या वेळी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण यांचीही उपस्थिती होती. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्वाच्या चौकामध्ये उभारलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत जाहिरातीला आलेल्या महत्वामुळे ठिकठिकाणी होर्डिंग उभारली गेली. काही ठिकाणी महापालिकेच्या नियमाची पायमल्ली करीत बेकायदा पद्धतीने होर्डिंग थाटली गेली. काही ठिकाणी कमी जागेची परवानगी घेऊन मोठी होर्डिंग लावण्यात आली असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील काही ठिकाणी अनधिकृत व धोकादायक इमारतींवरही होर्डिंग असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, अशी भीषण परिस्थिती आहे. घोडबंदर रोडवर दोन इलेक्ट्रिक टॉवरला वेल्डिंग करून होर्डिंग उभारण्यात आला आहे, याकडे आयुक्त राव यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासणी करावी. तसेच बेकायदा होर्डिंग काढून टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उंचावरील होर्डिंगची नियमित तपासणी करावी. तसेच भविष्यात होर्डिगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात नियमावली तयार करावीत, अशी मागणी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठाणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला त्यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार संजय भोसले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ई रिक्षाच्या सोडतीमध्ये वीस जणांना लाभ

माथेरान : सनियंत्रण समितीने सध्या वीस ई रिक्षांना पायलट प्रोजेक्ट वर परवानगी दिली होती परंतु यामध्ये एकूण २३ जणांनी आपले फॉर्म भरले होते.याकामी वीस जणांना अधिकृतपणे या ई रिक्षा मिळण्यासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दि.२७ रोजी सायंकाळी पाच वाजता सोडत काढण्यात आली यामध्ये वीस जणांना सध्या सुरू होणाऱ्या पायलट प्रोजेक्ट साठी लाभ मिळाला आहे.यावेळी नगरपरिषदेचे अंकुश इचके, सदानंद इंगळे उपस्थित होते तर २३ हातरीक्षा चालक, मालक सुध्दा सोडतीच्या वेळी समक्ष हजर होते. अनेक दिवसांपासून ई रिक्षाचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. सुरुवातीला सनियंत्रण समितीने वीस ई रिक्षासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून परवानगी दिली होती त्यावेळी पंधरा ई रिक्षा शालेय विद्यार्थ्यांना आणि उर्वरित पाच ई रिक्षा पर्यटकांना, स्थानिक,आबालवृद्ध,दिव्यांग यांना वापरण्यात याव्यात असे सूचित केले होते. त्यावेळी आपला यामध्ये तोटा होणार आहे ही बाब लक्षात घेऊन काहींनी अंग काढले होते तर आज ना उद्या सर्वांना ई रिक्षा मिळणार आहेत त्यामुळे डेरिंग करून वीस जणांनी हा कोटा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता      फॉर्म भरण्यात आले होते.अखेरीस यातील वीस जणांना लाभ झाला असून उर्वरित ७४ जणांना ह्या पायलट प्रोजेक्ट नंतर टप्प्याटप्प्याने लाभ घेता येणार असल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे  हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती च्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल असल्याचे हात रिक्षा चालकांचे मत व्यक्त केले. हात रिक्षाच्या अमानवीय प्रथेतून मुक्ती होणार असून ई रिक्षा मुळे आमच्या जीवनात बदल होणात आहे तसेच माझे अन्य हात रिक्षा बांधव त्यांना देखील लवकर ई रिक्षाचा परवाना मिळावा…

हे नसते उपद्व्याप कशासाठी?

राजकारणात प्रतिपक्षाची उणीदुणी शोधणे आणि त्यांना नामोहरम करणे ही नेहमी चालतेच, नव्हे राजकारण करायचे तर ते क्रमप्राप्तच असते. अशी उणीदुणी शोधून प्रतिपक्षात भांडणे लावून देणे हे देखील एक महत्त्वाचे काम…

मालेगावच्या माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार

मालेगाव : मालेगावचे माजी महापौर आणि एमआयएमचे नेते अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी काल मध्यरात्री गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले. या गोळीबारात इसा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाशिकच्या रुग्णालयात…

पुण्यात हिट अँड रन केस चर्चेत असतांनाच नागपूरातही मद्यधुंद कारचालकाने तिघांना उडवून गंभीर जखमी

विशेष रमेश कृष्णराव लांजेवार पुण्यातील पोर्शे अपघाताची चर्चा सुरूच असतानाच महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ दिनांक २४ मे २०२४ शुक्रवारला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाने…

कोलकाताच ठरला सर्वोत्तम संघ ; तिसऱ्यांदा जिंकली आयपीएल ट्रॉफी

भोवताल श्याम ठाणेदार इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाची नुकतीच सांगता झाली. रविवारी झालेल्या एकतर्फी अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने पॅट कमिन्सच्या सन राईजर्स हैद्राबादला अवघ्या…

‘इंडिया’ आयी है, सिंहासन खाली करो !

विशेष योगेश त्रिवेदी १९७४ साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्माण आंदोलन झाले. अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून इंदिरा गांधी ओळखण्यात येत होत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर इंदिरा गांधी वैफल्यग्रस्त झाल्या…

४०० पार घोषणेचा फटका बसला- भुजबळ

मुंबई : देशात सत्तेत येण्यासाठी २७२ जागांचीच गरज असताना भाजप ४०० पारचा नारा देत आहे, कारण त्यांना संविधान बदलायचं आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. हा मुद्दा समोर येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग सत्ताधाऱ्यांवर…