Author: bittambatami.com

मतदानाच्या खेळखंडोबाची चौकशी होणार

मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश मुंबई : महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यात झालेल्या मतदानाच्या खेळखंडोबाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच्या चौकशीचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत. राज्यातील शेवटच्या मुंबईसह 13 लोकसभा…

…तर मोदीं सत्ता सोडतील-शरद पवार

मुंबई : “मी जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओळखतो, त्यानुसार जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि जर त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी दुसऱ्या कुणावरतरी अवलंबून राहण्याची वेळ आली, तर मला वाटतं ते स्वत:च…

रायगड जिल्ह्यातील ४९९ इमारती धोकादायक

अलिबाग– आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ४९९ इमारती धोकादायक परीस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.…

मनीष सिसोदियांचा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांचा ईडी आणि सीबीआय अशा दोन्ही खटल्यांमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. काही…

मंगळवारी महाराष्ट्र बोर्डाचा १२ वी चा निकाल जाहीर झाला या निकालांमध्ये मुलींनी पुन्हा बाजी मारली आहे. ठाणे येथे विद्यार्थी निकालानंतर एकमेकांना पेढे भरवताना दिसत आहे. (फोटो प्रफुल गांगुर्डे)

१४ जून रोजी डाक अदालतीसाठी तक्रार पाठवा – सुनिल थळकर

अशोक गायकवाड रायगड – ग्राहकांनी आपल्या तक्रारीच्या दोन प्रती अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांच्याकडे ०६ जूनपर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे. अधीक्षक डाकघर रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालया‌द्वारे १४ जूनला सकाळी ठीक ११ वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली असून इछूक ग्राहकांनी आपली तक्रार २ प्रतीत अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांच्याकडे ०६ जूनपर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी. रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/समस्या ज्याचे निवारण ६ आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इ. असणे आवश्यक आहे, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे.

पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मंगळवेढ्यात होणार

कुमार गटाची लातूर तर किशोर गटाची स्पर्धा मानवतला : प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांची माहिती पुणे : पुरुष व महिला गटाची राज्य अजिंक्यपद  खो-खो स्पर्धा मंगळवेढामध्ये सोलापूर ॲम्युचर  खो खो असोसिएशन यांच्या  यजमान पदाखाली होणार असल्याची माहिती महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिली. पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या शासकीय परिषदेच्या बैठकीत राज्याच्या विविध स्पर्धांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असल्याचे डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.  याबाबत अधिक माहिती सांगताना ते म्हणाले, कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा लातूर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने तर किशोर- किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मानवत (जिल्हा परभणी) या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धा साधारणपणे नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये होतील.  या स्पर्धेच्या अगोदर राज्य अजिंक्यपद  स्पर्धेच्या तारखा  निश्चित करण्यात येतील. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे संघ निवडण्यासाठी निवड समिती सदस्य आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक व फिजिओ यांची नियुक्ती सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. पंच शिबीर वसमत, हिंगोली येथे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे २०२४-२५ या वर्षीचे पंच शिबीर वसमत (जिल्हा हिंगोली) या ठिकाणी ऑगस्टमध्ये आयोजित केले जाणार आहे. ज्यामध्ये खो-खो मध्ये समाविष्ट होत असलेल्या व बदल  झालेल्या विविध नियमांवर चर्चा होऊन उजळणी सुध्दा घेतेली जाते. निवड समित्या पुरुष – महिला (खुला गट) : जगदीश दवणे (पालघर), मंदार कोळी (ठाणे), विशाल भिंगारदेवे (सांगली), गौरी भगत (सातारा). कुमार – मुली (१८ वर्षाखालील) : प्रशांत कदम (सातारा), रमेश नांदेडकर (नांदेड),  संदीप चव्हाण (पुणे ), भावना पडवेकर ( ठाणे). किशोर – किशोरी (१४ वर्षाखालील)  :  अमोल मुटकुळे (हिंगोली), विशाल पाटील (जळगाव ), राजाराम शितोळे (सोलापूर),  वर्षा कच्छवा (बीड ). संघ प्रशिक्षक व सहाय्यक प्रशिक्षक: राष्ट्रीय स्पर्धा : पुरुष गट : डॉ. नरेंद्र कुंदर ( मुंबई उपनगर ), डॉ. पवन पाटील ( परभणी). महिला गट : नरेंद्र मेंगळ (ठाणे ),अनिल रौंदाळ (नंदुरबार). फेडेरेशन चषक …

मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम – संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे मतदाना दिवशी उघड झाल्यानंतर प्रशासना विरोधात सर्वच स्तरातुन टिकेची झोड उठत आहे.या पार्श्वभूमीवर ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ‘नवमतदार नोंदणी’ तसेच मतदार ओळखपत्र दुरुस्ती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी 022 – 25333850 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आ. संजय केळकर यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानात निवडणुक यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर आला होता.  मतदार यादीतुन नावे वगळण्यात आल्याने अनेक जुन्या जाणत्या मतदारांना मतदानापासुन वंचित राहावे लागले होते. ही बाब गंभीरतेने घेत आ. संजय केळकर यांच्या पुढाकाराने सचिन शिनगारे यांनी मतदार नोंदणी व दुरुस्ती मोहिम सुरु केली आहे. मतदार यादीमध्ये नाव नोंदणी आणि मतदार ओळखपत्रामध्ये दुरुस्ती करण्याकरिता, तसेच, ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असतील अशांसाठी विशेष मोहिम सुरु केली आहे.त्यानुसार, ज्यांना मतदार नोंदणी करावयाची आहे, त्यांनी स्वतःचा फोटो,आधारकार्ड, वास्तव्याचा पुरावा आदी आवश्यक स्वयंसांक्षाकित कागदपत्रांसह जनसेवा कार्यालय, जय भवानी नगर, मराठी शाळे मागे, माजिवडा ठाणे प. 400601.अथवा श्रमसाफल्य, वीर सावरकर मार्ग, तीन पेट्रोल पंप जवळ, आराम बाग समोर, ठाणे प. 400602. या पत्यावर तसेच  022 – 25333850 या व सचिन शिनगारे यांना या  98927 66111 क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन आ. संजय केळकर यांनी केले आहे.

भारतीय माहिती क्रांतीचे जनक राजीव गांधी

दिन विशेष श्याम ठाणेदार आज २१ मे, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज ३३ वा स्मृतीदिन. राजीव गांधी यांना भारतीय माहिती क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. आधुनिक विचार आणि…