Author: bittambatami.com

मतदान केंद्रावर संस्कृती, परंपरांचा जागर

कासा : पालघर लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून जागृती करण्यात येत आहे. डहाणूमधील विविध मतदान केंद्रांवर आदिवासी, ग्रामीण परंपरांचे दर्शन घडवण्यात आले होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित देशमुख यांनी विविध मतदान केंद्रे तयार केली. मतदानाचा टक्का वाढावा, तसेच मतदारांना आकर्षित केले जाईल, अशी मतदान केंद्रे तयार केली आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्याची संस्कृती, परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केला. डहाणूतील मल्याण मतदान केंद्रात वारली चित्र रेखाटन, चिखला येथील शाळेतील मतदान केंद्रात कोळी मतदान केंद्र, गटसदन केंद्र डहाणू येथे युवा व्यवस्थापित केंद्र, मॉडल हायस्कूल मसोली येथे आदिवासी पारंपरिक मतदान केंद्र, तर वाकी ब्राह्मण पाडा येथे सक्षम मतदान केंद्र, नंदारे येथे सखी मतदान केंद्र उभारले होते. यामुळे येथील संस्कृती, परंपरा जपल्या जातील आणि मतदारांना आकर्षित करून मतदानाचा टक्कादेखील वाढला जाईल, यासाठी ही मतदान केंद्रे उभारली आहेत.

जंजिरा किल्‍ला २६ मेपासून बंद

मुरूड :- साडेतीनशे वर्षांपूर्वी समुद्रात बांधलेला जंजिरा किल्ला कोकण किनारपट्टीवरील पाच जलदुर्गांपैकी एक असून वास्तूशिल्पाचा अजोड नमुना आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पावसाळ्‌यात किल्‍ल्‍यावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. यंदा २६…

नालासोपारा मतदारसंघातील तब्बल ‘इतके’ लाख मतदार गायब

निकालावर होणार थेट परिणाम विरार : नालासोपारा व बोईसर मतदारसंघातील तब्बल दीड लाख मतदात्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असल्याचे निरीक्षण बहुजन विकास आघाडीने नोंदवले आहे. यात नालासोपारा मतदारसंघातून 1,09,069 तर, बोईसर विधानसभा मतदारसंघातून 55,332 मतदारांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. ही नावे जाणीवपूर्वक व हेतूपुरस्सर वगळण्यात आली आहेत. त्यामुळे 2024 च्या पालघर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. निवडणूक प्रशासकीय यंत्रणांचा निष्काळजीपणा आणि डोळेझाक या सगळ्याला कारणीभूत आहे, असे मत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, मतदानापासून वंचित राहिलेल्या शेकडो मतदात्यांनीही याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 2019 साली नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या 5,12,425 इतकी होती. 2024 मध्ये यातील 1,09,069 नावे काढून टाकण्यात आली आहेत. 2024 मध्ये 5,57,547 इतकी मतदारांची नोंद आहे. या वर्षी यात 1,53719 इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे. बोईसर मतदारसंघात 2019 साली 3,14,213 इतकी मतदारसंख्या होती. त्यापैकी 55,332 इतकी नावे या वर्षी काढून टाकण्यात आलेली आहेत. तर, 2024 मध्ये बोईसर मतदारसंघातील मतदारसंख्या 3,84,201 इतकी नोंदवण्यात आलेली आहे. यात या वर्षी 1,26,245 इतके मतदार वाढलेले आहे, असे निरीक्षण बहुजन विकास आघाडीने नोंदवले आहे. मात्र, या याद्या मागील वर्षीच्या तुलनेत या वेळी जास्तच सदोष आहेत. त्यामुळे या वर्षी तब्बल दीड लाखाहून अधिक मतदार मतदानापासून वंचित राहिलेले आहेत. याचा थेट प्रभाव मतदान टक्केवारी आणि निकालावर होणार आहे. निवडणूक यंत्रणाचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे. मतदारयादीत प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींना सामावून घेतले जात नाही. त्यांच्या सूचना अथवा मार्गदर्शन घेतले जात नाही. सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सी अथवा शासकीय कर्मचारी यांच्या मार्फत सर्व्हे करून या याद्या तयार केल्या जातात. त्यामुळे मतदाराची निश्चित माहिती त्यांना प्राप्त होत नाही. याचे परिणाम म्हणून त्रोटक माहितीआधारे ही नावे वगळण्यात किंवा काढून टाकण्यात येतात. मतदार याद्या निर्दोष बनवायच्या तर स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींचा त्यातील सहभाग वाढविला गेला पाहिजे, असे मतही बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, नालासोपारा व बोईसर मतदारसंघातून गावनिहाय काढून टाकण्यात आलेल्या मतदारांची संख्याही बहुजन विकास आघाडीने समोर आणली आहे. विशेष म्हणजे या मतदारांनी मागील वर्षी मतदान केले होते. मात्र, त्यांची नावे आता या यादीत नाहीत. शिवाय एकाच कुटुंबातील काही व्यक्तींची नावे सापडत असतील तर इतरांची सापडत नसल्याच्या मतदात्यांच्या तक्रारी आहेत. पतीचे नाव असेल; तर त्याच्या पत्नीचे नाव सापडत नव्हते. मृत व्यक्तीचे नाव यादीत सापडत होते; पण जिवंत व्यक्तीचे नाव सापडत नव्हते. त्यामुळे नालासोपारा मतदारसंघांतील बहुतांश मतदार मदत कक्षांबाहेर मतदात्यांच्या संतप्त प्रतिक्रया उमटताना दिसत होत्या. या मतदार यादी ज्यांच्यामार्फत व ज्यांच्या माध्यमातून बनविण्यात आल्या; त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या मतदात्यांनी लावून धरली आहे. विशेष करून यात मराठी व्यक्तींची नावे मोठ्या प्रमाणात काढून टाकण्यात आली आहेत, असे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

यादीत नावच सापडत नसल्याने मतदार हैराण

डोंबिवली, : कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते; मात्र अनेक ठिकाणी मतदान यादीत नावच सापडत नसल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.…

मिरा-भाईंदरमध्ये मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

भाईंदर : मिरा भाईंदरमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी मतदारांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत ३७.५६ टक्के मतदान झाले होते. सकाळी पहिल्या तासात मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसून आली.…

नववधूसारखे सजले मतदान केंद्र

ठाणे : ठाण्यातील सखी मतदान केंद्र हे नववधूसारखे सजविण्यात आले होते. आकर्षक फुग्यांच्या कमानीने तर लाल, हिरवी मॅट अंथरली होती. महिला मतदारांनी सुविधांचा लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच सेल्फी पाईंटवर मतदानाचे फोटो काढले तसेच इतरांना मतदानासाठी समाजमाध्यमांवरून आवाहन केले. एकंदर सखी मतदान केंद्रावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदान केंद्रावर ‘सुस्वागतम्’ असे लिहिलेल्या कमानी उभारल्या होत्या. महिलांसाठी बैठक व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. महिला कर्मचारी मतदानासाठी येणाऱ्या महिलांचे स्वागत करत होत्या. सेल्फी पॉईंटची खास सुविधा उभारली होती. त्यावर आम्ही ‘मी मतदान केलं तुम्ही केलं का?’, असे वाक्य ठळकपणे लिहिले गेले होते. सेल्फी काऊंटर फुग्यांनी सजविले होते. मतदानावेळी असुविधा होऊ नये, याची विशेष खबरदारीदेखील घेण्यात आली होती. तर काही केंद्रांवरील असुविधांबद्दल मतदारांनी नाराजी व्यक्त केली. ओवळा माजिवड्यात मतदान केंद्र क्र. ३३२ येथे युवा मतदार केंद्रात सेल्फी स्टॅन्ड उपलब्ध नव्हता. तर ओवळा माजिवड्यात मतदान केंद्र क्र. ४३९ या ठिकाणी मतदारांनी गर्दी केली आहे; मात्र पिण्यासाठी पाणी व पंख्याची सोय नसल्याने गर्मीने काही मतदार वैतागून मत न देता मागे फिरल्याचे चित्र दिसले. गुलाबी वस्त्र परिधान महिलांना निर्भय मतदान करता यावे, यासाठी सखी मतदान केंद्रांची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे होती. मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंतचे संपूर्ण कामकाज महिलांनी सांभाळले. दिवसभर येथील मतदान केंद्राचे वातावरण उत्साहपूर्ण होते. सखी या केंद्रावरील कर्मचारी महिलांनी खास गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले होते.

महेंद्र थोरवे मार्गदर्शनाखाली शिवमंदिराचा जीर्णोद्धार

माथेरान : कर्जत तालुक्यातील पोसरी गावातील शिव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सोहळा शनिवार, 18 मे रोजी उत्साहात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने संपन्न झाला. शनिवारी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, होम हवन, भजन कीर्तन यासह भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शिव मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी श्रीरंग आप्पा बारणे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून यथोचित सत्कारही केला.तीन दिवस जीर्णोद्धार कामी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कर्जत (पोसरी) येथील मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून श्री महादेवाचे दर्शन घेतले. त्यामुळे पोसरी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांच्या आध्यात्मिक कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे. पोसरी येथे पुरातन काळापासून असलेल शंभू महादेवाच मंदिर हे आम्हा ग्रामस्थांच नेहमीच श्रद्धास्थान राहिल आहे त्यामुळे या शिव मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अत्यंत जवळून काम करण्याची संधी मला मिळाली आणि आज हे शिव मंदिर पूर्ण झाल्यानंतर एक ग्रामस्थ म्हणून मलाही मनस्वी समाधान मिळत आहे -महेंद्र थोरवे आमदार, कर्जत विधानसभा

‘मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..’

मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला! डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली. सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडेल आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मतदारांची मतदान यादीत नावच सापडत नसल्याने गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले. उन्हाच्या तीव्र झळा, त्यात नाव भेटत नसल्याने नागरिक हैराण होते. मतदान केलं नाही तर पगार कापला जाण्याची भीती, तसेच काहींचे पहिलेच मतदान असून त्यांना ते करता न आल्याने मतदारांचा हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले. कल्याण मतदारसंघाच्या अंतर्गत कल्याण ग्रामीण, डोंबिवली मतदान केंद्रावर (Dombivli Polling Station) मतदार यादीत नाव नसल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदार याद्यांचा घोळ पाहता भर उन्हात लोक मतदानासाठी बाहेर पडले. नाव सापडत नसल्याने मतदार गोंधळून गेले आहेत. राजकीय पक्ष, नगरसेवक यांनी मतदारांची नावे शोधण्यासाठी बुथ लावले आहेत. दुपारच्या वेळी मतदारसंघात मतदान केंद्राऐवजी राजकीय पक्षाच्या बुथवर मतदारांची झुंबड उडाली होती. मात्र, नाव न सापडत नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून 5 वर्षे सतत काम केले पाहिजे. तरच हा गोंधळ पुढे होणार नाही, अशी मागणी शिवसेनेचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी केली. पगार कापला जाण्याची भीती विशेष म्हणजे, मतदान न केल्यास तीन दिवसांचा पगार कापला जाणार असल्याची नोटीस कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांची यादीत नावेच नसल्याने हे मतदार रडकुंडीला आले आहेत. आम्हाला कोणीतरी मतदार यादीत नाव नाहीये इतकं तरी लिहून द्यावं, अशी याचना ते करत आहेत. आमचा हक्क आहे, आम्हाला आजच मतदान करायचं आहे, अन्यथा आमचा पगार कापला जाईल, त्याची जबाबदारी कोण घेईल? असा प्रश्न नोकरदार करत होते. आमच्या घरात एकूण 9 ते 10 मतदार आहेत. यातील 2 जणांची केवळ नाव मतदार यादीत आली. बाकी सर्वांची नावे नाहीत. आम्हाला के.सी.गांधी येथे जाऊन 17 नंबरचा फॉर्म भरून घेऊन या, मग मतदान करता येईल असं सांगितलं. तिथे गेल्यावर असा कोणता फॉर्म नाही तुम्हाला मतदान करता येणार नाही असं सांगितलं गेलं. माझे वडील 85 वर्षाचे आहेत. दरवेळी ते मतदान करतात. आताच नाव कसे त्यांचे कट झाले. म्हणजे आम्ही मतदान करायचंच नाही का? असा सवाल डोंबिवलीतील राहुल पाटील यांनी उपस्थित केला.

मोखाड्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

यंत्रणा मात्र संथ; दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढला मोखाडा : पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मोखाड्यात मतदारांनी सकाळ पासूनच मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला आहे. मात्र, मतदान करताना, मतदान यंत्र संथ गतीने चालत असल्याने, मतदानासाठी ऊशीर होत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून येत होत्या. तर दुपारनंतर मतदानाचा ओघ वाढला आहे. विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील मोखाडा तालुक्यात एकुण 77 मतदान केंद्र आहेत. तर 59  हजार 358 मतदार आहेत. सकाळपासून तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांनी, मतदानासाठी गर्दी केली होती. मात्र, यंत्रणा संथ गतीने काम करत असल्याने, एका मतदानासाठी 5 ते 10 मिनिटे लागत असल्याच्या तक्रारी आमदारांकडून आल्या आहेत. त्यामुळे मतदारांना केंद्राबाहेर वाट पहावी लागत होती. विशेषतः महिला व वृध्द मतदारांनी वाट पाहून घरची वाट धरली. दुपारनंतर ऊन्हाची तिव्रता कमी झाल्याने, मतदार पुन्हा मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे सर्वच मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाल्याची दिसून आली आहे. तालुक्यातील वाशिंद – दुधगाव मतदान केंद्रावर मतदानाच्या आकडेवारीत फरक आढळून आल्याने, मतदान अर्धा ते एक तास बंद करण्यात आल्याची माहिती मतदान केंद्राध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी दिली आहे. मात्र, त्यानंतर मतदान सुरळीत सुरु झाल्याचे ठोंबरे यांनी सांगितले आहे. तर एका मतदानासाठी 10  मिनिटे लागत असल्याने, मतदारांमध्ये नाराजी असल्याचे संजय मांगे या मतदाराने सांगितले.

मतदानाचा हक्क बजावणे झाले शक्य

मतदानाच्या दिवशी नवमतदारांना मिळाले मतदार ओळखपत्र मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या भागात मतदान सुरू झाले. मात्र निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्र न मिळाल्याने अनेक नवमतदारांचा हिरमोड झाला. परंतु पोस्टमन सोमवारी सकाळी मतदार ओळखपत्र घेऊन घरी पोहोचल्यामुळे बहुसंख्य नवमतदारांना सोमवारी मतदानाचा हक्क बजावता आला. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी बहुसंख्य नवमतदारांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. मात्र अर्ज करण्यास विलंब झालेल्या नवमतदारांना निवडणुकीपूर्वी ते मिळू शकले नाही. मतदानाचा दिवस उजाडला तरी ओळखपत्र न मिळाल्याने नवमतदारांचा हिरमोड झाला होता. मात्र अनेक नवमतदारांचे मतदान ओळखपत्र मंगळवारी सकाळी ७ ते ११ च्या सुमारास टपाल कार्यालयामार्फत घरपोच करण्यात आले. त्यामुळे या नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावता आला. मतदार ओळखपत्र मिळावे यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर एप्रिल महिन्यात नाव नोंदणी केली होती. काही दिवसांपूर्वी मला माझा ईपीआयसी क्रमांक मिळाला. मात्र मतदार ओळखपत्र मिळाले नव्हते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही असेच वाटले होते. परंतु टपाल कार्यालयाने सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मतदान ओळखपत्र घरपोच केले. त्यामुळे मला मतदानाचा हक्क बजावता आला, असे नवमतदार आकांक्षा सकपाळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. निवडणूक आयोगाकडून टपाल कार्यालयांना प्राप्त झालेली मतदार ओळखपत्र २० मे रोजी दुपारी १२ पर्यंत मतदारांना सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार टपाल कार्यालयाला उपलब्ध झालेली नवमतदारांची मतदार ओळखपत्रे सकाळी ७ वाजल्यापासून मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत, असे पोस्टमन दिनेश धाके यांनी सांगितले.