Author: bittambatami.com

महाराष्ट्रात प्रभारी-सहप्रभारीपदी केंद्रातील दोन मंत्र्यांची नियुक्ती

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यातील संघटनात्मक बदलही केली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी…

शिंदे सरकारची जनतेला अनोखी आरोग्य विमा भेट !

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकांआधी राज्यातील नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आता राज्यातील नवी आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात…

वंदना सुर्यवंशीनी बाथरुममधून संशयास्पद फोन कॉल केले

निवडणूक अधिकाऱ्यांवर अनिल परबांचे गंभीर आरोप मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी वादात सापडली आहे. “१९ व्या फेरीनंतर सरळ २३ व्या फेरीला सगळे निकाल वाचले गेले. तसेच निवडणूक प्रक्रिया संपताना ठाकरे…

मुंबईत पाणीबाणी ; धरणांनी तळ गाठला

मुंबई : मुंबईतून मान्सून दाखल होऊन आठवडा उलटून गेला तरीही मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. धरणक्षेत्रात पावसाने दडी मारल्याने एकुण सात पैकी पाच जलाशयांनी तळ गाठला असून दोन जलाशयांमध्ये…

सिक्कीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; महाराष्ट्रातील २८ पर्यटक अडकले

आसाम : सिक्कीम येथे ढगफुटीमुळे हाहाकार उडाला असून मुसळधार पावसामुळे देशभरातली सुमारे २००० पर्यंटक पुरात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रातील २८ पर्यंटकांचा समावेश आहे.   या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी

नाशिक : लोकसभेत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतरही भाजपाप्रणीत महायुतीतील धुसफूस संपता संपत नाहीय. नाशिक शिक्षक मतदार संघात अजित पवार राष्ट्रवादी गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमनेसामने उभी ठाकली असल्यामुळे…

छगन भुजबळ बंडाच्या तयारीत

स्वाती घोसाळकर  मुंबई :  राष्ट्रवादी अजित पवार गटात सारखे डावलण्यात येत असल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ बंडाच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सुत्र आहे. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी  समाजाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करता यावे…

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात एक्सप्रेसची मालगाडीला धडक

१५ प्रवाशांचा मृत्यू, शेकडो जखमी  बंगाल : पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेसने  मालगाडीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत .जखमींना…

अथक चालणे हाच मुक्काम !

विनय हर्डीकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन प्रज्ञा जांभेकर मुंबई : शिक्षक-प्राध्यापक, लेखक-समीक्षक, पत्रकार-संपादक, राजकीय-सामाजिक कार्यकर्ता अशी बहुआयामी ओळख असलेले विनय हर्डीकर 24 जून 2024 रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत.…

मुंबई रत्न पुरस्कार कामगार नेते मारुती विश्वासराव यांना बहाल

मुंबई : दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात रविवारी झालेल्या कोकण दीप मासिकाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार  क्षेत्रातील मुंबई रत्न पुरस्कार, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख व पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे  कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांना बहाल करण्यात आला. दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय  सभागृहात  १६ जून २०२४ रोजी झालेल्या कोकण दीप मासिकाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार  क्षेत्रातील मुंबई रत्न पुरस्कार,  ज्येष्ठ संपादक डॉ.  सुकृत खांडेकर यांच्या हस्ते, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख व  पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे  कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांना बहाल करण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार साक्षी नाईक, दापोली विधानसभेचे शिवसेना संपर्कप्रमुख सुधर कदम, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक भाऊ सावंत, शशिकांत सावंत, उद्योजक डॉ. नानजीभाई ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.