Author: bittambatami.com

 दिव्यांग (विशेष) मुलांच्या उडान ११ नृत्य स्पर्धेत

दिव्यांग (विशेष) मुलांच्या उडान ११ नृत्य स्पर्धेत एम बी ए फाऊंडेशन अव्वल ठाणे: लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि  ज्युपिटर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग (विशेष) मुलांच्या उडान ११ नृत्य स्पर्धेत एम बी ए फाऊंडेशन संस्थेने बाजी मारली. एन के टी सभागृहात जुन्या संमिश्र गाण्यांवर पार पडलेल्या या नृत्य स्पर्धेत १३ शाळांमधील सुमारे १३० हून अधिक विशेष विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ तरल नागडा यांच्या संकल्पनेतून ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहकार्याने होत असलेल्या या स्पर्धेचे यंदा ११ वे वर्ष होते. झवेरी ठाणावला कमलिनी कर्णबधिर स्कूलच्या चमूने दुसरा तर विश्वास सेंटरने तृतीय स्थान संपादन केले. विशेष मुलांच्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. दिवसोदिवस या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थांची संख्या वाढत आहे. त्यामुळे समाजात या मुलांना स्वीकारण्याची भावना वाढीस लागल्याचे लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे अध्यक्ष प्रसाद खोपकर यांनी सांगितले. सर्वश्री डॉ जुई मांडके आणि दिप्ती नायर यांनी यावेळी परिक्षक म्हणून काम पाहिले. लायन्स क्लबचे माजी जिल्हा गव्हर्नर राकेश चौमाल, लिओ क्लबच्या जिल्हा गव्हर्नर शिवानी शाह आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. लिओ क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा ग्रीष्मा इंदप यांनी आभार प्रदर्शन केले.

डोंबिवलीतील गणेश स्मृती इमारतीचा पुनर्विकास मार्गी – संजय केळकर

डोंबिवलीतील गणेश स्मृती इमारतीचा पुनर्विकास मार्गी – संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे, डोंबिवली पूर्वेतील धोकादायक इमारतीचा रखडलेला पुनर्विकास आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला असून येथील भाडेकरू कुटुंबांना दिलासा…

काय आहे हिमगौरी आडकेंचा विक्रम?

काय आहे हिमगौरी आडकेंचा विक्रम? नाशिक महापौर दालनाचा फलक चर्चेत हरिभाऊ लाखे नाशिक: महापालिकेत स्थायी समिती सभापती झालेली व्यक्ती कधीही महापौर होत नाही, असा आजवरचा नाशिकचा इतिहास आहे. महापौरपदी विराजमान…

भारत–श्रीलंका पर्यटन व व्यापार संबंध अधिक दृढ

भारत–श्रीलंका पर्यटन व व्यापार संबंध अधिक दृढ रमेश औताडे मुंबई : श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरो यांच्या वतीने मुंबईत ‘श्रीलंका टुरिझम नेटवर्किंग इव्हिनिंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत आणि श्रीलंका…

इंतजार मालिकेचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वाडा आगित जळून खाक

इंतजार मालिकेचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वाडा आगित जळून खाक अविनाश उबाळे ठाणे:  शहापूर तालुक्यातील आटगाव रेल्वे स्थानका जवळील ११२ वर्ष जुना असलेला व १९९२ च्या काळातील  सुपरहिट ठरलेल्या व प्रसिद्ध…

वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे

वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे लोककला अभ्यासकांचे चर्चासत्रात परखड मत मुंबई, दि (प्रतिनिधी) : लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली अमिट छाप आजही तितकीच तेजस्वी आहे.…

अभिनव कॉलेजचा स्पंदन उत्सव उत्साहात संपन्न

अभिनव कॉलेजचा स्पंदन उत्सव उत्साहात संपन्न मिरा -भाईंदर – विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी अभिनव कॉलेजच्या वतीने दरवर्षी स्पंदन उत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षी या उत्सवाचे आयोजन मिरा रोड…

ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्रासाठी अर्ज स्वीकृतीला सुरुवात

ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्रासाठी अर्ज स्वीकृतीला सुरुवात ठाणे : ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी नमुना अर्ज वितरित करून तो भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. सध्या ठाणे स्थानक, कोपरी आगार, आनंदनगर व वागळे आगार येथे अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता शनिवार, ७ फेब्रुवारीपासून वृंदावन सोसायटी, लोकमान्यनगर टर्मिनस, पवारनगर टर्मिनस व धर्मवीर चौक येथेही अर्ज स्वीकृती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रांवर सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार असून नागरिकांनी नमुना अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल ओळखपत्रानुसार सदर योजना १ मार्च २०२६ पासून सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, ओळखपत्रासाठी आलेल्या अर्जांचा विचार करून सर्व अर्जदार ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र मिळेपर्यंत जुन्या पद्धतीप्रमाणे मोफत प्रवासाची सवलत सुरू राहणार आहे याची नोंद ज्येष्ठ नागरिकांनी घेवून परिवहन सेवेचे सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

केडीएमसीची रुग्णालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांना संलग्नित करणार

केडीएमसीची रुग्णालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांना संलग्नित करणार कल्याण: अंबरनाथ येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबरनाथ जिल्हा ठाणे यांनी त्यांच्याकडील विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष रुग्णालयीन अनुभव मिळण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची बाई रुमिणीबाई रुग्णालय, कल्याण (प.), शक्तीधाम रुग्णालय, कल्याण (पू.) व गौरीपाडा रुग्णालय, कल्याण (प.) ही रुग्णालये तात्पुरत्या स्वरुपात किमान सात वर्षांसाठी किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतःची स्वतंत्र ईमारत निर्माण होईल यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सामंजस्य कराराद्वारे वापरण्याकरिता हस्तांतरण करण्यासाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबरनाथ जिल्हा ठाणे यांनी विनंती केली आहे. त्या अनुषंगाने वरीलप्रमाणे रुग्णालये सामंजस्य कराराद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना संलग्नित करुन देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येत आहे. प्रथमतः बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे आयसीयू करणे व अत्यावश्यक सेवा सुरू करण्यासाठी बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण (प.) हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबरनाथ यांचेमार्फत ताब्यात घेऊन आयसीयू व अत्यावश्यक सेवा तात्काळ कार्यान्वित करण्यात येईल. तद्नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबरनाथ यांच्या  आस्थापनेवर आवश्यक अध्यापकीय तसेच तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध झाल्यानंतर गौरीपाडा रुग्णालय करिता असलेली इमारत ताब्यात घेऊन Gynaecology & Paediatrics Department कार्यान्वित करण्यात येतील. सर्वात शेवटी शक्तिधाम रुग्णाल, कल्याण (पू.) येथील ईमारतीचे आरक्षण बदल झाल्यानंतर सदर रुग्णालय ताब्यात घेऊन तेथे इतर विभाग कार्यान्वित करण्यात येतील. हि रुग्णालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांच्याशी संलग्नित झाल्यावर महाविद्यालयामार्फत तज्ञ वैद्यकीय अधिकारी व इतर मनुष्यबळ उपलब्ध होणार असून त्यांचेमार्फत प्रगत वैद्यकीय सुविधा, विशेषज्ञ सेवा व अतिदक्षता विभागाची सुविधा कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. हा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून पाठविण्यात येणार असून शासनाची मान्यता प्राप्त झाल्यास याबाबतची प्रत्यक्ष कार्यवाही नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर व आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येईल

कलर मराठी वाहिनीने अंधश्रद्धा पसरविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी- अंनिसची मागणी

कलर मराठी वाहिनीने अंधश्रद्धा पसरविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी- अंनिसची मागणी अनिल ठाणेकर मुंबई, कलर मराठी वाहिनी कडून अंधश्रद्धा पसरविली गेल्याने त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी व समाजात चुकीचा संदेश जाईल असे प्रसारण करू नये अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. तसे त्यांनी संबंधितांना निवेदन पाठविले आहे. कलर मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या आवडीचा व लोकप्रिय कार्यक्रम आहे. त्याद्वारे बहुजन कलाकारांना आपण लोकप्रियता मिळवून दिली आहे.त्याचा सहावा सीज़न आता चालू आहे.पण त्यात अंधश्रद्धा पसरवली गेली आहे. ४ फेब्रुवारीच्या २५ व्या भागात अंधश्रद्धायुक्त प्रसंगाचे प्रसारण झाले  आहे. त्यामध्ये  कलाकारांची नजर उतरविण्याचे दृश्य आहे. काही शब्द पुटपुटत मिरची कलाकाराच्या शरीरावरून ओवाळून गॅसवरील तव्यावर टाकली असल्याचे दिसत आहे. खरं तर ही अतिशय गंभीर बाब असून ती निखालसपणे अंधश्रद्धा आहे. यामुळे प्रेक्षकांच्या मनात अंधश्रद्धा रुजण्याचा धोका संभवतो. ही बाब वाहिनीसह दिग्दर्शक व पुरोगामी विचाराचे निवेदक रितेश देशमुख यांच्या नजरेतून सुटली गेली किंवा त्याचे गांभीर्य त्यांना समजले नाही. तरी त्यांनी ही चूक सुधारून तसे निवेदन त्यांच्या येणाऱ्या भागात प्रसिद्ध करावे म्हणजे प्रेक्षकांना मनात अंधश्रद्धा बळावण्याचा धोका टळेल. असे अंनिसने निवेदनात म्हटले आहे. या विषयी सकारात्मक विचार करून या पुढे अंधश्रद्धायुक्त प्रसंगांची दृश्य सदर वाहिनीवर प्रसारित केले जाणार नाहीत, उलट अंधश्रद्धांच्या विरोधात प्रबोधन करावे असेही पुढे म्हटले आहे. निवेदनावर राज्य प्रधान सचिव डॉ टी आर गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.