रेवण्णांच्या निमित्ताने नवी शोषणगाथा
दखल श्रीनिवास राव व्हाईट कॉलर पिता-पुत्र, असहाय्य मुली आणि अनेक अश्लील व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह… देशभरात खळबळ माजवणार्या या कथेचे खलनायक आहेत माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे चिरंजीव एच. डी. रेवण्णा…
दखल श्रीनिवास राव व्हाईट कॉलर पिता-पुत्र, असहाय्य मुली आणि अनेक अश्लील व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह… देशभरात खळबळ माजवणार्या या कथेचे खलनायक आहेत माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे चिरंजीव एच. डी. रेवण्णा…
विमा नियामक प्राधिकरणा (इर्डा) ने नुकतेच आरोग्य विम्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यानंतर विमा क्षेत्रात काही बदल होऊ शकतात. त्याचा परिणाम भविष्यात विम्याच्या हप्त्यावर दिसू शकतो. नवीन नियमानुसार आता…
देशातील अब्जाधीशांमध्ये दुसर्या क्रमांकावर असलेल्या गौतम अदानी यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने शेअर्समध्ये फेरफार केल्याच्या आरोपानंतर गेल्या वर्षी समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. आता…
भारताचे लष्करी समर्थ सामर्थ्य हे जसे वाढते आहे, तसेच आंतरराष्ट्रीय जगतात देखील भारताची पत वाढते आहे. १९४७ पासून काश्मीरचा काही भूभाग पाकिस्तानने बळकावून ठेवलेला आहे. आज भारत तो परत घेऊ…
समन्वयकांची भूमिका म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका नाही -रामदास शेवाळे पनवेल : समन्वयकांची भूमिका म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका नाही, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील काही मराठा समन्वयकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा समस्त मराठा समाजाला विश्वासात न घेता दिला असल्याने तो समाज म्हणून आम्हाला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे नेते रामदास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. सकल मराठा समाजाच्या वतीने कुठलाही पाठिंबा राजकीय पक्षांना देण्यात आला नाही. समाजात कोणतीही दुफळी होऊ नये, त्यामुळे हा निर्णय आहे मात्र काही लोकं स्वार्थापोटी असे करत असेल तर ती चुकीचं आहे, त्यामुळे सकल मराठा समाज म्हणून दिलेला पाठिंबा मान्य नाही, असे स्पष्ट मत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मराठा समाजाच्यावतीने व्यक्त केले. यावेळी मराठा समाजाचे बाळासाहेब पाटील, चंद्रकांत सावंत, दिपक पाटील, केदार भगत, समीर कदम, हर्षवर्धन पाटील, डाॅ.प्रशांत कदम, सुभाष कदम, शिवाजी थोरवे, सचिन भगत, राजेंद्र भगत, विकास वारदे, प्रदीप देशमुख, तेजस जाधव, सोनल कदम, स्नेहल बागल, स्वरूपा सुर्वे, अॅड.प्रशांत भिलारे, कुमार भगत, सुमित दसवते, नितेश भगत, सत्यजित भगत, भावेश शिंदे,भरत जाधव, किरण नागरगोजे, अवधूत साळुंखे, रावसाहेब आभाळे, रघुनाथ काळे, अशोक जाधव, निलेश दिसले,गोरख नाईकआदींसह शेकडो मराठा बांधव उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी खोपोली येथे काही मोजक्याच मराठा समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी परस्पर कोणालाही विचारात न घेता सकल मराठा समाजाचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते.या निर्णयाला मराठा समाजातीलच बांधवांनी विरोध केला आहे. यावेळी बोलताना रामदास शेवाळे यांनी, मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना सुध्दा विश्वासात न घेता काही नेते कोणताही निर्णय घेत असतील तर तो निर्णय समाज बांधवांसाठी घातक ठरण्याची जास्त शक्यता आहे. आणि हजारो मराठा बांधवांनी या निर्णयाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. काही मोजक्या समन्वयकांनी घेतलेला निर्णय समस्त मराठा समाजाला न पटणारा आहे. निर्णय घेण्याआधी संपूर्ण मराठा समाजाची बैठक घेणे गरजेचे होते. महायुतीने जे काम मराठा आरक्षणासाठी केले आहे ते आधी कोणीच केले नाही. वाशी येथे झालेल्या विजयोत्सवात तसे स्पष्ट दिसत होते. तर बाळासाहेब पाटील यांनी बोलताना, महायुती ने मराठा समाजासाठी जे काम केले आहे ते महाविकास आघाडीकडून तसूभरही झाले नाही. १० टक्के आरक्षण महायुतीकडून देण्यात आले.कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचे काम देखील फक्त महायुतीकडून झाले.त्यामुळे लाखो समाज बांधवांना याचा लाभ होणार आहे. सगेसोयरे हा विषय लवकरच सोडवला जाईल अशी आशा असून कोर्टात आरक्षण टिकवण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे मराठा समाजाने संभ्रमात न राहता देशासाठी आपल्याला मतदान करायचे आहे असे समजून मतदान करावे. तर मराठा आरक्षण समन्वय समिती सरचिटणीस चंद्रकांत सावंत यांनी, सकल मराठा समाजात ४०० समन्वयक आहेत.त्यातील काही जण मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत फोटो काढून स्वतःच जरांगे-पाटील असल्याचे भासवत आहेत.त्यामुळे अशांची भूमिका ही सकल मराठा समाजाची भूमिका आहे असे कोणी समजू नये असे सांगत मराठा समाज कोणाच्या बाजूने आहे ते ०४ जूनला समजेल असे ते शेवटी म्हणाले.
अनिल ठाणेकर ठाणे : शेतमालाला हमी भाव मिळण्याची गरज आहेच, त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पध्दतीने पिकवलेले धान्य, भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना थेट मिळावीत, आणि त्यासाठी दलालाची फळी तोडून ग्राहक आणि शेतकरी यांच्यात हा पूल या महोत्सवाच्या माध्यमातून तयार होईल, असा विश्वास प्रसिध्द अभिनेते व नाम फाऊडेंशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच, संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने १ ते १२ मे दरम्यान ठाण्यातील गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतमालाला हमी भाव मिळण्याची गरज आहेच, त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पध्दतीने पिकवलेले धान्य, भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना थेट मिळावीत, आणि त्यासाठी दलालाची फळी तोडून ग्राहक आणि शेतकरी यांच्यात हा पूल या महोत्सवाच्या माध्यमातून तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांशी यानिमित्ताने संवाद होतो, त्यांच्या समस्या जाणून घेता येतात, यासाठी गेली १२ वर्षे मी या महोत्सवाला भेट देत असल्याचे मकरंद अनासपुरे म्हणाले. गेल्या ५ वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याने शेतकर्यांना सुलतानी नाही तर अस्मानी संकटाचाही सामना करावा लागतो आहे, गेल्या २- ३ कोकणात आलेल्या मोठ्या वादळांचा सामना कोकणातील शेतकऱ्यांनी केला आहे, मात्र अशा अस्मानी संकटांनी कोकणातील शेतकरी मोडून पडत नाहीत, ते पुन्हा उभे रहातात, आणि जोमाने कामाला लागतात, त्यामुळे मला कोकणच्या शेतकऱ्यांचे कौतुक वाटते असे मकरंद अनासपुरे यांनी केले. संस्कार संस्थेचे अध्यक्ष व आंबा महोत्सवाचे संयोजक आमदार संजय केळकर यांच्यासह मकरंद अनासपुरे यांनी या महोत्सवास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कोकणातील भूमिपुत्रांच्या आंब्याना शहरात बाजारपेठ मिळावी, यासाठी आमदार संजय केळकर हा महोत्सव गेली कित्येक वर्ष भरवत आहे, नाम फाऊडेंशनची सुरवात होती, तेव्हा मराठवाड्याच्या शेतकर्यांच्या धान्याचे स्टॉल या महोत्सवात लावू द्यावेत, अशी मागणी आमदार केळकर यांच्याकडे केली होती, त्यावेळी त्यांनी या महोत्सवात मराठवाड्यातल्या शेतकर्यांचे १५ स्टॉल लावले होते, १० दिवसात २५ टन धान्यांची विक्री झाल्याची आठवण अनासपुरे यांनी सांगितली. शेतकर्यांना, भूमिपुत्रांना न्याय मिळावा, यासाठी आमदार केळकर यांची धडपड सुरू असते, या महोत्सवात विक्रीसाठी येणारा आंबा हा नैसर्गिक, सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला दर्जेदार असतो. या महोत्सवाच्या माध्यमातून , इंडिया विरूध्द भारत यांच्यातील पुल सांधण्यासाठी असे महोत्सव गरजेचे आहे, असे मत अनासपुरे यांनी व्यक्त केले. मी स्वतः ग्रामीण भागातून शहरात आलो आहे, त्यामुळे मला माझ्या गावकडचे धान्य,नैसर्गिक पध्दतीने पिकवलेले फळे मला शहरात मिळावीत, याचा शोध मी घेत असतो, त्यामुळे नैसर्गिक, सेंद्रिय पध्दतीने पिकवलेल्या या शेतमालासाठी एकत्रित असे व्यासपीठ, बाजारपेठ असावी, ती बाजारपेठ आमदार केळकर ठाणेकरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. कोकणातील राजापूर, चिपळूण मध्ये आलेल्या महापूराने खूप नुकसान झाले होते, त्यावेळी नाम फाऊडेंशनने केवळ मदतच पोहचवली नाही तर जगबुडी, वशिष्ठी,गोदवली यासारख्या नद्यातील गाळ नाम फाऊडेंशनचे संस्थापक नाना पाटेकर यांच्या मार्गदर्शनखाली काढण्याचे खूप मोठे काम नाम फाऊडेंशनने केले, त्यामुळे आता तिथे परिस्थिती सुधारत असल्याचे अनासपुरे यांनी नमूद केले. सजग नागरिकांनी या महोत्सवाला भेट देवून शेतकर्यांच्या या चळवळीला हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. या महोत्सवातील आंबा हा सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला आहे, या महोत्सवातील आंबा हा थेट शेतकऱ्यांच्या शेतातला,अढीतला आहे, त्यामुळे दर्जेदार आंबा आहे, १२ मे पर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवाला आवर्जून भेट देवून शेतकर्यांच्या चळवळीला पाठिंबा द्यावा. असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. यावेळी कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, परिवहन सदस्य विकास पाटील, सुनील लोखंडे उपस्थित होते.
कपिल पाटील यांच्या रॅलीला शहापूरात उत्स्फूर्त प्रतिसाद शहापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या रॅलीला शहापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहापूर शहरात काढलेल्या भव्य रॅलीने शहापूर शहर…
अनिल ठाणेकर ठाणे : मुरबाड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत सोमवारी, ५ मे ला श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिराचा संकोच विधी संपन्न झाला. स्थानिक आमदार .किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून आणि अविरत प्रयत्नाने मुरबाड तालुक्यातील ऐतिहासिक,सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र संगमेश्वर येथील भगवान शंकर मंदिराचा जिर्णोद्धार आणि मंदिर परीसराचे सुशोभिकरण कामाचे भुमीपुजन काही काळापुर्वी संपन्न झाले होते. मंदिर जिर्णोद्धारावेळी विविध धार्मिक विधी करण्यात येतात,त्यापैकीच एक विधी म्हणजे संकोच विधी होय. सोमवारी, ५ मे २०२४ रोजी श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिराचा संकोच विधी संपन्न झाला. याप्रसंगी आमदार किसन कथोरे आवर्जुन उपस्थित राहिले आणि त्यांनी भगवान महादेवांचे मनोभावे दर्शन घेतले.
ठाणे : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब अजमावू पाहत आहेत. त्यात अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात ७९…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दोन अर्ज भरले होते. त्यापैकी एक अपक्ष तर दुसरा काँग्रेसच्या नावाने भरला होता. परंतु काँग्रेसकडुन अधिकृत उमेदवारी मिळून…