Author: bittambatami.com

कोकण रेल्वेची विलंबयात्रा… मतदानाला पोहोचण्याबाबत शंका!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी मुंबईस्थित बहुसंख्य कोकणवासीय गावी निघाले आहेत. मात्र कोकण रेल्वेवर असलेला मेगा ब्लॉक आणि रेल्वे गाड्यांची सातत्याने विलंबयात्रा यामुळे मतदानासाठी वेळेवर पोहोचणार का, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. नियमित आणि विशेष रेल्वे गाड्या किमान दोन-तीन तास उशिरा असून एलटीटी ते थिवीम विशेष गाडी तर ११ तास विलंबाने धावली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त कोकणात मूळ गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यात तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडमध्ये मंगळवारी मतदान झाल्याने  मुंबईतील कोकणवासीय गावाकडे निघाले. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून गाड्यांना गर्दी वाढली आहे. मात्र सततच्या विलंबाने प्रवासी हैराण झाले.  कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्याने मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी गावी पोहोचण्यासाठी मतदारांना तारेवरची कसरत करावी लागली. एलटीटीवरून ४ मे रोजी रात्री १०.१५ वाजता सुटणारी गाडी ५ मे रोजी सकाळी ७.२४ वाजता सुटली. त्यानंतर पुढील प्रवास प्रचंड रखडत सुरू असल्याने थिवीम येथे रात्री ९ वाजता पोहोचली. ५ मे रोजीची सीएसएमटी ते मडगाव कोकणकन्या १ तास १० मिनिटे, सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस ३२ मिनिटे, दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ५३ मिनिटे, एलटीटी ते थिवीम १ तास २६ मिनिटे उशिराने धावल्या. केवळ एकच विशेष गाडी… मध्य रेल्वेने सोमवारी मुंबईतील टर्मिनसऐवजी पनवेलहून सावंतवाडीसाठी एकच विशेष रेल्वे गाडी सोडली. ही गाडी रत्नागिरीला रात्री १२ वाजता तर राजापुरात रात्री २ वाजता पोहोचेल. त्यामुळे पुढे गावापर्यंत प्रवास कसा करायचा, हा प्रश्न प्रवाशांना पडला. एसटीने एक लाख मतदार रवाना एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला या आगारांतून कोकणात जाण्यासाठी विशेष बसदेखील चालवण्यात आल्या. रायगड, रत्नागिरी या भागात सर्वाधिक बस धावल्या. ५ मे रोजी २४४ नियमित बस चालवण्यात आल्या, तर आठ जादा बस चालवण्यात आल्या. या बसद्वारे ४४,६०० प्रवाशांनी प्रवास केला. ६ मे रोजी २५० नियमित बस आणि आठ जादा बस सोडण्यात आल्या. त्यातून ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला.

जप्त मालमत्तांकडे खरेदीदारांची पाठ

मागील दहा वर्षात थकबाकीदारांच्या कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत लाखो रुपयांच्या मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचे विहित प्रक्रिया पूर्ण करून लिलाव जाहीर केले होते. कोट्यवधी रूपये पालिकेला या लिलावातून मिळणार होते. परंतु, गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत अशाप्रकारे जाहीर करण्यात आलेल्या लिलाव बोलीतील एकाही थकबाकीदाराची मालमत्ता विकली गेली नसल्याची पालिकेच्या अभिलेखातील धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून उघडकीला आली आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करायच्या असतील तर त्यासाठी पालिकेचा मालमत्ता कर विभाग संबंधिताला पहिले नोटिसा पाठवून थकीत रक्कम भरणा करण्याचे सूचित करतो. अशाप्रकारे तीन नोटिसा पाठविल्यानंतर संबंधित थकबाकीदाराने मालमत्ता कर थकबाकी भरणा केली नाही तर पालिका त्या मालमत्ता जप्त करते. अशा अनेक थकबाकीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्यानंतर पालिका प्रसिध्द वर्तमानपत्रात या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्याची आणि त्यांचा लिलाव जाहीर करते. या जाहिरातींसाठी पालिका लाखो रुपये खर्च करते. या मालमत्ता नागरिकांनी खरेदी कराव्यात म्हणून जनजागृती करते. मालमत्ता विक्रीला न गेल्याने पालिकेने खर्च केलेला सगळा पैसा फुकट जातो, असे माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी सांगितले. मागील १५ ते २० वर्षाच्या काळात थकबाकीदार कर मालमत्ताधारकांकडे पालिकेची सुमारे पंधराशे कोटीहून अधिकची रक्कम होती. या रकमा वेळोवेळी पालिकेने अभय योजना, विविध प्रकारच्या क्लृप्त्या करून थकबाकीदारांकडून वसूल केली आहे. ही रक्कम आता सुमारे चारशे ते पाचशे कोटीच्या आसपास आहे. थकबाकीदार कर भरणा करत नाहीत मात्र पालिका पुरवत असलेल्या पाणी, रस्ते आणि इतर सुविधांचा लाभ घेतात. गेल्या महिन्यापूर्वी पालिकेने अनेक वर्ष कर भरणा न करणाऱ्या २७ कर थकबाकीदारांच्या ११४ कोटीच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव जाहीर गेला होता. या मालमत्ता विक्रीतून पालिकेला सुमारे सहाशे कोटीहून अधिकची रक्कम बाजारभावाप्रमाणे मिळणार होती. परंतु, पालिकेने हा लिलाव अचानक रद्द केला. त्यामुळे थकबाकीदारांनी समाधान व्यक्त करून पालिकेला या लिलाव प्रक्रियेसाठी केलेला खर्च वाया गेला, असे तक्रारदार कुलकर्णी यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात पालिकेने किती मालमत्तांचे लिलाव केले. किती मालमत्ता विक्रीला गेल्या, अशाप्रकारची माहिती मनोज कुलकर्णी यांनी कर विभागाकडून मागवली होती. त्यावेळी कर विभागाचे साहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी लिलाव प्रक्रियेव्दारे मिळकती विकल्या गेल्या नाहीत, असे उत्तर दिले आहे. या मालमत्तांंचे पुढे पालिकेने काय केले, थकित रकमा पालिकेने वसूल केल्या आहेत का, असे प्रश्न कुलकर्णी यांनी केले आहेत. राजकीय दबाव आणून बडे थकबाकीदार पालिका अधिकाऱ्यांना असे लिलाव रद्द करण्यास किंवा त्यांच्या जप्त मालमत्ता कोणी खरेदी करू नये म्हणून ‘व्यवस्था’ करतात, असे समजते.

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ‘ब’ संघ उपांत्य फेरीत

ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धा ठाणे : गतविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने बेनेटन क्रिकेट क्लबचा एक गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे…

किरण सामंतांना सुरक्षा द्यावी-वैभव नाईक

रत्नागिरी : किरण सामंत हे आज सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार  माध्यमांवर आल्या आहेत. कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीने कायम डोके वर काढले आहे. ही दहशतवादी प्रवृत्ती आज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना…

किरण सामंत अन् १५ मिनिटे

सिंधुदुर्ग : सामंत बंधूमधिल नाराजी नाट्य आज मतदानाच्या दिवशी पुन्हा एकदा दिसून आले. राणेंच्या एवेजी या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उत्सुक होते. पण एनवेळी शिवसेनेची ही…

पालघर मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी आज मुंबईत दादर येथील वसंतस्मृती येथे डीसीएम देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

‘दोन सुरतवाले’ छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायेत-ठाकरे

धुळे : दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ मात्र जर कोणी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्यावर वाघ नखं बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, मोदी सरकार थापेबाज सरकार आहे. थापेबाज सरकारला पुन्हा…

मतांच्या लाचारीमुळे ठाकरे गप्प बसले- फडणवीस

मुंबई : हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पाकिस्तानचीच भाषा बोलतायत. वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल करीत मतांच्या लाचारीमुळे ठाकरे गप्प बसले आहेत अशी…

काँग्रेसचा ‘मिशन कॅन्सल’ हाणून पाडा – नरेंद्र मोदी

बीड : सत्ता मिळाली तर कलम 370 पुन्हा स्थापित करणार, मोदी सरकारने आणलेला सीएए कायदा रद्द करणार, मोदी सरकारने तिहेरी तलाक प्रथेविरुद्ध आणलेला कायदा रद्द करणार आणि किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना मिळणारा निधी रद्द करणार, मोफत धान्य…

मतदार राजा भडकला

माढ्यात ईव्हीएम पेटवले, सोलापुरात हतोड्याने फोडले मुंबई: सर्वपक्षीय राजकारण्यांच्या आश्वासनामुळे निराश झालेला तरुण मतदार राजा भडकल्याचे आज पुन्हा पहायला मिळाले. महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान माढा लोकसभा मतदार संघात एका तरुणाने चक्क…