Author: bittambatami.com

शिळफाट्याचा प्रवास आता आणखी सुसाट!

शिळफाटा उड्डाणपूलाच्या आणखी तीन मार्गिका सेवेत ठाणे : ह. भ. प. संत सावळाराम महाराज कल्याण शीळ मार्गावरून कल्याण, डोंबिवली ते ठाणे, नवी मुंबई प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. या मार्गावरील शिळफाटा येथील उड्डाणपुलाच्या आणखी तीन मार्गिका नुकत्याच खुल्या करण्यात आल्या आहेत. या मार्गिकांमुळे शिळफाटा चौकातला प्रवास अधिक वेगवान झाला आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापुरातून ठाणे, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर तसेच आसपासच्या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ठाणे, नवी मुंबईला जाण्यासाठी ह. भ. प. संत सावळाराम महाराज कल्याण शीळ मार्ग हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मागील वर्षी या रस्त्याचे सहा पदरीकरण करून येथील वाहनचालकांना दिलासा देण्यात आला होता. तर या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होण्यासाठी या मार्गावरील पुढील टप्पा असलेल्या मुंब्रा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील शिळफाटा जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या सहा पदरी उड्डाणपुलाच्या उर्वरित सहा मार्गिका आता खुल्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका खुल्या करण्यात आल्या होत्या, ज्यावरून दोन्ही बाजूंची वाहतूक होत होती. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या उड्डाणपुलामुळे बदलापूर ते डोंबिवली येथून कल्याण शीळ मार्गे ठाणे आणि नवी मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळणार असून अधिक वेगवान प्रवास करता येणार आहे. यामुळे वाहन चालकांच्या वेळेची आणि इंधनाचीही बचत होणार आहे. शीळफाटा सहापदरी उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये : – एमएमआरडीएच्या माध्यमातून ११९ कोटी रुपयांच्या निधीतून पुलाची या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. – ७४० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद असा हा उड्डाणपूल आहे. – या पुलामुळे शिळफाट्याची वाहतूक कोंडीची समस्या कायमची मार्गी लागली आहे.

30 वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि मार्गदर्शक सूचनांसह जाहीर आवाहन

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील विद्यमान इमारतींचे विभागनिहाय सर्वेक्षण करुन सदर इमारत धोकादायक असल्यास पावसाळयापूर्वी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 264 अन्वये प्रवर्गनिहाय धोकादायक म्हणून घोषित करण्यात येतात. सी-1 प्रवर्गातील इमारती या मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिकाम्या करणेबाबत त्या त्या सहकारी गृहनिर्माण संस्थाना नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात येते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 265(अ) नुसार  ज्या इमारतींचा वापर सुरु होऊन 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट संबंधित गृहनिर्माण संस्थेने एक वर्षाच्या मुदतीच्या आत नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडून करुन घेणे अनिवार्य आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम 1968 अन्वये शासनाने जारी केलेल्या मॉडेल बाय-लॉ मधील मुद्दा क्र.75 (अ)(i) नुसार इमारतीचे आयुर्मान 15 ते 30 वर्षांचे दरम्यान असल्यास किमान 5 वर्षातून एकदा तसेच 75 (अ)(ii) नुसार  इमारतीचे आयुर्मान 30 वर्षापेक्षा जास्त असल्यास किमान 3 वर्षातून एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेणे अनिवार्य आहे. सदर स्ट्रक्चरल ऑडिट हे महानगरपालिकांमध्ये नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडूनच करुन घेणे बाबतची तरतूद आहे. त्यास अनुसरून संबंधित सोसायटीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. याबाबतची दक्षता ही सोसायटीचे अध्यक्ष / सचिव यांनी घेणे आवश्यक आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नजिकच्या काळात विदयमान इमारतींमधील सदनिकांमध्ये अंतर्गत फेरबदलाची कामे – ज्यामध्ये लाद्या (Flooring) बदलणे, अंतर्गत असलेले आरसीसी कॉलम / बीम यांची दुरुस्ती करताना सदर सदनिकेच्या फ्लोअरिंगचा स्लॅब खालच्या मजल्यावर कोसळण्याच्या घटना यापूर्वी नेरुळ, सेक्टर 17 येथील जिमी टॉवर सहकारी गृहनिर्माण संस्था, सेक्टर 06 येथील तुलसी भवन, तसेच सन 2016 मध्ये अशाच प्रकारच्या अपघाताने जिवित हानी झालेली असल्याच्या घटना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये  घडलेल्या आहेत. त्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की, नवी मुंबई महानगरपालिकेस लागू असलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील तरतुदी विचारात घेता – इमारतींच्या रहिवास तथा वाणिज्य वापराच्या इमारतींमधील वरच्या मजल्यावरील गाळयांमध्ये अंतर्गत वा बाह्य भागात दुरुस्ती / स्ट्रेंग्थनींग करणेसाठी परवानगी प्राप्त करण्याची आवश्यकता असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचे प्रमाणपत्रासह नियमानुसार वास्तुविशारदामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी प्राप्त करुन घेऊन त्यांचे देखरेखीखाली अशी कामे करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या बाबींकरीता नियमावलीतील तरतुदीनुसार अंतर्गत फेरबदलाचे काम करताना परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. अशा बाबतीत सदर काम करताना नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचे देखरेखीखालीच करण्यात यावे. तसेच सदर काम करतेवेळी संबंधित सदनिका / वाणिज्य वापराच्या गाळेधारकांनी संबंधित सोसायटीस अवगत करणे आवश्यक असून संबंधित सोसायटीने सदर काम हे नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचे देखरेखीखाली होत असल्याची खात्री करावी. भविष्यात विद्यमान इमारतींमध्ये दुरुस्तीच्या कामांमुळे काही दुर्घटना घडल्यास त्यास संबंधित सदनिका / वाणिज्य वापराचे गाळेधारक यांना व सोसायटीचे अध्यक्ष / सचिव यांनादेखील जबाबदार धरण्यात येईल. जेणेकरून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यापूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. याची कृपया नोंद घेणेबाबत याव्दारे नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

नरेश म्हस्के यांनी घेतली नाराज गणेश नाईक यांची भेट !

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे लोकसभेतील महायुती पुरस्कृत शिवसेना शिंदेगटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी नाराज भाजप नेते गणेश नाईक यांची मंगळवारी तातडीने सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार व नवीमुंबई भाजपचे अध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक उपस्थित होते. माजी खासदार संजीव नाईक हे ठाणे लोकसभेतुन निवडणूक लढविण्यास उत्सुक होते. तिकीट मिळेल हे गृहीत धरुन संजीव नाईक यांनी ठाणे लोकसभेतुन निवडणूक प्रचारही सुरु केला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेसाठीआग्रही होते. तर संजीव नाईक यांच्यासाठी भाजप अत्यंत आग्रही होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप व शिवसेना शिंदेगटात ठाणे लोकसभा जागावाटपावरुन दोन्हीकडे रस्सीखेच सुरु होती. अखेर पालघर लोकसभेची जागा शिवसेना शिंदेगटाकडून घेऊन ठाणे लोकसभेची जागा शिवसेना शिंदेगटाला भाजपने सोडली पण यामुळे ठाणे लोकसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्ते अतिशय नाराज झाले होते. नवीमुंबई व मिराभाईंदर येथील नाईक समर्थक ४०० भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी या नाराजीतुन पक्षाकडे राजीनामे सोपविले होते. तर भाजप नेते गणेश नाईक यांनीही, प्रेमाने दिलेला पक्ष आदेश स्वीकारू पण आपल्याला तंबी देणारा जन्माला आलेला नाही, असे ठणकावून आपली नाराजी उघड केली होती. ठाण्यात सोमवारी झालेला टीपटाॅप प्लाझा येथील ठाणे लोकसभेतील पदाधिकारी मेळाव्यातही गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह नवीमुंबई व मिराभाईंदर येथील नाईक समर्थकांनी गैरहजर राहून आपली नाराजी उघड केली होती. यामुळेच नरेश म्हस्के यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी व नाराजी दूर करण्याकरिता तातडीने राज्याचे माजी मंत्री व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार गणेश नाईक यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत निवडणुकीच्या अनुषंगाने नरेश म्हस्के आणि गणेश नाईक यांच्यात चर्चा झाली. प्रचारसभा, चौकसभा, जाहीरसभेबरोबरच घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचे निर्णय पोहोचविले पाहिजेत, अबकी बार ४०० पार खासदार निवडून यायलाच हवेत, अशी गणेश नाईक यांच्यासोबत चर्चा झाल्याचे व निवडणुकीतील विजयासाठी गणेश नाईक यांनी आपल्याला आशीर्वाद दिल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली.

भय संपलेले नाही…

पैलू उर्मिला राजोपाध्ये जगातील अनेक कंपन्यांनी कोविडची लस बनवली. त्यापैकी ‘एस्ट्राजेनेका’ ही एक कंपनी होती. ‘कोविशिल्ड’ नावाची कोरोना प्रतिबंधक लस तयार करणार्‍या याच कंपनीने नुकतेच आपल्याकडून निर्मित लसीमुळे लोकांवर काही…

बदलत्या हवामानाचा परिणाम

विशेष रमेश कृष्णराव लांजेवार राज्यात फक्त २८ टक्के जलसाठा; पाणीटंचाईचे संकट भीषण उन्हाचे चटके चोहोबाजूंनी जाणवू लागले असतानाच राज्यात लघु,मध्यम व मोठ्या प्रकल्पात एप्रिलमध्ये ३८ टक्के जलसाठा होता आणि आता…

विजयभाऊ.. हे वागणं बरं नव्हं..!

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी अजमल कसाबच्या गोळीने झाला नव्हता, तर दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला…

शिंदेंच्याआधी म्हस्के गद्दारी करणार होता- राजन विचारे

ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या आधी हा नरेश म्हस्के गद्दारी करणार होता. त्यावेळी म्हस्के काँग्रेसमध्ये जात होता, शिवाजी मैदानमध्ये त्याचा प्रवेश होता. उद्धव ठाकरे म्हणाले म्हणून त्याला मी थांबवलं. मी तुमच्यासारखा गद्दार नाही, मला…

एकच वादा ‘सुर्या’ दादा

स्टंप व्हीजन स्वाती घोसाळकर अखेर मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर अपेक्षित विजय मिळवता आला. सूर्याच्या घणाघाती शतकामुळे मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैराबादविरुद्ध ७ विकेट्सनी विजय मिळवला. तर दुसरीकडे हैदराबादला मात्र आता बाद फेरी…

अजित पवार, शिंदेंच्या पक्षाचे अस्तित्व निवडणूकीनंतर संपेल

पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी ० साताऱ्यात उदयनराजे दिड लाखाच्या मताने पडणार ० बारामतीत सुप्रीया सुळे जिंकणार ० लोकसभा निवडणूकीनंतर अजित पवार शिंदेंच्या पक्षाचे अस्तित्व संपणार कराड – लोकसभा निवडणुकीनंतर अजित…