चांदवडनजीक भीषण बस अपघात
नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव-चांदवड दरम्यान सकाळी पावणे दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही बस जळगावहून वसईकडे निघाली…
नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव-चांदवड दरम्यान सकाळी पावणे दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही बस जळगावहून वसईकडे निघाली…
लातूर : काँग्रेसच्या ‘कातील पंजाची’ नजर आता तुमच्या आजच्या संपत्तीवरच नाही तर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी सोडून जाणाऱ्या संपत्तीवरही आहे. जर तुमच्याकडे दहा एकर शेती असेल तर त्यातील पाच एकर शेती काँग्रेस हडपणार आणि त्यांच्या व्होट…
शरद पवरांचा मोदींवर पलटवार शिरुर: पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे. एकेकाळी माझे कौतुक करताना त्यांना माझे बोट धरून राजकारणात आलो होतो असे अभिमानाने सांगितले होते मात्र, आता ते बोलत आहेत…
छत्तीसगढ : छत्तीसगडमधिल अबुझमाड मध्ये सुरक्षा दलानी दहा माओवाद्यांचा चकमकीत खात्मा केला आहे. मृतांच्या संखेत आणखी वाढ होण्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांकडून व्यक्त करण्यात आलीय. या चकमकीत घटनास्थळी ३ महिलांसह एकूण १० माओवाद्यांचे मृतदेह…
इंडिया आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल. (छाया-संतोष नागवेकर) मुंबई: भाजपाने मुंबईच्या अस्मितेवर घाला घातला आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी मुंबईतील महत्वाचे उद्योग व संस्था दुसरीकडे…
शिंदे गटाकडून मुंबईतील उमेदवारांची घोषणा मुंबई : दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव तर वायव्य मुंबईतून रविंद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. यामिनी जाधव या दक्षिण मुंबईत…
रत्नागिरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उप जिल्हाधिकारी मारुती बोरकर, रोहयो उप जिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनीही अभिवादन केले.
तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर संवाद ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात सोमवारी तीन विधानसभा मतदारसंघांची क्लस्टर बैठक घेतली. या बैठकीत पदाधिकारी, बूथ प्रमुख व सुपर वॉरियर्सबरोबर थेट संवाद साधून लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शहरातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण जागेवर महायुतीच्या विजयासाठी रणनीती आखली जात आहे. त्यानुसार भाजपाकडून नियोजन केले जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मिरा भाईंदर, ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील बूथप्रमुख व सुपर वॉरियर्सची बैठक घेतली. या बैठकीत भाजपाच्या संघटनात्मक स्थितीबरोबरच बूथनिहाय परिस्थितीची माहिती घेण्यात आली. भाजपाच्या ठाणे येथील विभागीय कार्यालयात भाजपाचे नेते रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ठाणे लोकसभा मतदारसंघ प्रमुख व माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, नरेंद्र मेहता, विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सुभाष काळे व मनोहर डुंबरे, मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, विलास साठे, डॉ. समीरा भारती यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी घरोघरी संपर्क साधावा. आयुष्मान योजनेत ७० वर्षांवरील नागरिकांच्या सहभागासाठी फॉर्म भरून घेणे, ८५ वर्षांवरील मतदार व दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करावी, लाभार्थींबरोबर संपर्क साधावा,आदी सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केल्या.
डोंबिवली: डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील सर्वाधिक वर्दळीचे रस्ते सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आल्याने जागोजागी वाहन कोंडी आणि या कोंडीने नागरिक हैराण आहेत. या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी नागरिक पर्यायी रस्त्यांचा अवलंब करतात. हे रस्तेही खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना मागे फिरल्यानंतर पुन्हा कोंडीचा सामना करावा लागतो. डोंबिवली पूर्व भागातील टिळक रस्ता, सावरकर रस्ता, आगरकर रस्ता सेवा वाहिन्या टाकणाऱ्या ठेकेदाराने खोदून ठेवले आहेत. अचानक एकावेळी सर्वाधिक वर्दळीचे रस्ते ठेकेदाराने खोदून ठेवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. फोर जी केबल वाहिन्या, महानगर गॅसच्या भूमिगत वाहिन्या आणि इतर कंपन्यांच्या सेवा वाहिन्या टाकण्याची कामे यावेळी केली जात आहेत. टिळक रस्त्यावर खोदकाम करून रस्त्याच्या कडेला मातीचे ढीग आहेत. या अरूंद रस्त्यावर दररोज सकाळ, संध्याकाळी वाहनांची कोंडी होते. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडे येणारी सर्व वाहने याच रस्त्याने येतात. या रस्त्यावरील कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी नागरिक पर्यायी रस्ते म्हणून आगरकर रस्ता, सावरकर रस्ता भागातून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी सावरकर रस्त्यावरील भूषण सोसायटी आणि कर्वे यांच्या बंगल्या समोर रस्ता मध्यभागी खोदून ठेवण्यात आला आहे. याठिकाणी एक बँक आहे. सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कार्यालय या रस्त्यावर आहे. त्यामुळे हा रस्ता खोदल्याने या रस्त्यावर दररोज कोंडी होते. फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांंचे यामध्ये सर्वाधिक हाल होत आहेत. आगरकर रस्त्यावर आगरकर सभागृहा समोरील रस्ता, याच रस्त्यावरील गॅस वितरक अतुल देसाई यांच्या कार्यालया समोरील रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. नवखा वाहन चालक रस्त्यावर आला की तो या कोंडीत अडकतो. रस्ते खोदाई करताना परिसरातील सोसायटी चालकांंना कोणतीही पूर्वसूचना ठेकेदाराने न दिल्याने काही वाहन चालकांची वाहने सोसायटीच्या आवारात अडकून पडल्याच्या तक्रारी आहेत. पालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही रस्त्यांच्या चरी आणि काँँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी नागरिकांंकडून केली जात आहे. कोट डोंबिवली पूर्वेत ज्या रस्त्यांवर खोदकाम केले आहे. त्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण प्रस्तावित आहे. त्यामुळे या रस्त्यांवर सेवावाहिन्या टाकून घेण्याची कामे करून घेतली जात आहेत. रस्ते खोदकाम, चऱ्या भरण्याची कामे २० मे पूर्वी पूर्ण केली जाणार आहेत. मंगेश सांगळे (कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, डोंबिवली)
एक लाखाहून अधिक किमतीची तिकिटे जप्त कल्याण : टिटवाळा जवळील बनेली गाव येथे रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका पाच मध्यस्थांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी सोमवारी छापा टाकून अटक केली. या टोळीकडून एक लाख १६ हजाराची लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसची ४८ ई रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. टिटवाळ्या जवळील बनेली गावात काही रेल्वेचे एजंट लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ई तिकिटांचा काळाबाजार करत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांना गुप्तरित्या कळली होती. या माहितीची सत्यता तपासून झाल्यावर सोमवारी रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, तपासणी विभाग अशा विविध विभागाच्या पाच पथकांनी अचानक टिटवाळा बनेली येथे रेल्वे एजंटच्या कार्यालयावर छापा मारला. तेथे सुरू असलेला काळाबाजार थांबविला. या कारवाईत मोहम्मद जावेद आलम अली अन्सारी (३३, रा. राजेश्वरी रेसिडेन्सी, बनेली, टिटवाळा), अफरोज आलम वजाहत अली (२९, रा. मंजिल राजेश्वरी, बनेली, टिटवाळा), जैद हैद्दर सिद्दीकी (२७, रा. वायले चाळ, टिटवाळा), मोहम्मद सलमान मन्नान (२३, रा. आम्रपाली इमारत, बनेली), अब्दुल सलाम मोमीन (२४, रा. ओमिया रेसिडेन्सी, बनेली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन हजार रूपये ते ५० हजार रूपयांपर्यंत रेल्वेची ई तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. ही तिकिटे ते काळ्या बाजारात प्रवाशांना विकत होते. या कारवाईमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारी एक मोठी टोळी कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. या टोळीने आतापर्यंत किती तिकिटांचा काळाबाजार केला आहे याचा तपास पोलीस करत आहेत.