Author: bittambatami.com

 जोरदार पावसाने वंदे भारत एक्स्प्रेस रद्द रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले

    मुंबई : ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने, अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य रेल्वेच्या आटगाव-तानशेत दरम्यान भूस्खलन झाल्याने, रेल्वे रुळावर चिखल-मातीचा…

ई रिक्षाच्या सेवेमुळे माथेरानची विकासाकडे वाटचाल !

  स्थानिकांच्या रोजगारात भर ; व्यावसायिकांमध्ये समाधान       माथेरान : माथेरान अंतर्गत वाहतुकीची गहन समस्या ई रिक्षाच्या माध्यमातून पूर्णत्वास जात असून स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने ई रिक्षा…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला माताभगिनींनी दिला उत्फुर्त प्रतिसाद – आनंद परांजपे

    अनिल ठाणेकर     ठाणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स, विवियाना मॉल…

संजय केळकर यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार आणला उघडकीस

    अनिल ठाणेकर     ठाणे : अर्थसंकल्पावर भाष्य करताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेतील कोट्यावधींचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आणि मल प्रक्रिया केंद्राच्या…

भारतात सर्वप्रथम नवी मुंबई येथील सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्र-विजय नाहटा

नवी मुंबई : पूर्वी ज्येष्ठ नागरिक आरामासाठी कुठेतरी झाडाखाली बसत असत. आपण ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून, भारतात सर्वप्रथम नवी मुंबई येथील सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्र उभारले. आजही…

ठाणे बाजारपेठेतील ८० वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला

ठाणे : ठाण्यातील जांभळीनाका बाजारपेठेतील ८० ते ९० वर्ष जुन्या इमारतीचा भाग रविवारी कोसळला. ही इमारत रिकामी असल्याने दुर्घटना टळली. सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी इमारतीजवळ धोकापट्टी बांधली आहे.…

उल्हास खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे

उल्हास, भातसा, भारंगी, काळू नद्यांच्या पाणी पातळीत वाढ     कल्याण : रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातील उल्हास खोरे आणि ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री डोंगरांच्या रांगेत रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या खोऱ्यातून वाहणाऱ्या उल्हास, भातसा, काळू, भारंगी नद्यांच्या पाणी पातळीत शनिवारी रात्री पासून वाढ झाली आहे. कल्याण-डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोहिली, मोहने येथील पाणी पुरवठा केंद्रांच्या समतल पाण्याची पातळी वाढली आहे. मोहने ते टिटवाळा परिसर जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या कठड्यांना पाणी लागले आहे. पुलावरून पाणी वाहून जाण्यासाठी एक ते दीड फुटाची उंची बाकी आहे. पाण्याच्या पातळीमुळे टिटवाळा भागातील सावरकर नगर भागातील वस्तीत रात्रीपासून पाणी घुसले आहे. हा परिसर नद्यांच्या समतल पातळीत येतो. रात्रीपासून रहिवासी घरातील पाणी उपसण्यासाठी व्यस्त आहेत. सतत मसुळधार पाऊस सुरू राहिला तर कल्याणमधील दुर्गाडी परिसरातील बाजारपेठ, बैलबाजार भागात पाणी घुसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खाडी किनारच्या रहिवाशांनी स्थलांतराची, तबेले चालकांनी सावध राहून पाणी पातळी वाढील तर तबेल्यातून म्हशी बाहेर काढण्याची तयारी सुरू केली आहे. मुसळधार पावसामुळे पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. माहुली किल्ला परिसरा रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने सावरोली, शहापूर भागातून वाहणारी भारंगी नदी दुथढी वाहत आहेत. या नदी किनाऱ्याच्या वस्तीत पाणी शिरले आहे. अनेकांची वाहने पाण्याखाली गेली आहेत. तर काहींच्या दुचाकी वाहून गेल्या आहेत. भातसा, काळू नद्यांच्या पात्रात वाढ झाला आहे. या मुसळधार पावसामुळे भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे. रविवार सकाळपासून पावसाने उसंत घेतल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडकसागर या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला नसल्याने धरणांची तळ गाठला आहे. या धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. धरणांमध्ये पाणी नसल्याने सध्या मृत साठ्यांमधून शहराला पाणी पुरवठा केला जातो. रेल्वे मार्गांवर अडथळे मध्य रेल्वेच्या कसारा ते आसनगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्गावर झाड कोसळले होते. ते कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून या रेल्वे मार्गावरील वाहूतूक सुरळीत केली. वासिंद आणि खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान डोंगराच्या खचलेल्या मातीचा भाग रेल्वे रूळावर येऊन पडला होता. त्यामुळे रेल्वे रूळ ढिगाऱ्याखाली गेला होता. रेल्वे कामगारांनी तातडीने घटनास्थळी येऊन या रूळावरील चिखलमय मातीचा ढीग बाजुला काढला. कल्याण ते आसनगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान तिसऱ्या, चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामामुळे डोंगरभागात खोदकाम करण्यात आले आहे. हा खोदलेला भाग पावसाळ्यात खचून तो रेल्वे मार्गात मातीसकट वाहून येत आहे. ०००००

पावसामुळे जनजीवन विस्कळीत कल्याण कसारा रेल्वे सेवा 6 तास ठप्प

कल्याण : रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे आटगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रकवर झाड पडल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक 2 तासाहून अधिक काळ ठप्प होती. सकाळी 8 वाजता रेल्वे…

 ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’

अभियानात रेल्वे स्टेशन, बस डेपो व वर्दळीच्या जागी सखोल स्वच्छता मोहीमा     नवी मुंबई : दररोज नियमितपणे करण्यात येणा-या स्वच्छतेप्रमाणेच काही दुर्लक्षित जागांची सफाईदेखील विशेष मोहीमेव्दारे करण्यात यावी अशा प्रकारच्या नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या सूचनांनुसार आठही विभागांमध्ये सखोल स्वच्छता मोहीमा (Deep Cleaning) राबविण्यात येत आहेत. यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेऊन शहरात स्वच्छतेची चळवळ उभी करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त  सुनिल पवार आणि घनकचरा व्यवस्थापनाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली घणसोली विभागात विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त  संजय तायडे यांच्या पुढाकाराने घणसोली रेल्वे स्टेशन व परिसरात विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रेल्वे स्टेशन्सच्या स्वच्छतेची जबाबदारी सिडको महामंडळाची असली तरी नवी मुंबईच्या स्वच्छ शहर मानांकनात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये याकरिता आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका सखोल स्वच्छता मोहीमेंतर्गत रेल्वे स्टेशन स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आहे. या अनुषंगाने घेण्यात आलेल्या घणसोली रेल्वे स्टेशन स्वच्छता मोहीमेत पोलीस प्रशिक्षण घेत असलेले दळवी ॲकेडमीचे होतकरू युवक – युवती सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सहभागी झाले होते. तसेच राजीव गांधी महाविद्यालयातील एन.एस.एस. चे विद्यार्थी आणि स्वच्छताप्रेमी नागरिकही उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग अधिकारी  संजय तायडे यांच्या समवेत उप मुख्य स्वच्छता अधिकारी  राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी  विजय पडघन तसेच स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांनी विशेष योगदान दिले. सखोल स्वच्छता मोहीमेंतर्गत विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त  भरत धांडे यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे येथील पेट्रोल पंपांवरील शौचालय सफाईची विशेष मोहीम स्वच्छता अधिकारी  संजीव रोकडे यांनी स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता मित्रांसह राबविली. तसेच कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी  सुनिल काठोळे यांनी स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता मित्रांच्या सहयोगाने कौपरखैरणे बस डेपोमध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबविली. अशा सखोल स्वच्छता मोहीमांव्दारे दुर्लक्षित जागांप्रमाणेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते अशा ठिकाणांचीही स्वच्छता केली जात आहे. ०००००

कपिल पाटील फाऊंडेशनतर्फे मुरबाडमध्ये मंगळवारी विद्यार्थी गौरव

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती     मुरबाड : भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने मुरबाड येथे मंगळवारी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा ट्रॉफी व कॉलेज बॅग देऊन गौरव केला जाईल. तसेच अॅड. अदिती निटुरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन केले जाईल. मुरबाड येथील माऊली गार्डन येथे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होत आहे. त्यात मुरबाड तालुक्यातून चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी, तालुक्यातील विद्यालयात दहावी व बारावीमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकातील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व कॉलेज बॅग आणि दहावीत ७५ व बारावीत किमान ७० टक्के गूण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज बॅग देऊन गौरविण्यात येईल. त्याचबरोबर पदवी, पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत आणि कला-क्रीडा क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या व्यक्तिमत्वांचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक अॅड. अदिती निटुरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनही केले जाणार आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी एस. एल. पाटील यांच्याबरोबर दूरध्वनी क्र. ९६२३०४१६४७ व एकनाथ खाटेघरे क्र. ८३०८५१७८८८ यांच्याबरोबर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 0000