Category: क्रीडा

निखिल पाटीलचे नाबाद दमदार शतक

ठाणे प्रीमियर लीग टी – २० क्रिकेट स्पर्धा ठाणे : सामनावीर ठरलेल्या निखिल पाटीलचे नाबाद दमदार शतक, साहिल गोडेच्या ९१ धावा आणि गोलंदाजांच्या एकत्रित चांगल्या कामगिरीच्या जोरावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने ए.टी स्पोर्ट्सचा १९८ धावांनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर लीग टी – २० क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय मिळवला. फलंदाजांच्या आक्रमक खेळामुळे २५८ धावांचा पर्वत उभा केल्यावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाच्या गोलंदाजांनी ए,टी स्पोर्ट्सला ६० धावांवर गुंडाळत विजयावर शिक्कामोर्तब केले. दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर सुरु असलेल्या स्पर्धेतील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निखिल पाटील आणि साहिल गोडेने ए.टी. स्पोर्ट्सच्या गोलंदाजांचा अक्षरशः फडशा पाडला. निखिलने नाबाद ११८ धावांची खेळी केली. ४८ चेंडूत शतक साकारणाऱ्या निखिलने ९ चौकार आणि तेवढेच षटकार ठोकले. साहिलने ३६ चेंडूत ९१ धावांची बहुमूल्य खेळी साकारताना १२ चौकार आणि पाच षटकार मारले. धृमील मटकरने नाबाद ३० धावा केल्या. या डावात योगेश सावंतने दोन, अश्विन यादव आणि सिद्धार्थ यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. त्यानंतर मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ए टी स्पोर्ट्सच्या फलंदाजाना खेळपट्टीवर टिकू न देता गोलंदाजांनी विजयाचा मार्ग मोकळा केला. संक्षिप्त धावफलक : एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ( ब संघ ) : २० षटकांत ४ बाद २५८ ( निखिल पाटील  नाबाद ११८, साहिल गोडे ९१, धृमील मटकर नाबाद ३०, योगेश सावंत ४-२५-२, अश्विन यादव ४-४९-१, सिद्धार्थ यादव ४-५२-१) विजयी विरुद्ध ए टी स्पोर्ट्स : १२.१ षटकात सर्वबाद ६० ( कौशिक शुक्ला १८, शिवम घोष १५ , हेमंत बुचडे २-४-२, अमित पांड्ये २-७-२,अर्जुन शेट्टी २-७-२, धृमील मटकर १.१ – २-१, अमन खान १-४-१,नंदन कामत३-१३-१.) सामनावीर – निखिल पाटील.

गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंची चमक

मुंबई : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गाव चिखले, जि. पालघर येथे मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात , मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवानांनी भरघोस बक्षिसांची लयलूट केली. मनीषा शेलार हिने महिला गटातील फायनलची गदे वरील कुस्ती जिंकली. कोमल पटेल, मनस्वी राऊत, कविता राजभरने आपल्या लढती सहज जिंकून चषक पटकावले. सूरज माने, सूर्यकांत देसाई, आदर्श शिंदे, अभिषेक इंगळे यांनी देखील प्रतिस्पर्ध्यांना लिलया आस्मान दाखवून रोख रकमेची पारितोषिके आणि पदके मिळवली. या सर्व कुस्तीपटूंना वस्ताद वसंतराव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

बुजुर्ग क्रीडा प्रशिक्षक किसन कदम यांचे निधन

मुंबई : लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेचे माजी क्रीडा शिक्षक, बुजुर्ग क्रीडा प्रशिक्षक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त किसन  सखाराम कदम यांचे १ मे रोजी सकाळी चेंबूर येथील कोळेकर हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. निधना  समयी ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. चेंबूर हायस्कूल या चेंबूर च्या पहिल्या शाळेत काम करत असताना भ. मा. पंत यांच्या तालमीत कदमसर तयार झाले. बास्केटबॉल, खोखो, ॲथलेटिक्स अश्या विविध खेळांच्या स्पर्धांत राज्य व राष्ट्रीयस्तरावर कदमसर सहभागी झाले होते. त्यांनी या विविध खेळात अनेक खेळाडू तयार केले. त्यानंतर पंत सरांबरोबर जवाहर विद्याभवन व श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळा  स्थापन करून गरीब मुलांना शिक्षण देण्यात सरांचा मोठा वाटा होता. कदम सरांच्या १ खेळाडूला अर्जुन पुरस्कार, १४ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार, २२ खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाले. सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या खेळाडूंनी  आशियाई स्पर्धेत देखील भरघोस पदकांची कमाई केलेली आहे. चेंबूर येथील चरई स्मशानभूमीत कदम सरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टी-२० वर्ल्डकपसाठी कॅप्टन रोहीत शर्माच !

स्वाती घोसाळकर मुंबई- मिशन टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीनंतर टीमची घोषणा करण्यात आली. भारताच्या मिशन वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची कॅप्टन्सी पुन्हा एकदा रोहीत शर्माकडेच…

मॉर्डन क्रिकेट क्लब सलग दुसऱ्यांदा अजिंक्य

ठाणे : आकाश सावला आणि निशांत मानेने पाचव्या गड्यासाठी केलेल्या नाबाद १०८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर गतविजेत्या मॉर्डन क्रिकेट क्लबने माझगाव क्रिकेट क्लबचा ६ गडी राखून पराभव करत स्पोर्टींग क्रिकेट क्लब…

नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण यांच्यावतीने डोंबिवलीमध्ये भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार

ठाणे- नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ (डोंबिवली – कल्याण) यांच्या विद्यमाने सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 21 एप्रिल 2024 रोजी लोढा हेरिटेज मैदान, भोपर रोड,…

भारतीय पुरुषांचा अंतिम फेरीत ८५ धावांनी दारूण पराभव

कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेतील आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा दारूण पराभव करत इंग्लंड-एशिया कपावर नाव…

भारतीय पुरुष संघ अंतिम फेरीत श्रीलंकेविरुध्द खेळणार

इंग्लंड-आशिया इनडोअर क्रिकेट स्पर्धा कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेत भारताने साखळीतील शेवटचे दोन्ही सामने जिंकत अंतिम फेरी गाठली. इंग्लंडने साखळीत केलेल्या पहिल्या पराभवाची सव्याज परतफेड करताना अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला. गुणतालिकेत  श्रीलंका प्रथम स्थानावर असून पाठोपाठ भारत सुध्दा दुसऱ्या स्थानावर असून इंग्लंड व सिंगापूर अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर असून अंतिम सामन्यातून बाहेर फेकले गेले आहेत. आज भारतीय संघाने  इंग्लंडच्या पहिल्या पराभवाची सव्याज पराभवाची परतफेड करत स्पर्धेत पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारत अंतिम फेरीत स्थान मिळवले. भारतीय संघ गुणी असून अंतिम फेरीत भारत चमकदार कामगिरीची नोंद करेल असे प्रशिक्षक जयेश साळगावकर यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात १०२ धावा करताना सामन्यावर सुरवातीपासूनच वर्चस्व राखले होते. या सामन्यात भारताच्या विजय गौडाने (१६ धावा, १ बळी), धनुष भास्कर (१९धावा १ बळी), आफ्रोज पाषा (१९ धावा व २ बळी), कार्थिक सुब्रमनियन (१८ धाव ) व दैविक राय १ बळी) यांनी जोरदार कामगिरी करताना इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. तर इंग्लंडच्या अनिश पटेल (१७ धावा), टॉम क्लार्क ( १३ धावा १ बळी) व कॉर्नर रॉफ (१० धावा व २ बळी) यांची कामगिरी चांगली झाली.

इंग्लंड-आशिया इनडोअर क्रिकेट स्पर्धा

भारतीय पुरुष संघाला पराभवाचा धक्का कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेत रंगत भरली जात असून काल भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला व भारत (२०.५ गुण) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर फेकला गेला तर श्रीलंका (३५.५ गुण) व इंग्लंड (२१ गुण) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. या स्पर्धेत भारताला अजून एक सामना सिंगापूर विरुध्द खेळायचा असल्याने भारत अंतिम सामन्यात खेळताना दिसेल. इतर सर्व संघाचे साखळी सामने झाले असल्याने व त्यांना गुण वाढवण्याची कोणतीही संधी नाही. गुणतालीकेतील पहिले दोन संघ अंतिम सामना खेळातील. काल झालेल्या इंग्लंड विरुध्दच्या सामन्यात भारताचे खेळाडू प्रचंड दबावाखाली खेळताना दिसले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात ७५ धावा केल्या तर प्रती उत्तरादाखल…

महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या वतीने 2024-25चं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदाच्या वर्षी ७० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र कॅरम असोसिएशन एका विशेष कॅरम स्पर्धेचे आयोजन  करणार असून या स्पर्धेचे पुरुष गटाचे पहिलं पारितोषिक ७०…