Category: क्रीडा

कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्त राबविले विविध उपक्रम

कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्त राबविले विविध उपक्रम कल्याण : कल्याण पूर्व येथील कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्ताने विद्येची देवी माँ सरस्वतीची पूजा-अर्चा श्रद्धा व उत्साहात करण्यात आली. मिथिलाजन एज्युकेशनल सोशल अँड रिलिजियस ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कल्याणी दुर्गा माता मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन, सरस्वती पूजन, हवन तसेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. वसंत पंचमीच्या खास प्रसंगी मिथिलाजन ट्रस्टच्या माध्यमातून ज्ञानाची देवी माँ सरस्वतीची पूजा करण्यात आली तसेच शेकडो गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेची फी भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ही करण्यात आली. या उपक्रमाबाबत मिथिलाजन ट्रस्टचे अध्यक्ष संजीव मिश्रा यांनी सांगितले की, मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहेत आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. याच उद्देशाने दरवर्षी ट्रस्टकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी, सुमित झा, दीपक मिश्रा, केशरी पांडेय, आनंद झा आदींचे मोलाचे योगदान लाभले.

मिरा-भाईंदरचा कुस्तीपटू सूरज माने यांना राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक

मिरा-भाईंदरचा कुस्तीपटू सूरज माने यांना राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक मिरा – भाईंदर मिरा -भाईंदरचा प्रतिभावान कुस्तीगर सूरज माने याने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे झालेल्या २० वर्षांखालील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ७९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्राभरातील २० कुस्तगरांशी स्पर्धा करताना, मानेने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. मिरा -भाईंदर महानगरपालिकेच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या श्री गणेश आखाड्याचे प्रतिनिधित्व करत आणि क्रांतीवीर जी.डी. बापू लाड मिशन ऑलिम्पिक कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या मानेने छत्रपती संभाजीनगरच्या रुपेश धनवतवर १२-२ अशा एकतर्फी विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर त्याने सोलापूरच्या विवेक भालेकरवर १२-१ असा विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत सोहेल शेखला ११-४ ने पराभूत केले. उपांत्य फेरीत, मानेने धाराशिवच्या हृषिकेश भोसलेवर ८-६ असा विजय मिळवला. अंतिम फेरीत मानेचा सामना नाशिकच्या ऋत्विक सामोरेसोबत झाला. सामन्याच्या बहुतेक वेळेस आघाडीवर असूनही, मानेने शेवटच्या क्षणी काही महत्त्वाचे गुण गमावले आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मानेचे हे पहिले राज्यस्तरीय पदक आहे. श्री गणेश आखाड्याचे मुख्य प्रशिक्षक वसंत पाटील यांनी त्याच्या भविष्यातील यशाबद्दल विश्वास व्यक्त केला. अभिनव कॉलेजमध्ये कला शाखेच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या मानेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’त शौर्याला नतमस्तक अभिवादन

‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’त शौर्याला नतमस्तक अभिवादन पराक्रम दिनाला प्रचंड प्रतिसाद मुंबई, दि. (प्रतिनिधी) “स्वातंत्र्य मागून मिळत नाही… ते हिसकावून घ्यावे लागते!” या तेजस्वी विचारांचे मूर्त रूप असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पराक्रम दिनी, भारतीय शौर्य, त्याग आणि बलिदानाचा जिवंत इतिहास अनुभवायला मिळाला तो ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’ या भव्य, भावनांनी ओथंबलेल्या कार्यक्रमातून. प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन व नृतनाट्य प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात साकारलेला हा ध्वजांकित उपक्रम म्हणजे केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता तर तो होता सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जवानाच्या श्वासाचा, त्यागाच्या प्रत्येक थेंबाचा आणि मातृभूमीसाठी धडधडणाऱ्या प्रत्येक हृदयाचा जयघोष! या राष्ट्रभक्तीने भारलेल्या संध्याकाळी शौर्यचक्र विजेते सेवानिवृत्त हवालदार मधुसूदन सुर्वे (२१ पॅरा एस.एफ.) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रणांगणावर प्राणांची पर्वा न करता देशासाठी उभे राहणाऱ्या या वीराच्या उपस्थितीने संपूर्ण सभागृह भारावून गेले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या ‘ऑक्सिजन लेडी’ सुमेधा ताई चिथडे यांच्या कार्यकथनाने प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सियाचेनसारख्या दुर्गम प्रदेशात सैनिकांसाठी उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पांमागची त्यांची निःस्वार्थ भावना म्हणजे आधुनिक भारतातील देशसेवेचा तेजस्वी अध्याय ठरला.यावेळी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी ओंकार मुळ्ये, भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त ज्युनियर वॉरंट ऑफिसर नारायण वाडकर, तसेच राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त उपनिरीक्षक  मंगेश नाईक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरवाची झळाळी दिली. या सन्मानसोहळ्याला सांस्कृतिक अभिव्यक्तीची भावस्पर्शी जोड देताना युवकांनी सादर केलेल्या पारंपारिक नृत्य-संगीत सादरीकरणांनी भारताचा आत्मा प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभा केला. प्रत्येक ताल, प्रत्येक सूर आणि प्रत्येक भावात “जय हिंद” गुंजत होते. याच मंचावर ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचे दिग्दर्शक  विजय कलमकर तसेच ज्येष्ठ मॅरेथॉन धावपटू व सुवर्णपदक विजेते  महादेव समजीस्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या गौरवशाली पराक्रम दिन सोहळ्याला पितांबरी प्रॉडक्ट्स व इंडियन ऑइल यांचे मोलाचे प्रायोजन लाभले, तर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., सुनील दळवी एमएफ इन्व्हेस्टमेंट्स, जाधव फूड्स, अद्वैता वास्तु, बीऑ.न स्टोअर, रुचिसूत्र यांनी सहप्रायोजक म्हणून भक्कम साथ दिली.  ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’ हा कार्यक्रम म्हणजे एक संकल्प — देशासाठी जगण्याचा, एक श्रद्धांजली बलिदानाला आणि एक जागरण, प्रत्येक भारतीयाच्या मनातील पराक्रमाला!

जखमी कासवावर उपचार करून सोडले समुद्रात

जखमी कासवावर उपचार करून सोडले समुद्रात धवल लक्ष्मी हे स्थानिक नावही दिले कासवाने केला १८४७ किलोमीटरचा प्रवास योगेश चांदेकर पालघरः अरबी समुद्रालगत डहाणू येथे वन विभागांतर्गत सागरी कासव संक्रमण उपचार केंद्र आहे. या केंद्रात समुद्रात जखमी झालेल्या कासवांवर उपचार केले जातात. गेल्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण मध्य समुद्रात वावरणारे कासव डहाणूनजीक आढळले. हे कासव जखमी असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याला फिजिओथेरपी देण्यात आली. समुद्रात ते पोहण्यास सक्षम आहे, की नाही याचा विचार करून नंतर ते समुद्रात सोडण्यात आले. धवल लक्ष्मी हे कासव दक्षिण मध्य समुद्रात पोहोचले आहे. डहाणू येथील सागरी कासव संक्रमण केंद्र कासवांवरील उपचारासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ओलिव्ह रीडले, ग्रीन सी, लॉगर हेड, हॉक्सबीन यासारख्या कासवाच्या प्रजाती आढळतात. असंख्य समुद्र कासवांना जीवदान देण्याचे कार्य डहाणूच्या समुद्रालगत असलेल्या कासव संक्रमण उपचार केंद्रात केले जातात. फिजिओथेरपीने उपचार दहा ऑगस्ट रोजी ओलिव्ह रीले जातीचे कासव जखमी अवस्थेत आढळले होते. अशक्त व जखमी अवस्थेत कासव पाहिल्यानंतर तेथील मच्छीमारांनी वनविभागाला कळवले. वनविभागाच्या ‘रेस्क्यू टीम’ने या जखमी कासवाला सागरी कासव उपचार केंद्रात दाखल केले. कासवावर फिजिओथेरपी तसेच अन्य औषधोपचार करण्यात आले. स्टमक ट्यूबच्या मदतीने त्याला खाद्य देण्यात आले. जखमांवर योग्य ते उपचार आणि योग्य काळजी घेतली गेली. २९.६ किलो वजनाचे हे कासव महाराष्ट्रात प्रथमच आढळले. ते पोहण्यास सक्षम झाल्यानंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. अशा प्रकारचा हा प्रयोगही महाराष्ट्रात पहिलाच होता. सॅटेलाईट टॅगच्या मदतीने लक्ष या कासवाचा समुद्रातील प्रवास कसा असेल, यावर देखरेख ठेवण्यासाठी संशोधकांनी भारतीय वन्य जीवन संस्थेच्या मदतीने सॅटेलाईट टॅग बसवला. मादी जातीच्या या कासवाचे नाव धवललक्ष्मी असे ठेवण्यात आले. धवल कंसारा यांचे  ४ फेब्रुवारी २०२३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांची आठवण म्हणून तसेच डहाणूला असलेल्या महालक्ष्मी देवीमुळे या कासवाचे नाव धवल लक्ष्मी असे ठेवण्यात आले. वीस नोव्हेंबरला हे कासव समुद्रात सोडण्यात आले. धवल कंसारा यांनीच ‘ॲनिमल सेविंग ग्रुप’ स्थापन केला होता. त्यामुळे त्याचेच नाव या कासवाला देण्यात आले. आता ते समुद्रात सोडण्यात आले असून, त्याची अचूक दिशा सॅटेलाईटमधून कळते. सध्या ते डहाणूपासून १८४७ किलोमीटर अंतरावर दक्षिण मध्य समुदात आहे. कासवावर बसवलेले सॅटेलाईटची कालावधी एक वर्ष इतके आहे. त्यातील यंत्रणा ही कासव पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर पडल्यास कासवाची अचूक दिशा दाखवते. मासेमारांच्या जाळ्यात अडकून जखमी डॉ. दिनेश व्हिनेरकर व डॉ.जानवी जाधव, टीटीसीमधील प्राणी रक्षक रेमंड डिसोझा व प्रतिक वाहुरवाघ आणि ‘वाईल्ड लाईफ कन्झरवेशन’ आणि ॲनिमल वेलफिअर असोसिएशन’ चे सर्व सदस्य एरिक ताडवाला, पूर्वेश तांडेल, मानद वन्यजीव रक्षक हार्दिक सोनी व संपूर्ण वन अधिकाऱ्यांनी या कासवावर उपचार करून लक्ष ठेवले. सागरी कासव हे मुळात समुद्रात असलेल्या गाळ स्वच्छ करण्याचे काम करतात. अनेकदा ते मच्छीमारांच्या मासे पकडण्याच्या जाळ्यात पडतात. अशावेळी त्यांची सुटका जाळ्यातून होत नाही. त्यांना अंतर्बाह्य जखमा होऊ शकतात. बरेच मच्छीमार ही वेगवेगळी जाळी वापरत असतात. त्याला घोस्ट नेटजाळी’ म्हणतात. श्वास घेता न आल्याने त्याला जखमा होतात. त्याला ‘ल्फोटिंग सिंड्रोम’ असे म्हणतात. त्याच्या पोटात बऱ्याचदा प्लास्टिक दिसते. धवल प्राणीप्रेमी धवल लक्ष्मी नावामागे एक खूप मोठे कारण आहे, ज्या सागरी बचावासाठी व सागरी कासव केंद्र उभारणी करण्यामागे त्याने पहिले पाऊल उचलले. वन्यजीव रक्षक धवल कंसारा म्हणून नामांकित असा एक वन्यजीव प्रेमी होता. तो आज जगात नाही. त्यांच्या आठवणी टिकून राहाव्यात, म्हणून धवल असे व लक्ष्मी म्हणजे डहाणूमध्ये सुप्रसिद्ध असलेली महालक्ष्मी मंदिर आहे. त्याला अनुसरून धवल लक्ष्मी असे नाव त्या कासवाला देण्यात आले.

महाराष्ट्र पोस्ट, पश्चिम रेल्वे आणि ओम साईश्वर सेवा मंडळाची विजयी गर्जना!

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ वी खो-खो स्पर्धा – महाराष्ट्र पोस्ट, पश्चिम रेल्वे आणि ओम साईश्वर सेवा मंडळाची विजयी गर्जना! पुरुष व्यवसायिक विभागात मध्य रेल्वे वि. रचना नोटरी व पश्चिम…

ठाणे जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य उद्घाटन!

ठाणे जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य उद्घाटन! संदीप माळवी, रवींद्र प्रभुदेसाई, व चंद्रशेखर पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती ! यंदाच्या वर्षातील पहिल्या ठाणे जिल्हा अजिंक्यपद रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेला खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या सर्व भागातून १७ वर्षा पर्यंतच्या वयोगटातील ४०० खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा ठाणे महापालिकेचे क्रीडा प्रेमी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी तसेच पितांबरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड चे चेअरमन रवींद्र प्रभुदेसाई आणि नामवंत गुंतवणूक सल्लागार चंद्रशेखर पुरोहित तसेच सर्व खेळाडू व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.  संदीप माळवी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच  रवींद्र प्रभुदेसाई यांनी नारळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन केले.  पुरोहित यांनी बॅडमिंटन कोर्टाचे हार घालून पूजन केले. संदीप माळवी यांनी आपल्या भाषणात ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीची व त्याचे प्रमुख श्रीकांत वाड व सर्व प्रशिक्षक घेत असलेल्या अहोरात्र मेहेनतीबद्दल त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. तसेच  रवींद्र प्रभुदेसाई यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. व गरजू आणि गुणवंत खेळाडूंन साठी ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन करीत असलेल्या विशेष मदतीचा खास उल्लेख केला. तसेच पितांबरी लिमिटेड तर्फे आर्थिक मदतीचेही आश्वासन दिले. पुरोहित यांनी देखील ठाण्याच्या बॅडमिंटन पटूंच्या खास कामगिरी बद्दल गौरवोद्गार काढले.  या प्रसंगी राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील १४ वर्षीय वयोगटातील सुवर्ण पदक विजेता मयंक राजपूत चा खास सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत भागवत, राजीव गणपुले, तारक मोदी, सतीश शबराय,  मितेश हजारनीस,  संदीप कांबळे तसेच प्राजक्ता रानडे कांबळे हे ही उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष  श्रीकांत वाड यांनी केले.

 मैदान गाजवलं! महाराष्ट्राचा झंझावात प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण!

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मैदान गाजवलं! महाराष्ट्राचा झंझावात प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण! काझीपेठच्या रेल्वे ग्राउंडवर थरारक लढती; विजयी संघांची दिमाखात पुढील फेरीत झेप काझीपेठ (तेलंगणा):  येथील रेल्वे ग्राउंडवर सुरू…

 घुफ्रान – आकांक्षा विजयी                   

जॉली जिमखाना कॅरम स्पर्धा घुफ्रान – आकांक्षा विजयी विद्याविहार (पश्चिम) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३ री घाटकोपर जॉली…

 कल्याणच्या हर्षिणी चव्हाणला सुवर्णपदक

अस्मिता खेलो इंडिया युथ वेटलिफ्टिंग अजिंक्य स्पर्धा कल्याणच्या हर्षिणी चव्हाणला सुवर्णपदक कल्याण : अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या हर्षिणी प्रशांत चव्हाण हिने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक…

 ५१व्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर.

५१व्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर. परभणीच्या अतुल जाधवकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा. मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशीएशनने ५१व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता आपला संघ घोषित केला. परभणीच्या…