Category: होम

ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा;

पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका ठाणे / कल्याण : ठाणे आणि कल्याण शहरामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्याने ३ ते ४ दिवस अशुद्ध पाण्याचा पुरवठा होणार असल्याचे…

मरुबाईचा चैत्र नवरात्री उत्सवाचा दिमाखदार सोहळा

माटुंग्‍याच्या देवीचा ३५० वर्षांचा पुरातन इतिहास; दर्शनासाठी भाविकांची गर्दी मुंबादेवी : माटुंग्याच्या पंचक्रोशीत आपल्या चैतन्यमय आशीर्वादाची पखरण करणाऱ्या ३५० वर्षांचा पुरातन इतिहास असणाऱ्या मरुबाई मातेच्या चैत्री नवरात्री उत्सवाला मंगळवारी (ता.…

मुंबईत मराठी शाळा, मातृभाषा टिकवण्याचे आव्हान

मुंबई:- आणि आसपासच्या महानगरात मोठ्या प्रमाणात खासगी शाळांचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे गुणवत्ता असलेल्या मराठी शाळा बंद पडताना दिसत आहेत. अल्पसंख्याक शाळांची संख्या झपाट्याने वाढत असून येणाऱ्या काळात मुंबईत मराठी…

योगेश वसंत त्रिवेदी यांना राज्यस्तरीय

स्टार उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर मुंबई : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांना सर्वद फौंडेशन तर्फे राज्यस्तरीय स्टार उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वद फौंडेशनच्या सुचिता…

रसिकांच्या गर्दीने रंगला संगीत – नाट्य महोत्सव

मुंबई : संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीत-नाट्य महोत्सव दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात साजरा झाला. संस्था गेली १५ वर्षे संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी हा महोत्सव आयोजित…

दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही-एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी : नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

इंग्लंड-आशिया इनडोअर क्रिकेट स्पर्धेत भारत गुणतालिकेत अव्वल

भारतीय पुरुष संघाचा श्रीलंका डेव्हलपमेंट व सिंगापूरला दणका कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-आशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या…

महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या वतीने 2024-25चं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदाच्या वर्षी ७० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र कॅरम असोसिएशन एका विशेष कॅरम स्पर्धेचे आयोजन  करणार असून या स्पर्धेचे पुरुष गटाचे पहिलं पारितोषिक ७०…

रायगड लोकसभा मतदारसंघात पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये ३२ रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी  पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी…

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर महानगरपालिकेची कारवाई

पनवेल : महानगरपालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या ७५ झोपड्यांवर कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत, सदरची कारवाई पनवेल महानगरपालिकेने करत नागरिकांना मोठा दिलासा आहे. बेलपाडा गावाजवळ डोंगर परिसरात अनधिकृतरित्या झोपड्या बांधल्या जात असल्याची तक्रार भाजपचे खारघर शहर अध्यक्ष माजी नगरसेवक प्रवीण पाटील, ऍड. अमर उपाध्याय, कीर्ती नवघरे यांनी महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती. बेलपाडा गावाच्या मागे आणि डोंगराळ भागात उभ्या राहिलेल्या या झोपड्या सहजा नजरेत येत नाही मात्र या भूखंडावर अनधिकृतपणे झोपड्यांचे बस्तान बांधल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत होता.  त्यामुळे अशा प्रकारच्या झोपड्यांना आंदण मिळू नये आणि अशा प्रकारामुळे झोपड्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी अनधिकृत झोपड्यांवर वेळेवर कारवाईची गरज लक्षात घेता माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याकडे या संदर्भात तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार आज सकाळी प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त मारुती गायकवाड, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, अतिक्रमण विरोधी प्रमुख रत्नाकर जाधव, स्वच्छता निरीक्षक संदीप भोईर, अतुल मोहोकर आणि ५० कर्मचारी यांनी त्या ठिकाणी तीन जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत झोपडपट्ट्या जमीनदोस्त करत ती जागा पूर्ववत करून नागरिकांना दिलासा दिला आहे. या कारवाईबद्दल माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी समाधान व्यक्त करून प्रभारी आयुक्त प्रशांत रसाळ आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांचे दूरध्वनीवरून आभार मानले आहेत. तसेच अशा कारवाईमुळे अनधिकृतपणे झोपड्यांचा विळखा उभारणाऱ्यांना जरब बसली आहे.